'शेतकरी बापाने १० स्थळं पाहिले, पण शेती करतो म्हणून मुलीकडच्यांनी नकार दिला' | Maharashtra Times

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 12. 2022
  • #FarmersStory #marriage #maharashtranews
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    या महाराष्ट्रातला असा एक ज्वलंत विषय खान्देश आणि मराठवाड्यातून पुढच्या काही मिनिटात मी तुम्हाला समजावून सांगणार आहे, ज्याने उद्याचं भविष्य असणारी तरुण पिढी मानसिक तणावात आहे, त्यांचं दुःख ना कुणासमोर मांडता येतंय, ना त्यावर काही तोडग काढला जातोय.. शेतकरी बाप आपल्या लेकाचं लग्न जमवण्यासाठी दारोदार भटकतोय, त्याचा गुन्हा एकच आहे की तो शेतकरी आहे.. शेतीत काम करणाऱ्या तरुणांना लग्न जमवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतोय आणि यामुळे महाराष्ट्रातील लाखो तरुण नैराश्याच्या गर्तेत सापडलेत.. याचंच डोळे उघडणारं वास्तव, लग्न जमण्यासाठी नेमकं काय करायला हवं हे सगळं या व्हिडीओत पाहू.. ज्या शेतकऱ्याचं आपण देणं लागतो त्याला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी तुमच्या आयुष्यातली काही मिनिटं या व्हिडीओसाठी द्या.
    मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
    महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
    मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
    Social Media Links
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.com/+maharashtrat...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Komentáře • 1,7K

  • @maharashtratimes
    @maharashtratimes  Před rokem +85

    शेतकऱ्यांची ही परिस्थिती पाहता यावर काय पर्याय आहेत असं तुम्हाला वाटतं? व्हिडीओ पूर्ण पाहिल्यानंतर तुमचं मतही नक्की व्यक्त करा

    • @SwapnilPatil192
      @SwapnilPatil192 Před rokem +12

      आधुनिक शेती ! हमी भाव
      उत्पन्न वाढल्यास पैसा येईल आणि समाज आधुनिकीकरण महत्वाचे.

    • @rameshraghupati1050
      @rameshraghupati1050 Před rokem +9

      शेतकरी नको म्हणतात पण शेती पाहिजे , आता आपल्याला शेती सोबत मार्केटिंग व business कडे लक्ष द्यायला हवं. जगाला दाखीवल पाहिजे की शेतकरी कुनापेक्षाही कमी नाही. 👍👍

    • @vishalmore9002
      @vishalmore9002 Před rokem +3

      यावर चर्चासत्र व्हायला पाहिजेत विद्यापीठांमध्ये मोठमोठे कार्यक्रम व्हायला पाहिजे आणि शेतीला एक जवळ धंदा म्हणून आपण शेतीला व्यवसाय केला पाहिजे अरे भाऊ आमच्याकडे पण हीच परिस्थिती आहे मी ह हिंगणा काजी गावातील मलकापूर तालुका जिल्हा बुलढाणा एक शेतकरी मुलगा आहे माझं मास्टर सोशल वर्क झाला आहे..

    • @ratnparakhi4168
      @ratnparakhi4168 Před rokem +2

      महाराष्ट्र टाइम्स...तुम्ही काहीतरी करा या शेतकरी माणसांना... राजकारणी तर लुटायला बसलेत. कमीत कमी... मीडिया वाल्यानि यांना मदत केली पाहिजे...

    • @dnyandeorote9152
      @dnyandeorote9152 Před rokem

      शेतीमालास काॅर्पटर कंपनी सारखा भाव द्या

  • @sudarshanmaske3042
    @sudarshanmaske3042 Před rokem +706

    ज्या मुलीच्या बापाचे वय 45 ते 55 आहे त्यांना उभ्या आयुष्यात घरावरचे पत्र बदलणे झाले नाही... त्यांना मात्र 25-30 वर्षाच्या मुलाकडून पुण्यात फ्लॅट,नौकरी,चार चाकी वाहन पाहिजे अशी अपेक्षा आहे.

  • @hok507
    @hok507 Před rokem +588

    स्वतःच्या मुलीला नोकरीवाला नवरा पाहिजे
    आणि स्वतःचा मुलगा बेरोजगार म्हणून सून भेटत नाही
    मानसिकता बदलणे काळाची गरज

    • @happyjourney5439
      @happyjourney5439 Před rokem +38

      खर आहे भाऊ स्वताच्या मुलगा पानपट्टी बसतो जावई सरकारी नोकरी वाला पाहीजे

    • @Nmnnmnnikam5104
      @Nmnnmnnikam5104 Před rokem +2

      Khar aahe

    • @vilasdange5193
      @vilasdange5193 Před rokem +17

      हा मुद्दा फार महत्त्वाचा आहेयावर आवाज उठावणारा कोणीतरी हवा होता म. टा. तो उठवला त्याबदल आभारी आहे असाच काळ राहीला तर अराजक होईल समाजात याचे गंभिर परिणाम होतील

    • @ganeshgunjal4220
      @ganeshgunjal4220 Před rokem +11

      khr ahe mitra tuz..
      porinna well settled mulga pahij asto.. palun jayla tr koni pn chalto.. hotel chya room mdhe jayla koni pn chalto. hi fact ahe.. konala rag yeil maybe he read krun.. jyanna rag yeil te pn aaju bajula hya gosti bght ahe.. krupaya tyanni akkal shikwu naye.
      khup mothi gost ahe hi dada. khup kasht krun sudhha mulichya ghrche nakar detat tevha mulga pn depress hoto.
      sheti pahij.. jr sheti asel tr mg ti jast pahij.. job asel tr mg flat pn pahij city mdhe. sheti pn pahij aste gavakde.. porichya bapala tyachya gharache patre change krta krta aayushya nighun jate mg 25 to 30 varshacha ek mulga ks ky evdh sgl evdhya kmi vayat kru shakel.. vichar krnyasarkhi gost ahe hi..
      chhan point samor aanla .. utube channel che khup khup thaks...

    • @amitbagade6263
      @amitbagade6263 Před rokem

      खरच आहे

  • @ravindrajadhav2047
    @ravindrajadhav2047 Před rokem +287

    शेतकरी आपली मुलगी नोकरी वाला मुलगा पाहिजे भलेही तो एक गुंठा विकून लग्न करेल.....माझ्या मामाने शेत विकून पोलीस ला मुलगी दिली आणि माला नाही दिली तो पोलीस आता बेवड्या निघालं मामा बसला आता उपटत....मामा सलाम तुला

    • @Ramshete
      @Ramshete Před rokem +17

      मोठीविसनाल व्हिडिओ

    • @travellingkida4388
      @travellingkida4388 Před rokem +18

      भाऊ पोलीस आणि दुसऱ्या च्या नोकरीत तरी काय होते एक घर,गाडी,मुलाचे शिक्षण बाकी काही होत नाही,लोकांचा गैरसमज आहे की नौकरी वाला पाहिजे

    • @rupeshg.3327
      @rupeshg.3327 Před rokem +6

      😂😂😜

    • @blackpearl0076
      @blackpearl0076 Před rokem +10

      मामा कोमात

    • @chetanphalke8426
      @chetanphalke8426 Před rokem +33

      भावा तुझ दुःख लय मोठ आहे 😂 😂🤣

  • @ankush2711
    @ankush2711 Před rokem +101

    माझा एक सल्ला आहे कि आपण विधवा मुलीशी लग्न करावे असे जरा पाऊल उचला माझंही लग्न होत नव्हते अनेक ठिकाणी स्थळे पाहून झाली तरीपण जुळले नाही मग मी हा निर्णय घेतला समाजामध्ये अशा बऱ्याच मुली आहेत त्यांना आधार नाही त्यांना आधार द्या

  • @DK22227
    @DK22227 Před rokem +236

    समाज उपयोगी काहीतरी चांगली बातमी दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार असेच समाजिताचे काम करीत राहा गोरगरीबासाठी मदत करीत रहा

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 Před rokem +434

    आरे मोहीत 28 वर्षाच काय घेऊन बसला,आमच्या कडे 35 वर्षाची मुले अजून कुठलंही पाहुणे सुद्धा येत नाहीत,

    • @WAGH6789
      @WAGH6789 Před rokem +1

      महिलांची भ्रूणहत्या करा
      मोठा हुंडा घ्या
      सुना जा
      सुना विहरित धकलून द्या
      शेतीचा आणि पैशाचा माज करा
      हेच होतं
      कशी भेटणार पोरीगी
      साहेब दिवस फिरतात
      नियतीचा न्याय म्हणतात तो हाच
      आता मुलगी मिळण्यासाठी हुंडा द्यावा लागतो
      10 yr पूर्वीचे इंदुरीकर चे शब्द आहे
      100% खर

    • @bhikansingthoke3943
      @bhikansingthoke3943 Před rokem +10

      सगळीकडे हीच परस्थिती आहे

    • @rameshmuthekar8500
      @rameshmuthekar8500 Před rokem +24

      येत नसतात जावं लागत 😁🙏

    • @akashd2843
      @akashd2843 Před rokem +4

      🤣🤣

    • @tatyagavhane2452
      @tatyagavhane2452 Před rokem +12

      @@rameshmuthekar8500 अहो पण येतो तर म्हणावं लागेल की नाही,येतो म्हणाल्यावर सांगतात आम्हाला या वर्षी करायचं नाही, पुन्हा जमवून ठेऊ म्हणाल तर म्हणतात,ते आमच्या कडे नाही,मुलीचा मामा किंवा मावशी स्वतःच्या खर्चाने करणार आहेत, आम्हाला म्हणालेत आमचं आम्ही बघतो सगळा खर्च तेच करणार आहेत ,मग आता सांगा आपण म्हणता येत नाहीत नाही आपण जायचं असतं,कसं जाणार बोला, आणि हे माझ्यात कुणी लग्नाच आहे म्हणून म्हणत नाही,जी सर्व सामान्य परिस्थितीवर बोलतोय,

  • @asaramkure997
    @asaramkure997 Před rokem +94

    इंदुरीकर मागे दहा वर्षापूर्वी म्हणत होते .अर्धे पोरं बाबा होतील

  • @aniltawade6231
    @aniltawade6231 Před rokem +80

    अहो साहेब '
    प्रत्येक गावा गावातील ही समस्या आहे, काळ फार कठीण आहे.
    भिकार्‍या बरोबर पळून गेली तरी चाललेल
    पण शेतकरी नको.
    अशी मानसिक ता झाली आहे,

  • @maheshshinde1596
    @maheshshinde1596 Před rokem +82

    लग्नासाठी सध्या या दोन गोष्टी महत्त्वाच्या वाटत आहेत
    1) छोट्या शहरालगत एखादा वन बीएचके
    2) छोटीशी नोकरी आणि शेती
    3) उद्योगधंदा आणि शेती

    • @rameshmuthekar8500
      @rameshmuthekar8500 Před rokem +8

      झालं की मग येतात की लगेच पळत अजुन काय. पाहिजे

    • @DW-lp5ni
      @DW-lp5ni Před rokem +13

      Jyane ayushyabhar naukari karun saving keli tari tyala 1-2 acer sheti gheta yet nahi.. ani naukari pahije

    • @walter9011
      @walter9011 Před rokem

      @@DW-lp5ni barobar 👍👍

  • @bhaushebrupanavar4003
    @bhaushebrupanavar4003 Před rokem +37

    या वाघांना फक्त एक विचारा त्यांची बहीण आणि मुलगी शेतकरी बघून दिली आहे का नोकरी बघून ............

  • @yuvrajgharbude4585
    @yuvrajgharbude4585 Před rokem +131

    आजच्या चालू काळा मध्ये काम करण्याची प्रवृत्ती नसल्यामुळे आणि बसून खाण्याची प्रवृत्ती वाढल्यामुळे ही भयानक स्थिती उद्भवली आहे..

    • @panditdoke4035
      @panditdoke4035 Před rokem +7

      ही बात एक नंबर सत्य आहे , मुलींचे आई वडील हे शेतकऱ्याला कन्यादान करत नाहीत कारण ते गरीब माजुरे निघाली आहेत

    • @pd370
      @pd370 Před rokem +2

      @ Yuvraj----Question kaam karnya cha nahi pan kami salary muley problem ahey. Sakali 9 tay ratri 1 vaja paryant kaam ghetat ani salary agdi low, faqt shoshan hota tar mag naukri faqt lagna sathi kashala karaychi ani job security pan nahi aaj kaal. Engineer mulan la pan faqt 8000 salary miltay. Future agdi zero mag mulga lagna ka karnar. Ekach option girl friend barobar dating kara kiva foreign chya muli shi lagna kara.

    • @yuvrajgharbude4585
      @yuvrajgharbude4585 Před rokem +7

      @@pd370 मुलीच्या आई-वडिलांना वाटते आपल्या मुलीने काम करू नये , निवांत बसून खायला मिळावे. शेतकरी असला तर काही ना काही काम करावे लागते, नोकरी असली तर काय गरज नसते "असं त्यांना वाटतं."

    • @bhaubau6247
      @bhaubau6247 Před rokem

      @@yuvrajgharbude4585 ho na
      Bechari shetat pan kaam karnar Ani gharat pan fukat Rabwun ghenar....Ani he sagla karayla hunda pan dyaycha aai bapani...
      Tya peksha nokariwalyal hunda deun aaramat basun Tari Khail...

    • @gaikwaddayanand9617
      @gaikwaddayanand9617 Před rokem

      Correct 👌 👌 👌

  • @swapnalidhanawade6201
    @swapnalidhanawade6201 Před rokem +61

    एक वायरस आला होता तेव्हा समजल आमचे नोकरीचे पैसै संपले खायला पण काय नव्हते पण या नोकरीवाल्याला शेजारच्या शेतकऱ्यान मदत केली तब्बल सात महिन्याच फुकट राशन दिल.

    • @obc7523
      @obc7523 Před rokem +4

      शेतकर्‍यांनी फुकट दिले?

    • @swapnalidhanawade6201
      @swapnalidhanawade6201 Před rokem +1

      फोकट

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před rokem

      Starting la ch tyane sangitliy sthiti, mitra ne nako yeu sangitla

    • @obc7523
      @obc7523 Před rokem

      @Rohitफेक अकाउंट आहे ते येड्या

  • @d.m.5410
    @d.m.5410 Před rokem +80

    1no. मटा वाल्याचे आभार आहे . हे वास्तव आहे मराठवाडय़ातील

    • @shailendraborate6954
      @shailendraborate6954 Před rokem

      फक्त मराठवाडा नाहीतर सगळा महाराष्ट्र राज्य भर सर्व जाती मध्ये हा प्रॉब्लम आहे!
      इंजिनियर,फार्मा, बैंकिंग,प्राइवेट बेस्ट कंपन्या मधल्या आणि घरी शेती जमीन असलेल्याना इंटरकास्ट ही लग्न चालतात हल्ली!
      कुठल्याही समाजातील उच्चशिक्षित मुली वेल सेटल्ड आणि घरी जमीन शेती असलेले इंटरकास्ट ही पसंत करतात हे वास्तव

    • @trushaljore7980
      @trushaljore7980 Před rokem +2

      Sagalikade hech ahe

    • @ruralmaharashtra8043
      @ruralmaharashtra8043 Před rokem +4

      प महाराष्ट्र शेतकऱ्यांना हेच भोग भोगावे लागत आहेत दादा

    • @RokingAB
      @RokingAB Před rokem +2

      मि पण मराठवाड्यातला आहे.
      मराठवाड्याच बिहार झालं आहे

    • @chhayapalkar9059
      @chhayapalkar9059 Před rokem +1

      सगळीकडे हीच परिस्थिती आहे . मुली शेती नको म्हणतात म्हणून भाऊ खाजगी कंपनीत जातो पण तरीही परमनंट नाही सरकारी नाही म्हणून नकार येतो नोकरी चांगली पाहिजे सरकारी पाहिजे खाजगी असेल तर परमनंट पाहिजे त्यामुळे आम्ही खूप टेन्शन मध्ये आहे

  • @tusharnirgude8996
    @tusharnirgude8996 Před rokem +112

    सगळ्यात वाईट परिस्थिती आहे सगळ्यात नीच पणा मराठा समाजात आहे आमच्याकडे तर 35ते 38 वर्ष्याचे मूल आहे मी नोकरी ला असूनही 31व्या वर्षी लग्न झाले नोकरी ही पाहिजे जमीनही आणि बंगाल गाडी किती अपेक्षा असतात यांच्या

    • @saurabhsapkal5235
      @saurabhsapkal5235 Před rokem +6

      अगदी बरोबर भावा नातेसंबंध गाव हे पण आलंच

    • @MB-ex2jj
      @MB-ex2jj Před rokem +5

      Hunda kiti ahe maratha samajat

    • @SaurabhAkshu
      @SaurabhAkshu Před rokem +5

      लय नखरे असतात ह्या लोकांचे 😡😡

    • @hemantjadhav9015
      @hemantjadhav9015 Před rokem +2

      100% barobar

    • @avinashpawar1853
      @avinashpawar1853 Před rokem +2

      खरे आहे. कोणतं गाव

  • @ramgosavi9806
    @ramgosavi9806 Před rokem +139

    लग्न , न होणे ही मानसिकता खूप मुलांच्या डोक्यात घर करून बसलेली आहे पण खऱ्या अर्थाने बघितले तर लग्नाच्या पाहिले आणि लग्ना नंतर खूप काही बदलते अता तुम्हीच बघा लग्न झालेल्या मुलांची काय अवस्था होऊन बसलेली आहे पाहिले लग्न व्हावं म्हणून छोटी मोठी नोकरी शोधणे आणि लग्न करणे आणि लग्न झाल्यावर ती नोकरी सोडून पुन्हा गावात किवा पहिल्या ठिकाणी येऊन काम करणे मंग बायकोचे टोमणे ऐकणे कुठल्याही प्रकारचा सांसारिक अनुभव माहीत नसणे आणि नंतर पुन्हा डोक्यात नस्त लग्न केलं तर बरं झालं असतं हा विचार सतत करत बसणे म्हणजे आगीतून उठून फाफुत्यात जाऊन पडणे हीच अवस्था आज महाराष्ट्रात खूप ठिकाणी पाहायला मिळत आहे आज पाहायला गेले तर कोर्टात 90% केसेस ह्या डीवोस प्रकरणात चालू आहे ,,,,😭 लग्न नाही झाले म्हणून आयुष थांबत असे होत नाही आपल्याला सृष्टी ने एकदाच जन्म दिला आहे पुन्हा नाही देऊ शकत त्या मुळे त्या स्वतःला ओळखा आणि जीवनाचा आनंद घ्या 🥳🥳 आणि एक सांगू लग्न करणे ही एक मोह माया आहे हे प्रेतेकला जमजने खूप महत्त्वाचे आहे आज आपला देश सुध्दा संन्याशी लोकच चालवत आहे😁 त्या मुळे जीवनात आले आहे तर मन सोकत जगून घ्या इथे no once more 🏃हर हर महादेव 🙌

    • @maulinalawade3490
      @maulinalawade3490 Před rokem +3

      श्री विठ्ठल

    • @vaibhavkawade456
      @vaibhavkawade456 Před rokem +5

      जप नाम जप नाम 😂😂😂

    • @AK-iy3em
      @AK-iy3em Před rokem

      Manal bhava tula

    • @topgamer8292
      @topgamer8292 Před rokem +4

      तुम्ही सर्व छान लिहल आणि ज्या वाटत काही शारीरिक सुख पाहिजे त्याने ते वित्तीय /पैसे देऊन करून घेणे । आणि लग्न न करणे मजा करा

    • @viralsuch4953
      @viralsuch4953 Před rokem +1

      @@topgamer8292 hiv hoil 😅

  • @akshaypawar4900
    @akshaypawar4900 Před rokem +178

    लग्नाचा बाजारात नवीन मागणी आहे. मुलगा शेतकरी नको पण मुलाला 5-7 एकर शेती पाहीजे 🤣🤣

  • @rajeevkamra9120
    @rajeevkamra9120 Před rokem +129

    अरे भाऊ शेतकऱ्यांच्या मुलाचं काय घेऊन बसलाय? माझेच मित्र वय 36 सरकारी नोकरीला पण मुली नको म्हणतात कारण दर तीन वर्षाच्या महाराष्ट्रभर बदल्या नकोत, मुलाचे आई वडील बहीण भाऊ सोबत नको, त्याला मुंबई पुण्यात घर हवे, जमीन हवी आणि दिसायला सुद्धा चांगला पाहिजे........ Matrimonial site वर पोरी लिहितात की त्यांचा प्रोफाइल आई वडील हॅन्डल करतात आणि असं सांगून स्वतः हॅन्डल करतात आणि वरच्या गोष्टीवरून नकार देतात....... नकार की होकार त्यांचा प्रश्न आहे पण इतकं दिव्य पार पाडून सुद्धा मुली लग्नानंतर व्यवस्थित राहतील याचा काहीच भरोसा नाही.... माझ्या मित्रांपैकी 40% मित्रांचे घटस्फोट, कोर्टात केसेस किंवा उठसूट माहेर गाठून संसार मोबाईलवर करने असे प्रॉब्लेम झालेत....20-25% मित्र वरच्या भीतीने गप्प झालेत आणि उरलेले मित्र चालतंय चालू द्या म्हणत रडत पडत जगत आहेत जे वाढलं ते खायचं रात्री घरी कटकट नको म्हणून उशिरा जायचं जे होईल ते होऊ द्यायचं.

    • @shankarsargar188
      @shankarsargar188 Před rokem +7

      Yach sathi sanskar lagtat 🤫

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před rokem +3

      Koni pan asla tari bayko la sambhalta ala pahije re

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před rokem +3

      Ani Te software navach khul alay na bajara t te band kara kinva control kara jara tyala naitar baki saglya n la binlagna ch maraw lagel

    • @sushildurafe9037
      @sushildurafe9037 Před rokem +4

      हो एकदम खरें

    • @dhanajaykolhapur
      @dhanajaykolhapur Před rokem +5

      आलेली एस टी पकडावी लागते .volvo च्या नादी नाही लागायचे.

  • @atulkhandagale9289
    @atulkhandagale9289 Před rokem +21

    अहो पळून चालल्या हो मुली दुसऱ्या जातीच्या मुलांबरोबर😂😂

    • @sushildurafe9037
      @sushildurafe9037 Před rokem

      लांडया न बरोबर जास्त 😂🤣🤣🤣

    • @kisanweljali6277
      @kisanweljali6277 Před rokem

      भाडखाऊ आई बापणा हे चालते का

  • @vasu-tj5em
    @vasu-tj5em Před rokem +228

    मी तर आशाच सोडून दीली ..भगवे पताका घेऊन जातो आता आळंदी ला

    • @RahulArtFactory.
      @RahulArtFactory. Před rokem +18

      मी तर अश्रमाच खोलणारे

    • @suniljadhav340
      @suniljadhav340 Před rokem +4

      वासु नको रे बाबा नको वासु

    • @vijaykawade8365
      @vijaykawade8365 Před rokem +4

      जय हनमान ग्रुप की

    • @govindmarde3606
      @govindmarde3606 Před rokem +1

      Me pan bhau

    • @vip7947
      @vip7947 Před rokem +1

      वासू दहीवाळ आहेस का तू

  • @arunshelake8349
    @arunshelake8349 Před rokem +18

    हा तुमचा उपक्रम छान आहे. हा व्हिडीओ पाहून समाज जाग्रुत होईल अशी अपेक्षा करू या. नाही तर शेती करण्यासाठी कोणी मोठं धाडस करणार नाही.तसेच अन्नधान्याची टंचाई निर्माण होईल.देशाला अन्नधान्यासाठी इतर देशावर आवलंबून रहावे लागेल.

  • @shankarraomahalle6274
    @shankarraomahalle6274 Před rokem +21

    अशीच परिस्थिती विदर्भात सुध्दा आहे 🙏

  • @prakashlatke8931
    @prakashlatke8931 Před rokem +72

    मुलीना सगळं आयते पाहिजे चांगले चांगले पाहिजे मेहनत नको ही मानसिकता बदलली पाहिजे

    • @shubhamrajgade6449
      @shubhamrajgade6449 Před 5 měsíci +1

      ☘🍁 *कधीतरी स्वतःलाही पारखता आलं पाहिजे.*
      *ज्या अपेक्षा दुसर्यांकडून केल्या जातात,*
      *त्या स्वतःला पूर्ण करता येतील का हे ही पहावं.* 🍂🌿

  • @nikhilmore311
    @nikhilmore311 Před rokem +11

    धन्यवाद महाराष्ट्र टाईम्स तुमचं सत्य परिस्थिती मांडल्या बदल मुलींनी आणि मुलीच्या घरच्यांनी वीचार बदलायला हवे ...

    • @gokulmhais7402
      @gokulmhais7402 Před rokem

      धन्यवाद भाऊ

    • @maharashtratimes
      @maharashtratimes  Před rokem +2

      शेतकऱ्यांविषयी विचार बदलणं हाच आमचा हेतू आहे

  • @prashantm.3478
    @prashantm.3478 Před rokem +14

    ज्यांचं झालं ते म्हंतेत उगाच केलं...
    ज्यांचं होईना ते उतावळे झालेत 😂😂

  • @rahulvidhate8909
    @rahulvidhate8909 Před rokem +28

    पश्चिम महाराष्ट्रात ही स्थिती आहे भावा.

    • @shrikant285
      @shrikant285 Před rokem +2

      Purna Maharashtra madhe same situation aahe

  • @SUBHASH670
    @SUBHASH670 Před rokem +37

    माझा अनुभव:
    इंजनीअरिंग केली, नंतर 10 वर्ष mpsc केली- पास नाही झालो, वय 33 झाले होते,मग लग्न करायचं ठरवलं, पहिल्या दोन ठिकाणी नोकरी पाहिजे म्हटले
    तिसऱ्या ठिकाणी मुलगी इंजिनियरिंग ला होती, लग्न झाले, तिला पुढे शिकवले -स्वभाव पण चांगला
    नातेवाईकांमुळे लग्न झाले, त्यांना माझा स्वभाव आवडला

  • @gokulmhais7402
    @gokulmhais7402 Před rokem +21

    पाच ते आठ वर्षापुर्वीचे माझा मनातील भाकित आज जगासमोर महाराष्ट्र टाईम्स मध्ये आले खुप खुप धन्यवाद्

  • @nitinchinnawar6350
    @nitinchinnawar6350 Před 4 měsíci +8

    शेती मालाचे भाव भरपूर वाढलेत की सर्व बरोबर होईल

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 Před 4 měsíci

      शेतीमालाचे भाव भरपूर म्हणजे किती वाढणार?
      ग्राहकाला(end user) जो भाव परवडेल त्या भावाने शेतमाल विकावा लागतो, उगाच अनाठायी अव्वाच्या सव्वा भाव सांगून शेतमाल विकला जाणार नाही आणि खराब होऊन नुकसानच पदरी पडेल.
      उत्पादन खर्च कसा कमी करता येईल याच्यावर लक्ष देणे गरजेचे आहे.

  • @RAHULKUMAR-qh9zu
    @RAHULKUMAR-qh9zu Před rokem +8

    नाटक आहे मूली भेटत नाही म्हणून , मुलाला मूली कडून १०० अपेक्षा आहे, स्वत मात्र रावसाहेब होऊन डिंग्या हाकनार, सरवात महत्वाच म्हणजे मुलगी सुंदर गोरी, नाजुक, नौकर सारख़ राबनारी हवी, जनू काही गौतमी पाटिल मग काय घंटा लग्न होइल खंडया चे...
    😁😁🤣😁

  • @yuvrajadkar
    @yuvrajadkar Před rokem +253

    पंधरा-वीस वर्षापासून स्त्रीभ्रूणहत्या करताना मजा वाटली.. मुलगी नको आम्हाला वंशाला दिवा पाहिजे..भोगा आता कर्माची फळ..

    • @umeshdhawale394
      @umeshdhawale394 Před rokem +50

      मला तीन बहीणी तिघींचेही लग्न झालीत या तिघींचा मी एकटा भाऊ वय ३३वर्ष स्वताचा व्यवसाय ,वारकरी कुटुंब फक्त शेती कमी असल्या मुडे लग्न होत नाही ..विषेश म्हणजे माझ्या आई वडिलांनी कोणतीही भ्रूण हत्या केली नाही ....!!!

    • @anj6542
      @anj6542 Před rokem +6

      agadi barobar. Agadi 100% lokkanni asa nahi kelay pn he khup motha karan ahe ek.

    • @anj6542
      @anj6542 Před rokem +4

      @@umeshdhawale394 tumhala subbecha pudhil ayushya sathi nkkich changli mulgi bhetel. Ram krushn hari.

    • @umeshdhawale394
      @umeshdhawale394 Před rokem +1

      @@anj6542 राम कृष्ण हरि ...🙏🚩..।।।

    • @globalthings6774
      @globalthings6774 Před rokem +2

      Agadi barobar... Muli kami mhtlyas tya best asnare mula bghnar

  • @SJ_speaks
    @SJ_speaks Před rokem +4

    अतिसुंदर किंवा जास्त सुखवस्तू घरात वाढलेल्या किंवा मध्यमवर्गीय आसेल तरी ज्या मुलीने आयुष्यात कशाचे च टेन्शन घेतले नाही कधी काही काम केले नाही कुठले ध्येय नाही फक्त आपल्या घरच्या लोकांच्या भरवश्यावर राहून मौज मजा केली आहे अश्या मुली लाखो मे मिळतील तुम्हाला त्यांच्या घरचे निवांत आहेत आणि त्या पण कारण त्यांना माहिती आहे हुंडा मोजला की मला एक छान पैसेवाला शेतीवला बंगला वाला मुलगा मिळेल म्हणून अश्या पोरींच्या मागे जाण्या पेक्षा जबाबदार मुलगी भेटते का पाहा भले ती सुंदर नसेल तुमचं आयुष्य सुंदर होऊन जाईल

  • @ChandgadNews24media
    @ChandgadNews24media Před rokem +38

    नोकरदार नवरा पाहिजे म्हणून लग्नाला नकार देणा-या घमंडी मुलींच्या ऐवजी गरीब , असहाय्य मुलींशी लग्न करा. फालतू अटी लादणा-या मुलींच्या घरच्यांना किंमत देऊ नका. त्यांच्या नाकावर टिच्चून सुखी संसार करून दाखवा .

    • @Rupam_Patil_
      @Rupam_Patil_ Před rokem +17

      भाऊ, गरीब मुलींच्या पण खूप अपेक्षा आहेत आजकाल... स्वतः छोट्या सा खोलीत राहणार ..पण नवरा 2 bhk वला पाहिजे ...

    • @RajendraPatil-sm6fr
      @RajendraPatil-sm6fr Před 7 měsíci

      Garib jast harami aahet

  • @kiranargade2544
    @kiranargade2544 Před rokem +100

    ह्या अशा अवस्थेला सरकार जबाबदार आहे कारण शेतकऱ्याला सरकार हमीभाव देत नाही ..जाहीर निषेध सरकारचा.. 👍

    • @globalthings6774
      @globalthings6774 Před rokem +4

      Ha CZcams nishedh zala.... Jahir karycha asel tar sarpanch , circle sadsyasamor nished kara.....

    • @RCICICI
      @RCICICI Před rokem +4

      नाही मित्रा पोरी शेतकरी नवरा म्हणून नाही तर शेतात राबव लागेल म्हणून शेतकऱ्या सोबत लग्न करत नाही

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před rokem +2

      Rabun paise yenar astil tar muli lagn kartil, pan rabun gharche paise ghalun pan dhanda totya t janar asla bhav nahi mhanun tar kas karnar kon, ya var ek ch upay ahe ata shetkarya ne mansa n la upashi thewava kahi diwas tyashivay Annadata kay asto kalnar nahi

    • @kiranargade2544
      @kiranargade2544 Před rokem +1

      @@RCICICI फिक्स बाजारभाव असेल तर कष्ट करायला कुणी मागे पुढे पाहणार नाही

    • @sudhirkumardawale8375
      @sudhirkumardawale8375 Před rokem

      Agdi barobar

  • @gopalladdha5235
    @gopalladdha5235 Před rokem +5

    समाजाची खरी परिस्थिती दाखवणारा 1 चांगला व्हिडीओ बनवला तुम्ही तुमचे खूप खूप आभार🙏🏻👍

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 Před rokem +14

    आजकाल ची खरी परिस्थिती आहे,महत्वाची बातमी दाखवली आहे,धन्यवाद.

  • @madanjadhav6991
    @madanjadhav6991 Před rokem +19

    आहो आमच्या गावात पण 20 -22 मुल अशी आहे की 40 वर्षाची झाली पण अजून लगीन नाय . शेती त पण चांगलं कमावतात

  • @Sam-vw3il
    @Sam-vw3il Před rokem +16

    दादा सरकारी नोकरी वाल्यांची पण अशीच हालत आहे त्यांना मुलगी तर मिळते पण मुलीच्या बापाच्या अपेक्षा एवढे जास्त असतात की मुलाला शेती पाहिजे ती पण थोडीफार चालत नाही दहा-पंधरा एकर शेती पाहिजे फक्त नोकरीन काय होणार असं म्हणतात त्याच्यामुळे फक्त पैसे कमवा पोरीचा बाप काय ऐश्वर्या रॉय पण तुमच्याकडे पळत पळत येईल

  • @princearyan80
    @princearyan80 Před rokem +146

    सरकारी बाबुचा महागाई भत्ता वाढतो पण शेतकऱ्याच्या मालाचा भाव त्या प्रमाणात वाढत नाही.......

    • @umeshjadhav860
      @umeshjadhav860 Před rokem +14

      सरकारी बाबूच्या घरामध्ये वीस तारखे नंतर दाळ दाणा सगळा संपतो त्याला पगाराची वाट पहावी लागते, पण आमच्या शेतकरी राजाच्या घरात पोते पोते भरून असतात एवढा श्रीमंत आहे आमचा शेतकरी राजा तरीही नो एटीट्यूड आणि नो इगो

    • @anupbhau91
      @anupbhau91 Před rokem +1

      @@umeshjadhav860 चुप रे चमन
      तुजा कड़े शेती नसेल

    • @kailaskale7152
      @kailaskale7152 Před rokem +9

      सरकारी धोरण हे इंग्रज सारखे आहे पिक पिकलं की लुटलं जातंय

    • @princearyan80
      @princearyan80 Před rokem +1

      @Online Report भाऊ महाराष्ट्रात गेली 5 वर्षे ऊसाचा दर वाढलेला नाही... याउलट युरिया आणि इतर खतांचे दर दुप्पट झाले आहेत... खाजगी नोकरदारांचेही पगार वर्षाला वाढतोच की.....

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před rokem

      Asa asel tar shetkarya nni dubai chya raja kade jawa to sheti karnara la changla dar deto, Bharat sarkar la sangawe mag shetkarya nni ki tyanni ji Shetkarya la dusrya desha chi sheti karayla bandi ghatli ahe ti uthawavi

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 Před rokem +27

    विस तिस वर्षे मागे स्त्री भ्रूणहत्या केल्या आणि आता लग्नाला मुली कुठून आणायच्या

  • @bappasahebraut3091
    @bappasahebraut3091 Před rokem +4

    आपले सर्वांचे लाडके महाराज ह भ प इंदोरीकर
    यांनी 10वर्षा खाली सांगितलं होत ते आज खरंच झालं आहे

  • @bappasahebraut3091
    @bappasahebraut3091 Před rokem +15

    हे का झालं तर 15वर्षाखाली पोरांच्या बापानी लाइ माज दाखवला होता त्याची फळ आजची पिढी भोगत आहे 💯💯💯💯💯

  • @dilipghumare8748
    @dilipghumare8748 Před rokem +45

    दादा माझी परिस्थिती अशीच होती 35 नंतर माझा विवाह झाला पण मलाही त्याची किंमत मोजावी लागली आर्थिक आर्थिक

    • @dnyaneshwaravhad3965
      @dnyaneshwaravhad3965 Před rokem +3

      सध्या सगळीकडे हाच ट्रेंड चालू आहे

    • @saurabh1812
      @saurabh1812 Před rokem +2

      Abhinandan kiman bhetli tari

  • @kailashghuge2916
    @kailashghuge2916 Před rokem +10

    खरी हकीकत मुलींची संख्या कमी झाली आहे आज गावात वीस तरूण मुले आहे. आणि मुली चार ते पाच .

  • @mandgaonnagari4834
    @mandgaonnagari4834 Před rokem +24

    धन्यवाद विशाल भाऊ बातमी दाखवल्याबद्दल

  • @rajkumarghuge5151
    @rajkumarghuge5151 Před rokem +18

    नोकरी लागलेला मुलाने पण आता नोकरीवालीच मुलगी,करावी नाही तर करू नये ही विनंती

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před rokem +1

      Mhanje divorce hoyla.

    • @SK-xz4qw
      @SK-xz4qw Před rokem +5

      Are dada... Nokari wali keli ki lagla ayushyala ghoda... Shahani jobwale fakt shikleli mulgi karat ahet sadhya...

  • @sidgawali952
    @sidgawali952 Před rokem +5

    मुळात म्हणजे शेतकरीच आपली मुलगी शेतकऱ्याच्या मुलाला देयला तयार नाही ,मग शिकलेल्या लोकांच्या आणि नोकरदार लोक आपल्या मुली शेतकऱ्या कशे देतील अपेक्षा करन चुकीचं आहे.....💯❤️

  • @Mahesh_naik100
    @Mahesh_naik100 Před rokem +9

    ही परिस्थिती बदलण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करणे गरजचे आहे कारण मुलगी स्वतः ची असेल तर हे अपेक्षा चे डोंगर असतातच.

  • @bhaveshsapkalepatil9939
    @bhaveshsapkalepatil9939 Před rokem +47

    मी पण अल्पभूदारक शेतकरी आहे. पण स्वतःच्या मनगटात दम आहे आणि एक दिवस नक्की यशस्वी होईल... लग्न नाही झालं तरी हरकत नाही कारण असही ज्यांनी ज्यांनी बायका केल्या नाहीत तेच लोक आज सर्वोच्च पदांवर आहेत मोदी, योगी, बाबा रामदेव,सलमान, राहुल गांधी,...
    महत्वाची गोष्ट- वय फक्त एक आकडा आहे. बाकी काही नाही. ज्या दिवशी पैसा आला ना त्या दिवशी तुम्ही 35-40 चे जरी असला ना तरी तुम्हाला 20-22 वर्षाची पोरगी भेटेल ही सत्यता आहे. कित्येक उदाहरणे आहेत ही समाजातील

  • @laanat_beshumaar
    @laanat_beshumaar Před 5 měsíci +5

    अविवाहित राहून आपला निषेध नोंदवणे हेच गरजेचे आहे मुलांसाठी 👍

  • @rahulyedake1786
    @rahulyedake1786 Před rokem +11

    *मुलिंची खरच लग्न करायची आहेत का नुसती नाटकं करायची आहेत.......?????*
    कमी शिक्षण आहे - नको
    पगार कमी आहे - नको
    खेड्यात राहतो - नको
    स्वतःचे घर नाही - नको
    घरात सासू सासरे आहेत - नको
    शेत नाही - नको
    शेती करतो - नको
    धंदा करतो - नको
    फार लांब राहतो - नको
    काळा आहे - नको
    टक्कल आहे - नको
    बुटका आहे - नको
    फार उंच आहे - नको
    चष्मा आहे - नको
    वयात जास्त अंतर आहे - नको
    तो जिथे राहतो तो एरिया बरोबर नाही- नको
    एक नाडी आहे - नको
    मंगळ आहे - नको
    नक्षत्र दोष आहे - नको
    मैत्रीदोष आहे - नको
    सगळ्यालाच नकार देत राहिलात तर *मग लग्न कधी करणार*?
    संसार कुणाबरोबर करणार ?
    आई/ वडील कधी होणार ?
    सासू/सासरे कधी होणार?
    आजी/आजोबा कधी होणार ?
    बरं एवढया सगळ्या कारणांसाठी मुलाला नकार देत असताना मुलींमध्ये अशी कोणती खास गुणवैशिष्ट असतात हे आईवडील सांगू शकतील काय ? अनेक मुलींना संसार कसा करतात हे माहीत नसतं, तडजोड कशी करायची हे माहित नसतं, रोजच जेवण सुद्धा बनवता येत नाही काही मुलींना. मान्य आहे मुली हुशार आहे, शिकलेल्या आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यापेक्षा हुशार जावयाची, त्याच्या लठ्ठ पगाराची, त्याच्या प्रॉपर्टीची अपेक्षा ठेवणार त्या अपेक्षा पूर्ण होत नाही म्हणून स्थळांना नकार देत राहणार आणि मुलीचं वय वाढत राहणार... या सगळ्यात नुकसान होतंय ते कमी पगार असलेल्या चांगल्या स्वभावाच्या आणि निर्व्यसनी मुलांचं... ज्यांना मनापासून जोडीदार हवा असतो पण मुलींच्या, त्यांच्या आईवडिलांच्या आणि नातेवाईकांच्या वेलसेटल च्या व्याख्येत ते बसत नाहीत त्यामुळे ते मागे पडतात,
    मुलाचा लग्नाच्या वेळेस असलेल्या पगारावर मुलीच्या भविष्याची चिंता त्यांच्या पालकांनी करण्यापेक्षा त्या मुलावर विश्वास दाखवून मुलीच त्याच्यासोबत लग्न करून देण गरजेचं आहे, कारण त्या मुलाचा जो पगार आता आहे तोच भविष्यात राहणार नाही, त्यात दरवर्षी वाढ होत राहणार आहे तसंच लग्न झाल्यावर त्या मुलाला पण त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी, भरारी घेण्यासाठी नवीन उत्साह, उमेद, बळ मिळणार आहे आणि पगार चांगला आहे म्हणजे मुलगी सुखी राहील हा एक गैरसमज आहे, भविष्यात काय होईल हे कोणालाच माहिती नसतं, त्यामुळे राजाचा रंक आणि रंकाचा राजा होऊ शकतो.
    हल्ली लग्न म्हणजे मुलामुलींपेक्षा त्यांच्या आईवडिलांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी स्टेटस सिम्बॉल चा विषय झालेला आहे.
    माझा जावई डॉक्टर, इंजिनीअर, MBA, C A, MCA आहे हे सांगण्यात, एवढं लाखाचं पॅकेज आहे हे सांगण्यात पालकांना मोठेपणा वाटतं आहे आणि तसं स्थळ मिळावं यासाठी प्रत्येक मुलीचा, मुलीच्या आईवडिलांचा आणि नातेवाईकांचा प्रयत्न असतो, पण सर्वांनीच अशा अपेक्षा ठेवल्या तर बाकी मुलांनी करायचं काय ? त्यांची लग्न कशी होणार हा प्रश्नच आहे.
    जेव्हापासून लग्नात माणसापेक्षा शिक्षण, पैसा, प्रॉपर्टी याला जास्त महत्व आलंय तेव्हापासून नवरा बायको मध्ये भांडणाचं आणि घटस्फोट होण्याचं प्रमाणही वाढलंय हे सत्य विसरून चालणार नाही.
    लग्नात भौतिक सुखांपेक्षा मानसिक सुखाची, आधाराची, समजूतदार पणाची जास्त गरज असते.
    पुढच्या जन्मात मनुष्य देह मिळेल की नाही माहिती नाही,
    स्वर्गातून भगवंत नेहमी तथास्तु म्हणत असतो.
    आणि आपण सगळ्याच गोष्टीत नकारात्मकता ठेवून या जन्मातला सगळा अर्थच संपवून टाकतोय.
    आईवडिलांनी आपल्या मुलाचा / मुलीचा सुखाचा विचार जरूर करावा,
    पण तो करताना त्यांच्या वाढत जाणाऱ्या वयाचं आणि निघून चाललेल्या वेळेचं भानही आईवडिलांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी ठेवायला हवं, कुठेतरी थांबायला हवं आणि अपेक्षांवर अडून न बसता तडजोड करून पुढे जायला हवं, कारण अपेक्षा या कधीच न संपणाऱ्या असतात...🙏🏼

    • @ushadeshmukh6781
      @ushadeshmukh6781 Před 5 měsíci

      अगदी खरे आहे दादा. माझी मुलगी साठी जेव्हा स्थळ पहायला सुरवा त केली तेव्हा खरच वास्तव कळाले.माझी गुण मिलानालेक्षा मुलाचा स्वभाव... व्यवहारी जगाशी समजून कसा घेणार.कष्टाची तयारी.रुपापेक्षा गुणाला महत्व देणारा आणि आपल्या आई वडिलांना मन सन्मान देणारा.त्यांच्या कष्टाचं मोल जपणारा.कुटुंबाला महत्व देणारा असा मुलगा हवा. घराचं घरपण असेल तिथे सोयरिक करायला हवी......

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 Před 4 měsíci

      हे खरे वास्तव आहे, पण लोक कळले तरी सहजासहजी स्वीकारायला तयार नाहीत.

  • @vaijanathwadje4908
    @vaijanathwadje4908 Před rokem +52

    अगदी बरोबर🙏🙏..Ded केलेले पोरं कधी हारणारे नाहीत. तू लढ मित्रा फक्त. ही वेळ पण बदलेलं. 👍👍बेरोजगारीवर सरकार काही मार्ग काढत नाही. त्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. 🙏🙏

    • @obc7523
      @obc7523 Před rokem +3

      सरकारने काय मार्ग काढायचा

    • @pradipbaste2889
      @pradipbaste2889 Před rokem +2

      Na layak sarkarne sarv sheti walyache hal kele

    • @obc7523
      @obc7523 Před rokem +5

      @@pradipbaste2889 कर्ज माफी देते, करमाफी देते, सबसिडी नुकसानभरपाई देते अजून काय हवं?

    • @DW-lp5ni
      @DW-lp5ni Před rokem +1

      🍌🍌🍌

    • @victorstarc5620
      @victorstarc5620 Před 4 měsíci +2

      100 टक्के
      मी पन d.ed krun नंतर पोलीस झालो आणी आता si
      आहे

  • @sudarshanmaske3042
    @sudarshanmaske3042 Před rokem +17

    I.T. क्षेत्रात आता LAY OFF चालू आहे. म्हणजे चालू जॉब वरून हाकलून देणे.

  • @nitindeshmukh6640
    @nitindeshmukh6640 Před rokem +53

    हा नको..तो नको..करून मुली पण 30/35 च्या घरात गेलेल्या आहेत....मुलींच्या बापावर पश्चातापा ची वेळ आलेली आहे.."अती शहाणा त्याचा बैल रिकामा..."

    • @sanketdeshmukh7490
      @sanketdeshmukh7490 Před rokem +4

      25 chya war mulgi geli ka Tila bai mhantat

    • @Pramod-wd5sj
      @Pramod-wd5sj Před rokem +3

      @@sanketdeshmukh7490 ho lagn n karta 🖕ghalun ghenari Bai 😂

  • @bantipatil6301
    @bantipatil6301 Před rokem +12

    Mohit maza मित्र आहे लहान पना पासून आम्ही सोबत शिक्षण घेतलं... तो हुशार आहे खूप ... तो शेती पण o नोकरी पण चांगल्या प्रकारे करू शकतो याचा मला त्याचा वर पूर्ण विश्वास आहे

  • @sachindamse9925
    @sachindamse9925 Před rokem +4

    पैसा म्हणजे सुख ही संकल्पना बदलली पाहिजे तरच शक्य 🙏

  • @bhagavatkalyankar2058
    @bhagavatkalyankar2058 Před rokem +19

    उगाच बोंबा मारु नका निरव्यसनी आणि ते चरित्र चांगले असलेल्या पोरगा असल्यास कोन पन पोरगी देइल🌱🛠🔥शेतकरी👳💦

    • @SK-xz4qw
      @SK-xz4qw Před rokem +4

      Are bhava... Bahutek tu city t rahatos... Gavakad changlya character la kay kami nahi pn lokkanna job wala pahije

    • @laxmanbirajdar7990
      @laxmanbirajdar7990 Před rokem

      💯💯💯💯💯💯💯💯💯💯👍👍👍👍👍👍

    • @akankshakashid9639
      @akankshakashid9639 Před rokem

      Barobar aahe

    • @RajendraPatil-sm6fr
      @RajendraPatil-sm6fr Před 7 měsíci

      Ghanta nahi det
      Tula Kay ghanta mahiti

  • @dilipghumare8748
    @dilipghumare8748 Před rokem +52

    प्रत्येक समाजातच अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे भाऊ

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před rokem +2

      Marathi n madhe ch hi sthiti jast ahe. Gujrat wagere kade paha asa nahiye. Village life with om and family channel paha to shetkarya cha ch ahe

    • @operatorgroup786
      @operatorgroup786 Před rokem

      @@deshmukh7354 are to tr majha dairy farming cha mast favourite channel aahe mi tya video madhunch shiklo dudh kadaycha 4 varsha aadhi

  • @kale537
    @kale537 Před rokem +7

    खूप सुंदर video आहे त्यामुळे लोकांचे डोळे उघडलीत

  • @indiaup2236
    @indiaup2236 Před rokem +11

    काही नाही शेवटी मी स्वतः उच्च शिक्षित आहे पुण्यात जॉब करतो लोकडॉऊन नंतर पाहिल्यादाच आलो वय 25 आतापर्यंत शिक्षण केलं आता कोरोनानंतर कुठे जॉब करेल म्हणून आलो पुण्यात फक्त 14 हजार रुपये पगाराची नौकरी करतो ते पण कॉन्ट्रॅक्ट बेसेसवर कधी लाथ देतील ते माहीत नाही गावी 6 एकर जमीन एकुलता एक पण शिकल्यामुळे आणि सगळीकडून काही तरी मुलाने करावं म्हणून पुण्याला येऊन जॉब बघितला दुसरा पर्याय नाही पण इथले खरे हाल पाहून वाटत नाही जास्त दिवस मी इथे राहील खर बगायच गेलं तर मुलीच्या बापाला आणि मुलींना कळायला पाहिजे शहरात काहीही नाही खरी मज्जा गावी राहूनच आहे भले तुम्ही शेतात काम करू नका पण गावीच राहा इथे 2 दिवस पण घरी राहू शकत नाही एव्हडी परिस्थिती बिकट आहे आणि खरे दिवस आता शेतकऱ्यांचे येतील भविष्यात हे नक्की

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před rokem

      Ya video madhe surwati la ch tyane sangitli ahe sthiti, shahara til mitra ne sangitla yeu nako ith sthiti bikat ahe

  • @dnyaneshwarsuryawanshi8663

    खरे आहे खूप अवघड झाले राव शेतकऱ्याचे

    • @WAGH6789
      @WAGH6789 Před rokem +1

      महिलांची भ्रूणहत्या करा
      मोठा हुंडा घ्या
      सुना जळा
      सुना विहरित धकलून द्या
      शेतीचा आणि पैशाचा माज करा
      हेच होतं
      कशी भेटणार पोरीगी
      साहेब दिवस फिरतात
      नियतीचा न्याय म्हणतात तो हाच
      आता मुलगी मिळण्यासाठी हुंडा द्यावा लागतो
      10 yr पूर्वीचे इंदुरीकर चे शब्द आहे
      100% खर

  • @macchindrasadhye4024
    @macchindrasadhye4024 Před rokem +13

    सर्वप्रथम महाराष्ट्र टाईम चे खूप खूप आभार गावा गावातील गंभीर परिस्थिती दाखवल्याबद्दल ज्या मुलांना सरकारी नोकरी व अल्पभूधारक आहे त्यांनी लग्नाची अपेक्षा ठेवू नये.

  • @ashishwalke4117
    @ashishwalke4117 Před rokem +74

    स्वतः पण शेतकऱ्याला मुलगी द्यायची, आणि नसेल मिळत तर विधवा मुलीशी लग्न करा समाजाला आदर्श राहाल..

    • @yogeshtambe8107
      @yogeshtambe8107 Před rokem +11

      भाऊ विधवा मूली सुद्धा नौकरी वलाच पाहिजे ह्या गोष्टी वरती आडूण बसले य

    • @ashishwalke4117
      @ashishwalke4117 Před rokem +6

      @@yogeshtambe8107 दाद्द्या गरीबाची मागायची ते करणारं रे, मग आपण विचार नाय करायचा की ती अशी तशी दिसतेय म्हणून, आपल्या सोबत दुसऱ्यावर उपकार करून मरणे खूप चांगले असते..

    • @yogeshtambe8107
      @yogeshtambe8107 Před rokem +6

      दादा तुमच्या मताशी मी सहमत आहे पण जो अनुभव मला अला आहे तो मी सांगितला आहे असे कितेक उद्धरण आहे लग्न झालेली मुलगी असेन किंवा विधवा असेन शेतकरी मुलगा नको य पण शेती पाहिजे असे म्हणाऱ्या खूप लोग आहे आणि हे लोक शुद्ध दूसरे कोणी नसून आपले शेतकरिच लोक आहे पण शेतकऱ्याला मात्र मुलगी देत नाही ही घरच खूप मोठी शोकांतिका आहे

    • @najiyakothali7725
      @najiyakothali7725 Před rokem

      Te nahi karnar te..

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 Před 4 měsíci

      ​@@yogeshtambe8107ह्याला म्हणतात शेतकऱ्याचा दुटप्पीपणा.

  • @sunilmahajan799
    @sunilmahajan799 Před rokem +15

    खंरच आजची वास्तव स्थिती आहे ,शेतकरी कडे बघण्याचा दुष्टीकोन बदलला पाहीजे, शेतकरी हा जगाचा पोंशिदा आहे , वावर आहे तर पावर आहे

  • @santhoshjaybhaye1495
    @santhoshjaybhaye1495 Před rokem +8

    अगदी बरोबर खरी वस्तुस्थिती आहे, भाऊ पण काय करणार भाऊ कुठेतरी मानसिकता बदलण्याची काळाची गरज

  • @maheshpawar4314
    @maheshpawar4314 Před rokem +38

    शेतकऱ्यांना प्रतिष्ठा मिळाली पाहिजे..
    हाच एक मार्ग आहे...

    • @sonucheke3313
      @sonucheke3313 Před rokem +1

      शेतकरयाला उत्पादन खर्चावर आधारित मालाला भाव स्वतः मिळवायला पाहिजे तेव्हा हि परिस्थिती बदलेल

  • @sunilpatil880
    @sunilpatil880 Před rokem +11

    प्रत्येकाला मुलगा हवा होता त्याच एक कारण आहे......त्याच परिणाम 30 वर्षांनी जानऊ लागल

  • @boyfromsambhajinagar
    @boyfromsambhajinagar Před rokem +5

    Demand and Supply...मुलींचा गर्भपात केला आधी आता तेच भोगत आहेत सर्व... निसर्गाचं payback आहे हे...किंमत मोजावी लागेल..आता मुलींची संख्या वाढत आहे पण त्याचा परिणाम खूप दिवसांनी समोर येईल... कुठेतरी समतोल असणे महत्वाचे आहे.

  • @santoshsuryawanshi390
    @santoshsuryawanshi390 Před rokem +25

    लग्न जरी होत नसेल तरी काळजी करू नका आई वडील भाऊ बहिण हेच आपले कुटुंब आहे .शेवट चा श्वासापर्यंत

  • @anandtayde7378
    @anandtayde7378 Před rokem +7

    खुप छान बातमी लावली समाजातील वास्तव समोर आणले

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza Před rokem +9

    मुली नाही म्हणजे वंशाचा दिवा पाहिजे. मुलींना पोटात मारून टाकल्यामुळे आज हे दिवस आले आहेत 🙏

  • @panash6
    @panash6 Před 5 měsíci +1

    किती तरी छान मुले /नवरदेव आहेत ही मुले. शहरातील लाखाचा जोब करणा-या व्यसनी मुला पैक्षा , अंगाने धडधडीत, खमकी, मातीत काम करणारी ही मूले खूप छान

  • @vasantpatait1611
    @vasantpatait1611 Před rokem +11

    विशाल बडे सर तुमचं खूप खूप आभार.. मठाचे पण आभार.. खूप छान विषयाला वाचा फोडली त्याबद्दल तुमचे धन्यवाद.. सत्य परिस्थिती 👍👍

    • @sandipmane7064
      @sandipmane7064 Před rokem +1

      मी सांगली मधून बोलतोय मी एम काम झालो आहे माझा वाहन व शेती व्यवसाय आहे माझा महिना 70,000 येणे आहे तरी कोण मुलगी देत नाही माझे वय 33 आहे या ला शेतकरी च जबाबदार आहे कारण शेतकरी शेतकर्यांना मुलगी देत नाही

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před rokem

      @@sandipmane7064 changlay ki, porgi kon det nahi tula, tuch nakarat asashil muli

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před rokem

      Marathi n madhe ch hi sthiti jast ahe. Gujrat wagere kade paha asa nahiye. Village life with om and family channel paha to shetkarya cha ch ahe

    • @SK-xz4qw
      @SK-xz4qw Před rokem

      @@deshmukh7354 Tu kay channel ch promotion karayla aala kay ith... 🤣🤣

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před rokem

      @@SK-xz4qw are prashnay re sadhya😆

  • @Abhi-zb8uy
    @Abhi-zb8uy Před rokem +8

    Love marriage काळाची गरज.

  • @tanajiadhav124
    @tanajiadhav124 Před rokem +16

    मुलींच्या आई बापाला, मस्ती फार आहे

    • @dadasan
      @dadasan Před 5 měsíci +2

      पंचवीस तीस वर्षांपूर्वी हीच परिस्थिती उलट होती भावा.. हजारो पोरींचा जीव घेतलाय हुंड्यासाठी पोरांच्या आई बापांनी. आता कसं गोड वाटत आहे.

  • @NileshZope-ob2kg
    @NileshZope-ob2kg Před 6 měsíci +2

    खरंच सांगू आज काल मुलींना बायका नवरा पाहिजे म्हणजे मुलगा आई बाबा पासून वेगळा राहणारा आणि शेतकरी आई बाबा सोबत राहतो म्हणून तो आवडत नाही शहरांत वेगळे वेगळे राहतात म्हणून शहरातील मुलगा आवडतो

  • @sportsfans581
    @sportsfans581 Před rokem +7

    आत्ता शेतकरी मुलांचे हाल होत असले तरी, एक दिवस शेतकर्याचांच असेल...आणि हे कोरोणानी दाखवून दिलं आहे...

  • @saandeepwaghmodee6026
    @saandeepwaghmodee6026 Před rokem +8

    किती शेतकऱ्या ने स्वतः चा मुली शेतकऱ्या ला दिल्या 🤔🤔🤔

    • @kisanweljali6277
      @kisanweljali6277 Před rokem +2

      ही खरी शोकांतिका आहे

  • @nileshchaudhari291
    @nileshchaudhari291 Před rokem +16

    खूपच छान बातमी लावली.अभिनंदन मटा चे

  • @user-hb3jn2fl9t
    @user-hb3jn2fl9t Před 4 měsíci

    आपको मेरा धन्यवाद,आपने किसानो कि समस्या लोगों तक पहुंचाया

  • @struggleforexistence3742
    @struggleforexistence3742 Před rokem +69

    This is real ground level condition

    • @pawarvilas26
      @pawarvilas26 Před 5 měsíci

      Land ahet hi mule 😂 sheti kratat sheti 2 acre 😂 dushkal padla ki suicide 😢 tumhich sanga aaliya unstable life chiya mulana kon mulgi denar ani most of the gavti mule nashedi charsi astat mg hich bevdi boykola martat kon denar hya yedzvayna na mulgi😅 mi pn shetkari putra aahe amhi mi mazi sister che lagna software engineer la dele ❤

  • @dilipghumare8748
    @dilipghumare8748 Před rokem +24

    म्हणजेच शेतीला नोकरी इतका मोबदला मिळाला पाहिजे तरच हा प्रश्न सुटण्यास सुरुवात होईल

  • @wisesoul269
    @wisesoul269 Před rokem +14

    Modiji be like- na biwi rakhunga na kisiko rakhne dunga 😂😂

  • @devghotale7908
    @devghotale7908 Před rokem +5

    शेतकरी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की माझ्या प्रत्येक शेतकरी बंधूंनी नाराज न होता आपल्या व्यवसायामध्ये प्रगती करावी व्यवस्थित घर घरासमोर गाडी दहा ते पंधरा लाख खात्यावर ज्याच्या आहेत त्याला मुलगी प्रत्येक पिता देणार फक्त आपली कुवत दाखवली पाहिजे बांधवांना विनंती आहे माझी

  • @sunilpatil5807
    @sunilpatil5807 Před rokem +3

    यू ट्यूब वरील सर्वत्तोम , सुंदर व्हिडिओ
    समाज कसा वाढणार,, पिढीचा नायनाट होईल आणि आता जे मुल मुली उपवर आहेत ते म्हातारे दिसायला लागतील,,, आणि त्यात मुली चे वय वाढल्याने त्यांची सुंदरता कमी होत आहे मुल त्यांना पसंद करत नाही, या वर मुला मुलींच्या आई वडील यांनी विचार करावा

  • @studypoint5320
    @studypoint5320 Před rokem +5

    मुली कुणाच्या शेतकर्‍याची मग शेतकरी च शेतकर्याला मुलगी देत नाही ही तर तुमचीच चूक आणि तुम्हीच रडताय वा रे! डबल गेम 🙏🙏🙏🙏

  • @bumbbardingshow4040
    @bumbbardingshow4040 Před rokem +41

    अरे मी 22 वर्षाचा आहे. Combine exam देण्यासाठी girlfriend ला जास्त वेळ देत नाही. आता ही परिस्तिथी पाहून वाटत आहे. Exam द्यायची राहुद्या girlfriend वरच फोकस करून लग्न करावं 😥🥺😟😥. अवघड आहे ना😑😑

    • @youtubeindian8604
      @youtubeindian8604 Před rokem +2

      😂

    • @amitbhau
      @amitbhau Před rokem +27

      भावा तुझ्या एकट्याचीच नसेल रे ती,आणखीन 4-5 ला फिरवत असेल. तू अभ्यास कर रे अगोदर 🙏

    • @sangram1760
      @sangram1760 Před rokem +10

      Tu abhyas kar ti jail combine STI kinva PSI clear kelelyasobat

  • @harshal5570
    @harshal5570 Před rokem +16

    City मधील Standard Lifestyle पाहिजे सर्वांना ..... गांधीजी उगाच म्हणत नव्हते की खेड्याकडे चला. त्यांची दूरदृष्टी तेव्हा होती की खेडी समृद्ध करा. खेड्यातील जीवनमान सुधरवा. गांधीजींच्या दुरदृष्टीनुसार जर ग्रामीण भागाचा विकास असता तर ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारली असती त्याचबरोबर lifestyle पण शहरासारखी असती....

    • @victorstarc5620
      @victorstarc5620 Před 4 měsíci

      Pn आंबेडकर म्हणाले होते शहरांकडे चला

  • @armylavar8357
    @armylavar8357 Před rokem +22

    कोणती पण बघायची भाऊ . भेटतील तितके आहेत. खचून जाऊ नको प्रयत्न करत रहा. एक मे एक दिवस सक्सेस होशील. 😁😁👍👍👍

  • @devidaswagh279
    @devidaswagh279 Před rokem +10

    खर म्हणजे आता शेती बरोबरच शेतीवर आधारित उद्योग प्रक्रिया पण शेतकरी मुलांनी प्रयत्न केले पाहिजेत

  • @Shlokyadav5577
    @Shlokyadav5577 Před rokem +3

    फ्यूचर शेतकारी मनसाचे आहे ..👍🙏

  • @pawankhandekar1121
    @pawankhandekar1121 Před rokem +60

    जो पर्यंत बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत मुला - मुलींचे लग्न वयात होणे कठीणच (आजची परिस्थिती)😔

    • @pd370
      @pd370 Před rokem +2

      @ Pawan----Berojgaari nahi pan mahgai pramane salary nahi milat becoz pratyak company kiva bank swatacha profit pahtay ani employee la kami salary madhe 16 taas kaam ghete. Mag lagna ka karaycha ? Girl friend kara pan sex noka karu becoz doghan la tras honar faqt kissing and pressing paryant limit theva, khup phira movies bagha ani dating kara . Hach navin paryay ahey.

    • @sumit.s7535
      @sumit.s7535 Před rokem +1

      बेरोजगारीचा प्रश्न तेव्हाच सुटेल जेव्हा लोकसंख्या कमी होईल(खरी परिस्थिती

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před rokem

      Starting la ch tyane sangitliy sthiti, mitra ne nako yeu sangitla

    • @upscaspirant02
      @upscaspirant02 Před rokem +1

      Bhartat jansankhya pahun hech kaltay ki sarkar saglyanna ch job kasa denar ?

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před rokem

      @@upscaspirant02 jithe loksankhya kami ahe tith saglya n la job ahe ka?

  • @rohanraje8033
    @rohanraje8033 Před rokem +17

    मला शेती नाहीये तरी सुद्धा शेतकरी बांधवांचे हे दुःख मी समजू शकतो...आजकाल समजाचा दृष्टिकोन च असा झालाय की सगळ्यांना नोकरदार च मुलगा पाहिजे , खर सांगायचं तर शेतकरी घराला सुद्धा आपल्या मुलीसाठी शेतकरी नको तर नोकरदार हवाय, ही परिस्थिती लवकर बदलायला हवी नाहीतर लवकरच भारतात (कृषी प्रधान देशात) शेतकऱ्यांचा च तुडवडा होईल
    या व्हिडीओ मध्ये एका शेतकरी भावाचं एक वाक्य अगदी मनाला लागलं आणि म्हणून मी ही कमेंट करायला मजबूर झालो, सहजासहजी मी कमेंट करत नाही. ते वाक्य म्हणजे, "जर आम्ही 2 वर्ष पिकवलं च नाही तर नोकरी वाले काय करणार"? अगदी मनाला भिडला हा प्रश्न...
    ही परिस्थिती बदलायला हवी

    • @deepakgund9622
      @deepakgund9622 Před rokem

      या सर्वांला मुलगा व मुलगी यांच्या जन्म दरतील विषमता, गर्भलिंग निदान कारणीभूत आहे. नवीन अपत्य जन्माला घालताना मातापित्यास आपल्या घरी मुलगा जन्मास यावा व मुलगी दुसऱ्या घरी जन्मास यावी असे वाटते, पुढे जाऊन आपल्या मुलासाठी मुलगी लागणार याचे भान राहात नाही. या सरवास राजकीय व सामाजिक दृष्टीकोनाचा आभाव कारणीभूत आहे.

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 Před 4 měsíci

      नको पिकवू 2 वर्ष, नोकरदार आयात केलेला खाईल; तो शेतकरी काय खाणारेय हे सांग म्हणाव.

  • @nitinborey7587
    @nitinborey7587 Před rokem +2

    हेंरब कुळकर्णी सर तुम्ही केलेल्या उल्लेख अगदी बरोबर

  • @gurudevm5249
    @gurudevm5249 Před rokem +2

    खरंच वाईट परिथिती महाराष्ट्रमध्ये 😔

  • @chandrakantavasare7425
    @chandrakantavasare7425 Před rokem +13

    साहेब माझे वय आज 35 वर्ष असून माझेही लग्न बाकी आहे , आजकाल मुलीवाले नोकरीवाल्यांना मुली देतात पण आमच्यासारखे मुलं येवढं शिकून काय केलं पाहिजे . तसे तुम्ही सांगा आमच्यासारख्यांनी काय करावं . सरकार आज मुलींना नोकरी देताहेत व मुलांना कामावरून खाली करून मुलींना नोकरीवर ठेवता.पण मुंबई मध्ये महिला व मुलींवर कंपनीमध्ये अन्याय होताना दिसून येतयं..
    आजच्या 21 व्या शतकात मुली महाविद्यालयीन बॉयफ्रेंड च्या प्रेमात पडून पळून जातात तरीही ह्या मुलीवाल्यांना काहीच उमजत नाही कारण की मुलं-मुलींकडे लक्ष द्यायला आजकाल आई वडलांना वेळच मिळत नाहीये. धुळ्यातही मुलं आहे ज्यांची अंदाजे संख्या 30,000 पर्यत असून त्यांना नोकऱ्या नाही त्यामुळे मुलीवाले मुली देण्यास नाकारता. काहीतर लग्न न जमल्याने किंवा लग्न जमलं पण मुलगी दुसऱ्याच कुणाबरोबर पळून जाते .तेव्हा मुलाकडचे विचारात पडता की आता माझ्या मुलाचे काय होईल ?? त्याच विचारात मुलीवाले सुद्धा गोंधळून जातात कारण की त्यांनी मुलीसाठी लग्नाचा व साखरपुड्याचा येवढा खर्च केला अन् मुलगी एेनवेळेस तिच्या प्रियकरासोबत पळून जाते. हे मुलीवाल्यांना कळायला हवे.की कोणाला मुलगी द्यायची (स्वमेहनत करणाऱ्याला की ,आई-वडलांच्या जीवावर बसून मजा मारणारा ),माझ्या भावांनो ,मी सुद्धा तुमच्यातलाच एक आहे तेव्हा आपण सर्वांनी मिळून एकच करायचे की आता मुलीवाल्यांना त्यांच्याच भाषेत धडा शिकवायचा.. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩जय शिवराय🚩🚩

    • @rohitbobafe8591
      @rohitbobafe8591 Před rokem

      Barobar

    • @hemantganorkar4261
      @hemantganorkar4261 Před 5 měsíci

      आणि आता तर हे आयटी, सॉफ्टवेअर सेक्टर मार्केट मध्ये आल्यामुळे ..शहरात आणि गावांमध्येही , इतर क्षेत्रातील मुलांना मुली मिळत नाहीत . आम्ही आमच्या मुलींना सिव्हिल इंजिनिअर , यांत्रिकी अभियंताला देणार नाही ...कारण आयटी क्षेत्रातील सर्वोच्च पॅकेज . मी पण सिमेंट कंपनीत नोकरी करतो ..पण मुलींच्या अपेक्षा एवढ आहेत की जास्त लाखाचं पॅकेज वाला मुलगा पाहीजे त्याना.. मी पण तुमच्यातलाच आहे ...परंतु शेतकर्यांचा दुख खरच खुप मोठ आहे.....

  • @anilkumarkarande5033
    @anilkumarkarande5033 Před rokem +11

    वास्तव आहे. शेतकरीच शेतकऱ्यांना मुली देत नाही. कारण शेती व्यावसाय तोही बागायतदार पाहिजे.तर काही तरी ठिक. शेतीला भविष्य नाही. आपर कस्ट आणि शेवटी पदरात काही पडत नाही.
    शेतकरीचा कारणीभूत आहेत. आईन वेळी
    मत चुकिचे देतात.

  • @digambarjeughale8918
    @digambarjeughale8918 Před rokem +2

    एकाच नंबर आहेत 👌. 👌 👌 👌

  • @vivek1703
    @vivek1703 Před rokem +3

    चांगली न्युज दिल्याबद्दल म.टा. चे आभार

  • @rahuldesale9261
    @rahuldesale9261 Před rokem +10

    जरा वेळीच छताखालची नोकरी बघा . . . . . .
    असं आमचा बाप आम्हाला म्हंटला व्हता.