उसाची लागवड केव्हा करावी।कोणत्या महिन्यात ऊस लागवड करावी।ऊस लागवड हंगाम

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2021
  • उसाची लागवड केव्हा करावी।कोणत्या महिन्यात ऊस लागवड करावी।ऊस लागवड हंगाम
    बाळ भरणी,खते,माती,आड,करणे,पॉवर टिलर,टिलर,tiller,power,weeder,विडर,ऊस नवीन लागवड खते मातीआड करणे वीडर/टिलरच्या साह्याने Use of Tiller/Weeder to Make manuar under soil
    Music:Happy Ukulele
    Musician:Marphologiya

Komentáře • 24

  • @Ab-li5pd
    @Ab-li5pd Před 2 lety

    खुप छान व्हिडियो सर

    • @shetisamadhan
      @shetisamadhan  Před 2 lety +1

      धन्यवाद दादा 🙏🙏🌈🌺

  • @user-ri1hj7gh8v
    @user-ri1hj7gh8v Před 21 dnem

    डिसेंबर ला ऊस लागवड केली तर

    • @shetisamadhan
      @shetisamadhan  Před 21 dnem

      शक्यतो 25 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर दरम्यानच उसाची लागवड करावी हा उत्तम कालावधी आहे परंतु शक्यच नसेल तर डिसेंबर महिन्यात सुद्धा आपण लागवड केली तर हरकत नाही परंतु थंडीचे प्रमाण जास्त असल्या कारणामुळे उगवणीवर थोडा परिणाम होतो त्याचप्रमाणे कारखाना नोंद करणे गरजेचे आहे सर्वात प्रथम आपण हे पहा की आपला कारखाना खरोखर ऊस घेऊन जाणार आहे का ऊस तोड कामगार आपल्याकडे कशा पद्धतीने काम करतात कारण अलीकडे आमच्या भागात ऊस तोडणे हा अत्यंत खर्चिक झालेला आहे लवकर ऊस घेऊन जात नाहीत त्यामुळे उसाचे उत्पन्न चांगले असूनही ऊस लागवड करणे मी बंद केलेले आहे आपल्या भागात कारखाना जर नक्कीच ऊस घेऊन जात असेल लागवड डिसेंबर मध्ये ही करू शकता शक्यतोवर 15 डिसेंबर च्या आधी लागवड करावी धन्यवाद

  • @jagulavhate7834
    @jagulavhate7834 Před 2 lety +1

    फेब्रुवारी महिन्यात ऊसाची लागन केली तर

    • @shetisamadhan
      @shetisamadhan  Před 2 lety +1

      राम राम साहेब आपल्या मेजला उत्तर देण्यासाठी उशीर झाला त्या बद्दल क्षमस्व
      1 ऊस लावण्या आधी आपला साखर कारखाना फेब्रुवारी ची नोंद घेतो का हे सर्व प्रथम खात्री करा
      2 माझ्या अनुभवा प्रमाणे फेब्रुवारी तील ऊस लागवड फारशी फायदेशीर नाही कारण ऊन वाढत जाते पोंगे मर होते , खत दिल्या नंतर पाणी देणे आवश्यक आहे सध्या mseb वीज पुरवठा होत नाही
      तसेच उसाचे क्षेत्र ही जास्त आहे

  • @yogeshnigade5220
    @yogeshnigade5220 Před 2 lety +1

    डिसेंबर मध्ये केली तर

    • @shetisamadhan
      @shetisamadhan  Před 2 lety +1

      राम राम योगेश निगडे साहेब, शक्य असेल तर नोव्हेंबर च्या शेवटच्या आठवड्या पर्यंत लागवड करावी डिसेंबर मध्ये लागवड करण्यासाठी पहिल्यांदा कारखान्याची संपर्क साधून नोंद होते का ते पाहावे व नोंद कारखाना घेत असेल आणि पर्यायच नसेल तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये ची लागवड पूर्ण करावी त्यापेक्षा पुढे जाऊ देऊ नये

    • @yogeshnigade5220
      @yogeshnigade5220 Před 2 lety

      धन्यवाद👌👍

    • @shetisamadhan
      @shetisamadhan  Před 2 lety

      🙏🙏

  • @RitikSingh-nu9vh
    @RitikSingh-nu9vh Před 2 lety

    क्या बीज मिल सकता है

    • @shetisamadhan
      @shetisamadhan  Před 2 lety +1

      नमस्ते रितिक भाई गन्ने का बीज हमारे पास उपलब्ध नही है सॉरी, वैसे आप कोनसे शहर से है आपके कॉन्टॅक्ट डिटेल्स और ईमेल एड्रेस

    • @RitikSingh-nu9vh
      @RitikSingh-nu9vh Před 2 lety

      आप भाई को राम राम गन्ना बीज की वीडियो हिन्दी में जानकारी चाहते हैं

    • @shetisamadhan
      @shetisamadhan  Před 2 lety

      @@RitikSingh-nu9vh धन्यवाद! अगले कुछ ही दिनो मे हिंदी मे व्हिडिओ उपलब्ध होगा

  • @kiranbavachkar2139
    @kiranbavachkar2139 Před rokem

    आक्टोबर मध्ये ऊस लागवड करावी का

    • @shetisamadhan
      @shetisamadhan  Před rokem

      राम राम किरण साहेब, नक्की आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये उसाची लागवड करू शकता, जास्तीत जास्त 15 नोव्हेंबर पर्यंत उसाची लागवड करावी त्यानंतर शक्यतोवर टाळावी. तसेच ऊस लागवड करण्यापूर्वी आपल्या आजूबाजूला उसाचे क्षेत्र किती आहे व आपले कारखान्यांमध्ये शेअर्स आहेत का कारखाना आपल्या उसाची नोंद कोणत्या तारखेपर्यंत घेऊ शकतो व तसेच ऊस जाण्याची खात्री आहे याचा विचार करूनच उसाची लागवड करावी कारण उसाचे क्षेत्र जास्त झाल्यावर ऊस लवकर जात नाही ऊसतोड कामगार भरपूर मोठ्या प्रमाणात पैसे घेतात व आपण केलेला खर्च सुद्धा निघत नाही तेव्हा या सर्व बाबींचा विचार अवश्य करावा धन्यवाद

  • @vilaspathare947
    @vilaspathare947 Před rokem

    दादा नमस्कार, मार्च मध्ये ऊस लागवड केली तर जमेल का, कारण आत्ताच खुपचं उन पडले आहे,, पुढे तर अवघड होऊन बसले तर मग...

    • @shetisamadhan
      @shetisamadhan  Před rokem

      राम राम साहेब,
      1) ऊस लागवडीचा खरा सुवर्ण कालावधी हा 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर असा आहे.
      2) माझ्या अनुभवाप्रमाणे 30 नोव्हेंबर नंतरची लागवड त्यातल्या त्यात फेब्रुवारी मार्च या महिन्यात तर उसाची लागवड करूच नये कारण उन्हाचा पारा वाढलेला असतो उसाची कोवळे कोंब या उन्हामध्ये तक धरत नाहीत त्यामुळे पोंगे मर भरपूर होऊन तुटाळ होते.
      3) तसेच फेब्रुवारी मार्च मध्ये लागवड केल्यानंतर संपूर्ण उन्हाळाभर काम करावे लागते खत द्यावी लागतात एखादे जरी पाणी चुकले तर त्याचा मोठा दुष्परिणाम होतो व परिणामी उत्पन्न कमी होऊन नुकसान होते.
      4) मार्च महिन्यात आपण उस लागवडीचे नियोजन करत असाल तर त्याआधी कारखाना याची नोंद घेणार का त्याची खातर जमा करावी
      5) बरेच शेतकरी अडसाली उसाची लागवड करतात म्हणजे साधारण जून महिन्यामध्ये उसाची लागवड होते परंतु माझ्या अनुभवाप्रमाणे जून महिन्यापासून जर सारखा पाऊस लागून राहिला तर उसाची योग्य ती मशागत होऊ शकत नाही अक्षरशः खते सुद्धा आपण टाकू शकत नाही त्यानंतर बाळबांधणी मोठी बांधणी या तर गोष्टी लांबच राहिल्या आणि उसाचा सर्वसाधारण मशागतीचा कालावधी पहिले तीन ते चार महिन्याचा असतो त्यानंतर ऊस मोठा होतो व त्यामध्ये कुठलीही मशागत करता येत नाही तेव्हा माझ्या अनुभवाप्रमाणे मला असे वाटते की उसाची चांगले उत्पन्न घ्यावयाचे असेल तर एक ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीतच उसाची लागवड करावी.
      6) उसाची लागवड करताना कारखाना ऊस घेऊन जाण्याची नक्की हमी देतो का हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण योग्य वेळेत ऊस जर कारखान्याला गेला नाही तर त्यापासून भरपूर प्रमाणात नुकसान होते उत्पन्न कमी होते तसेच ऊस तोड टोळी ही अवाजवी पैसे मागून अडवणूक करते शेतकऱ्याला ऊस कारखान्या व्यतिरिक्त दुसरीकडे कुठे पाठवणे परवडत नसल्या कारणामुळे निमुटपणे जो खर्च येईल तो करून ऊस कारखान्याला टाकावा लागतो तेव्हा या सर्व बाबींचा सखोल विचार करावा ऊस लावण्याआधी नंतरच ऊस लावावा.
      🙏🙏🙏🍀🌿🌺
      आपलाच एक शेतकरी
      शेती व समाधान

  • @ramakantchichondikar4140
    @ramakantchichondikar4140 Před 8 měsíci

    उसासाठी कोणता पावर विडर

    • @shetisamadhan
      @shetisamadhan  Před 8 měsíci

      VST, BCS कंपनी चे पॉवर टिलर उसासाठी वापरू शकता, आपण ज्या भागात शेती करता त्या ठिकाणी लोकल डीलर पहावा जेणेकरून सर्व्हिस चा प्रश्न निर्माण होते नाही यासंदर्भात इतर ही बरीच माहिती चा विचार करणे गरजेचे आहे आपला फोन नंबर द्यावा🙏🙏
      खालील लिंक वर क्लिक करून हा व्हिडिओ पहावा
      czcams.com/video/hBTDXBh6G9Q/video.html

  • @sagarrandive2139
    @sagarrandive2139 Před 11 měsíci

    सोयाबीन चे पीक काढून मग लागण होईल का
    सोयाबीन चा बेवड चांगला असतो असं म्हणत्यात
    प्लीज सल्ला द्या

    • @shetisamadhan
      @shetisamadhan  Před 11 měsíci

      नमस्कार दादा
      नक्कीच, सोयाबीन काढून आपण ऊसाची लागवड करू शकतात, शक्यतो सोयाबीन काढल्यानंतर लवकर रान मऊ असेपर्यंतच रानाची मशागत करून सरी करून घ्या म्हणजे जास्त प्रमाणात ढेकळे निघणार नाहीत व उसाची बाळ भरणी करताना अडचणी येणार नाही
      🙏🙏🙏🍀🌿🌺
      आपलाच एक शेतकरी
      शेती व समाधान

    • @sagarrandive2139
      @sagarrandive2139 Před 10 měsíci

      धन्यवाद माहिती दिल्याबद्दल