यशस्वी तमाशा सोंगाड्याचा जीवन प्रवास : विनोदसम्राट गुलाब बोरगावकर [भाग १]

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 07. 2021
  • विनोदसम्राट सोंगाड्या गुलाब बोरगावकर
    गण, गवळण, लावणी, बतावणी आणि वग या मुख्य घटकातून सादर होणारा तमाशा शुद्ध मनोरंजन आणि लोकप्रबोधन करीत आला आहे. या तमाशाची लोकप्रियता कलावंताच्या यशस्वी कारकीर्दीवर अवलंबून असते. त्यामुळे तमाशाला प्रतिष्ठा तर मिळालीच,पण त्याची भरभराट होत गेली. पेशवेकालीन तमाशात फडाचा प्रमुख शाहीर स्वतः लावण्या रचत असेल. त्याच्या जोडीला नाच्या पोऱ्या,मिसरुड न फुटलेला तरुण असे. तर त्याच्या जोडीला सोंगाड्या विनोद करून लोकांना हसवीत असे. त्यामुळे हजरजबाबीपणा, प्रसंगावधान राखून तो बोलत असे. आतापर्यंतच्या नामांकित सोंगाड्यांची तमाशाला खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. खरे तर तमाशातील सोंगाड्या, सर्कशीतला विदुषक, नाटकातील विनोदी नट आणि दशावतारातील शंकासूर यांची जातकुळी एकच असल्याचे सांगितले जाते. गंभीर प्रसंगातही विनोद निर्माण करण्याचे काम सोंगाड्या करतो त्यामुळे तमाशाची लोकप्रियता टिकून राहते. तमाशातला पहिला सोंगाड्या बाकेराव पेशवेकालीन परशरामाच्या तमाशात होता. नंतरच्या काळात अनेक सोंगाडे नावारूपाला आले. त्यामध्ये शदगडू साळी शिरोलीकर, शंकर अवसरीकर, दादू इंदुरीकर,सावळा महागावकर,संभा कवलापूरकर, रामा कुंभार वर्धनगडकर, हरिभाऊ वडगावकर, दत्ता महाडिक पुणेकर, गुलाब बोरगावकर,काळू-बाळू, दत्तोबा तांबे,जयवंत सावळजकर या सारखे असंख्य सोंगाड्यांचा उल्लेख करावा लागेल.
    यापैकीच स्वातंत्र्योत्तर काळात गुलाब बोरगावकर या सोंगाड्याचा जीवन प्रवास आणि यशस्वी कारकीर्द पहाणे गरजेचे आहे. स्वातंत्र्यानंतर काळू-बाळू कवलापूरकर,गुलाब बोरगावकर, दादू इंदुरीकर या हजरजबाबी सोंगाड्यांचा आवर्जून उल्लेख केला जातो.
    त्यापैकी गुलाब बोरगावकर म्हणजे प्रत्येक शब्दाला, स्वभावाला आणि अंगविक्षेपाला हास्याचे फवारे उडवणारा तमाशातला अवलिया सोंगाड्या. एखादा माणूस आपण बसायचे नाही असे ठरवून तमाशा पाहायला आला तर हसून हसून मुरकुंडी वळेल इतके या सोंगाड्यात हसविण्याचे कसब होते.
    असा हा गुलाब सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातील बोरगाव या गावी मुस्लिम कुटुंबात जन्माला आला. लहानपणी आईने लाडाने वाढवले. पुढे तमाशाचा नाद लागला. भाऊ बाबालाल तमाशात काम करीत होता. त्यामुळे गुलाबही तिकडे आकर्षित झाला. पुढे ही आवड इतकी वाढत गेली एकविसाव्या वर्षी आईच्या मृत्युनंतर तो अहमदभाई इस्लामपूरकर यांच्या तमाशात दाखल झाला.
    त्याच्या छंदाला आळा घालण्यासाठी त्याचे लग्न करण्यात आले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. १९५२ साली त्याने तमाशा जवळ केला. तेंव्हा अहमदभाई इस्लामपूरकर आणि बाबुराव पुणेकर यांचा एकत्रित असणारा तमाशा गावोगावी लोकरंजन करीत होता. गुलाब अडचणीच्या काळात स्टेजवर गवळणीत उभा राहू लागला. त्याचे वागणे-बोलणे यावरून काहींना त्याच्यातला गुणवंत कलावंत दिसत होता. गुलाबने मात्र आपण एक चांगला सोंगाड्या व्हायचे असे मनात ठरवले होते. गुलाबला त्यानंतर शिरसी आंबी याठिकाणी माधवराव नगरकरांच्या तमाशात प्रवेश मिळाला. त्याच्याच गावचे बाबुराव शिंदे बोरगावकर यांच्या सहकार्याने तो माधवराव नगरकर सह गणपतराव सविंदणेकर या तमाशा सामील झाला. येथे बिगारी काम करताना दत्ता महाडिक पुणेकर यांच्याशी त्यांची ओळख झाली. रंगनाथ आबा पारगावकर या नामांकित सोंगाड्याला जवळून पहाता आले. आणि एक दिवस दत्ता महाडिक त्या पार्टीतून अचानक निघून गेल्याने गुलाबला 'गवळ्याची रंभा' या वगनाट्यात भूमिका मिळाली. या दिवशी या भूमिकेचे कौतुक झाले आणि तिथेच रात्रीच गुलाबचा सोंगाड्या म्हणून उदय झाला. इथे चंद्रकांत ढवळपुरीकर या अभिनयसंपन्न कलाकाराला त्यांना जवळून पाहता आले. चंद्रकांत आणि गुलाब यांच्या अभिनयावर नगरकर यांचा तमाशा पुढे नावारूपाला आला. १९६१ साठी मुंबईच्या लालबाग थिएटरवर या तमाशाला सुवर्णपदक मिळाले.
    माधवराव नगरकरांच्या मृत्यूनंतर गुलाब तुकाराम खेडकर यांचा तमाशात गेला. तिथे दत्ता महाडिक यांच्याबरोबर त्यांनी जोडी जमली. तिथेही त्यांना नाव मिळाले, पण तुकाराम खेडकर यांच्या मृत्युनंतर १९६५ साली नव्याने उभा राहिलेल्या चंद्रकांत ढवळपुरीकर सह दत्ता महाडिक पुणेकर तमाशा तो दाखल झाला. तिथे पुन्हा दत्ता महाडीक यांच्याबरोबर त्यांची जोडी इतकी जमली की, महाराष्ट्रभर आपल्या सोंगाड्यांनी धुमाकूळ घातला. तिथे त्याला लेखणीसम्राट गणपत व्ही.माने चिंचणीकर यांच्या वगनाट्यातील भूमिकेमुळे आणखीच लोकप्रियता मिळाली.
    १९७४ सालानंतर गुलाब बोरगावकर आणि गणपत व्ही.माने चिंचणीकर यांनी तमाशा फड उभा केला तेंव्हा माने यांची असंख्य वगनाट्ये नावारूपाला आली. या काळात अनेक सुखदुःखाच्या गोष्टी घडल्या तरी तमाशा एका नवेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचला. १९८२ साली परत नसंगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर सह विनोदसम्राट गुलाब बोरगावकर लोकनाट्य तमाशा उभा राहिला. आणि तोही १९८४ साली गुलाब बोरगावकर यांच्या मृत्यू पर्यंत एक मोठा महाराष्ट्रातला अवजड वाहनांचा तमाशा म्हणून उल्लेख नकेला गेला. १८जानेवारी १९८४ साली गुलाबराव यांचे निधन झाले असले तरी त्यांच्या नावाने तमाशाचा फड कित्येक वर्षे दत्ता महाडीक चालवित होते. असा हा अवलिया सोंगाड्या महाराष्ट्रातल्या तमाशा परंपरेत होऊन गेला.
    कोणताही कलावंत कलंदर असतो. जनरितीचे बंध तो आवळू शकत न ही. हे सिद्धांत त्याला माहीत असतील त्यांनी ते स्वीकारले नाहीत. खेड्यातल्या दीन-दलितांना,विवंचनग्रस्तांना क्षणभर का असेना त्याने हसायला लावले. दुःखापासून परावृत्त केले. नवोदित कलाकारांना प्रोत्साहन दिले. पैशाचा हव्यास धरला नाही. येणाऱ्या दुखाना तोंड दिले आणि सुख सढळ हातानी वाटून टाकले. १९६० नंतरच्या लोकनाट्य तमाशात विनोदी सोंगाड्या म्हणून यशस्वी कारकीर्द अनुभवणारा हा एक कलावंत होता.
    प्रा. डॉ. संपतराव पार्लेकर/ पलूस
    ९६२३२४१९२३
    Follow on This Media -
    ● Telegram -
    t.me/Lokranjandrsampatparlekar
    ● Facebook - / sampatrao.parlekar.77
  • Zábava

Komentáře • 119

  • @rameshthorat538
    @rameshthorat538 Před 3 lety +10

    संगीत रत्न दत्ता महाडिक पुणेकर सह गुलाबराव बोरगावकर यांना कोटी कोटी मानाचा मुजरा...👏👏🙏🙏

  • @sarjeraopawar5215
    @sarjeraopawar5215 Před 3 lety +8

    गुलाबराव बोरगावकर व दत्ता माहडीक हे तमाशा क्षेत्रात सोंगाड्या चे काम करणारे महान कलाकार होते पारनेर गावचा व माझा कोटी कोटी प्रणाम,

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  Před 3 lety

      धन्यवाद.. रसिकहो
      आपण व्हिडीओ पाहून प्रेम व्यक्त केले

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 Před rokem +2

    महान कलाकार म्हणून नावलौकिक मिळवलं खरोखर खरी माणस होती

  • @navnathchaudhari7515
    @navnathchaudhari7515 Před 3 lety +5

    गुलाबराव यांचे कांम मी 1982ला अकोळनेरला न्यानेश्वर माझी माय माऊली ह्या वगनाटयात पाहिले खूप आवडले

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  Před 2 lety

      खूप छान रसिकहो ..
      आपण सांगितलेली आठवण खूप आवडली.
      डॉ. संपतराव पार्लेकर पलूस सांगली
      9623241923

  • @rajarametame6186
    @rajarametame6186 Před 11 měsíci +1

    धन्यवाद आपल्या कार्याला ❤❤❤

  • @santramwagh102
    @santramwagh102 Před rokem +1

    अतिशय उत्कृष्ट आणि मुद्देसूद मांडणी सह पार्लेकर सरांनी ज्येष्ठ कलावंत श्री.मुबारक भाई बोरगावकर यांची मुलाखत घेताना आणि मला ऐकताना विशेष आनंद होतो.

  • @uttamraomaske2695
    @uttamraomaske2695 Před 2 lety +3

    गुलाबराव बोरगावकरांची एखादी तमाशाची झलक दाखवा

  • @sumedhkamble2625
    @sumedhkamble2625 Před rokem +1

    मुबारक भाई .. नमस्ते.

  • @ajijjamadar4757
    @ajijjamadar4757 Před 3 lety +7

    मा.गुलाबराव बोरगांवकर
    यांना विनम्र अभिवादन

  • @vasantchavan5497
    @vasantchavan5497 Před 3 lety +15

    गुलाब मामांना.विनम्र अभिवादन.....असा तमाशा सृष्टीत अवलीया पुन्हा होणे नाही 💐💐💐💐💐💐💐🙏💐💐🙏🙏💐🌹

  • @sudhakarauti9255
    @sudhakarauti9255 Před 2 lety +2

    गुलाब बोरगावकर यांचा तमाशा मी गावी यात्रेला पाहिले, अप्रतिम अस सादरीकरण होत अश्या महिन कलावंतास विनम्र अभिवादन

    • @shahajikurumkar5910
      @shahajikurumkar5910 Před rokem

      वाईट वाटते मी एवढ्या महान कलाकाराला पाहू शकलो नाही

  • @sampatnavale5183
    @sampatnavale5183 Před 3 lety +4

    गुलाब राव मामा यांना विनम्र अभिवादन धन्य पावनखिंड या मधी तुम्ही भरपूर चांगले काम केले त्या साठी सलाम प्रणाम दंडवंत 🙏🏽🙏🏽⚘⚘

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  Před 3 lety

      मस्त आठवण
      रसिकहो..
      तमाशा वर प्रेम करणारे आपण रसिक.
      चांगल्या आठवणी जागवत आहात. त्याबद्दल धन्यवाद
      डॉ.संपतराव पार्लेकर सर पलूस
      9623241923

  • @PrashantPatil-wu9wb
    @PrashantPatil-wu9wb Před 3 lety +6

    एका पिढीला..मंत्रमुग्ध करणार्या...आवलियास..विनम्र अभिवादन

  • @vishnuwayal8868
    @vishnuwayal8868 Před 3 lety +4

    गेले ते दिवस , फ़क्त आठवणी
    कोरोनाच्या काळात तमाशा या लोककलेला फार वाईट दिवस आलेत.
    असेच जर काही महिने चालू राहिले तर ही कला संपुष्टात येईल.सरकार पण लक्ष घालत नाही.

  • @vishvanathpotdar4775
    @vishvanathpotdar4775 Před 3 lety +11

    संगीत रत्न दत्ता महाडिक आणि गुलाबराव बोरगांवकर अशी जोडी पुन्हा होणार नाही.
    शेकडो वर्षातूनच एखादी जोडी जमते. स्टेजवर गुलाबराव आले कि असा हंगामा व्हायचा कि हसता हसता पुरेवाट होत असे. दत्ता महाडिक आणि त्यांचे एकमेकांतील संवादाचे टायमिंग एकदम पर्फेक्ट असे. नवीन पिढीत अशी जोडी आहे कि नाही हे माहिती नाही

  • @shahajikurumkar5910
    @shahajikurumkar5910 Před rokem

    वाईट वाटते की मी एवढ्या महान कलाकाराला पाहू शकलो नाही

  • @rajendrashelar856
    @rajendrashelar856 Před 2 lety

    मुबारकभाई यांच्या चेहऱ्याची ठेवण सुद्धा पैं. गुलाबराव बोरगावकर यांच्या सारखीच आहे. ते मराठी छान बोलत आहेत. कै. दत्ता महाडिक आणि पैं. गुलाबराव बोरगावकर ही जोडी पन्नास वर्षांपूर्वी आळंदी येथे कै. चंद्रकांत ढवळपुरीकर, गणपत व्ही. माने यांच्यासह एका स्टेजवर ज्ञानेश्वर माझी माऊली या वगनाट्यात एकत्र पाहिलेत. जबरदस्त ताकतीचे कलाकार. सगळ्यांना विनम्र अभिवादन. 💐🙏

  • @janardhanmali1417
    @janardhanmali1417 Před 3 lety +1

    दत्ता (आण्णा) महाडिक पुणेकर सह गुलाबराव बोरगावकर तमाशा कलावंत आणि सहकारी नाव खूप छान गाजले होते खरोखर हे नाव जरी कानावर पडले तर असे वाटते आपण 1975/76असल्या सारखे वाटते खूप खूप धन्यवाद धन्यवाद 🌹🙏👌🙏🌹🙏🌹👌🙏🌹👌🙏👌🙏🌹

  • @gautamkale1197
    @gautamkale1197 Před rokem

    मुबारक साहेब बोरगावकर खरे कलाकार असेल त्या वेळेला.

  • @dadapawar342
    @dadapawar342 Před 3 lety

    मी 1974 साली ज्ञानेश्वर आमुची माऊली आणि महाराष्ट्र झुकत नाही ही वगनाट्य पाहिली चक्क 13 कि.मी.पायी चालत जाऊन.त्यांनी सादर केलेले विनोद आणि छोटूबाई वाईकर यांचे लाल लाल मिरची तोडा बायांनो.हे गीत आठवते दररोज सकाळी गप्पा गोष्टी करताना गुलाबराव, डबल आवाजात बोलणारे अनंत पांगारकर आणि दत्ता महाडिक व हाताने नाक झाकून घेऊन बोलणारे विष्णू चासकर यांच्या आठवणी काढून हसतो.हाय रं धंदा!आणि खलबत्ता (मामा पाथर्डीकर)या विनोदाला आजही हसतो. त्या कलाकारांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि मानाचा मुजरा.

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  Před 3 lety

      खूप सुंदर..
      तुम्हाला बरीच तमाशा विषयीची माहिती आहे. गुलाब मामा आणि महाडीक अण्णा यांच्याविषयीच्या आठवणी तुम्ही फार चांगल्या सांगत आहात. काही हरकत नाही तुमचा फोन नंबर , पत्ता द्या किंवा मी फोन नंबर देतो फोन करा आपण गप्पा मारू
      ९६२३२४१९२३

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 Před 3 lety +2

    गुलाबराव आणि दत्ता महाडिक तमाशा पंढरीचे अनमोल हिरे . अशी अनमोल रत्न पुन्हा पुन्हा जन्माला यावीत.

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  Před 3 lety +1

      धन्यवाद..
      ही मोठी माणसं आपण पाहिलीत. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..
      डॉ. पार्लेकर सर 9623241923

    • @balasahebrode5100
      @balasahebrode5100 Před 3 lety

      दत्ता महाडिक साहेब यांनी जे जे जनसमुदायाला गयणातून संबोधित केले ते ते आज सत्यात पाहतोय.आफलातून वैचारिक पध्दतीने मांडणी केलेली गाणी आज प्रत्येक्षात सत्यात उतरत असताना साहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

  • @_lokkala
    @_lokkala Před rokem

    खरच जुनं ते सोनं

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap335 Před 3 lety +7

    खुप छान आठवणी

  • @anandraval395
    @anandraval395 Před rokem

    ❤❤❤छानच

  • @Mangeshkakadekalakar.6696
    @Mangeshkakadekalakar.6696 Před 3 lety +12

    दत्ता महाडिक आणि गुलाब बोरगावकर म्हणजे परीस ला हात लावल्यावर त्याच सोन होत अशी ही जुनी जाणकरी माणसे होती आपण काय बोलणार या कलाकारांन विषयी माझा मानाचा मुजरा

  • @madhavraobhoite1558
    @madhavraobhoite1558 Před 3 lety +2

    गूलबराव बद्ल शब्दच नाही त त्यांची स्तुती करण्यासाठी लाख लाख वेळा वंदन अशा कलाकाराला

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  Před 3 lety

      खूप धन्यवाद .. गुलाब मामांचे विषयी तुमच्या मनात प्रेम आहे. असा कलाकार होणे नाही . धन्यवाद जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा व्हिडीओ पोहोचवूया ग्रुपवर सेंड करा

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  Před 3 lety

      ९६२३२४१९२३

  • @chandrakantjamale321
    @chandrakantjamale321 Před 3 lety

    असा विनोद सम्राट परत होणे नाही

  • @shahus4822
    @shahus4822 Před 3 lety +3

    खूप छान आणि प्रेरणादायी,तुमचा आणि तुमच्या आदरणीय वडिलांचा जीवन प्रवास आमच्या समोर मांडला, ऐकून खूप चांगले वाटले. गुलाबराव बोरगावकर, गणपतराव व्हि माने,दत्ता महाडिक, चंद्रकांत ढवळपुरीकर,, काळू बाळू हे सगळे तुफानातले दिवे होते,झपाटून गेल्यासारखे यांनी रंगभूमीवर त्या काळात तमाशा रसिकांना आपल्या कलेने मंत्रमुग्ध केले आहे,या पैकी आता कोणीही जिवंत नाहीत, या अमूल्य कलावंतांना मानाचा मुजरा.मला एकच खंत वाटते की मी गणपत व्ही माने, चंद्रकांत ढवळपुरीकर, काळू बाळू यांचा तमाशा मी पाहू शकलो नाही,लहानपणी यात्रेत खूप तमाशे पाहिले आहेत,असे वाटते की, मी दहा वर्षे अगोदरच जन्माला यायला पाहिजे होते.या सर्व मान्यवरांनी तमाशा या केलेला अग्रस्थानी नेऊन ठेवले आहे, जो पर्यंत तमाशा जिवंत आहे तो पर्यंत यांची कीर्ती स्मरणात राहील.

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  Před 3 lety

      धन्यवाद..
      आपण सविस्तर लिहिले.
      तमाशा कलावंताविषयी आपल्या मनात आस्था आहे. वाचून बरे वाटले. खरेच आपण दहा वर्षे अगोदर जन्माला यायला हवे होते. ही खरी रसिकता.
      या 'लोकरंजन' चँनेलवरील सर्व तमाशाचे व्हिडीओ पहा आनंद मिळेल. सर्व लिंक वॉटसपच्या ग्रुपवर पाठवा.
      डॉ. संपतराव पार्लेकर पलूस 9623241923

    • @shahus4822
      @shahus4822 Před 3 lety

      @@lokranjandr.sampatparlekar खुप आभारी आहे, तुमच्या प्रतिसादा बद्दल.

  • @uttamraomaske2695
    @uttamraomaske2695 Před 2 lety +1

    Gulab Borgoankar yanchi yekadi video Tamasha zalak dakhva

  • @vikaspatil3388
    @vikaspatil3388 Před 3 lety +2

    गुलाबराव बोरगावकर यांच्या आठवणीं व इतिहास हा तरूण पिढीला प्रेरणा दायी

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  Před 3 lety

      खूप सुंदर आपण प्रतिक्रिया दिलीत. धन्यवाद
      यावर माझा लेख ही फेसबुकवर आहे. इतरांच्या पर्यंत लिंक पोहचवा ही विनंती.

  • @dilipkadam2382
    @dilipkadam2382 Před 3 lety +1

    Amache Giravi tal.Phaltan gavat yatresathi tamasha anla hota. Khup sunder karyakram zala hota.

  • @sayjipatil5083
    @sayjipatil5083 Před rokem

    अति छान धन्यवाद

  • @anilchopade7435
    @anilchopade7435 Před 3 lety +8

    Respected Mubarak Saheb, excellent comments/speach for waghnatya Tamasa. 🙏🌺🙏🇮🇳

  • @vasantgage9402
    @vasantgage9402 Před rokem

    खूप जुनी आठवण, असे कलाकार होणे नाही

  • @prakashwategaonkar3630

    मुबारकभाई आम्ही आपल्या सोबत आहोत.

  • @dilipadhangle3484
    @dilipadhangle3484 Před 3 lety

    तमाशा जीवंत कला
    महान कलावंत

  • @ranganathkanhere8472
    @ranganathkanhere8472 Před 3 lety

    या महान कलावंतास ञिवार मानाचा मुजरा

  • @hiralalpenterofficial6096

    वा अप्रतिम प्रवास

  • @avinashdhotre4171
    @avinashdhotre4171 Před 3 lety

    Congratulations saheb

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 Před 3 lety

    Khup khup dhanyvad

  • @suvarna517
    @suvarna517 Před 3 lety +3

    अशा कलाकारांना त्रिवार मानाचा मुजरा

  • @daulatgangurde2883
    @daulatgangurde2883 Před 3 lety +2

    गुलाबराव बोरगाव कर यांचा रंगबाजी किंवा त्याचे इतर व्हिडिओ असतील तर ते अपलोड करावा आपले वडिलांना माझा सलाम

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  Před 3 lety

      मी डॉ संपतराव पार्लेकर पलूस सांगली तमाशा अभ्यासक. तुम्ही आता जो व्हिडीओ पाहिला तो गुलाब बोरगावकर यांचे चिरंजीव मुबारक बोरगावकर यांचा. त्यावेळेची वगनाट्ये व्हिडीओ याचा शोध घेतला जात आहे. बघूया यश मिळते कसे.
      आहे हा व्हिडीओ आपल्या सर्व मित्रमंडळींना शेअर करा आणि काळू-बाळू यांचाही व्हिडिओ पहा.
      9623241923

  • @dattakad452
    @dattakad452 Před 3 lety

    खूप छान माहिती दिली

  • @vijaykamble5890
    @vijaykamble5890 Před 3 lety

    Apan aathavaniche pustak lihave.Athavni sundar ahet.

  • @anandraval395
    @anandraval395 Před rokem

    ❤❤❤

  • @digutumwad1272
    @digutumwad1272 Před 3 lety

    बोरगाव करांना मानाचा मुजरा

  • @tanajisalunkhe3563
    @tanajisalunkhe3563 Před 3 lety +2

    छान 👌👌

  • @dattatrayharishchandre326

    आमचे मित्र वसंत चव्हाण कोरटीकर यांनी योग्य कमेंट केली

  • @hajusayyed4642
    @hajusayyed4642 Před 2 lety

    दुसराभागदाखवा

  • @sachinsalve5698
    @sachinsalve5698 Před 3 lety

    अप्रतिम......

  • @popalghatrangnath6048
    @popalghatrangnath6048 Před 2 lety

    धन्य हि पावनखिंड झाली.भिल्लाची टोळी लोकनाट्य पुस्तक कसे मागवता येईल सांगा...

  • @kalugadekar3658
    @kalugadekar3658 Před 2 lety

    dutta mahadik punekar sah gulabrao borgaonkar hyanchi vinod an vinod shali khupch uchh darjachi hoti

  • @vasudevpdatil5924
    @vasudevpdatil5924 Před 3 lety

    गुलाब भाऊ आपनास कोटी कोटी प्रणाम।

  • @maheshsuryawanshi5294
    @maheshsuryawanshi5294 Před 3 lety

    Very nice

  • @DattatrayJadhav
    @DattatrayJadhav Před 3 lety

    salama aahe bhauna.

  • @prakashshinde6337
    @prakashshinde6337 Před 3 lety +1

    Gulab mama is grat

  • @vijaypagare4198
    @vijaypagare4198 Před 2 lety

    🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @arungangurde8658
    @arungangurde8658 Před 3 lety

    Marave pari kirti rupi urave

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  Před 3 lety

      धन्यवाद.. रसिकहो.
      या कलावंतांच्या कलेची कदर केलीत.
      9623241923

  • @studyforever1779
    @studyforever1779 Před 3 lety

    Best

  • @bhuleshwarengineeringworks3705

    Mi pahila ahe tamasha

  • @bhaukudale5443
    @bhaukudale5443 Před 3 lety +1

    Aasa. Songadya. Aata. Kadapi. Honar. Nahi

  • @savalakharat1169
    @savalakharat1169 Před 3 lety

    Nice sir

  • @vilaspawar5413
    @vilaspawar5413 Před 3 lety +2

    बोर ही पिकली
    भाराने वाकली
    एकाएकाने नंबर लावा
    पहारेकऱ्याला जपून र्हावा।
    हे गाणे गुलाबराव बोरगावकर यांचे आहे का?

    • @dattatraysatav9920
      @dattatraysatav9920 Před 2 lety

      हे गीत साहेबराव nandavalkar यांचे आहे

    • @sunitanawale3494
      @sunitanawale3494 Před rokem

      हे गीत साहेबराव नांदवळकरांच आहे.कै.तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर या तमाशात नेहमी हे गीत सादर करत होते.

  • @anantshinde8417
    @anantshinde8417 Před 3 lety

    M

  • @shahus4822
    @shahus4822 Před 3 lety +4

    त्यांचे जुने वगनाटय असतील तर कृपया अपलोड करावे....

  • @nileshnimhan2265
    @nileshnimhan2265 Před 3 lety

    दत्ता (अण्णा) महाडीक आणि गुलाबराव बोरगांवकर हे दोन शरीर आणी एक जीव होता.