भुईमूग लागवड पावसाळी भुईमूग लागवड भुईमुग लागवड नियोजन

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 07. 2021
  • भुईमूग लागवड पावसाळी भुईमूग लागवड खरीप हंगामात भुईमूग पिकास पेरणीवेळी २५ किलो नत्र, ५० किलो स्फूरद, प्रति हेक्टरी द्यावे. भुईमुगास नत्र व स्फूरद ही महत्त्वाची अन्नद्रव्ये लागतात. त्याचबरोबर सल्फर व कॅल्शियम ही दुय्यम अन्नद्रव्ये भुईमुगासाठी द्यावी लागतात. त्याचप्रमाणे पेरणीवेळी २०० किलो जिप्सम सल्फर कॅल्शियमची उपलब्धता करण्यासाठी जमिनीतून द्यावे. तर राहिलेला २०० किलो जिप्सम आ-या सुटताना द्यावा जेणेकरून शेंगा लागण्याचे प्रमाण वाढते व एकूणच उत्पन्नात वाढ होते, असे कृषीतज्ज्ञ सांगतात.
    आंतरमशागत महत्त्वाची भुईमूग हे तेलबिया वर्गातील महत्त्वाचे पीक असून भारतात भुईमूग लागवडीचे तीन हंगाम आहेत. खरीप हंगामात (जून ते नोव्हेंबर) जिरायत पीक, रब्बी हंगामात (ऑक्टोबर ते मार्च) दक्षिण भारतात भाताचे पीक काढल्यानंतर भात खाचरात भुईमुगाचे पीक घेतले जाते. भारतात मुख्यत: आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडूू राज्यात भुईमुगाची लागवड होते.
    भुईमुगाचे पीक ४५ दिवसांपर्यंत तणविरहित ठेवणे आवश्यक असते. या पिकाचे तणामुळे फार मोठे नुकसान होते. त्यासाठी वेळेवर निंदणी, कोळपणी करावी लागते. भुईमुगाच्या मशागतीचे दोन प्रकार असून पूर्व मशागत व आंतरमशागत अशा प्रकारे मशागत करण्यात येते. पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी पूर्व मशागत जेवढी आवश्यक असते तितकीच आंतरमशागत देखील. पेरणीनंतरच्या सर्व कामांना आंतरमशागत म्हणतात.
    भुईमूग पिकामध्ये ही मशागत ओळीने करावी लागते. पिकातील तण काढल्याने मूळ पिकाला भरपूर अन्न मिळते. त्यामुळे पीक चांगले येते. ही मशागत केल्याने अन्नांश वाढतो. ओल टिकली जाते.
    पिकास भर मिळून पीक जोमदार येते, रोगराई होण्याचे टाळते. सर्वसाधारण पिकांची आंतरमशागतीची कामे कोळपणे व खूरपून गवत काढणे होय. पुरुषवर्ग हातात कुदळ अथवा तत्सम हत्याराने जमीन भुसभुशीत करतात. भुईमुगाच्या पिकावर येणा-या मावा, तुडतुडे इत्यादी किडींचा वेळेवर बंदोबस्त करणे आता आवश्यक आहे. उन्हाळी हंगामात भुईमुगाचे चांगले उत्पादन मिळते. या हंगामात रोग व किडींचा प्रादुर्भाव अत्यल्प प्रमाणात आढळतो. उन्हाळी लागवडीसाठी सुधारित वाणाची निवड करावी. 10 फेब्रुवारीपर्यंत पेरणी पूर्ण करावी.
    ♥भुईमूग लागवडीसाठी बियाण्यांचे प्रमाण ठरविताना निवडलेला वाण, पेरणीची पद्धत, हेक्‍टरी झाडांची संख्या, 100 दाण्याचे वजन, बियाण्याची उगवणशक्ती यांचा विचार करावा. भुईमूग लागवड करताना हेक्‍टरी 100 ते 125 किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी एक किलो बियाण्यास तीन ते पाच ग्रॅम थायरम किंवा कार्बेन्डझिमची बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर प्रति 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम रायझोबियम व स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी.
    ♥लागवडीचे तंत्र
    लागवडीसाठी जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखराची पाळी देण्यापूर्वी दहा गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे. लागवडीसाठी वरंबे किंवा वाफे तयार करून घ्यावे. उन्हाळी भुईमुगाची पेरणी थंडी कमी झाल्यानंतर 10 फेब्रुवारीपर्यंत पेरणी पूर्ण करावी. पेरणी सरी वरंबा पद्धत किंवा सपाट वाफा पद्धतीने करावी. पेरणी यंत्राने किंवा टोकण पद्धतीने पेरणी पूर्ण करावी. एका ठिकाणी एकच बी पेरावे. बियाण्याची उगवणशक्ती कमी असल्यास दोन बियाण्यांतील अंतर कमी करावे. पेरणी दोन ते अडीच इंच खोल करावी. उगवण झाल्यानंतर खांडण्या असल्यास ताबडतोब भरून घ्याव्यात. टीएजी-24 हा वाण 3 x 10 सें.मी. अंतरावर पेरावा. म्हणजे एकरी झाडांची संख्या 1.33 लाख होईल. एसबी-11 हा वाण 30 x 15 सें.मी. किंवा 45 x 10 सें.मी. अंतरावर पेरावा. म्हणजे एकरी झाडांची संख्या 88,888 राहील.
    भुईमूग खत व्यवस्थापन असे कराल♥प्रगतशील शेतकरी♥
    ♥ पेरणीपूर्वी किंवा भुईमूग पेरताना संपूर्ण रासायनिक खताची मात्रा पिकास द्यावी.
    साधारणतः प्रति एकरी 10 किलो नत्र आणि 20 किलो स्फुरद द्यावे. त्याकरिता एकरी 50 किलो अमोनिअम सल्फेट किंवा 22 किलो युरिया अधिक 125 किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे.
    ♥ पीक 50 टक्के फुलोरावस्थेत असताना तज्ज्ञांचा सल्ला आणि माती परीक्षण अहवालानुसार हेक्‍टरी 300 ते 500 किलो जिप्सम तासाच्या दोन्ही बाजूला सरळ ओळीमध्ये मिसळावे.
    जिप्सममधून 24 टक्के कॅल्शिअम व 18 टक्के गंधक पिकास मिळते.
    ♥ भुईमुगास नत्र, स्फुरद आणि पालाशच्या खालोखाल कॅल्शिअम आणि गंधकाची आवश्‍यकता असते.
    तसेच झिंक, बोरॉन, लोह आणि मॅग्नेशिअम या सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज भासते.
    रासायनिक खतासोबत एकरी चार किलो झिंक सल्फेट वर्षातून एकदा आणि हलक्‍या प्रतीच्या जमिनीस तीन वर्षांतून एकदा बोरॅक्‍स दोन किलो द्यावे.
    उभ्या पिकात सूक्ष्म पोषण द्रव्यांची कमतरता आढळून आल्यास शिफारशीनुसार त्यांची पूर्तता फवारणीद्वारे करावी.
    संकलित!
    ♥आंतरमशागत
    पीक साधारणतः सहा ते सात आठवड्यांचे होईपर्यंत तणविरहित ठेवावे.
    त्याकरिता तीन वेळा डवरणी आणि आवश्‍यकतेनुसार दोन ते तीन वेळा निंदणी करावी.
    पीक साधारणतः 50 दिवसांचे झाल्यानंतर मातीची भर देण्याकरिता शेवटची डवरणी करावी.
    नंतर मोठे तण उपटून घ्यावे.
    आऱ्या सुटल्यानंतर आंतरमशागत करू नये.
    भुईमुग पाणी व्यवस्थापन असे कराल♥प्रगतशील शेतकरी♥
    ♥ पेरणीपूर्वी पाण्याची पहिली पाळी द्यावी.
    वाफसा आल्यावर पेरणी करून लगेच पाण्याची दुसरी पाळी द्यावी.
    ♥ उगवण झाल्यावर खांडण्या असल्यास त्या भरून घ्याव्या व नंतर पाण्याची तिसरी पाळी द्यावी.
    नंतर पाण्याचा ताण द्यावा.
    ♥ साधारणतः फेब्रुवारी महिन्यात 10, मार्च महिन्यात 8, एप्रिल महिन्यात 6-8 आणि मे महिन्यात 4-6 दिवसांनी पिकास ओलीत करावे.
  • Věda a technologie

Komentáře • 10

  • @shubhamnikam1056
    @shubhamnikam1056 Před 3 lety +1

    सुरवातीला म्हणजे भुईमूग 20 ते 25 दिवसांचा झाला आहे त्यासाठी कोणती फवारणी घ्यावी

  • @sbmleo
    @sbmleo Před 3 lety

    English subtitles will reach out to many more please !!!

  • @maheshbolgad9943
    @maheshbolgad9943 Před 3 lety +2

    Kama pksha बताच जास्त

  • @akshaykoparde7818
    @akshaykoparde7818 Před 3 lety

    सर तुमचा नंबर द्या. खुप छान माहिती दिली

  • @prafulljangam6956
    @prafulljangam6956 Před 11 měsíci

    सप्टेंबर मध्ये भुईमुग पीक घेणे योग्य आहे का ?
    सल्ला मिळावा.

  • @rajeshmore1915
    @rajeshmore1915 Před rokem

    बियाणे नाव सांगा

  • @nandashinde9493
    @nandashinde9493 Před 11 měsíci

    पोशन.साठिखतेसाग

  • @tusharjagtap8340
    @tusharjagtap8340 Před 2 lety +1

    गप