Questions and Answers | Prathamesh, Mugdha | Part 2

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • Hello everyone!!
    आमचं ठरलंय च्या घोषणेनंतर तुम्हा सर्वांना आमच्या बद्दल खूप प्रश्न पडले आहेत. त्यापैकी काही प्रश्न आम्ही सोशल मिडिया वरून घेतले आहे. त्यांची उत्तरं देण्यासाठीचा हा व्हिडिओ घेऊन आलोय.
    Like, Share, Subscribe!!
    --
    Prathamesh’s Social Media handles :
    CZcams channel 👇🏻
    / @prathameshlaghateoffi...
    Facebook 👇🏻
    / singerprathameshlaghate
    Instagram 👇🏻
    / prathamesh_laghate_adh...
    Mugdha’s Social media handles :
    CZcams Channel 👇🏻
    / @mugdhavaishampayanoff...
    Facebook👇🏻
    / mugdhabhagwan
    Instagram👇🏻
    / mugdhabhagawan5

Komentáře • 423

  • @manoharbhagat5079
    @manoharbhagat5079 Před rokem +28

    एक प्रश्न मात्र कोणीच विचारला नाही तुम्हाला, तो म्हणजे कार्तिकी रोहित आणि आर्या यांच्या काय प्रतिक्रिया होत्या.?हे ऐकायला सगळ्यांना आवडलं असं मला वाटतं.

  • @manikhadkar6066
    @manikhadkar6066 Před rokem +25

    तुम्हां दोघांच बोलणं संपूच नये असं वाटत होतं. खूप गोड बोलणं झालं. तुम्हां दोघांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि अनेक अनेक आशीर्वाद!!! आणि मुग्धा तू लहानपणी गायलेल, "चाफा बोलेना चाफा चालेना" हे गाणं आता तुझ्याकडून ऐकायला खूप आवडेल. तसच तुम्हां दोघांकडून , "धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना" हे गाणं ऐकायला खूप आवडेल.

  • @udaydivekar4133
    @udaydivekar4133 Před rokem +4

    *मुग्धमेश*
    मोदकाच मॉनिटरशी एकदाचं जुळलं,
    आता म्हणतात आमचंही ठरलं,
    संगीताने एकमेकांच्या जवळ आणलं,
    मुग्ध सुरांनी प्रथमेशला वरलं ,
    आणि आता....
    लिटिल चॅम्पसचे होईल मनोमिलन,
    सूरतालांनिं सजेल घराचे अंगण
    *अभिनंदन*
    *मुग्ध*.. *।* वैशंपायन आणि
    प्रथ.. *मेश* लघाटे
    👩‍❤️‍👨💐🎉🎊🥳
    *उदय दिवेकर*

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 Před rokem +14

    मस्त... अप्रतिम.. दोघांचेही व्यक्तीमत्व, स्वभाव, संगीत.. सेन्स ऑफ ह्युमर आणि एकमेकांबद्दल असलेलं प्रेम आदर काळजी खूप भारी आहे... तुमच्या दोघांचे सूर उत्कृष्टपणे जुळले आहेत.. खूप आनंदी सुखी समृद्ध जीवन लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना... साक्षात लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभतो..👌👌🙌 😄💗

  • @saritadamle6078
    @saritadamle6078 Před rokem +21

    खूप छान पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना हे गाणे ऐकायला आवडेल

  • @vijayawalunjkar5853
    @vijayawalunjkar5853 Před rokem +17

    मुग्धा,प्रथमेश दोघांना अनेक आशिर्वाद,तुम गाते रहो,हम सुनते रहेंगे ,छान जोडी आहे!!

  • @ankitakalgaonkar9743
    @ankitakalgaonkar9743 Před rokem +17

    तुमची जोडी एकदम मस्त आहे 👌🏻 दोघांचं Bonding खरंच खूप छान आहे, असेच कायम आनंदी रहा, दोघांना खूप खूप शुभेच्छा..!!

  • @indradhanushyapritijambhek4148

    दोघांना खुप खुप मनापासुन अभिनंदन आणि धन्यवाद
    कारणं आम्हाला लग्नं ठरलं हे ऐकुनं खुप खुप आनंद दिलात....
    माझ्यासारखे खुप सगळे आहेत,आनंद घेणारे 😊😊❤❤

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Před rokem +4

    सर्वप्रथम दोघांचं मनःपूर्वक अभिनंदन 💐💐 शेवटी दादा भाई नौरोजी काय मुग्धा 😄 आणि मोदकासोबत करंजी असल्याशिवाय ताट भरलेलं वाटणारचं कसं. काय प्रथमेश 😄 चला पोरं मोठी झाली म्हणायला हरकत नाही 🤔👍

  • @vidyaupadhye697
    @vidyaupadhye697 Před rokem +5

    तुम्हां दोघांचेही खूप खूप अभिनंदन...🎉🎊🎉💜💛❤💐💐 मी तुमची लिटिल चँम्पसची गाणी भरपूर ऐकली आहेत...Wonderful.!
    मला सर्वच आवडली..प्रथमेश तू एकदा आम्हांला रात्र काळी ;घागर काळी हे आम्हांला ऐकवावेस.. तुझे शास्त्रीय संगीताचे ज्ञान अफाट आहे.. गळा किती सहज फिरतो तुझा आणि मिठ्ठास स्वर..
    तुझी नाट्यगीते -भावगीते - आणि अभिषेकी बुवांचे अबीर-गुलाल हे फार आवडले.. सारेगमप हा कार्य्रक्रम आमच्यासाठी अनमोल ठेवा आहे..

  • @ujwalarele8489
    @ujwalarele8489 Před rokem +3

    मन:पूर्वक अभिनंदन दोघांचे💐
    तुमचा दिसण्या, वागण्यातला साधेपणा खूप भावतो ..जास्तीत जास्त मराठी शब्द वापरले तर अजून छान वाटेल.. पटलं तर........

  • @anaghachandorkar7946
    @anaghachandorkar7946 Před rokem +97

    किती गोड... अगदी आमच्या घरातले लग्न ठरले आहे असे वाटते ❤

    • @mugdhakarve4877
      @mugdhakarve4877 Před rokem +2

      Agdi khara

    • @1969shailesh
      @1969shailesh Před rokem +3

      स्वप्नात रंगले मी चित्रात दंगले मी.... हे duet ऐकायला आवडेल

    • @vidyamarathe9216
      @vidyamarathe9216 Před rokem +1

      Khup khup chan jodi pudhachaya vatachalisathi shubhychya

    • @vishalpatil4353
      @vishalpatil4353 Před rokem

      Barrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrr

    • @user-qd3jf3cj3h
      @user-qd3jf3cj3h Před rokem

      kharach

  • @maithilibapat7328
    @maithilibapat7328 Před rokem +5

    मुग्धोन्मेष🎉
    लक्ष्मीनारायण जोडा
    तुमचं दोघांचं जुळून अगदीच सहज होतं कारण दोघांचे संस्कार शिक्षण आणि अंगी असलेली जिद्द मेहनत सुसूत्रता आणि सगळ्यात महत्वाचे प्रेम
    गाणी- रंध्रात पेरिली
    छेडून गेले मधुर मेष
    गुरू एक जगी त्राता
    अनंता तुला कोण पाहू शके- मुग्धा

  • @aparnarahate5065
    @aparnarahate5065 Před rokem +6

    आनंद पोटात आमच्या माईंना माईंना ,!!
    आम्हांला संकेत मिळत होते. अंदाज येत होता. आणि आता शिक्कामोर्तब झाले. तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा !! आनंदी सहजीवनासाठी खूप खूप आशीर्वाद !!

  • @vinaydixit935
    @vinaydixit935 Před rokem +1

    प्रश्नोत्तराचा पहिला भाग अधिक आवडला. पहिल्या भागाबाबत असणारी उत्सुकता ह्या वेळी राहिली नाही हे खरं. दोघांचेही खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा

  • @minakshigogate7510
    @minakshigogate7510 Před rokem +9

    खुप छान जोडी, लिटल चॅम्प्स पासून आवडती, आणि आता तर आयुष्यात जोडीदार होतात, खुप शुभेच्छा💐

  • @vinitadesai8067
    @vinitadesai8067 Před rokem +2

    खूप खूप अभिनंदन , मला तुम्ही लहान असताना वाटत होते की तुम्ही एकमेकांना अनुरूप आहात , अंबज्ञ 🙏❤

  • @pratibhav.pawar.781
    @pratibhav.pawar.781 Před rokem +5

    खूप गोड....गाणी ऐकवत रहा, मस्त रहा....शुभेच्छा आणि आशीर्वाद आहेतच....God bless you both....👍👍👍❤❤🎉🎉🎵🎵

  • @swatiphansalkar113
    @swatiphansalkar113 Před rokem +2

    आम्हाला दोन वर्षांपूर्वी च हे वाटलं होतं . गणपतीपुळ्या चा व्हिडिओ बघितला तेव्हाच आणि ते खरं झालं पण छान झालं अभिनंदन 🎉🎉 प्रथमेश आणि मुग्धा,💐💐

  • @adwaitgodse8091
    @adwaitgodse8091 Před rokem +2

    किती disclaimers देता रे...तुमच्या सारख्या गोंडस बाळांवर कोण रुसणार फुगणार आहे? बिनधास्त रहा आणि ह्याहून जास्त personal sphere मधे चाहत्यांना वाव देऊ नका.
    गाण्यांची फर्माईश:
    1. तुम्हे देखती हुं तो लगता है ऐसे...अगर तुम हो सावन (मुग्धा)
    2. बादल घुमड बढ आये (प्रथमेश)
    3. ऐ हैरत ए अशिकी (Duet)
    4. बेनाम सी ख्वाहिशे (मुग्धा)
    5. त्या एका निमिषात (प्रथमेश) - [ओंजळीत स्वर तुझे अल्बम, सुधीर मोघे - रवींद्र साठे - आनंद मोडक]
    6. पद्मनाभा नारायणा (दोघांच्या पैकी कोणीही किंवा दोघांचे ही separate version)

  • @nilkanthkulkarni6174
    @nilkanthkulkarni6174 Před rokem

    कलावंताने निर्मितीच्या बाबतीत काय ठरविले आहे ते सांगावे जुन्या खजिन्याचा आदर करुन नवनिर्मिती करणे हे प्रधान कार्य आपण मानावे एक खास अशी शैली विकसित व्हावी हीच तुम्हा दोघांना शुभेच्छा ज्या दिवशी स्वतःच्या रचनांचा चालींचाच प्रचंड कार्यक्रम होईल व रसिक गुणगुणत ती चाल घरी जातील तो मराठी रसिकांच्या द्रुष्टीने किती आनंदाचा दिवस असेल हे सांगायला नको अन्यथा या आमच्या पुण्यातले एखादे पं जगन्नाथराव पुरोहित गायलेले गाताय वेगळे काय करताय अस म्हणायचे.आणि खरोखर आज प्रसार माघ्यमांचा या धावपळीच्या जगात फार अविभाज्य भाग आहे अर्थात संगीताच्या बाबतीत शास्त्र,कला,त्यातले संशोधन यातूनच नवनिर्मिती तुम्हा दोघांकडून होईल अशी आशा आहे स्वामी समर्थ तशी प्रेरणा तुम्हाला देवोत हीच शुभेच्छा.आणि आमच्या काहीशा सूचनांमुळे गैर वाटले असेल राग आला असेल तर क्षमस्व

  • @namrathakulkarni7513
    @namrathakulkarni7513 Před 9 měsíci

    एवढे छान आणि अप्रतिम गाणारे तुम्ही दोघेही इतके सर्वांशी मनापासून जोडले गेलेले आहात की मला वाटते पहिल्यांदाच अशी गायक जोडी मी पाहिली. असेच नेहमी दोघेही दिलखुलास आणि मोकळे राहा. तुम्हा दोघांना मनापासून शुभेच्छा आणि आशिर्वाद. असेच नेहमी खुष राहा.

  • @renukaborgaonkar4207
    @renukaborgaonkar4207 Před rokem +1

    खूप खूप अभिनंदन दोघांचेही
    तुम्ही दोघेही एकमेकांना अगदी perfect आहात
    खूपच छान वाटले
    तुमच्या दोघेही आपल्या शास्त्रीय संगीत चे कार्यक्रम करा कारण bollywood music अती झालय तुम्हाला भरभरून शुभेच्छा

  • @manalipathak9648
    @manalipathak9648 Před rokem +8

    खूप खूप छान. पुढील वाटचालीसाठी दोघांना खूप शुभेच्छा. तुम्ही गात रहावे बोलत रहावे आम्ही ऐकत रहावे असे वाटते. 😊 एक व्हिडिओ रियाज कसा करावा या माहितीचा कराल का plz

  • @tejashreeparab2856
    @tejashreeparab2856 Před rokem +3

    अग,छोटी मुग्धा हातवारे मान डोलवणे नी गाणे ,डोळ्या समोरून जातच नाही.खूप आठवण येते.तु बारावीत होतीस.आमच्या जवळ रहात होतीस.मला खूप वाटायचे,ही दोघ एकत्र यायला हवीत. नी तसेच झाले.आनंद झाला. धन्यवाद,

  • @truptighare797
    @truptighare797 Před rokem

    खुप गोड जोडी. तूम्ही गिरनारला दर्शनाला गेले तेव्हाच तुमची जोडी योग्य वाटली होती. दत्तात्रयाचे आशिर्वाद तुम्हाला आहेतच. आमच्या कडूनही खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद.

  • @kulkarnisir8912
    @kulkarnisir8912 Před rokem

    प्रथमेश आणि मुग्धा तुमच्या नवीन सह जीवनास आभाळभर शुभेच्छा.तुमचा निर्णय आवडला .हल्ली कलेच्या क्षेत्रातील अशा संस्कार संपन्न नव परिणीत दाम्पत्य कमी दिसतात .तुम्ही या दृष्टीने योग्य निर्णय घेतला. मला वाटतं महाराष्ट्राला आनंद झाला असेल . तुम्ही धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना l शब्द रूप आले मुक्या भावनांना ll हे युगुल गीत गायिलेले नक्कीच आवडेल. माझे आवडते गायक ,संगीतकार सुधीर फडके आणि आशा भोसले यांची आठवण जा ग व ली जाईल. तुम्हाला पुनश्च कुलकर्णी शे व ते क र कुटुंबाकडून हार्दिक शुभेच्छा.

  • @deepakkudtarkar9550
    @deepakkudtarkar9550 Před rokem +3

    अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा प्रथमेश व मुग्धा
    यशवंत व्हा।।
    मला मनापासून वाटत होते कि तुम्ही एकत्र यावे असे 🎉🎉

  • @archanasirsikar9123
    @archanasirsikar9123 Před rokem +2

    कित्ती गोड आहात तुम्ही दोघेही....सरळ स्वाभाविक, प्रामाणिक. खूप शुभेच्छा.
    Shukratara मंदवारा....he गाणं ऐकायला आवडेल ❤

  • @sheetalbhange93
    @sheetalbhange93 Před rokem +2

    दोन्ही part खूप छान झाले आहेत ❤आणि तुम्ही दोघं पण इतक्या आपुलकीने बोलत आहे सगळ्यांना खूप खूप धन्यवाद पण देताय❤ मस्त वाटतय खरच घरचे लग्न असल्यासारखं वाटतंय तुम्हा दोघांना खूप खूप प्रेम❤❤❤

  • @reshap9103
    @reshap9103 Před rokem +1

    Khupach god ani ekmekala sajese ahat doghahi......Tumachya bhavi ayushyala amache Bharbharun ashirvad...Prathamesh i love your song AMHI VITTHALACHE VARKARI.....Sukhat raha Anandat raha.

  • @ashabodas116
    @ashabodas116 Před rokem +5

    ❤दोघांचे अभिनंदन आणि खूप शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद..
    आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे हे गाणे नक्की गाऊन आनंद द्या आम्हाला.

  • @nehakulkarni2431
    @nehakulkarni2431 Před rokem

    खूप छान जोडी आहे तुमची,अगदी साजेशी.
    बोलण्यामध्ये कुठेही मोठेपणा नाही.अगदी सहज आणि मनापासून संवाद साधता तुम्ही,खूप छान वाटतंय तुम्हाला एकत्र बघून😊
    तुम्हाला खूप खूप शुभेच्छा,असेच छान आनंदी रहा.

  • @user-pi4uo1pt3l
    @user-pi4uo1pt3l Před rokem

    दोघही खूप छान आहात, का कोण जाणे पण मला खूप आधीपासून वाटत होत तुम्ही भावी आयुष्यातील जोडीदार व्हावेत. खूप खूप अभिनंदन.

  • @suchith9327
    @suchith9327 Před rokem +1

    आता तरी 2 चॅनेल ठेवण्यापेक्षा merge करा मुग्धा प्रथमेश लघाटे कस वाटत.. तुमचं लग्न झालं कि एकत्र जोडी म्हणून तुमी जेव्हा कार्यक्रम महफिल कराल तेव्हा धमाल करून द्याल. धुमाकूळ घालाल तुमी एकत्र. मी आत्ताच predict करतो कि in next 5 to 10 years you will be the most famous couple in maharashtra and most succesful. Just push your marketing slightly aggresively. Fingers crossed. God bless you ❤

  • @rohinihatwalne4687
    @rohinihatwalne4687 Před rokem +1

    तुमच्या दोघांनची छान जोडी आहे.
    अभिनंदन दोघांचे.मस्त रहा.आनंदी रहा.
    छान गाणी आम्हास ऐकवत रहा.❤❤👌👌🌹🌹

  • @arundhatishivadekar729
    @arundhatishivadekar729 Před rokem +2

    अभिनंदन ! आजही डोळ्यांसमोर सारेगमप च्या वेळचेच प्रथमेश -मुग्धा आहेत असेच वाटते.🥰

  • @pushpapande2211
    @pushpapande2211 Před rokem +1

    बोलण्यात कांही हि नाटकीयता नाही दोघाचाही मोकळा स्वभाव असावा छान असेच रहा

  • @rashmiborkar6686
    @rashmiborkar6686 Před rokem +2

    मुग्धा प्रथमेश अभिनंदन आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा दोघांना आणि शुभ आशिर्वाद गात रहा हसत रहा ❤️

  • @deshpandenitin3567
    @deshpandenitin3567 Před rokem

    सारेगमपतील लहानपणाचे तुम्ही दोघेही आठवताहेत , आता जीवनाचा वैवाहिक प्रवास एकमेकांचे जोडीदार म्हणून करताहात, खूप छान, आनंदी राहा, खूप खूप आशीर्वाद 🎉

  • @hbc11
    @hbc11 Před rokem +2

    तुम्ही दोघे कित्ती गोड आहात.. एकदम निर्मळ.. छान वाटतं तुम्हाला बघून. खूप खूप शुभेच्छा!🎉💐💐

  • @sai675
    @sai675 Před rokem +2

    खूप छान दिसता दोघे पण....मस्तच.
    मला तुमच्या कडून शुक्रतारा मंद वारा..हे duet ऐकायला खूप आवडेल..तर पहा आपणास केव्हा वेळ मिळतोय ते.. धन्य वाद

  • @paragkane6037
    @paragkane6037 Před rokem +12

    Zakas!! 🎉God bless both of you!! All the power to you!!

  • @mugdhakarve4877
    @mugdhakarve4877 Před rokem +13

    Cute couple...love and blessings to both of you

  • @rajanimotke6939
    @rajanimotke6939 Před rokem +4

    दोघांचेही खूप खूप अभिनंदन!! Session छान झालं हे सुध्दा!!
    Recently, तुम्हा दोघांचेही पुण्यातील musical events मी attend केलेत..... दोघांचेही सादरीकरण उत्तम !!
    फरमाईश....
    1. दो पंछी, दो तीनके , कहो लेके चले है कहा! किशोर कुमार आणि आरती मुखर्जी यांचे...
    2. कभी कभी मेरे दिल में खयाल आता है....
    आणि आता एक प्रश्न...
    तुम्हा पंचरत्नांपैकी तुम्ही सोडून उर्वरित गायकमधून तुमचे वैयक्तिक आवडते गायक कोण?

  • @manoharbhagat5079
    @manoharbhagat5079 Před rokem

    मला तुम्ही दोघं सा रे ग म पासून आवडता, जेव्हा मला समजलं की तुम्ही लग्न करता आहात तेव्हा मला खरं तर खूप आनंद झाला .तुमच्या दोघांबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे .किंबहुना हा आदर सगळ्यांच्याच मनात असेल .त्यामुळे तुमच्या लग्नाच्या बातमीनंतर चे जे काही व्हिडिओ असतील ते मी प्रचंड आवडीने बघतो आहे. तुमचा दोघांचा संसार खूप सुखाचा होईल अशी मी देवाकडे प्रार्थना करत आहे .मला तुम्हा दोघांकडून. तुझी साथ हवी रे रोज मला, नवी बाग फुलू दे प्रीत फुला, हे गाणे ऐकायला आवडेल.

  • @rutujanasikkar3955
    @rutujanasikkar3955 Před rokem +3

    तुमची जोडी खूप छान आहे❤ ❤
    पुढील वाटचालीसाठी दोघांना खूप खूप शुभेच्छा 🎉🎉

  • @charupophale6975
    @charupophale6975 Před rokem

    मस्तच!
    तुम्ही दोघेही खूप खरे,सरळ, सालस,संस्कारी आहात.सांगीतिक जीवनाच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद.
    पहिलीच भेट झाली पण,ओढ ती युगाची जादू अशी घडे ही... माझ्या अतिशय आवडीचे हे द्वंद्व गीत तुमच्या आवाजात ऐकायला खूप आवडेल.
    धन्यवाद.
    🌹🌹
    .

  • @rashmik2296
    @rashmik2296 Před rokem +3

    तुमचं दोघांचेही tuning छान आहे... तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा....💐

  • @aishwaryaagwekar1948
    @aishwaryaagwekar1948 Před rokem +3

    Congratulations Both of you ❤🎉🤩All the Best For Your Future 💕.
    फणसाच्या गऱ्यांची भाजी मस्त 😋.
    फणसाचे तळलेले गरे यांची रेसिपी बघायला आवडेल 👍

  • @nilimamake8969
    @nilimamake8969 Před rokem +8

    सात्विक जोडी आहे अगदी खूप प्रेम❤❤

  • @vaishalimashalkar2578
    @vaishalimashalkar2578 Před rokem +1

    Mast aahe jodi,Mugdha chi majja aahe Prathmesh kadun chan chan recipe chakayla milat astil😊👍👏👏👏💐

  • @prabhakarkothavade3344

    मुलाखत बघितली . खुपच आवडली. तुमच्या उभयतांची आणखी गाण्यांची अपेक्षा आहे.

  • @meghaupadhye9639
    @meghaupadhye9639 Před rokem +1

    Prathamesh tuzi 2 gaani aavdtil aikayla,1___abeer gulaal,2___kanda raja pandharicha, tashi tuzi saglich chhan gaani aahet,pn he 2 bharich

  • @namratadeo9900
    @namratadeo9900 Před rokem +3

    Sweetness overloaded modak and karanji❤

  • @shirishbelsare2121
    @shirishbelsare2121 Před rokem

    खुप खुप छान होते दोन्हीही पार्ट,मुग्धा, प्रथमेश दोघांनाही खूप खूप शुभेच्छा 🌹
    उदंड आयुष्याचे व्हा, यशस्वी व्हा.

  • @supriyajoshi3726
    @supriyajoshi3726 Před rokem +1

    खूप छान !
    Duets म्हणाल तर बाबूजी- आशा भोसले यांनी गायलेली duets सादर करायचा प्रयत्न करा.
    उदा. धुंदी कळ्यांना, स्वप्नात रंगले मी...
    अरुण दाते- सुधा मल्होत्रा - शुक्रतारा मंदवारा...

  • @manishagogate1061
    @manishagogate1061 Před rokem

    तुम्हां दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद.... दोघांची जोडी आम्हा सर्वांना खूप आवडते

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 Před rokem +1

    खुपच सुंदर वाटले तुम्हा दोघांना खुप खुप शुभेच्छा आणि अशिर्वाद ....

  • @vaijujoshi3855
    @vaijujoshi3855 Před rokem

    खूप छान मोदक आणि मॉनिटर असेच कायम हसत रहा आणि आम्हाला नवीन गाणी ऐकवा तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि मनापासून आशिर्वाद रोज रियाज करा आणि आम्हाला सुद्धा काही tips सांगा तुम्ही किती रियाज करता आणि कसा करता हे सांगितले तर (माझ्यासारख्या)अनेक गायकांना त्याचा उपयोग होईल thanks for sharing your Hobie's.

  • @sushmamarathe976
    @sushmamarathe976 Před rokem

    आम्ही काल गडकरीला तुमच्या कार्यक्रमाला आलो होतो...... अतिशय सुंदर झाला कार्यक्रम....... कान तृप्त झाले........एव्हढ्या लहान वयात तुम्हाला रसिकांचे खूप प्रेम आणि प्रतिसाद मिळत आहे ...... रंगायतनचा पूर्ण show houseful होता....... once more सारखी दाद मिळत होती...... अशीच दोघांची खूप प्रगती होऊ दे

  • @shri1951
    @shri1951 Před rokem +1

    जोडी छान जमली आहे सारेगम पासून मी तुम्हा दोघांच्या प्रेमात आहे. मुग्धा तुझे हुर हूर हे गाणे एक उनाड दिवस सिनेमातले एकदा प्रथमेश ने गाऊन दाखवावे असे वाटते जमले तर बघा मुग्धा ने ते खूप छान गायले होते ❤ लव्ह यू बोथ ❤

  • @ss-ol1ky
    @ss-ol1ky Před rokem

    प्रथमेश तू आमच्या तालुक्याचे कोकणचे रत्न आहेस . आणि मुग्धा नावाप्रमाणेच गोड आहे मला तुमची जोडी तुम्ही little champ असल्यापासून खूप आवडते...

  • @akankshajagtap5628
    @akankshajagtap5628 Před rokem +1

    Heartiest congratulations both of you 😍🎉💐
    farmaish : aigiri nandini tumchya avajat aikayala avdel

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Před rokem +4

    श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने तुमच्या दोघांचे 1लाख subscribers पुर्ण हो हो त 🙏💐💐

  • @aparnajoshi628
    @aparnajoshi628 Před rokem

    असेच बोलत रहा.गाणी ऐकवा. शुभेच्छा. प्रथमेश तुझ देवदर्शनाला जायच कधीच विसरणार नाही मुग्धा तुझे आणि पललवीचे संभाषण आठवते.

  • @k3632
    @k3632 Před rokem

    प्रथमेश तीसीच्याआत घेतलेला लग्नाचा विचार खूप छान आहे आणि मुग्धा खूप छान हसते तूमच्या दोघांचे अभिनंदन

  • @atreomkar
    @atreomkar Před rokem +4

    Ajab chemistry ahe guys.. you will be remembered for most melodious couple forever 🤩

  • @aparna3018
    @aparna3018 Před rokem

    तुम्ही दोघेही छान आहात. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद.

  • @span123-yl7rw
    @span123-yl7rw Před rokem

    पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा... ❤ आनंदी रहा,मस्त रहा,💐🌿 दादोजी नवरोजी झाला हे नवल any way beast of lack...👍 सुखी जीवन जगा...🌼

  • @sushmamarathe976
    @sushmamarathe976 Před rokem

    आम्हाला खूप मनापासून तुमची जोडी असावी असे वाटायचे..... खूप गोड आहात तुम्ही दोघे

  • @sandeepshindeonline
    @sandeepshindeonline Před rokem +2

    ❤Little Champs to Young Masters hya Pravasat Tumhi Gayileli Tumachya Avadichi Athavanitil Gani Amha Sarvana Eikayala Jarur Avadtil. Pan, tyachi Suruvat Little Champ madhe Gayilelya First Ganyane Kara. All the Best. ❤

  • @umeshjoshi346
    @umeshjoshi346 Před rokem +2

    अभिनंदन दोघांचे. All the Best ❤️

  • @meenajere7615
    @meenajere7615 Před rokem

    प्रथमेशमुग्धा 💐💐खुप गोड अभिनंदन, आशिर्वाद, लग्नाला बोलवा हं,विसरुनका😂आमच्या कुटुंबला आनंद झाला,,,आम्ही नृसिंहवाडीचे,, दोघे घरी या

  • @bhaktideshpande6265
    @bhaktideshpande6265 Před rokem

    Khup satvik,sushil Ani chan Jodi aahe tumchi.aayushbhar asech ekmekanvar Ani ganyavar Prem karat Raha.
    Khup shubhechha.

  • @amrutajoglekar-hj1gy
    @amrutajoglekar-hj1gy Před rokem

    तो व्हिडिओ पाहिला. ह्या व्हिडिओची वाट पहात होते. Wish you all the best!🎉अनेक उत्तम आशिर्वाद!

  • @sujatapansare3648
    @sujatapansare3648 Před rokem +1

    खूप गोड आहात तुम्ही दोघं!असेच हसत रहा!God bless you both!❤

  • @adigokhale90
    @adigokhale90 Před rokem +6

    Congratulations... Best wishes for great life ahead and togetherness. Keep smiling 🎉

  • @PrasadSadhale
    @PrasadSadhale Před rokem

    दोघांनाही खूप खूप शुभेच्छा....!!!
    लग्नासाठी 21 डिसेंबर, 2023 हा अतिशय चांगला मुहूर्त आहे. बघा शक्य असल्यास. अजून बराच काळ आहे त्यामूळे होईल सर्व... पुन्हा एकदा शुभेच्छा.

  • @rajeshlimaye6865
    @rajeshlimaye6865 Před rokem

    मस्त👌
    फर्माइश म्हणजे
    आप की आँखो में ... हे गीत तुम्ही सादर करावे, आवडेल ते ऐकायला

  • @vaishalilondhe343
    @vaishalilondhe343 Před rokem +7

    तुम्ही दोघे ground to earth आहात, सुसंस्कारित, संयमी आहात.
    तुम्हाला खूप शुभेच्छा 🎉

  • @shrikantbhoir7892
    @shrikantbhoir7892 Před rokem

    हे असले काही करण्यापेक्षा तुमच्या गाण्यांचे व्हिडिओ पाहायला जास्त आवडले असते ज्यामध्ये तुमचे खरे talent आहे

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 Před rokem

    लक्षात असू द्या. 🌹अती परिचया अवज्ञा 🌹श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏

  • @user-rv9sn3vf1q
    @user-rv9sn3vf1q Před rokem +10

    You both are so cute! very happy for you as you begin this new chapter of your life . I have 2 questions (1) Where will you stay after marriage (2) Can you create a video with your families so that we can hear from them also? It would be so cute to hear from them. We have been seeing your parents since sa re ga ma pa so would be great to hear from them. Congratulations!

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Před rokem

    अभिनंदन दोघेही असेच कायम आनंदी रहा.

  • @ravibendre3053
    @ravibendre3053 Před rokem +2

    दोघांना ही खूप खूप शुभेच्छा

  • @gajananmayekar126
    @gajananmayekar126 Před rokem

    Khup Sundar doghanche vichar aahet,Om Sai Ram Shubh Ratri 🙏🙏🙏🙏🙏.

  • @shantilalkalel1136
    @shantilalkalel1136 Před rokem

    खळखळून असणं आणि उत्तर देताना दोघांची सहमती ,मनमोकल्या गप्पा खूपच छान वाटलं........

  • @rekhamane8385
    @rekhamane8385 Před rokem +1

    Khup chan answers dile.mast

  • @rekhakilpady487
    @rekhakilpady487 Před rokem +2

    व्हिडिओ चा आवाजात फक्त तुमचा दोघांचा आवाज ऐकायला जास्ती आवडेल कारण तो अतिशय गोड आहे दोघेही जण केळवणे जपूनच खा आवाज व तब्येतीला जपा आपल्या आईवडिलांना पण कधी कधी व्हिडिओ त दाखवा

  • @purvisapre7564
    @purvisapre7564 Před rokem +1

    खूप छान उत्तर दिलीत् दोघां नी.👌👌duet song सूचवेन मी,"रिमझिम रिमझिम रूमझूम रूमझूम'from 1942 love story,please.ऋतुपावसाळा आहे,so"मौका भी है,दस्तूर भी"😊

  • @nehatambe7376
    @nehatambe7376 Před rokem

    खुप छान जोडी....मी खुप भाग्यवान आहे की मी प्रथमेश च्या गावची माहेर वाशिण आहे...लहानपणापासून जसा आहे तसाच आहे प्रथमेश....खुप खुप शुभेच्छा

  • @ulhasgokhale9485
    @ulhasgokhale9485 Před rokem

    डेट करतात म्हणून लग्न करणार की नाही ही शंका लोकांच्या मनात आली .
    सौ.विजया उल्हास गोखले.

  • @pratibhaphadke9184
    @pratibhaphadke9184 Před rokem +2

    लग्नाच्या गडबडीत नवीन रेकाॅर्डिंग काही आहे का नाही? केवळ दुसर्‍यांची गाणी गाऊन चालणार नाही, लवकरात लवकर स्वत:ची गाणी लोकांच्या तोंडी व्हायला हवीत.

  • @swatitere1114
    @swatitere1114 Před rokem

    तुमची जोडी तर खूपच गोड आहे...सगळ्यांना हवीहवीशी वाटणारी...
    एक विचारायचं होतं...तुमच्यात अंतर किती आहे???(शक्य असेल तर सांगा...)

  • @sunitapatil26
    @sunitapatil26 Před rokem

    Khup cute and matured jodi aahe tumchi. God bless you. Lagna jhala ki ya aamchyakade kelvan la 😊

  • @priyankajadhav9911
    @priyankajadhav9911 Před rokem +1

    खूप गोड आहात तुम्ही दोघे पण लवकरच लग्न करा ❤❤❤❤

  • @vrundarasal7276
    @vrundarasal7276 Před rokem

    Khup khup Abhinandan Mugdha n Prathamesh

  • @kumudsalunke248
    @kumudsalunke248 Před rokem +2

    Made for each other❤ saglya goshti life madhye pre destined astat ..tumhala doghanna ekatra baghun khup Anand hotoy ..❤❤❤

  • @neelawadhwa9011
    @neelawadhwa9011 Před rokem

    Khup ch goad aahet tumhi dogha ...very very down to earth...asech Raha nehmi...khup abhinandan ❤😊