हरिहरांची पलाखी व भजन, भारुड, गवळण बेलापूर खुर्द.

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • हरिहरांची पलाखी व भजन, भारुड, गवळण बेलापूर खुर्द.
    श्रावणातील प्रत्येक सोमवारी हरिहरांचे तीन मंदिर असलेल्या गावातून म्हणजेच बेलापूर खुर्द, बेलापूर बुद्रुक व उक्कलगाव अशा तिन्ही ठिकाणाहून हरिहरांच्या पादुकांची पालखी काढली जाते. त्यापैकी बेलापूर खुर्द येथील हा पालखी सोहळा, यामधे वेगवेगळ्या अभंग रचना असलेले भजन, गवळण, भारूडे म्हंटली जातात. भारूडाद्वारे समाज प्रभोदनाचे कार्य केले जाते.
    यात लहानग्यापासुन वृद्धलोकांपर्यंत पालखीत सहभाग घेतात.
    या पालखीची सुरुवात गावातील दक्षिण मुखी मारुती मंदिरापासून होते व पूर्ण गावातून मिरवली जाते, ही पालखी पिढ्यानपिढ्या चालु ठेवली आहे. या पालखीला रात्री 9 वाजता सुरुवात होते व रात्री 1-2 वाजेपर्यंत ही पालखी मिरवली जाते . ही पालखी मिरवत असताना पालखीच्या स्वागतासाठी सर्व घरासमोर सडा रांगोळी केली जाते, व पालखीचे पूजन केले जाते. व पूर्ण गावात मिरवून झाल्यावर शेवट मारुती मंदिरात आरती करून थांबवली जाते.

Komentáře • 8