अतिदुर्गम दर्जा असलेले एकमेव गाव | महाराष्ट्रातील मॉरीशस | नक्की बघा | Maharashtra Desha

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2021
  • मॉरिशससारखा छोटा देश आज केवळ तिथल्या सरकारने पर्यटन सुविधेवर भर दिल्याने तिथला निसर्ग पाहण्यासाठी जगभरातील लोक तिथे जातात.
    भारतात ही फोफसंडी सारखे अनेक निसर्ग सॊदर्य असलेली ठिकाणे आज पर्यटकांपासून वंचित असल्याने तेथील जनतेचा विकास खुंटला आहे.
    तसेच पर्यटक निसर्ग सॊदर्याला मुकले आहे.चला आपण ही पर्यटनासाठी या निसर्गरम्य व शांतताप्रिय दरीखोऱ्यातील “फोपसंडी” पर्यटन स्थळांना अवश्य भेट द्या.
    पर्यटन करून आल्यावर तेथील सुवासिक तांदूळ, मध, व चुलीवरच्या तांदळाच्या भाकरी, मासवडी, लज्जतदार शेवंती तसेच गावरान कोंबडीचाही आस्वाद घ्या.
    या गांवचे अनेक वैशिष्टये सांगता येतील त्यातील काही प्रामुख्याने खाली देत आहे.
    १) अहमदनगर, नाशिक, पुणे, ठाणे जिल्ह्याच्या सीमारेषेवर वसलेले अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील शेवटचे गांव).
    २) पावसाळ्यात तुफान पर्जन्यवृष्टी होत असल्याने अजूनही गावातील बहुतांश आदिवासी गुराढोरांसह पावसाळ्याचे चार महिने गुहेचा आसरा घेतात..
    ३) या गावात सकाळी नऊ वाजता सूर्योदय व संध्याकाळी साडेचार वाजता सूर्यास्त होतो. हा दोन्ही देखावा पर्यटकांनी पाहणे म्हणजे पर्यटकांना कपिलाषष्टीचा योग होय.
    ४) पर्यटनाच्या दृष्टीने फोपसंडी परिसरात ” कोंबड किल्ला, भदभद्याचा धबधबा, धुळगडीचा धबधबा, धारीचा धबधबा, कावड्याचा धबधबा, चोहडीचा धबधबा, काजवा महोत्सव.
    आदिवासी नृत्य, निसर्गसॊदर्याने भरलेला मानखांदा गायदरा, सानदरी, निखळीचा डोंगर, बाळूबाईचा डोंगर, रांजण्याचा डोंगर, टकोरीची खिंड, वारल्याचा कडा, चारण गडद, दोंड्याची गडद, घोडगडद.
    केमसावण्याचे पाणी, उंबारले, अनेक गुहा, तसेच कळमजाई मंदिर, बर्डीनाथ मंदिर, दर्याबाई मंदिर, राणूबाई मंदिर इतके प्रचंड निसर्ग सॊदर्याने भरलेले पॉईंट येथे पहावयास मिळतात.
    मात्र त्यासाठी किमान तीन दिवस पायी भटकण्याची तयारी हवी.
    ५) या गावचे पाणी पिण्यासाठी अतिशय गोड आहे. तसेच धबधब्याखाली आंघोळ केल्यावर शांपू न लावता ही केस कुरळे होतात.
    येथून माळशेज घाट अवघा 10 कि. मी. अंतरावर आहे. किमान 3 कि. मी. डोंगर फोडून रस्ता केला तर माळशेज अगदी जवळ येईल.व दळणवळण, पर्यटन वाढेल.
    हे 1200 लोकवस्तीचे हे Mauritius in Maharashtra - महाराष्ट्रातील मॉरिशस ” फोपसंडी” गांव अकोलेपासून अवघे अंदाजे 40 कि. मी. अंतरावरील अनेक मोठमोठे डोंगर पार करून दरीच्या तळाशी वाड्या, पाड्यावर वसलेलं अतिदुर्गम गांव आहे.
    या गांवचा इतिहास ही रंजक आहे. साधारणतः 1925 च्या सुमारास संगमनेर प्रांताचे इंग्रज अधिकारी “फोप” हे घोड्यावरूनजंगलात फिरत फिरत या दरीत उतरले.
    तेथे त्यांना आदिवासींची वस्ती आढळली. या “पोफला” येथील निसर्ग खूप आवडला. आणि येथे तो दर रविवारी येऊ लागला.
    येथे राहण्यासाठी त्यांनी “मांडवी नदीच्या” तिरावरील टेकडीवर त्याचे रेस्ट हाऊस बांधले. तेथून तो वरील चार ही जिल्ह्याच्या सिमेवरील डोंगर, कोंबड किल्ला(कुंजीर गड), चोहोबाजूंनी धबधबे पाहण्याचा आनंद घेत असे.
    पोफच्या या राहण्याने नंतर या गावाला “पोफसंडी” म्हणू लागले. नंतर त्याचा अपभ्रंश होऊन “फोपसंडी” हे नांव रूढ झाले.ते आजतागायत तसेच आहे.
    स्वातंत्र्यानंतर ही 50 वर्षे हे गांव शासनाच्या सर्व सोई सुविधांपासून वंचित होते.
    अगदी निवडणुकीच्या वेळी ही गाढवावरून 10 कि.मी. मतदान पेट्या नेल्या जात होत्या. 1997 मधील गावातीलच दत्तात्रय मुठे ही व्यक्ती पुणे येथून परत गावांकडे आली.
    तेव्हा गांवात रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण, दळणवळण, एस टी इत्यादी सुधारणा घडवून आणण्यासाठी पंतप्रधानांपासून ते तालुका स्तरापर्यंत सतत पत्रव्यवहार केले,पायपीट केली.
    सर्वात प्रथम गावांत बस येण्यासाठी त्यांनी सरकारदरबारी प्रयत्न केले. शेवटचे हत्यार गावकऱ्यांनी गावातच सांघिक आमरण उपोषणाबाबतचे हत्यार उपसले. नाईलाजाने अधिकारी वर्गांना गावात पायी यावे लागले.
    For join JIWASHI ADVENTURE
    CONTACT PERSON :-
    Mr. Vaibhaw Chaudhary - +91 94222 31245
    Mr. Vicky Bhakte - +91 99703 44665
    धन्यवाद
    आपलाच
    आशुुुतोष देशमुख

Komentáře • 36

  • @sunilmate6720
    @sunilmate6720 Před 2 lety +2

    खूपच अप्रतिम व्हिडीओ आहे, आणि माहिती सुद्धा खुप छान आहे

  • @hackerrudransh2681
    @hackerrudransh2681 Před 2 lety

    My Maharashtra

  • @JAYHANUMAN909
    @JAYHANUMAN909 Před 2 lety +1

    Nice khup chhan

  • @dilipkolapkar4952
    @dilipkolapkar4952 Před 2 lety

    सुपर खुप चांगले

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety

      मनापासून धन्यवाद साहेब ☺️🙏🚩

  • @ketangodbole5973
    @ketangodbole5973 Před 2 lety

    स्वर्ग आहे अप्रतिम आहे

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety

      येणाऱ्या पावसाळ्यात पुन्हा एकदा बघायला मिळेल तोही घारीच्या नजरेने 😊🙏👌

  • @ashishlawate2738
    @ashishlawate2738 Před 2 lety +1

    मस्त बंधू👌👌

  • @yogeshkhairnar1159
    @yogeshkhairnar1159 Před 2 lety +2

    👌🥰👌

  • @bhausahebmote3839
    @bhausahebmote3839 Před 2 lety +1

    Hi

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 Před 2 lety +1

    Absolutely amazing

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 Před 2 lety +1

    उलट भाऊ शहरातील व्यक्ती या गावात जास्त गेला तर येथील गावपण हरवेल.🙏🏿🙏🏿

  • @GauravshaliEtihas
    @GauravshaliEtihas Před 2 lety +4

    अप्रतिम सौंदर्याने नटलेलं हे गाव एकदा तरी पहावंच असं आहे

  • @scccc526
    @scccc526 Před 11 měsíci +1

    चकदेव,,तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा,,हे गाव पश्चिम महाराष्ट्रातील दुर्गम गाव आहे

  • @dagdujagdale8929
    @dagdujagdale8929 Před 2 lety +1

    खूप छान असेच काम करत रहा

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety

      तुमचे आशिर्वाद असेच पाठीशी राहो

  • @DVW9657
    @DVW9657 Před 2 lety +1

    एक नंबर 👌

  • @yogesh_kale
    @yogesh_kale Před 2 lety +1

    छान माहिती भाऊ 👍

  • @shyammilakhe0216
    @shyammilakhe0216 Před 2 lety +1

    जय adivashi

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před 2 lety +1

    ,,,,,,,,,,, Khoop,,,,, Sundar,,,,,,,,,, kokan,,,,,

  • @sanjayjadhav-ld5gk
    @sanjayjadhav-ld5gk Před 2 lety +1

    आशुतोष भाऊ खूपच छान. आपल्या युट्युब चायनल वर खरच अप्रितम अशी माहिती भेटती व खूप शिकण्या सारखे आहे . आपले खूप खूप आभार आशुतोष भाऊ जय शिवराय 👍👍👍

  • @Ghumakkad_Sachin
    @Ghumakkad_Sachin Před rokem

    Episode 1 Trirashmi-Pandav caves, Nashik
    czcams.com/video/73CUfQCD4H4/video.html
    Episode 2 Trirashmi-Pandav caves, Nashik
    czcams.com/video/oNXdBVe--w0/video.html
    Episode 3 Trirashmi-Pandav caves, Nashik
    czcams.com/video/5Taed5aYcqw/video.html
    Kanheri caves, Mumbai:
    czcams.com/video/VaqWBSUpCXk/video.html
    Lothal-Indus Valley Civilization:
    czcams.com/video/Gw_gluB0gyg/video.html
    Dholavira- Kutch Sindhu culture:
    czcams.com/video/xrxliZ7eZuM/video.html
    Karle caves, Lonavala:
    czcams.com/video/kOxBIkb3mPo/video.html