संत गाडगे बाबा यांचे 50 प्रेरणादायी विचार आणि माहिती | Sant Gadge Baba Quotes in Marathi | गाडगेबाबा

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 12. 2020
  • #संतगाडगेबाबा #प्रेरणादायी #stayinspiredmarathi
    ● गाडगे बाबांची थोडक्यात माहिती
    ◆ संत गाडगे बाबांचा जन्म:
    २३ फेब्रुवारी १८७६ कोतेगाव (शेंडगाव) येथे झाला. ते गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती.
    संत गाडगे महाराजांच पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव - झिंगराजी राणोजी जाणोरकर तर आईचे नाव - सखुबाई झिंगराजी जणोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. त्यांचे कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत. गाडगेबाबा म्हणजे एक चालती-बोलती पाठशाळा होती.
    माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली.
    डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे.
    देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला.
    डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले.
    सामाजिक सुधारणा : १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास घेतला. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.
    त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.
    ● मृत्यू
    लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावती जवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले. या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे.
    अमरावती विद्यापीठाला गाडगे बाबांचे नाव देऊन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे नामकरण करण्यात आलेले आहे.
    ◆ "संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश"
    भुकेलेल्यांना = अन्न
    तहानलेल्यांना = पाणी
    उघड्यानागड्यांना = वस्त्र
    गरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदत
    बेघरांना = आसरा
    अंध, पंगू रोगी यांना = औषधोपचार
    बेकारांना = रोजगार
    पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना = अभय
    गरीब तरुण-तरुणींचे = लग्न
    दुःखी व निराशांना = हिंमत
    गोरगरिबांना = शिक्षण
    हाच आजचा रोकडा धर्म आहे ! हीच खरी भक्ती व देवपूजा आहे !!
    || गोपाला, गोपाला, देवकीनंदन गोपाला ||
    ● इतर प्रेरणादायी व्हिडीओ :
    🎯 चाणक्य यांचे 40 प्रेरणादायी विचार | चाणक्य नीति मराठी | 40 Quotes of Chanakya in Marathi
    • Video
    ___________________________________
    🎯 गौतम बुद्धांचे 50 प्रेरणादायी विचार मराठी | 50 Motivational Quotes of Gautam Buddha in Marathi
    • गौतम बुद्धांचे 50 प्रे...
    ___________________________________
    🎯 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 60 प्रेरणादायी विचार | 60 Inspiring Thoughts of Dr. B. R. Ambedkar
    • डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...
    ____________________________________
    🎯 डॉ. ए पि जे अब्दुल कलाम यांचे 40 प्रेरणादायी विचार | 40 Life Changing Quotes of Dr A P J Abdul Kalam
    • डॉ. ए पि जे अब्दुल कला...
    ____________________________________
    🎯 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तथ्य आणि दुर्मिळ माहिती | डॉ. बाबासाहेब आंबेडकर | Stay Inspired
    • डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...
    ____________________________________
    🎯 गौतम बुद्धांचे दहा अमूल्य विचार | 10 Thoughts of Gautam Buddha
    • गौतम बुद्धांचे दहा अमू...
    ____________________________________
    🎯 अल्बर्ट आइन्स्टाइन यांचे 50 प्रेरणादायी विचार | Motivational Quotes of Albert Einstein in Marathi
    • अल्बर्ट आइन्स्टाइन यां...
    ____________________________________
    🎯 स्वामी विवेकानंद यांचे 40 प्रेरणादायी विचार | 40 Motivational Quotes of Swami Vivekanand in Marathi
    • स्वामी विवेकानंद यांचे...
    ____________________________________
    🎯 विश्वास नांगरे पाटील यांचे 50 प्रेरणादायी विचार | IPS Vishwas Nangare Patil Motivational Quotes
    • विश्वास नांगरे पाटील य...
    ____________________________________
    ● “All the videos, songs, images, and graphics used in the video belong to their respective owners and I or this channel does not claim any right over them."
    Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing."
    ● For Copyright Matter, please Email us - premtayade69@gmail.com

Komentáře • 1K

  • @nirmalanaik3717
    @nirmalanaik3717 Před 3 lety +219

    खूप छान प्रेरणा आहे गाडगे बाबाची मन प्रसन्न झाले ऐकून अशा महामानवाने कीर्तन मधून सर्व काही समाजाला समजावून सांगितले खूप अभिमान आहे मला छान वाटले ऐकून

  • @rupeshmore9151
    @rupeshmore9151 Před 3 lety +71

    गाडगे बाबा व बाबा साहेब आंबेडकर अशा दोन्ही महा पुरुषा सारखे पुन्हा कोणी जन्माला येणे म्हणून दोन्ही महापुरुषांना कोटी कोटी प्रणाम

  • @shrirambharti894
    @shrirambharti894 Před rokem +44

    संत गाडगे बाबा व डाँ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्र पुरुष हे भारत देशाला एक महान रत्न लाभलेले आहे व त्यामुळे देशात फार मोठी क्रांती घडून आलेली आहे

  • @kundlikguvhade9852
    @kundlikguvhade9852 Před 2 lety +43

    मानसात वावरणारा देव म्हणजे संत गाडगे बाबा. बाबासाहेबाच्या र्हदयातील संत
    संत गाडगे बाबा

  • @narayanghuge3751
    @narayanghuge3751 Před 3 lety +31

    श्री संत गाडगेबाबा यांच्या विचारांचे आजच्या पैसे घेऊन किर्तन करणार्या बुवांनी व समाजाने जर आचरण करुन ते अमलात आणले तर कोरोनासारख्या महामारीला ही आपण सहज हरवू शकू एवढे ते उपयुक्त व प्रेरणादायी आहेत.

  • @balkrishnagosavj1237
    @balkrishnagosavj1237 Před 3 lety +13

    गाडगेबाबा हे खरे संत होते किती ठिकाणी किर्तन केली एक रूपया घेतला नाही

  • @meenavairale5304
    @meenavairale5304 Před 5 měsíci +6

    संत गाडगे बाबा यांना आज जयंती निमित्त विनम्र अभिवादन. गेले सांगून गाडगे बाबा मुल करा शहानिरर विका प्रसंगी घरदार नका राहू अडाणी र.

  • @sangitaatkar8785
    @sangitaatkar8785 Před 3 lety +20

    गाडगे बाबा आणि बाबासाहेब याचे नाते म्हणजे विचाराचे ते रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ नाते आहे मानवाच्या हिताचे प्नेमाचे आणि उन्नतीचे

  • @shankarghule1902
    @shankarghule1902 Před 3 lety +14

    गाडगेबाबा बाबा विचार मनाला फार मोठा बोध देणारे होते असेच संत देशांत निमार्ण व्हायला हवेत हि ईश्वर चरणीं प्रार्थना करिता आहे

  • @babanpaithane3961
    @babanpaithane3961 Před 3 lety +51

    खुप छान माहिती संकलन करून ठेवली आहे दोन महापुरुषांना विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏🙏

    • @mahendrasalve3325
      @mahendrasalve3325 Před rokem +1

      संत गाडगे महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर , महात्मा ज्योतिबा फुले , छत्रपती शाहूमहाराज हे खरे समाज सुधारक या सर्व महान पुरुषांना विनम्र अभिवादन !
      जयभीम ! जयशिवराय !

  • @jadhavfamily6672
    @jadhavfamily6672 Před rokem +7

    प्राण्यांची हत्या करू नका, माणसात देव बघा . ह्या पेक्षा अजून काय समजवायला पाहिजे.कोटी कोटी प्रणाम संत गाडगेबाबांना .

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 Před 3 lety +14

    संत गाडगेबाबा यांनी चांगलं निःस्वार्थ पणे समाजसुधारक होऊन 💯 टक्के काम केलं आहे 🙏🙏🙏🙏🙏

  • @sunilsontakke1883
    @sunilsontakke1883 Před 5 měsíci +3

    संत गाडगेबाबा यांचे विचार अतिशय सुंदर जीवनात मार्गदर्शन घेण्यासारखे आहे समाजातील सर्व स्तरातील मानवाने त्यांचे विचार अंगीकारावे तेव्हा आपल्या जीवनाचे सार्थक होईल जय संत गाडगेबाबा

  • @dhananjayhembade9886
    @dhananjayhembade9886 Před 3 lety +15

    बाबांनी विचार आपल्या समोर ठेवले आहे. आशा बाबांना कोटी कोटी प्रणाम.

  • @shatrughanmore2426
    @shatrughanmore2426 Před 2 lety +6

    आजचे किर्तनकार गाडगे महाराजांचे विचार किर्तनात सांगित नाहीत.तर देव धर्मात अडकवित असल्याचे दिसून येते.आज समाजाला किंवा देशाला गाडगे महाराजांच्या विचारांचा गरज आहे.

  • @sudhakarmangulkar5242
    @sudhakarmangulkar5242 Před 2 lety +22

    अत्यंत उदबोधक आणि प्रेरणादायी विचार.महामानव श्री. गाड़गेबाबा स कोटी कोटी प्रणाम

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 Před 3 lety +12

    महापुरुषांना कोटी कोटी वंदना
    गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला
    देव मंदिरात नाही तर माणूसा आहे
    अतिशय सुंदर माहिती सांगितली जी सर व पुढील वाटचालीस मनापासून खूप खूप धन्यवाद जी सर

  • @sureshsatpute7594
    @sureshsatpute7594 Před 3 lety +13

    संत गाडगेबाबा़ंचे विचार खूप प्रेरणादायी व समाजाला नव संजीवनी देणारे आहेत

  • @shamraoholikeri9385
    @shamraoholikeri9385 Před 3 lety +13

    🙏संत गाडगेबाबा यांचे विचार ऐकून मन प्रेरीत झाले बाबा नां विनम अभिवान🙏

  • @anitadahiwale9884
    @anitadahiwale9884 Před 3 lety +9

    खूप प्रेरणादायी विचार आहे.आज लाेकांना गाडगे बाबांच्या विचारांची गरज आहे . जयभिम नमो बुध्दाय

  • @milindjadhavjadhav8027
    @milindjadhavjadhav8027 Před 3 lety +14

    लोक नाय सुधारणार

  • @dattamolane9708
    @dattamolane9708 Před 2 lety +3

    खूप चांगले विचार आहे हिंदू लोकांनी हा विचार अवलंबले पाहिजे आणि कोंबडे बकरी कापणे बंद केले पाहिजे आणि सर्व संत चे
    विचार अवलंबले पाहिजे हिंदू धर्म मा मध्ये
    पशु मात्रा दया केली पाहिजे हा च खरा हिंदू धर्म आहे जय शिवराय जय श्री राम जय हिंदू धर्म

  • @rameshgedam1928
    @rameshgedam1928 Před 2 lety +9

    फारच छान अप्रकाशित अप्रतिम
    , जय भीम जय गाडगे बाबा नमोबुदधाय जय संविधान

  • @gautamkamble7510
    @gautamkamble7510 Před 2 lety +42

    ज्यांनी ज्यांनी महापुरुषांना वाचलं, ऐकलं, त्यांनाच या जगात खरा देव सापडला आणि सत्याचा मार्ग सापडला... 🙏🏻🙏🏻

    • @nagmalonare7528
      @nagmalonare7528 Před rokem +1

      Gadgebabana and dr,babasahab -ambedkrana koti koti pranam

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 Před 3 lety +10

    ज्यांचे आदर्श संत गाडगेबाबा जी आहेत ते आयुष्यात कधीच पराभूत होऊ शकत नाही गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला

  • @budhay2016
    @budhay2016 Před 3 lety +8

    खर च अमुल दादा ,तुम्ही खूप विचार पूर्वक ,अभ्यास करून .समज जागृती निर्माण करण्यासाठी .आम्हाला इतिहास सत्य माहिती देता ..
    तुम्हाला कर्तीकरक.जय भीम.
    जय शिवराय.

  • @vasantdalvi9295
    @vasantdalvi9295 Před 3 lety +8

    संत गाडगेबाबांचे कीर्तन ही देव वानीआहे,मुलांना शाळेत हे शिकवीले पाहीजेत,त्यांचे भविष्यात भले होईल

  • @raghunathparvate3591
    @raghunathparvate3591 Před 3 lety +6

    खरोखरच सर्व अमूल्य विचार...!!!
    गोपाला गोपाल देवकीनंदन गोपाला...

  • @mangalkale7574
    @mangalkale7574 Před 6 dny +1

    खूप खूप प्रेरणादायी समाजासाठी काळाची गरज 🙏🙏

  • @dayanandrathod3717
    @dayanandrathod3717 Před 3 lety +8

    खूप छान माहिती आहे गाडगेबाबा ना प्रणाम ..!

  • @mangalhirvebudhaisgreatnam5596

    शिक्षण नसताना विज्ञान वादी असे संत गाडगेबाबा जयंती कोटी कोटी प्रणाम 🙏🏾🙏🏾

  • @manishabarve8134
    @manishabarve8134 Před 3 lety +5

    खरच गाडगे महाराज किती थोर होते, यालाच देवमाणूस म्हणावे.
    यांचे विचार प्रत्येकाने आप आपुल्या घरातील वेक्तीला नक्कीच सांगा.

  • @dhondirammandhare2318
    @dhondirammandhare2318 Před 2 lety +5

    खुपच सुंदर विचार मांडले आहेत सर, जय जिजाऊ जय शिवराय जय भारत,

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 Před 3 lety +6

    वंदनीय संत गाडगेबाबा जी यांना शत् शत् नमन‌ गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 Před 3 lety +6

    जय गाडगेबाबा महाराज

  • @ayushyajagtana4742
    @ayushyajagtana4742 Před 3 lety +5

    विचारधारा खुप छान आहे.
    लोकांमध्ये जनजागृतीसाठी करण्याचे महान कार्य करण्याचे काम छान संकल्पना आहे. अभिनंदन सर..🙏

  • @shreyaathawale9945
    @shreyaathawale9945 Před 8 měsíci +1

    खरे राष्ट्पुरूष असे व्यक्तिमत्व होते .हा विचारप्रवाह भारतीयांनी स्विकारला तर भारत पृथ्वी वरील अलौकीक राष्ट्र म्हणून उदयास येईल यात तिळमात्र शंका नाही . खूप खूप धन्यवाद हा विचार सर्व जनांपर्यंत पोहचावा ही सदिच्छा

  • @rajdarastekar9538
    @rajdarastekar9538 Před 2 lety +25

    He was a real Saint true human 🙏🙏🙏👍👍👌👌

  • @Bhalshankar8130
    @Bhalshankar8130 Před 3 lety +5

    खुप चांगले काम कलेत, गाडबे बाबा समजावले!

  • @kiranp4194
    @kiranp4194 Před 3 lety +7

    दोन्ही महापुरुषांना विनम्र अभिवादन🙏🙏🙏🙏🙏

  • @shashikanthulwale5839
    @shashikanthulwale5839 Před 2 lety +4

    विचार खरोखरच छान आहेत, अर्थपूर्ण, परिवर्तनकारी, आहे

  • @sadanandshirsat1229
    @sadanandshirsat1229 Před rokem +4

    गाडगे बाबा खरे संत होते खरे राष्ट्र संत आहे ते🙏🙏🙏

  • @bharatkalyankar1391
    @bharatkalyankar1391 Před 3 lety +5

    खुपचं छान आहे माऊली

  • @PrakashKakade-bk6ve
    @PrakashKakade-bk6ve Před 9 měsíci +2

    🔱🔱🔱☘️☘️☘️🙏🙏🙏 माता पार्वती पिता हर हर महादेव की जय
    ऊं नमः शिवाय 🙏🙏🙏☘️☘️☘️🔱🔱🔱🌹🌹🌹

  • @rinagavli1443
    @rinagavli1443 Před rokem +1

    Khup chan विचार आहेत 🙏गाडगे बाबा आणि बाबांसाहेब असे vichavant होते ki ते sarv aadic sangayce 🙏मस्त 👌

  • @shantaramingale7310
    @shantaramingale7310 Před 3 lety +3

    Khupch sundar, mangalmay jaybhim, sant gadge baba ki jay jay shivaray

  • @vilasurkude8065
    @vilasurkude8065 Před rokem +6

    एका शिक्षित,सुशिक्षित लोकांनाही जमले नाही किंबहुना हे गाडगे बाबा पेक्षाही अडानीच म्हणावे लागेल.
    बाबांचे विचार महान आहेत . गाडगे बाबा म्हणजे विज्ञानवादी विचार,आचार,

  • @user-yz5yg1yy4q
    @user-yz5yg1yy4q Před 2 lety +6

    संत गाडगेबाबा कि जय,🙏🌷🌷

  • @abhayshende4453
    @abhayshende4453 Před 3 lety +4

    Gadgebaba che vichar ani karya mahan hote , kirtanatun samajala jagrut kele . Babasaheb khud thank bhetayala ale hote.... Koti koti pranam.

  • @diliprote3111
    @diliprote3111 Před 3 lety +6

    खुप छान आहेत विचार

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 Před 2 lety +8

    दोन्ही महापुरुषांना वंदन

    • @tribhuvansakhahari3635
      @tribhuvansakhahari3635 Před rokem +1

      Sant GADAGEBABA thought and work is great and no forget till my last breath Jai GADAGEBABA Jai bhim namo budhay thank you Sir

  • @smrutikhandare6845
    @smrutikhandare6845 Před 6 měsíci +2

    संत गाडगेबाबा व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखे महापुरुष या पुढे होणे नाही....... 🙏🙏🙏

  • @ajaydhivar5499
    @ajaydhivar5499 Před 5 měsíci +1

    अतिशय उत्तम प्रेरणादायी संदेश

  • @sadmakeshyam4637
    @sadmakeshyam4637 Před 3 lety +7

    गाडगे बाबांचे कार्य महान

  • @sumitgodbole5424
    @sumitgodbole5424 Před 2 lety +4

    गाडगे महाराज के विचार बहूत मत्व पूर्न होते

  • @rajeshdhongade9252
    @rajeshdhongade9252 Před 2 lety +2

    वैज्ञानिक विचार रुजविणारे प्रबोधन आहे सर

  • @suvarnahattarki2611
    @suvarnahattarki2611 Před 5 měsíci +1

    DHNYVAD! MAJHE. SANTA GADGEBABA KOTEE KOTEE PRANAM TANCHE AADARSH SARVANNA.YUDET !"

  • @Balasahebpund4
    @Balasahebpund4 Před 3 lety +4

    सत्य विचार संत गाडगेबाबांना कोटी कोटी धन्यवाद आपणही बाबांचे अनुयायी बनु अशा महापुरूषांचे विचार सुखी जीवन जगण्याची गुरुकिल्लीच आहे . धन्यवाद भाऊ आपले.

  • @chandrakantwagmare9982
    @chandrakantwagmare9982 Před 2 lety +3

    खूपच छान माहिती आहे. अन्नश्रद्धा दूर केली आहे.

  • @dhondirammandhare2318
    @dhondirammandhare2318 Před 9 měsíci +2

    आई वडील हेच खरे देव, हे सांगणारे, मानसातच देव, आहे, असे सांगणारे, खरे संत, गाडगेबाबा, जय जिजाऊ जय शिवराय, जय शाहु महाराज जय फुले आंबेडकर,

  • @vijaywaghmare2263
    @vijaywaghmare2263 Před rokem +1

    Gadge babache vichar sukh shanti denare aahet ani khup sunder vichar aahet babache vichar khup avdle

  • @vikasadhav6760
    @vikasadhav6760 Před 3 lety +9

    गाडगे बाबांच्या विचाराची तुलना कुणाबरोबर होऊ शकत नाही धन्य ते गाडगेबाबा माझा तुम्हाला कोटिकोटी प्रणाम जय भीम

  • @_mahanama_2732
    @_mahanama_2732 Před 3 lety +5

    खुपच छान वाटले गाडगे महाराजांचे विचार

  • @rajeshbhole6376
    @rajeshbhole6376 Před 2 lety +1

    Khup chan mahiti koti koti naman 🙏💐

  • @devajimedi596
    @devajimedi596 Před rokem +1

    very good inspired by गाडगेबाबा,स thinks

  • @monalisavaidya6733
    @monalisavaidya6733 Před 2 lety +5

    Jai bhim jai santh gadage baba 🙏🙏🙏🙏

    • @krishnamasaya7782
      @krishnamasaya7782 Před rokem +1

      किती बुध्दी आहे. शिक्षण नसताना

  • @sushmazapale5886
    @sushmazapale5886 Před rokem +3

    व्हिडिओच्या शेवटी जेव्हा संत गाडगेबाबा आणि आंबेडकर यांच्या भेटीचा प्रसंग ऐकला तेव्हा डोळ्यात पाणी आले....🥺तो प्रसंग खूपच मनाला भावला. खुप, खुप आणि खुपच सुंदर व्हिडिओ. ....🙏🏻

  • @sanjayghadge5950
    @sanjayghadge5950 Před rokem +1

    अतिशय अनमोल विचार आहेत...जर पाळले तर!?

  • @subhashkamble3917
    @subhashkamble3917 Před 3 lety +2

    अति सुंदर मनाला प्रेरणा देणारे ... अशाच विचारांची सध्याच्या काळात अत्यंत गरज आहे ....जय संत गाडगे बाबा... जय भिम...

  • @vitthaljadhav8687
    @vitthaljadhav8687 Před 3 lety +3

    अतिशय उत्तम आहे

  • @user-er8gg1cu3b
    @user-er8gg1cu3b Před 3 lety +3

    खूप छान व्हिडिओ..👌
    #ज्ञानगंगा

  • @sonaliadhav
    @sonaliadhav Před 5 měsíci +1

    गाडगे महाराजांना शत शत नमन

  • @rajniadsule4989
    @rajniadsule4989 Před 2 lety +1

    Hats off 🙏🙏🙏 farach sunder. Tumche sadaiva mangal hovo 🙏🙏🙏

  • @nitinwaghade17
    @nitinwaghade17 Před 3 lety +4

    खुप छान संत गाडगे बाबा ची शिकवण साधि आणि सोपि आहे.

  • @bharatsinggirase7540
    @bharatsinggirase7540 Před 3 lety +4

    परमेश्वरा गाडगे बाबांना पून्हा जन्माला येऊ दे,

    • @krishnamasaya7782
      @krishnamasaya7782 Před rokem +2

      सहमत. छान विचार माडले.

  • @mahipalmandhare8590
    @mahipalmandhare8590 Před 6 měsíci +1

    खरंय अतिशय छान विचार आहेत... लोक आता शिकले पण सुशिक्षित झाले नाही... सर्वात जास्त अंधश्रद्धाळूपणा हा सुशिक्षित लोकांमध्ये आहे. ❤❤❤❤❤

  • @balajipalshetkar9850
    @balajipalshetkar9850 Před rokem +1

    खूप छान. मी गाडगे बाबांचे विचार मानतो

  • @arunbagade1123
    @arunbagade1123 Před 3 lety +4

    खूप छा न विचार आहे ते धन्य गाडगे बाबा

    • @garudnetaji45
      @garudnetaji45 Před 3 lety +1

      Amulya Theva donhi Baba karta karvita Sambhalanara tyanche nav Baba.

  • @amolgayikwad7243
    @amolgayikwad7243 Před 3 lety +3

    महामानव संत घाडगे बाबा सर्व समाज त्याचा विचार आचरणात आनंदाने शिकारा जय जिजाऊ जय शिवाजी जय भिमराय अंधश्रद्धा निर्मुलन समिती याना धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 Před 2 lety +1

    Baba aaplyala koti koti pranam.......aaple vichar kiti mahan hote....baba......

  • @dhanrajburande8966
    @dhanrajburande8966 Před 7 měsíci +1

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @mrbalu4105
    @mrbalu4105 Před 3 lety +7

    Khup chhan

  • @mandagawali6147
    @mandagawali6147 Před 3 lety +3

    बाबांचे विचार प्रत्येका पर्यंत पोहचणे गरजेचे आहे आपले आभार

  • @KailasPahurkar-pj7ig
    @KailasPahurkar-pj7ig Před 7 měsíci +1

    Khubchand gadge Baba vichar😊 Jay Hind Jay Bharat

  • @anikettupe1988
    @anikettupe1988 Před 2 lety +1

    खरच गाडगे महाराज गे्ट होते

  • @prakashnimbalkar887
    @prakashnimbalkar887 Před 3 lety +3

    खुपच छान विचार प्रेरणादायी विचार
    खूप छान वाटले। असे संत पुन्हा होने नाही

  • @rinamahire4183
    @rinamahire4183 Před rokem +1

    Koti koti naman gadgebabana

  • @sanghdeepnimgade2504
    @sanghdeepnimgade2504 Před 3 lety +4

    Thanks sir ya video sathi

  • @kiranpatil4dpatil739
    @kiranpatil4dpatil739 Před rokem +3

    सर बहुजन समाजाला सत्यनारायण कळतो पण गाडगे महाराजांचे विचार नाही कळत खूप छान प्रबोधन केलं जय जिजाऊ जय शिवराय जय बहुजन

  • @arvindmule1732
    @arvindmule1732 Před 3 měsíci +1

    छान.आभारी आहोत.

  • @anandraopathade8373
    @anandraopathade8373 Před rokem +1

    खूप छान गाडगेबाबा.चे.बोल.दखवले.जेयभिम

  • @akankshaghugare1130
    @akankshaghugare1130 Před 3 lety +4

    खरच बाबा चे विचार हे जगाला तारनारे आहे त

  • @milindjadhavjadhav8027
    @milindjadhavjadhav8027 Před 3 lety +4

    जबरदस्त

  • @pradipnandne3573
    @pradipnandne3573 Před rokem +1

    तुकाराम महाराजाचे खरे वारसदार संत गाडगे महाराज

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 Před 2 lety +1

    Babanche vichar khup mahan hote....lokani Samjun ghyayla pahije....

  • @ramkandewad854
    @ramkandewad854 Před 3 lety +7

    This is the best compliment of Maharashtra

  • @vitthaldinde3735
    @vitthaldinde3735 Před 3 lety +4

    गाडगे बाबांना विनम्र अभिवादन.

  • @SuperstitionSolutions
    @SuperstitionSolutions Před rokem +1

    बाबांचे अमूल्य कार्य होते

  • @yogeshdhawas5558
    @yogeshdhawas5558 Před 7 měsíci +2

    जय श्री राम 🚩🔥

  • @amazing148
    @amazing148 Před rokem +5

    सत्य घटना आहे सत्याचा नेहमी च विजय होतो अंधश्रध्दा निर्मूलन करा