Saat Sadda- The Hidden Waterfall in Maharashtra

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 08. 2024
  • पावसाळा नुकताच चालु झाला होता. सोशल मिडियावर वेगवेगळ्या निसर्गरम्य जागांचे फोटो आणि व्हिडिओ रोज दिसु लागले. पण दर वर्षी तेच तेच धबधबे, तेच ट्रेक्स आणि सोशल मिडिया संस्कृतीमुळे नावाजलेल्या जागांवर होणारी भरमसाठ गर्दी, यामुळे पावसाळ्यात अशा ठिकाणी जाणं टाळलेलंच बरं. म्हणुन पावसाळ्यात निसर्गाचा खरा आनंद घेण्यासाठी मागील काही वर्षांपासून मी नविन जागा शोधण्यास सुरुवात केली. अशा जागा, ज्या लोकांपासुन दुर आणि कोणाला माहित नसतील.
    सात थरांमध्ये वाहणारा तो धबधबा इतका सुंदर होता मी हा धबधबा शोधून काढण्याचेच ठरवले. तो फोटो एडिट केलेला किंवा हा धबधबा भारता बाहेर कुठेतरी असावा असं वाटत होतं. कारण असं दृश्य मी अजुन कधीही महाराष्ट्रात काय भारतात पण कुठे पाहिलं नव्हतं.
    एकदम अप्रतिम दृश्य. ज्याची एवढे दिवस उत्सुकता लागुन राहिली होती, शेवटी आज त्या धबधब्यासमोर येऊन पोहोचलो. डोंगरात तयार झालेल्या खळगीतुन सुरु होऊन खाली सात थरांमध्ये वाहणारा हा धबधबा आम्ही शोधला.असं निसर्ग सौंदर्य मी याआधी कधी पाहिलं नव्हतं. मी फेसबुक वर त्याचा फोटो शेअर केला. खुप लाइक मिळाले खुप शेअर आणि कमेंन्ट पण झाले. मला या धबधब्याला गुगल मॅप वर लोकेट करायचा विचार होता, पण बऱ्याच निसर्ग प्रेमींनी सांगितले की हि अशी सुंदर जागा लोकांपासून दुरच राहूदे. नाहीतर इतर सुंदर जागांचे जसे बाजारीकरण झाले आहे तसं या जागेचे पण होईल.
    • Devkund Waterfall- Gat... - Devkund waterfall
    • Kondana Caves Karjat-H... - Kondana Caves
    • Ashane Waterfall - Bes... - Ashane waterfall
    • How to Reach Morbe dam... - Morbe Dam
    #hiddenwaterfallinmaharashtra #saatsada #mahadraigad #marathivlog #secretwaterfallnearmumbai #vlogs #marathivlogger #weekendgetawaysfrommumbai #devkundwaterfall #kataldharwaterfall #vajraiwaterfallsatara #kelavliwaterfall #waterfalltrek #bhatkanti #bhivpuriwaterfall

Komentáře • 24