नरसोबाची वाडी | दत्त पादुका | Narsobachi Wadi Kolhapur| नृसिंह सरस्वती

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • कृष्णा-पंचगंगेचा विस्तीर्ण जलाशय, निसर्गाने चोहीकडे मुक्तहस्ताने केलेली सृष्टीसौंदर्याची उधळण आणि येणाऱ्या भाविकाला मिळणारे दत्तप्रभूंचे तेजोवलय या सगळ्या वातावरणाची अनुभूती मिळते ती नृसिंहवाडी इथं आल्यानंतर.
    “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा”
    या नामघोषात भक्त तल्लीन होत नरसोबाच्या वाडीला येतात आणि दत्तप्रभूंच्या पादुकांचे दर्शन घेऊन धन्य होतात. नृसिंह सरस्वतींच्या वास्तव्यामुळे इथल्या वातावरणात एक संचार जाणवतो. दत्तप्रभूंचा अवतार असलेल्या नृसिंहसरस्वतींचा जन्म कारंजा इथं झाला. सन्यासदीक्षा घेतल्या नंतर त्यांनी तीर्थाटन केलं. त्यावेळी नृसिंहवाडी ला त्यांनी तब्बल बारा वर्ष तपश्चर्या केली. येथून जातांना भक्तांना या ठिकाणी आपले कायम वास्तव्य असेल अशी हमी दिली आणि गाणगापुरी प्रस्थान केले आपल्या वचनांना जागल्याने आज देखील भाविकांना त्यांच्या अस्तित्वाची या ठिकाणी ठायी-ठायी प्रचीती येत असते.
    नरसोबाच्या वाडीला नृसिंह सरस्वतींच्या पादुका असून इतर तीर्थक्षेत्री आहेत तशी मूर्ती या ठिकाणी नाही. या पादुकांची दररोज महापूजा होत असते. दुध, दही, तूप, मध साखर या पवित्र जिन्नसांचे पादुकांना दररोज स्नान घालण्यात येते. त्यानंतर फुलांनी अत्यंत सुरेख अशी सजावट करून त्यावर शाल पांघरली जाते, ही महापूजा भाविकांना दूर बसून पाहता येते. कृष्णेच्या तीरावर असलेल्या या मंदिरात वेळ कसा जातो ते कळत देखील नाही. असं म्हणतात की, अविरत वाहणाऱ्या या कृष्णेला पूर आला तरी पादुकांपर्यंत पाणी पोहोचत नाही..
    दत्तप्रभूंच्या गुरुचरित्रात 18 वा अध्याय या नृसिंह वाडीतील नृसिंह सरस्वतींची लीला दाखवणारा आहे. कृष्णेच्या पलीकडील तीरावर एक दरिद्री दाम्पत्य रहात असे. एकदा दत्तप्रभू त्या ठिकाणी भिक्षा मागण्यासाठी गेले, परंतु घरात काहीही नसल्या मुळे ती स्त्री भगवंताना भिक्षा घालू शकली नाही. तेथून निघताना त्यांच्या अंगणात असलेला घेवड्याचा वेल नृसिंहसरस्वतींच्या नजरेस पडला, त्यांनी तो क्षणार्धात उपटला आणि निघून गेले. त्या स्त्रीला त्याचे खूप दुःख झाले आणि ती शोक करू लागली कारण घरात काही शिजवायला नसतांना त्या घेवड्यावर निदान त्यांचे पोट तरी भरत होते.
    पती घरी आल्या नंतर तीने घडलेली सर्व हकीकत सांगितली. त्याने तिला शांत करून तो वेल दूर नेऊन टाकला आणि त्या ठिकाणची माती नीट करत असतांना चमत्कार घडला. त्यांना सुवर्ण मुद्रांनी भरलेला हंडा सापडला. धावत जाऊन त्या पती-पत्नींनी दत्तप्रभूंचे पाय धरले.आजही भाविक नरसोबाच्या वाडीला गेल्यावर ती वेल उपटलेली जागा बघण्यास आणि तेथे असलेल्या मंदिराचे दर्शन घेण्यास आवर्जून जातात. नृसिंहवाडीला पूर्वी अमरापूर म्हणून ओळख होती. हा सर्व परिसर अरण्याने भरलेला होता. नरसोबाची वाडी हे गाव त्यानंतर बऱ्याच काळाने वसले आहे.
    या मंदिराबद्दल एक कथा अशी देखील सांगितली जाते की नरसोबाच्या वाडीतील हे मंदिर विजापूरच्या आदिलशाहने बांधले आहे. हिंदू धर्मियांचे हे पवित्र मंदिर असले तरी या ठिकाणी आपल्या मुलीची दृष्टी परत यावी यासाठी त्याने प्रार्थना केली होती. त्याच्या हाक भगवंताने ऐकल्याने समाधानी झालेल्या आदिलशाहने या ठिकाणी मंदिर बांधून दिले होते.
    मंदिरात पहाटे तीन वाजेपासून पूजा आणि धार्मिक विधींना सुरुवात होते. रात्री दहा वाजेपर्यंत या ठिकाणी भाविकांची वर्दळ पहावयास मिळते. काकड आरतीने पहाटे पूजेला सुरुवात होते, भूपाळ्यांचा सूर आसमंतात घुमू लागतो. त्यानंतर पंचोपचार पूजा पवमानाचा अभिषेक महापूजा, आरती असे नित्यक्रम सुरु होतात. दुपारी महाप्रसादाचा नैवैद्य दाखवला जातो आणि आरती होते. सायंकाळी देखील टाळ-मृदुंगाच्या गजरात भजनाचे सूर निनादतात. रात्री शेजारती गाऊन रोजचा नित्यक्रम संपतो.
    नृसिंह वाडी येथे आल्यानंतर भाविक देहभान विसरून दत्त चरणी लीन होतात कृष्णेच्या काठी निवांत वेळ घालवता येतो. या ठिकाणी नौकाविहाराचा देखील आनंद घेता येतो. येथे वारंवार येणाऱ्या भाविकांची संख्या देखील खूप आहे. दरवर्षी साजरा होणारा दत्तजयंती उत्सव या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो, त्यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी येतात. नरसोबाची वाडी या गावातील कृष्णेच्या काठची वांगी देखील खूप प्रसिद्ध आहेत. येथून परत जातांना भाविक आठवणीने वांगी घेऊन जात असतात..
    नरसोबाच्या वाडीला कसे जाल - How to Reach Narsobachi Wadi Mandir
    नरसोबाच्या वाडीला यायचे झाल्यास नृसिंह मंदिर कोल्हापुर जिल्ह्यात असून शिरोळ तालुक्यात आहे. सांगली येथून हे अंतर 22 की.मी. असून कोल्हापूर पासून नरसोबाची वाडी 45 की.मी. वर आहे. महामंडळाच्या बस ने आणि खाजगी वाहनाने देखील या ठिकाणी येता येईल.
    निवास व्यवस्था - Narsobachi Wadi Hotels
    मंदिर परिसरात संस्थानची निवास व्यवस्था असून अल्पदरात भाविकांना त्याचा लाभ घेता येतो. जेवणाची व्यवस्था देखील या ठिकाणी आहे.
    #narsobachiwadi #gurudevdatta #dattamandir #guru #dattaguru #dattatreya #dattamaharaj #kolhapurtourism

Komentáře • 174