जोड ओळ ऊसाची लागवड कशी करावी ओळ पट्टा पद्धतीचे फायदे

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • जोड ओळ ऊसाची लागवड कशी करावी अशी करा ऊसाची लागवड जोड ओळ पट्टा पद्धतीचे फायदे अशी करा ऊसाची लागवड जोड ओळ ऊसाची लागवड कशी करावी पट्टी पद्धत (जोड ओळ) : या पद्धतीमध्ये उसाच्या दोन ओळींमध्ये साधारणपणे ५ ते ७ फुटाचा पट्टा सोडून लागवड केली जाते. त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते. त्याची ऊस वाढीस मदत होते. तसेच लागवडीनंतर २ -३ महिन्यात येणारे आंतरपीक मधल्या पट्ट्यामध्ये घेता येते. प्रचलित पद्धतीने ऊसाची लागवड केल्यानंतर सुरुवातीस ऊसाच्या पिकात खूप गर्दी दिसते. तब्बल अडीच ते तीन लाख फुटवे होतात. मात्र प्रत्यक्षात कारखाण्यात तुटून जाणारा ऊस तुलनेने खूपच कमी होतो. कारण फुटवे वाढले, तरी एकमेकांना मारून टाकणारे फुटवे अधिक होतात. दिलेली अन्नद्रव्ये विभागून जाऊन प्रत्येक फुटव्यास त्या तुलनेत अन्न मिळत नाही. फुटव्यांची संख्या वाढून तुटेपर्यंत त्यातील अनेक मरून जातात व वजन कमी झालेला ऊस मिळतो.
    रोपांद्वारे#ऊस_लागवड कशी करावी #ऊस_लागवड
    शेताची चांगल्या प्रकारे मशागत झाल्यानंतर साध्या पद्धतीने पाच फुट बाय पाच फुट अंतरावर मध्यम खोलीची सरी काढून घ्यावी. या सरीमध्ये उपलब्ध असलेले कुजलेले शेणखत, मळी, कारखान्याची राख, कंपोस्ट खते टाकावी. एकरी प्रत्येकी तीन किलो अझॅटोबॅक्टर , स्फुरद विरघळविणारे जीवाणू व पालाश उपलब्ध करणारे जीवाणू मिसळून घ्यावेत. तर ठिबक सिंचन पद्धतीने केल्या जाणाऱ्या लागवडीसाठी पाच फुट अंतरावर सोळा ते अठरा एम.एम. जाडीची उपनळी टाकावी. हलक्या ते मध्यम जमीनीत चाळीस सेंटीमीटर अंतरावर ताशी ४ लिटर पाणी टाकणारा इनलाईन ड्रीपर असावा. तर भारी जमीनीत पन्नास सेंटीमीटर अंतरावर ताशी ४ लिटर पाणी टाकणारा इनलाईन ड्रीपर असावा. रोपांची लागवड करण्यापूर्वी ठिबक सिंचन चालवावे, म्हणजे मध्यम ते हलक्या जमीनीत एकरी ५० हजार लिटर पाणी तर भारी जमीनीत ४४ हजार लिटर पाणी द्यावे. वाफसा आल्यानंतर कुदळीने दोन फुट अथवा अडीच फुट अथवा तीन फुट अंतरावर गल घेऊन रोपांची लागवड करावी. यानंतर दिवसातून एक वेळ दोन तास ठिबक सिंचन प्रणाली चालू ठेवावी. चौथ्या दिवसापासून आठ किलो युरिया, अर्धा किलो फॉस्फेरिक अॅसीड, चार किलो पोटॅश ठिबक सिंचनातून आठवड्यातून एकदा सोडावे. जमिनीच्या प्रकारानुसार पट्टा पद्धतीने लागण करावी. हलक्‍या जमिनीत 2.5 फूट अंतरावर रिझरच्या साह्याने सलग सऱ्या पाडून दोन सऱ्यांमध्ये उसाची लागण करून तिसरी सरी मोकळी सोडावी. म्हणजे दोन जोड ओळींत पाच फूट पट्टा रिकामा राहील. मध्यम भारी जमिनीत सलग तीन फूट अंतरावर सऱ्या पाडून पहिल्या दोन सऱ्यांत उसाची लागण करून तिसरी सरी मोकळी सोडावी म्हणजे दोन जोड ओळींत अंतर सहा फूट पट्टा तयार होतो.
    फायदे - .*DOWNLOAD APP --- play.google.co...
    WHATSAPP wa.me/91917280...
    VISIT OUR WEBSITE agrowone.in/
    📞📞 wa.me/91917280...
    1) भरपूर सूर्यप्रकाश व हवा मिळाल्यामुळे उसाची वाढ जोमदार होते. ऊस लागवड
    2) पिकावर अनिष्ट परिणाम न होता आंतरपिकाचे उत्पादन मिळते, तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.
    3) ठिबक सिंचन पद्धतीसाठी पट्टा पद्धत अतिशय योग्य आहे.
    4) ऊस शेतातील यांत्रिकीकरणासाठी ही पद्धत योग्य आहे. या पद्धतीत यंत्राच्या साह्याने ऊस तोडणी करता येते.
    5) पट्ट्यामुळे पीक संरक्षण चांगल्या पद्धतीने करता येते.
    6) बांधणीनंतर दोन ओळींमध्ये एक सरी तयार होते. त्या एका सरीला पाणी देऊन उसाच्या दोन्ही ओळी भिजवता येतात. त्यामुळे पाण्याची 30 ते 35 टक्के बचत होते.
    जोड-ओळ पट्टा पद्धतीचे फायदे
    ऊस लागवडीनंतर चार महिने 80 टक्के क्षेत्रावरच पाणी वापर होतो.
    मोठ्या बांधणीनंतर 40 टक्के क्षेत्रावरच पाणी वापर होतो.
    सरी वरंबा पद्धतीपेक्षा 15 ते 20 टक्के कमी पाणी लागते.
    सूर्यप्रकाश व खेळती हवा मिळत असल्याने पिकाची वाढ जोमदार होते.
    आंतरपीक घेण्यासाठी उपयुक्त.
    ठिबक सिंचनाकरिता योग्य.
    आंतरमशागतीकरिता बैल अवजाराचा व लहान ट्रॅक्‍टरचा वापर सुलभपणे करता येतो.
    तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.
    पट्ट्यात पाचट आच्छादन करणे सोपे होते.
    प्रत्येक पाळीत पाणी किती द्यावे
    ऊस पीक बारमाही असल्यामुळे हंगामानुसार प्रवाही सिंचन पद्धतीने सुरू, पूर्वहंगामी व आडसाली पिकासाठी अनुक्रमे 250, 275 व 350 सें.मी. पाण्याची गरज असते. हवामान, जमिनीचा प्रकार, जमिनीची खोली, पिकाचे वय इत्यादी घटकांवर प्रत्येक पाळीतील पाण्याची मात्रा अवलंबून असते. उसाला 25 टक्के सरीच्या बुडातील भाग ओला होईल एवढेच पाणी देणे गरजेचे असते. #ॲग्रोवन , ऑनलाइन भेट द्या -------------------------------------------------------
    📱मोबाईल ॲप्लिकेशन play.google.co...
    🌐 वेबसाइट - www.agrowone.com
    👍 फेसबुक - / agrowone
    📸 इंस्टाग्राम - / agrowone
     ट्विटर - / agrowone
    टेलेग्राम - t.me/Agrowone
    ------------------------------------------------------- #ॲग्रोवन #Agrowone

Komentáře • 29

  • @ॲग्रोवन
    @ॲग्रोवन  Před 4 lety +1

    *DOWNLOAD * ❤️ agrowone ANDROID APP --->> play.google.com/store/apps/details?id=com.agrowone.agrowonemarathi&hl=en_IN
    😊😊 WHATSAPP wa.me/919172800247
    VISIT OUR WEBSITE agrowone.in/
    📞📞 wa.me/919172800247

  • @rampate4976
    @rampate4976 Před 2 lety

    Mast daadaa

  • @Chaltaykivlog
    @Chaltaykivlog Před 4 lety +2

    Usachi mahiti deto ka.. Kandyachi methichi deto.. Jod olitil anter kiti ahe te sangaa

  • @ramdasrautray5806
    @ramdasrautray5806 Před 5 lety

    छान आहे माहिती

  • @swapnilchavan2697
    @swapnilchavan2697 Před 3 lety

    Nice sir

  • @nileshkale5600
    @nileshkale5600 Před 11 měsíci

    सर कारले पिक घेताईन का

  • @mrsadashivdeshmukh2469

    In your pair row sugarcane planting the number tillers is more .it affects sugarcae yield.sugarcane plot is excellent. I think you will gate 80 to 90 tonnes per acere

  • @balirampatilkapse2210
    @balirampatilkapse2210 Před 5 lety

    thangs very good informeshan

  • @tractorlovers9893
    @tractorlovers9893 Před 4 lety +3

    दोन जोड ओळी किती फुटी पाडायच्या🤔

    • @mallikarjunsutar3936
      @mallikarjunsutar3936 Před 4 lety +3

      सलग तीन फुटी सरी सोडून दोन सरी लावणे आणि एक सरी गॅप करणे पुन्हा दोन सरी लावणे

  • @dattaithape8386
    @dattaithape8386 Před 5 lety

    Nice sar

  • @rampatil2478
    @rampatil2478 Před 4 lety

    Aapan Aka videvo madhe 8005 ya vanachi Lagvadichi shifarash keleli Aahe pan kahi setkarache manane Aahe ki 8005 ha dusara varshi ven karat nahi

  • @ravindrakale2583
    @ravindrakale2583 Před 5 lety +2

    Antar. Sanga

    • @mallikarjunsutar9956
      @mallikarjunsutar9956 Před 5 lety +1

      ३फुटी सरी सोडून
      २ सरी ऊस लवयच आणि
      १सोडायचं आणि परत २
      सरी लावायची

  • @neminathmagadum9143
    @neminathmagadum9143 Před 2 lety

    जोड़ ओळमधे sugarcane harvester चालतो का

  • @Chaltaykivlog
    @Chaltaykivlog Před 4 lety

    Overage kiti aale te sangaa

  • @vikaschormale9472
    @vikaschormale9472 Před 3 lety

    सरीचे अंतर किती ते सांगावे

  • @SantoshJadhav-vg6gn
    @SantoshJadhav-vg6gn Před rokem

    जोड.ओळ.कमी.करता.येते.का

  • @mohansuryawanshi7153
    @mohansuryawanshi7153 Před 4 lety

    Tumcha power trailer dakhva

  • @dilipmore51
    @dilipmore51 Před rokem

    अंतर किती

  • @ॲग्रोवन

    तुमचा प्रॉब्लेम/ शंका असेल ती मला थोडक्यात सांगा जर तुम्हाला शेतात जाऊन व्हिडिओ काढता आला तर तो काढून मला व्हाट्सअप करा व्हाट्सअप करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा wa.me/919172800247 ॲग्रोवन व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा chat.whatsapp.com/Dg65cYVW9yNAj5KNmDHUrQ किंवा आमच्या वेबसाईटला www.agrowone.in ला भेट द्या मला जसा वेळ मिळेल तसा मी तुम्हाला मदत करेल सूर्यप्रकाशात व्हिडिओ काढा व्हिडीओ काढताना मोबाईल आडवा पकडा

  • @akshaykumthekar4556
    @akshaykumthekar4556 Před 5 lety

    Part 2 upload Kara

  • @bapukaravale5192
    @bapukaravale5192 Před 5 lety +1

    जोड ओळ ऊसाची लागण कोणत्‍या महिन्‍यात करावी

  • @sagarmali9941
    @sagarmali9941 Před 2 lety

    एकरी कीती टन आवरेज देते

  • @bhaurupnar6132
    @bhaurupnar6132 Před 4 lety

    खत जिवानो कोठे मिळेल

  • @madanpardeshi5766
    @madanpardeshi5766 Před 4 lety +1

    Krupaya boltanaa time pass karu nakaa

  • @user-fv2dg4md7p
    @user-fv2dg4md7p Před 3 lety

    जोडवळीतील अंतर किती,
    दोन जोडवळीतील अंतर किती
    माहिती द्यावी 9767887231

  • @nitinsalunkhe5993
    @nitinsalunkhe5993 Před 4 lety +1

    Mahite kami ani faltu boltoy jast

  • @vishnubhauravgoykargoykar220

    Mst Sir ji