!! पट्टा पध्दतीने ऊसाचे संगोपन नेमके कसे करावे...? !!👍👌

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 11. 2019
  • 3.5 फुटांची सरी असतानाही.....!
    URJA INDUSTRIES
    9890669083
    Instagram I'd - urja_industries...
    कोणतेही पीक करताना त्याच्या पीक पद्धती बद्दल माहिती असणे फारच गरजेचे आहे जसे की आपले हातांचे डॉक्टर डोळ्यांचे डॉक्टर कानाचे डॉक्टर मेंदूचे डॉक्टर वेगवेगळे असतात त्याच पद्धतीने ऊस पिकामध्ये योग्य तंत्रज्ञान अवलंबलं तर सहजच जागेवरच आपण किमान 15 ते 20 टन ऊस उत्पादन इतरांपेक्षा पुढे असतो जसं की या व्हिडिओ मध्ये आपण पाहत असेल तर साडेतीन फुटाच्या दोन सलग सऱ्या लावून एक सरी बाद केलेले आहे म्हणजे मधला क्याप सात फुटांचा होणार आहे या मधल्या गॅप मध्ये आपण कोणतेही आंतरपीक घेऊ शकतो अगर साडेचार फुटांची जरी सरी असेल तरीसुद्धा वरती गुंड्या वरती आपण पावसाळ्यामध्ये आंतरपीक करू शकतो तर मुख्य पीक ऊसाला त्रास न होता आपण अंतर्तिका उत्पन्ना द्वारे उसाचा भर लावणे चा खतांचा अगर फवारणीचा खर्च कशाप्रकारे बाहेर काढू शकतो या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण बऱ्याच वेळेला भरपूर प्रमाणात आंतरपीक यामुळेच मुख्य पीक झाकोळलं गेल्यामुळे उसाला फुटवा निघत नाही परिणामी जवळ जवळ तीन महिने आपण मागे पडतो तर हे टाळण्याच्या उद्देशाने आणि मुख्य पिकास सोबतच आंतरपिकाचा हे जास्त उत्पादन घेण्याच्या उद्देशाने आपण या पट्टा पद्धतीचा स्वीकार केलेला आहे कारण पाऊस कितीही दाट लावला अगर पट्टा पद्धतीत लावला तरीसुद्धा कारखान्याला जायच्या वेळेला म्हणजे बारा महिन्यांपासून पुढे जास्तीत जास्त पन्नास ते साठ हजाराचा ऊस शेतामध्ये जिवंत असतात बाकीचे उस आपण वर्षभर दिलेली खते अन्नद्रव्य आणि पाणी पिऊन मरून जातात जसे की एखाद्या आंब्याच्या झाडाला भरपूर फळा असतात परंतु उत्पादनाच्या वेळेस मात्र त्याच्यातील ठराविकच आंबे झाडाला राहून बाकीचे आपोआप जळून गेलेले असतात म्हणजेच जमिनीवरती पडतात म्हणजे हा नियमच आहे की वनस्पती स्वतः मॅनेज करते मला नेमके किती फुटवे हवे आहेत म्हणून सुरुवातीपासूनच नियोजन अशा पद्धतीने करून घ्या की जेणेकरून जास्तीत जास्त पन्नास ते साठ हजार ऊस जिवंत राहणार आहेत त्याच उत्सवांना जास्तीत जास्त जोर लावावा म्हणजे एका उसाचे वजन सरासरी दोन किलो जरी धरले तरीसुद्धा 50000 गुणिले दोन इज इक्वल टू एक लाख म्हणजे शंभर टन ऊस उत्पादन निघते हेच शास्त्र या पट्टा पद्धतीमध्ये हेच तंत्रज्ञान स्वीकारलेले असते असे हा व्हिडीओ आपणाला समजावून सांगतो...
    असेच आणखी व्हिडिओ आपणाला पाहायचे असतील तर आमचं चानेल ऊर्जा इंडस्ट्रीजला लाईक शेअर सबस्क्राईब करा आमचे 132 हून अधिक व्हिडिओज शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वाहून घेतलेले आहेत सोबतच आम्ही मोटिवेशनल स्पीकर म्हणून सुद्धा काम करतो आहोत आणि शेतकऱ्यांच्या मुलांनी उद्योजक व्हावे हाच आमचा उद्देश आहे नमस्कार....

Komentáře • 47

  • @dildarpatil1457
    @dildarpatil1457 Před 3 lety

    खुप छान सर

  • @ravindraaldar6445
    @ravindraaldar6445 Před 4 lety

    Khup chaan 👌.mahatiee.delee sir

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 4 lety +2

      थँक्स,असेच आणखी 114 videos आहेत,ऊर्जा industries अस search करा

  • @dr.samrattote1594
    @dr.samrattote1594 Před 4 lety +1

    पुस्तकांची सविस्तर माहिती देणारा एक वीडियो बनवा प्लीज

  • @ravindrakale2583
    @ravindrakale2583 Před 4 lety

    Drip kiti vel chalve mahiti daya

  • @rushikeshdhumal8431
    @rushikeshdhumal8431 Před 4 lety

    Very good

  • @sumeshpawar2043
    @sumeshpawar2043 Před rokem

    👍👍👍

  • @dhananjaywagh2711
    @dhananjaywagh2711 Před rokem

    🙏🙏🙏Jay Jay shree Ram Krishna Hari 🙏🙏🙏

  • @vijaygamepatil5523
    @vijaygamepatil5523 Před 3 lety

    Aamcha 2 ekar 86032 aahe tyapeki 1 ekar groth va futava changla aahe pan 1 eakar madhil groth va futava kami aahe tyasathi kay karave . Us atta 4 mahinyacha ahe va asach patta padhatit aahe

  • @chetanjadhav5194
    @chetanjadhav5194 Před 4 lety

    सर कोबी फ्लॉवर यावर एकादी विडिओ बनवा

  • @nandkumarpatil6389
    @nandkumarpatil6389 Před 4 lety +1

    सर नमस्कार,
    खूप छान माहिती.
    शेतकर्यांनी मनावर घेऊन सर्व गोष्टी कराव्यात.

  • @pramoddeokar4800
    @pramoddeokar4800 Před 4 lety

    Dosage chart npk

  • @mallikarjunsutar3936
    @mallikarjunsutar3936 Před 4 lety

    आपण सेंद्रिय शेती बद्धल माहिती ध्या लोकांना

  • @naitikpatel9411
    @naitikpatel9411 Před 3 lety

    Sir please this video make in hindi

  • @panduranggangane9134
    @panduranggangane9134 Před 3 lety

    सर तुरी चा व्हिडिओ बनवा तुरीची माहिती द्या

    • @panduranggangane9134
      @panduranggangane9134 Před 3 lety

      सर आपल्या चैनल वरचे सर्व तुमचे व्हिडिओ बघतो आहे. उसाच्या खुप दिवसानंतर व्हिडिओ टाकला आहे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 3 lety

      हो,

  • @pansarenitin7
    @pansarenitin7 Před 4 lety

    पट्टा पद्धत म्हणजे नक्की काय

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 4 lety +1

      2सरी लावून 1 गॅप

    • @dnyaneshwarpotare9496
      @dnyaneshwarpotare9496 Před rokem

      साडेतीन फुटी सरी काढून दोन सरी ऊस लावणे व एक सरी सोडने

  • @mallikarjunsutar3936
    @mallikarjunsutar3936 Před 3 lety

    सर तालुका दक्षिण सोलापूर महाराष्ट्र
    दुष्काळ भाग आहे भिमा नदी आहे पण उन्हाळ्यात पाण्याची खूप अडचण येतो
    तर माझं जमीन मध्यम आहे तर मी ३×६ पट्टा पद्धतीने ऊस लागवड करावी म्हणून विचार केला आहे तर कमी पाण्यात येणारी उसाची जात कोणती आहे
    86032.
    0265

  • @ramuchavan4139
    @ramuchavan4139 Před 4 lety

    तिन आलवण्याचा खर्च किति येईल

  • @ramdhatrak8689
    @ramdhatrak8689 Před 3 lety

    सर उसाला जोडओळ पद्धतीला ड्रीप कधी केलं पाहिजे ऊस बुजवल्यानंतर लगेच पहिले पाणी द्यावे कि ऊस उगवून दिला पाहिजे

  • @devananddudhmal5092
    @devananddudhmal5092 Před 4 lety

    ऊसाचा वाण कोण ती आहे

  • @swanandchoudhary5781
    @swanandchoudhary5781 Před 3 lety

    पट्टा पध्दती सोडून आणखी कोणती वेगळी पद्धत असते

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 3 lety

      व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज

  • @shubhamthoratpatil3977
    @shubhamthoratpatil3977 Před 4 lety +1

    शक्य नाही 120 टन काढणे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Před 4 lety +5

      या जगात अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाही ,दादा.आता तर एकरी 150 टन प्रयोग सुरू आहेत

    • @akashkothulepatil7200
      @akashkothulepatil7200 Před 4 lety +1

      सर माती मध्ये फरक असतो

    • @panduranggangane9134
      @panduranggangane9134 Před 3 lety +1

      मराठवाड्यामध्ये निघू शकेल का

    • @dildarpatil1457
      @dildarpatil1457 Před 3 lety +1

      नक्की नीघनार सर मराठवाड्यातसुद्धा