"दापोली वाचवा..." पाडले गावच्या लढ्याला साथ दया...

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • डोंगर माथ्यावर चालू असलेले प्रचंड उत्खनन आणि बेशुमार वृक्षतोडी मुळे सध्या पाडले वासीय चिंतेत आहेत.. आपल्याही गावाचे माळीण, इर्शाळवाडी किंवा नुकत्याच घडलेल्या केरळ राज्यातील वायनाड येथील घटना आपल्याहि बाबतीत घडू शकेल या भीतीने ते त्रस्त आहेत..
    एकीकडे डोंगराखाली गाडले जाण्याची भीती..
    तर.. दुसरीकडे.. "त्या" कंपनीची दहशत, दडपशाही यातून... कधीतरी आणि कुठेतरी मरायचेच आहे.. ही भावना बाळगून आता पाडले येथील गाववाले लढायला तयार झालेत.
    त्यांच्या या जीवन मरणाच्या लढाईत एक प्रामाणिक दापोलीकर म्हणून आपणही साथ दयाल.
    असा विश्वास वाटतो.
    #dapolinewsagency
    #dnaन्यूजदापोली
    #dapoli
    #marathinews
    #keralawaynad
    #माळीण
    #इर्शाळवाडी
    #koknatil
    #कोकण
    #kokantourisim

Komentáře • 391

  • @varshag.8398
    @varshag.8398 Před měsícem +21

    फक्त दापोलीकराचा हा प्रश्न नाही,तर निसर्ग आणि माणुसकीवर प्रेम असणाऱ्या प्रत्येक भारतीयाचा आहे..

  • @sureshbhuvad5596
    @sureshbhuvad5596 Před měsícem +54

    आता हे बिल्डर शहराची वाट लावून आता आपल्यासुंदर कोकणाची वाटलावणार आहेत कोकण वासियांनी जागृत होणं गरजेचे आहे

    • @malhar1622
      @malhar1622 Před měsícem +3

      वाट लागलीच आहे

  • @chetanjogale2466
    @chetanjogale2466 Před měsícem +95

    ही परिस्थिती खुप गंभीर आहे...परंतु यासाठी जबाबदार आपलीच लोकं आहेत.... जमिनी का विकता परप्रांतियांना.... हे बाहेरून येऊन आपल्यावर माज दाखवणार ...

    • @sanjayshende4642
      @sanjayshende4642 Před měsícem

      स्थानिक सर्व पक्षीय नेत्यांना जब विचार त्याची साथ असल्याशिवाय हे होणार नाही असा कोकणचा विकास नको हे ठासून सांगा नाहीतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्व तालुक्यातील गावांनी व दापोली शहरातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार घालू असा इशारा द्या विजय तुमचाच होणार

    • @Star_Moon25
      @Star_Moon25 Před 29 dny +1

      Sahi bole

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l Před 28 dny +1

      सरकार अनुमती का देते?पैसे खाऊन सर्व कामे केली जातात.

    • @koknastha
      @koknastha Před 27 dny

      ​​@@user-vz9tn7wn1lअनुमती का देते म्हणजे? भारतात कोणी कुठेही जमीन घेऊ शकतो. त्याला सरकार का नकार देईल, त्यापोटी सरकारला महसुल मिळतो. उद्या तुम्ही कुठे जमीन घ्यायला गेलात आणि तुम्हाला सरकारने नकार दिला तर गप्प बसाल का??

    • @JaydevPatil-o7c
      @JaydevPatil-o7c Před 25 dny +4

      परप्रांतीय आहे पण सद्या तो महाराष्ट्र चा मंत्री आहे लोढा अतिशय निच माणूस आहे

  • @kalpanabhosale3250
    @kalpanabhosale3250 Před měsícem +40

    किती भयानक आहे हे, कोकण खरंच वाचवण्याची गरज आहे. त्या लोकांनी कुठे जावं😢

  • @koknastha
    @koknastha Před měsícem +47

    मी दापोलीचाच रहिवासी आहे. याला जबाबदार शेतकरीच आहे. थोडयाशा पैशांसाठी हे लोकं "अत्ता गरज भागतेय ना" म्हणुन पैसे घेऊन एजंटला मुखत्यारपत्र करुन देतात. याना माहीत पण नसतं आपली जमिन एजंटने कितीला विकली आणि आपल्याला व्यवहारापोटी किती देतोय. आता बोंबलुन काय होणार आहे.

    • @vijaykhaire2850
      @vijaykhaire2850 Před měsícem

      Bhau..cuki hi mansakdunch hote...aapli manse aahet ti

    • @ujwaljadhav5359
      @ujwaljadhav5359 Před měsícem

      त्यांना जागृत केले, फसवणूक होतेय हे समजावले तर ते कदाचित असं करणार नाहीत

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l Před 28 dny

      सगळ्या शेतकऱ्यांनी जमिनी विकलेल्या नाहीत.

    • @sureshgawade9129
      @sureshgawade9129 Před 25 dny

      ❤ मुंबई चे मुळ रहिवासी आगरी ,कोळी,भंडारी जसा बाहेर फेकला तसे गावे च्या गावे पैशाच्या जोरावर विस्थापित होणार धनदांडगा येऊन गावं विकत घेणार, ज्या कडे पैसा त्याने जगावे,धर्म संपला पैसा वाढला ❤ही तर सुरुवात झाली ❤ गावाला किनारा आहे ना❤

    • @user-hx3dc5vp1q
      @user-hx3dc5vp1q Před 22 dny

      मी pan तिकडचीच आहे. तिकडच्या लोकांची चुकी. पैशासाठी जमीन विकतातहेत.

  • @ViP_08-cp7cv
    @ViP_08-cp7cv Před měsícem +41

    कशाला जमिनी विकता 😡😡😡 कोकणाला कोकणसारखं राहूद्या.नकोय आम्हाला विकास...जो कोकणचा विनाश करेल....दोन जिल्हे निसर्गाने भरभरून आहेत ते तरी नीट राहुद्यात😢😢😢😢जमिनी विकताना 100 वेळा विचार करा. 😢😢🙏🏻🙏🏻

    • @malhar1622
      @malhar1622 Před měsícem

      @@ViP_08-cp7cv अख्खा कोकण इको सेन्सेटिव्ह झोन करून टाकायला पाहिजे,

    • @narendramayekar9042
      @narendramayekar9042 Před měsícem +1

      ✅💯

  • @surendravaskar9923
    @surendravaskar9923 Před měsícem +69

    ज्या एजंट ला जमिनी विकल्या तो स्थानिक असेल तर त्याच्यावर पहिली कारवाई करा.

    • @vasantgurav383
      @vasantgurav383 Před měsícem +1

      बरोबर आहे.

    • @ashoklad3772
      @ashoklad3772 Před měsícem +6

      कोकण वासीयांचे कोकणात हाल.
      म्हणून परप्रांतीयांना जमीनी विकू नका.

    • @juwalekhalilabduljuwale326
      @juwalekhalilabduljuwale326 Před měsícem +3

      Zmini viku naka 😢😢😢😢

  • @nareshchavan923
    @nareshchavan923 Před měsícem +29

    आपण पत्रकार प्रशांत कांबळे म्हणून या गंभीर विषयावर सविस्तर बातमी प्रसिद्ध केली आहेत. त्याबद्दल प्रथम आपले धन्यवाद.
    प्रकल्प होताना रहिवासशांना नाहक त्रास होत असल्यास त्याबद्दल विचार केला पाहिजे.
    त्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदार यांनी लक्ष केंद्रित करून मानवतेच्या दृष्टीने ग्रामस्थांना सहकार्य करावे.
    आणि सरपंचावर खोटे आरोप करून अटक करून त्यांना न्याय देण्यासाठी कोर्टाने चार महिने का लागतात.
    ग्रामस्थांनी संघटीत राहून लढा द्यावा. तरच अटक केलेल्या सुटका होईल.
    कोकणातील जमिनी परप्रांतीयांना विकू नये आणि डोंगरावर कोणतेही बांधकाम करण्यास सर्वानी वेळीच विरोध करावा.

    • @vijayjadhav6728
      @vijayjadhav6728 Před měsícem +1

      प्रशांत कांबळे साहेब 🙏. आपण पत्रकार आहात, चांगली गोष्ट आहे. झालेला प्रकार पाहता बाब गंभीरच आहे. आपण कंपनी असे उल्लेख केला आहे. पण ती कोणती कंपनी आहे ह्याचा आपण अजिबात उल्लेख केलेला दिसत नाही. ति कंपनी कोणती आहे. ह्या गोष्टीचा उल्लेख केल्यास संपुर्णपणे महाराष्ट्राला समजेल.असे मला वाटते आहे. मि दापोलीकर नाही पण मला दापोली बद्दल भरपूर आस्ता आहे.

    • @eknathtalele307
      @eknathtalele307 Před 27 dny

      परिस्थिती गंभीर आहे. सामान्य माणसाची फसवणूक आहे. धनदांडग्यांच्या स्वार्थीपणाला आणि सामान्य गोरगरीबांना न्याय देणारं सरकार ने यावर विचार करायला हवा.

  • @JaydevPatil-o7c
    @JaydevPatil-o7c Před 25 dny +3

    निर्दोष माणूस आहे तो पण कंपनी एव्हडी मोठी आहे लोढा आणि मालक तर मंत्री कोण काय करणार 😢

  • @user-rx4vk4kt7q
    @user-rx4vk4kt7q Před měsícem +7

    आजूबाजूच्या ग्रामस्थांनी सुद्धा ह्या ग्रामस्थांना सहकार्य करा आणी यांच्या लढ्यात शामिल व्हा ही नम्र विनंती आहे.. 🙏🙏 मी जरी रायगड जिल्ह्यातील असलो तरी मला माझ्या कोकणाचा खुप अभिमान आहे..

  • @purushottambhusare832
    @purushottambhusare832 Před měsícem +5

    परप्रांतीय हटवा, आपलेच राजकारणी परप्रांतीय साथ देतात

  • @amitkhambe3178
    @amitkhambe3178 Před měsícem +32

    कोकण वाचवायचा असेल तर परप्रांतीय लोकांना जमीनी विकू नका.🙏
    🌴🌳कोकण वाचवा पाडले गाव वाचवा🙏🌳🌴

    • @anaghabapat8350
      @anaghabapat8350 Před měsícem +1

      अगदी खरं आहे

    • @pushpalatanaik9167
      @pushpalatanaik9167 Před měsícem

      Lokani Jamin viklya nahit tar sardar vikasachya nava Khali Jamin polis bal vaprun Jabar dasti ne ghenar tyala kon rokhnar

    • @narendramayekar9042
      @narendramayekar9042 Před měsícem

      Point hai bhai👍

  • @kartiktandale3268
    @kartiktandale3268 Před 26 dny +4

    मुख्य मत्री 😢ची बहीणीना त्रास होतो आहे.

  • @hemlatatodkari7132
    @hemlatatodkari7132 Před 25 dny +2

    मी दोन वर्षांपूर्वी दापोलीला गेले होते अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य खरंच या गावाचे संवर्धन झाले पाहिजे

  • @sayeedkondekar3718
    @sayeedkondekar3718 Před měsícem +4

    खरोखरच इच्छाशक्ती दाखवली तर काही कठीण नाही सर्वांनी मिळून मिसळून लक्ष द्या आणि दापोली तालुक्यातील एक सुंदर दापोली आहे तीचा वर लक्ष असावे ❤

  • @piyushghadashi666
    @piyushghadashi666 Před měsícem +7

    आपले पण आभार आपण हे विषय जनते समोर आणले जनता आपाल्या सोबत आहे

  • @sunilpardale2903
    @sunilpardale2903 Před měsícem +12

    जमिनी विकली त्याचे परिणाम वेळीच सावधान व्हा 🚩🚩🚩🙏

  • @BalkrishnaGavelkar
    @BalkrishnaGavelkar Před měsícem +9

    जे चाललंय ते खूपच भयावह आहे,गरीब शेकऱ्यांना कुणी वालीच राहिलेला नाही,हार मानू नका संघटित रहा नक्कीच मार्ग निघेल

  • @manthantirlotkar
    @manthantirlotkar Před měsícem +15

    कोकणात आता सर्वत्र असे प्रकार दिसू लागलेत.ह्याच कारण एकच आपल्या हक्काच्या जमिनी विकू नका....

  • @SaveEnvironment-z4j
    @SaveEnvironment-z4j Před měsícem +2

    धन्यवाद साहेब...तुम्ही स्वतः जावून ही बातमी कव्हर केली. खूप भयानक आहे..गेल्या ४ वर्षापासून पाडले कोडं वाडीतील लोक ह्या विरोधात आवाज उठवत आहेत..पण आज ही बातमी टीव्ही वर आल्यामुळे सगळ्या लोकांना कळलं.... काही कारणाने जरी जमिनी विकल्या असल्या तरी पर्यावरण नावाची काही गोष्ट आहे की नाही...डोंगर चया डोंगर सपाट केले आहेत इथे...बेसुमार झाडे तोडली आहेत...ह्यांना कोण रोखणार...आता कोकणातील लोकांना एकत्र यावं लागणार...सगळे एकत्र आले तर ह्यांना आपण रोखू शकतो...सगळ्यांनी ही बातमी खूप पसरावा...म्हणजे जास्तीत जास्त लोकांना कळेल...आणि भविष्यात अशा चुका लोक करणार नाहीत..

  • @bharatkarawade1072
    @bharatkarawade1072 Před měsícem +8

    ह्या गावाला संपूर्ण दापोली कर उभे राहून साथ द्यावी

  • @santoshkanse5751
    @santoshkanse5751 Před měsícem +10

    पाडले ग्राम स्थान च्या उपोषणासआमचा कायम पाठिंबा आहे पाडले गावचे सरपंच खूप चांगले व्यक्ती मत्व आहे त्यामुळे पाडले वासियांवर आलेल्या प्रसंग खूप धोकादायक आहे आम्ही आपल्या सोबत आहोत

    • @technorakeshbhuvad
      @technorakeshbhuvad Před měsícem +1

      Kahi nahi fayda

    • @JaydevPatil-o7c
      @JaydevPatil-o7c Před 25 dny +2

      निर्दोष माणसाला अडकवलंय राजकीय ताकत वापरून लोढा कंपनी न मालक मंत्री 😢 कोण काय करणार 😢

  • @yogeshkanse9757
    @yogeshkanse9757 Před měsícem +17

    त्या एजेंट आणि जमीन खरेदी केली त्याला ताब्यात घ्या आणि हा प्रोजेक्ट थांबवा नाहीतर हे लोक असच कोकणात येत राहतील

  • @sandeshghag7404
    @sandeshghag7404 Před měsícem +3

    आज 4 महिने तो माणूस अडकला आहे. त्याचे कारण हे मोठे बिल्डर एखादा माणूस काही उलट बोलला की आपली राजकीय ताकद वापरून त्याला अडकवायची .जो काही हा विषय तुम्ही हाती घेतला आहे तो उत्तम असो थोडा उशीर झाला. पण आत्ता केरळ मधला विषय गरम आहे. 👍💪💪

    • @JaydevPatil-o7c
      @JaydevPatil-o7c Před 25 dny +1

      लोढा कंपनी आहे त्यामुळे राजकीय रसदीची काय कमी असणार मालक मंत्री असल्यावर

  • @mds8082
    @mds8082 Před měsícem +5

    मी दापोलीकर चला सर्वानी एकत्र येऊन एजंट यांच्या विरोधात लाडूया.

  • @vishnudange3241
    @vishnudange3241 Před měsícem +6

    आपण लढा चालू ठेवला तर सर्वच लोक आपल्याला मदत करतील.

  • @manishathavai
    @manishathavai Před měsícem +10

    कोकण वाचवण्यासाठी रायगड ते सिंधुदुर्ग मधील भूमिपुत्रांनी आपण एकत्र यायला पाहिजे.
    यyou touber रानमाणूस प्रसाद ने बऱ्याच वेळा वारंवार गोष्टीवर मार्गदर्शन पर video बनवले आहेत.

    • @Kirangavkar
      @Kirangavkar Před měsícem

      बरोबर आहे तुमचं

  • @rameshmurudkar9258
    @rameshmurudkar9258 Před 28 dny +2

    अतिशय भोळे असल्याचा आव आणून , मुलाखती देताहेत , हिच मंडळी एजंटांच्या मागून शेपुट हलवत फिरताहेत .आणि आता रडून दाखवताहेत . जमीनी विकतांना त्यांना अटी घालूनच विकायला हव्या होत्या .

  • @vijaytanavde912
    @vijaytanavde912 Před 27 dny +2

    विषयच भारी आहे पहिल्यांदा संपूर्ण कोकणातील जनतेला असे सांगावे लागते की सगळे जातीभेद विसरून एक व्हा संपूर्ण कोकणात परप्रांतीयांचे पसरले आहेत गावातील जनतेने एकत्र त्यांचा बंदोबस्त करायचा आहे कोकण वाचवा

  • @sandeshpawar8469
    @sandeshpawar8469 Před měsícem +4

    100%सरपंच निर्दोष आहेत कंपनी बंद झाली पाहिजे

  • @namratarajapkar617
    @namratarajapkar617 Před 24 dny +1

    जे आपल्या गावासाठी लढतात लवकरात लवकर बाहेर येतील असा सर्वानी प्रयत्न करा आपल्या जागा कोनालाही विकु नका आपल्या गावातील मानसांनाच विका.मी दापोलीतील नाही.गावचीच आहे.मला आमच्या गावांबद्दलखुप प्रेम आहे.आणी ही सर्व ठीकाणचीच परीसथीती आहे.देवा ते दादा लवकरात लवकर बाहेर येऊदेत आपले गाव वाचवण्यासाठी प्रयत्न करूदेत ही तुझ्या चरनी प्रार्थना.नम्रता राजापकर

  • @krishna.travelvlog3996
    @krishna.travelvlog3996 Před měsícem +3

    माननीय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडे जावा ती तुम्हाला न्याय देतील अजून वेळ गेलेली नाही

  • @sandipbhekare8291
    @sandipbhekare8291 Před měsícem +3

    संपूर्ण दापोली कर उभे राहून साथ द्यावी

  • @JaydevPatil-o7c
    @JaydevPatil-o7c Před 25 dny +4

    लोढा कंपनी आहे त्यामुळे कोणी दाद घेत नाही 😢 कारण कंपनी लोढा ची मंत्री आहे मग पोलीस अधिकारी आणि प्रशासन विकलं गेलंय किंवा काही भीती मूळ कोणी काही करत नाही 😢

  • @swapnilshigwan95
    @swapnilshigwan95 Před měsícem +14

    परप्रांतीय लोकांना जमीन विकण्याचे परिणाम

    • @narendramayekar9042
      @narendramayekar9042 Před měsícem

      👍💯

    • @JaydevPatil-o7c
      @JaydevPatil-o7c Před 25 dny +1

      परप्रांतीय कुठला लोढा चा प्रोजेक्ट आहे महाराष्ट्र चा
      मंत्री च्या त्यामुळे सगळं दम दाटी न चाललंय

  • @chandrakantsawant1547
    @chandrakantsawant1547 Před měsícem +1

    छान संदेश दीले आहे समाज हीता साठी ❤साहेब युवकाणी एकत्र आले पाहीजे

  • @shrikantagre2407
    @shrikantagre2407 Před měsícem +6

    ह्या गोष्टी कोकणासाठी नवीन नाही आहे तर कोकण वासियांनी आत्ताच याचं गांभीर्य घेऊन सुधारलं पाहिजे आणि जमिनीचा एक तुकडा परप्रांतीयांना विकला नाही पाहिजे

  • @maheshoak2701
    @maheshoak2701 Před měsícem +8

    संपूर्ण तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीला सांगा आधी स्वतः च्या जमीनी विकणे बंद करून टाका.

  • @marutijadhav6901
    @marutijadhav6901 Před měsícem +6

    आमदार खासदार कुठे गेलेत झोपेतून जागे करा

    • @pradeeptanavade7804
      @pradeeptanavade7804 Před 29 dny

      आमदार काय करतील.पैसे तुम्ही खाल्ले.

  • @udayp26up
    @udayp26up Před měsícem +4

    आपण फक्त एकच गोष्ट करू शकाल सरळ आमदार खासदार याना गाव बंदी करा जय महाराष्ट्र कारण यांनी वाट लावली आहे महाराष्ट्र चि..

  • @anilgaonkar5821
    @anilgaonkar5821 Před měsícem +4

    सर्व गावकरी एकत्र या गावापेक्षा कंपनी मोठीं नाही कंपनी चालवायची असेल तर गावचे निर्णय पाळला पाहिजे, पोलिस खाते पणं कंपनीच्या बाजुने आहेत

  • @Neck8967
    @Neck8967 Před 17 dny +1

    आमदारांच्याच पक्षाचा मंत्री त्यांचीच कम्पनी आमदार फक्त आले 15 ऑगस्ट ला आणि गोड बोलून गेले
    त्यांना आता घरी पाठवायची वेळ आलेय
    आता एकच आमदार आपला गाववला
    आपला सेवक संतोष दादा अबगुल

  • @satishlonkar6825
    @satishlonkar6825 Před 22 dny

    नमस्कार सर,आपली बातमी देण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे .मी पुणे मधे रहातो परंतू दापोली आमचे सर्व नातेवाईक, आणी मित्रमंडळींची आवडती आहे .सध्या दोपोलीत होत असलेले बदल हे स्थानिक लोकांमुळेच आले आहे .

  • @tusharmahadik350
    @tusharmahadik350 Před měsícem +5

    जागा विकताना हा विचार का करत नाही आपली लोकं. कमी पैसे घेऊन एजंट कोकण विकत आहेत या सगळ्यांना गावात बंदी घातली पाहिजे. किंवा प्रत्येक गाव वाडी यांनी जमीनी विकायच्या नाही हा निर्णय घायला पाहिजे तरच कोकण वाचेल..

  • @milindkambli8454
    @milindkambli8454 Před měsícem +12

    प्रथम जागा विकून चूक केली आता झोपी गेलेले जागे झाले खोदकाम ची सुरवात झाली तेव्हा पण गप्प होते तलाठी कार्यलयाला घेराव घाला परमिशन कस दिल त्याचा जाब विचारून त्याला काम बंद करण्यासाठी दबाव घाला रस्त्यावर उतरा सरकार ला ह्यावर लक्ष घालायला saanga

    • @pankajburte1248
      @pankajburte1248 Před měsícem

      पाडले गालावरील संकट फार भयंकर आहे, सर्वांनी त्यांना सहकार्य केले पाहिजे, नाहीतर आपल्या पण गावची ही स्थिती निर्माण होईल

    • @JaydevPatil-o7c
      @JaydevPatil-o7c Před 25 dny +2

      लोढा कंपनी आहे कोण परमिशन अडवणार 😢 मालक मंत्री आहे कंपनीचा

  • @MaheshJadhav-kq6ty
    @MaheshJadhav-kq6ty Před měsícem +5

    या जागा खरेदी साठी जे दलाल होते त्यांना अशा जमिनी देऊ नका

  • @santoshpadyal4682
    @santoshpadyal4682 Před měsícem +3

    👍👍उत्तम विडिओ बनवला आहेत, पण याला वाचा फोडावी लागेलच, नाहीतर आम्ही पुन्हा गुलामगिरीतच जाणार, हे मात्र सत्य आहे.

  • @sadanandghadge941
    @sadanandghadge941 Před měsícem +2

    जे कोणी आमदार खासदार आहेत ते काय फक्त मत मागण्यासाठी येतात का ...तुम्ही त्यांना घाबरता की काय हा संशय येतो....4महिने झालेत काही कमी आहे का...आमदार खासदार यांच्या घरावर मोर्चे न्या..त्यांच्या घरासमोर आंदोलने करा ..

  • @sudarshangaikwad5062
    @sudarshangaikwad5062 Před měsícem +3

    सरपंचांवर कोणत्या कलमांखाली गुन्हा नोंद आहे ? सदर प्रोजेक्टला परवानगी कोणी दिली ? कंपनीला विकलेल्या जमिनी स्वअर्जित होत्या की वडिलोपार्जित ? आणि जर त्या वडिलोपार्जित असतील तर त्या विकणारे नालायक कार्टी कोण आहेत ?
    बाकी बंटी विवेचन चांगले केले आहेस ! धन्यवाद..

  • @shaileshpatil4047
    @shaileshpatil4047 Před měsícem +1

    राजसाहेब बरोबर बोलता येत..... पण या लोकांना कधी कळणार.... जमिनी विकल्यानंतर का.....😡😡😡😡

  • @netraghag4430
    @netraghag4430 Před měsícem +2

    आपण सर्व दापोली करानी आपली दापोली माळीन होण्यापासून वाचवलीच पाहिजेच

  • @Surajnachanekar
    @Surajnachanekar Před 27 dny +1

    Journalist la salute

  • @user-er2mq7qt9k
    @user-er2mq7qt9k Před měsícem +19

    योगेश कदमाला निवडून दिलात ना त्याचा डोक्यावर बसा, रडून काय होणार !

    • @IPLPulse
      @IPLPulse Před měsícem

      आमदार साहेबाना परत निवडणुकीला उभ राहू देणार नाहीत, म्हणून ते काहीही करू शकत नाहीत.

    • @user-er2mq7qt9k
      @user-er2mq7qt9k Před měsícem +3

      @@IPLPulse योगेश कदम आणि साहेब कदम वाडीचा असेल, बापानी पैसा फेकला म्हणून आमदार झाला बापानी काय दिवे लावले तो हा लावणार आहे. सासरवडी राखत बसला आहे.

  • @malhar1622
    @malhar1622 Před měsícem +7

    सगळ्यांचे हात बरबटलेले आहेत. काय गरज आहे का एवढ्या मोठ्या प्रोजेक्ट ची, आणि याला परमिशन तरी कशी मिळते. जालगाव, दापोली येथे तर वृक्ष तोड करून सगळीकडे बिल्डिंग च्या बिल्डिंग उभ्या होत आहेत.

    • @aksman8563
      @aksman8563 Před měsícem

      Correct

    • @JaydevPatil-o7c
      @JaydevPatil-o7c Před 25 dny +1

      लोढा कंपनी आहे 😢😢 परवाना कोण अडवणार 😢🙏

  • @arjun8337
    @arjun8337 Před měsícem +5

    तुम्ही १००० रुपये गुंठा जमिनी विकल्यत. आता ते १००००००ने गुंठा विकत आहेत. म्हणून आपल्या जमिनी विकू नका आपल्या नातवंडांनसाठी तरी

  • @udayshinde2711
    @udayshinde2711 Před měsícem +1

    आम्ही सर्व दापोलीकर आपल्या सोबत आहोत 👍👍

  • @G1Guhagarkar1509
    @G1Guhagarkar1509 Před měsícem +6

    कोकण वाचवा..🌳 पाडले गाव वाचवा..🙏
    DNA..🙏

  • @rajeshreechavan2534
    @rajeshreechavan2534 Před 8 dny

    तुम्ही स़र्वीनी एक जुटीने तक्रार करत रहा. देवावर विश्वास ठेवून न्याय मागा.

  • @jitendrapathare3993
    @jitendrapathare3993 Před měsícem +2

    हो applich लोक जबाबदार आहेत जमिनी विकल्यावर कोणतया कायद्यानेय आपण भांडणार ह्या लोकांशी

  • @prakashnanarkar2353
    @prakashnanarkar2353 Před měsícem +8

    कुपया जमीन विकू नका हे सर्व कोकणावर का. उठलं

    • @sadanandghadge941
      @sadanandghadge941 Před 29 dny

      @@prakashnanarkar2353 यांचा अक्का तो स्वयंघोषित विश्व गुरू आणि त्याचा टिल्लू बेडूक साथीदार गुजरात मध्ये बसलेत ना त्यांनी कोकणचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि मराठी माणसाला बर्बाद करण्याचा छुपा डाव आणि कारस्थान मांडलय .आणि हाताशी दोन बांडगुळे धरलीत एक गद्दार आणि दुसरा टर बुज्या ज्यांना कोणाशी काहीही लेण देणं नाही....विश्वास करा अगर नका करू ..

  • @rajendragosavi1921
    @rajendragosavi1921 Před 15 dny +1

    आम्ही दापोली बरोबर आहोत.
    लढा सोडू नका.

  • @ravindrapanchal3740
    @ravindrapanchal3740 Před 25 dny +1

    कांबळे, तुम्ही अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयाला तोंड फोडले आहे... मात्र या गंभीर संकटाला जबाबदार जमिनी विकणारे गावकरी आहेत, हे ही वास्तव आहे !!

  • @bharatkarawade1072
    @bharatkarawade1072 Před měsícem +3

    आपले स्थानिक आमदार झोपले आहेत का त्यांच्याकडे न्याय मागा

  • @AmeyDesai-rb8sz
    @AmeyDesai-rb8sz Před měsícem +4

    सर आंदोलन कुठे आणि केव्हा होणार ही माहिती द्या.आणि जागा विकल्या ही आपली चूक आहे.परंतु त्यातील झाडे तोडण ही त्यांची महाचुक आहे.

  • @nayanamdaskar9555
    @nayanamdaskar9555 Před měsícem +2

    खरंच खुप गंभीर विषय आहे, आपल्या जमिनी परप्रांतियाना विकल्या मुळे ही परिस्तिथी ओढवून घेतली आहे. आता तरी जागे घ्यायला पाहिजे. आणी जमिनि विकणे बंद करायला पाहिजे.......नाहीतर आज जी पाडले गावावर आलेली वेळ तुमचा आमचा वर येऊ शकते

    • @vasudhadamle4293
      @vasudhadamle4293 Před 13 dny

      पर प्रंतियाच काय, कुणालाच विकू नका

  • @user-bi6ei6ih3c
    @user-bi6ei6ih3c Před 17 dny +1

    आपल्या जमिनी परप्रांतीयाःना विकू नका.सरकारने या गावची व्यथा ऐकून वेळीच कंपनीच काम थांबवावे.

  • @iqbalmukadam9877
    @iqbalmukadam9877 Před 24 dny

    अप्रतिम कव्हरेज, प्रामाणिक ग्रामस्थांना नको तो जाच दिला जात आहे.

  • @surajogale7239
    @surajogale7239 Před měsícem +3

    कोकण हा स्वर्ग आहे कोकणाची वाट लागत आहे हा फक्त ट्रेलर आहे अजुन विनाशकारी रिफायनरी अजुन बाकी आहे कोकणी माणसा आता तरी जागा हो

  • @piyushghadashi666
    @piyushghadashi666 Před měsícem +3

    एवढी गंबिर परिस्तिस्त असताना आमदार खासदार झोपले आहेत काय यांना न्याय कोण मिळवून देणार आहे

  • @aryak7382
    @aryak7382 Před měsícem +3

    कोकण वाचवण्यासाठी एकत्रित आवाज उठवण्याची गरज आहे .

    • @vaishalijoshi7246
      @vaishalijoshi7246 Před měsícem

      दादा सिंधुदुर्ग मध्ये कोकण वाचवा जमिनी विकू नका ह्यावर आवाज उठविणारी एक संस्था आहे त्यांना मी हा व्हिडिओ पाठवला आहे पण हे दादा जे सतीश जोशी बोलत आहेत त्यांचा नंबर मिळेल का

  • @bobby2306
    @bobby2306 Před 25 dny

    या बिडर लोकांनी तर निसर्गाची हानी करून टाकलेली आहे सगळ्यात आपला महाराष्ट्र सुंदर आणि संपन्न होता त्याची या बिल्डर लोकांनी आणि परप्रांतीयांनी वाटोळ करून टाकले

  • @prashanthadkar3178
    @prashanthadkar3178 Před měsícem +4

    जमीन विकली की तुमचा हक्क संपला, जे काही कायद्याने होईल त्याला कसा विरोध करणार?

  • @dilipkhare9979
    @dilipkhare9979 Před měsícem +3

    या परीस्थितीला तालुक्यातील महसूल खाते जबाबदार आहे, आणि गावचे पुढारी.

  • @dilipchimanchiman893
    @dilipchimanchiman893 Před měsícem +4

    आमचा पाठिम्बा आहे आता त्या बिल्डर लाच अटक होयला हवी

  • @sunilmehetar5613
    @sunilmehetar5613 Před měsícem +4

    राज साहेबांनी सांगितले होते जमीन विकु नका.आता का रडताय.आता तरी शहाणे व्हा

  • @balajipalshetkar9850
    @balajipalshetkar9850 Před 24 dny +1

    आपले आमदार खासदार, ज्यांचे वरपर्यंत पोचले आहेत त्यांना विचारा. आपण हिंदू मुस्लिम मध्ये विभागू नका . जातीभेद करून राजकारणी आपली पोळी भाजनार.
    तुम्ही बिनधास्त लढा तुम्हाला यश मिळणार 100 %

  • @chaitanyagaikwad6049
    @chaitanyagaikwad6049 Před 26 dny

    स्थानिक आमदार खासदार यांना हि बाब लक्षात आणून द्यावी तरीही योग्य कारवाई न झाल्यास ही लोकशाही आहे निवडणूका जवळ आल्या आहेत तेव्हा ठरवावे की कोणाला निवडून द्यायचे कोणाला नाही.

  • @ravindrabpawar8869
    @ravindrabpawar8869 Před měsícem +1

    खुप भयानक परिस्थिती खूप बिकट आहे, कोकण वाचवणे जरुरी आहे.. आता कोकणातील लोकांनी एकत्र येन जरुरी आहे....

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 Před 27 dny

    गावे उध्वस्त होऊ नये याकडे शासनाने लक्ष देऊन गावं वाचवण्यासाठी ठोस धोरण ठरवले पाहिजे.

  • @MohanMhadalekar
    @MohanMhadalekar Před měsícem +2

    कुठे नेऊन ठेवलेआहे माझा कोकण कोकण वाचला पाहिजे

  • @sudheerbhosale8354
    @sudheerbhosale8354 Před měsícem +1

    हे अतिशय वाईट आहे हे थांबले पाहिजे.मुख्य मंत्र्यांना सांगून याच्यावर अळा आणला पाहिजे. दडशाहीच्या जोरावर चाललेलं हे थांबवलं पाहिजे.नाहीतर मालिन गावावर आलेलं संकट इथ येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.या जगात सामान्य माणसाला न्याय मिळत नाही.

  • @kanhaiyawadke4724
    @kanhaiyawadke4724 Před 20 dny

    सगळ्यांनी अशीच एकी शेवट पर्यंत ठेवा ... आणि पंचक्रोशीतील गावं पण या लढ्यात येवून साद द्या...

  • @critic8134
    @critic8134 Před 22 dny

    शिवसैनिकांनी जाऊन लोकसहभागाची मदत घेऊन खड्डे बुजवावे. तोतर्यंत कोर्टाचा स्टे आणावा

  • @deveshuthanekar6122
    @deveshuthanekar6122 Před měsícem +1

    कोणतेही सरकार तुम्हाला काहीच मदत करू शकणार नाही, कारण हे प्रकल्प त्यातल्याच लोकांच्या सहकार्याने चालू आहेत. त्यात त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग आहे. आणि त्यात सर्वात मोठी चूक आपली आहे कारण आपण आपल्या अडचणी दूर करण्यासाठी सोन्या सारख्या जमिनी विकल्या

  • @ajaygothal607
    @ajaygothal607 Před 27 dny

    आमदाराने लोकांनच्या शिक्षण- रोजगार या कडे लक्ष दिले नाही, म्हणून लोकांची वाईट अवस्था.

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 Před měsícem +1

    कोकणातील लोकांनी आपल्या जमिनी विकू नका परपातीय लोकांना या जमिनी दाखवतोय कोण आपलेच लोक त्यांना प्रथम चोप दिला पाहिजे

  • @nandkumargonbare5789
    @nandkumargonbare5789 Před měsícem +6

    विकणारे स्थानिक लोक,
    आणि एजंट ला पकडा.
    आणि गावकरी जबाबदार,
    बेसावध राहू नका,
    आपल्या गावात आजुबाजूला परप्रांतीय लोक येऊन तुमच्या जमीन विकत घेतील,
    आणि कालांतराने तुम्हालाच तुम्ही कोण. विचारतील??

  • @XQRQZQ
    @XQRQZQ Před měsícem +12

    जागा का विकल्या?

  • @Konkanking-xu7
    @Konkanking-xu7 Před 28 dny

    ह्या साठ्ठी आपली कोकणची माणसं जबाबदार आहे

  • @madhukarshirke9412
    @madhukarshirke9412 Před měsícem +2

    सरकार तुमचा आवाज ऐकेल पण कोकनातला चाकरमानी पुर्वी सारखा राहिला नाही.गाव सोडुन मुंबईत पळतं राहीले सर्व माध्यमातून मी स्वतः फेसबुकवर, गुगल वर दापोलीतील नागरीकांना विनंती केली कि आपल्या जागा जमीन विकु नका मग आता का रडतात. विकताना हे आठवलं नाही का.

  • @FARHAN0717-KONKNI
    @FARHAN0717-KONKNI Před měsícem +2

    Dear all adekar'
    This is the time to show them unity..... Zar sghle ekatr ladlo tarach jinku shakto ani Konkan vachau shakto.....☹️

  • @navinrajshetty6991
    @navinrajshetty6991 Před 21 dnem

    This is the future that are going to hand over to our next generation...😢hope the village and villagers get to lead a normal life and ossue is resolved and the village saved

  • @imtopper8528
    @imtopper8528 Před měsícem +1

    12 करोड ची मालकीण आणि उपासमारीची वेळ कशी ?
    गावकऱ्यांनी मुख्यमंत्री ला पत्र लिहा.... किंवा पर्यावरण प्रेमी संघटना ना कळवा.... आणि 😂
    सु भाष्य करणाऱ्या आणि तुषार सिंचनाचा वापर करणाऱ्या लोकांना गावात येण्यापासून थांबवा...!

  • @girishwanare846
    @girishwanare846 Před 24 dny

    जागा विका आणि सगळे मुंबईत एक फ्लॅट घ्या!

  • @smileman3161
    @smileman3161 Před 27 dny

    हे सर्व घडतय पण मराठी माणसे काहीच करू शकणार नाहीत महाराष्ट्राचे भोगोलिक महत्व आपणास माहित नाही पण ते परप्रांतीय बरोबर ओळखतात

  • @sushamagokhale8184
    @sushamagokhale8184 Před 28 dny

    पुढारी आहेत त्यांना मत देऊ नका आता येणारी निवडणूकीवर बहिष्कार टाका.

  • @sandeepmundhe955
    @sandeepmundhe955 Před 27 dny +1

    मी प्रत्येक वेळी सांगतो तुम्हाला प्लॉट विकायचे असतील तर कोंकणी वाड्या 5 गुंठा 10 गुंठा पारंपरिक झाडे लावून ग्रामपंचायत ने अटीशर्ती लावून निसर्गाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन मगच विका

  • @madhurasawant258
    @madhurasawant258 Před 27 dny

    त्या एजंटला आणि जमिनी विकणाऱ्या हलकटानां जबाबदार धरा!

  • @AmitDalvi-o7m
    @AmitDalvi-o7m Před měsícem +1

    कोकणकर अजून झोपला आहे कमी किंमतीत जमिन विकुन builder लोकांना मोठ केले पडिक जमिन जरी विकली तरी त्याचा बाजार मुल्य किती आहे ते तरी समजा विकायचे तर ५ करोड च्या खाली विका बघा किती builders घेतात आपल्या जमिन कवडी भावात विकुन नोकर बनू नका

  • @JV-nb5cu
    @JV-nb5cu Před měsícem

    छान बंगले बनत आहे. आनंद घ्या. जग बदलत आहे. तर वागण उत्तम.