नंदुरबारजिल्हा रुग्णालयातर्फे अवयवदानअभियानअंतर्गत शासकीयमहाविद्यालयाच्या वतीने जनजागृतीरॅलीचे आयोजन

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • नंदुरबार जिल्हा रुग्णालयातर्फे अवयवदान अभियानअंतर्गत शासकीय महाविद्यालयाच्या वतीने जनजागृती रॅलीचे आयोजन. नंदुरबार येथे 3 ऑगस्ट रोजी अवयवदान दिन आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग व महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाने साजरा करण्यात आला, त्याअनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, व रुग्णालय नंदुरबार, यांच्या मार्फत
    24 जुलैपासुन अंगदान/अवयवदान दिन म्हणुन विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले, 3 ऑगस्ट रोजी अंगदान/अवयवदान दिनाचे औचित्य साधून, संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती करण्यात येत आहे, सध्या देशात अवयवदानाचे प्रमाण अत्यल्प म्हणजे 1 दक्षलक्ष लोकसंख्ये मागे 0 . 08 ऐवढे आहे, पाश्चीमात्य देशात हे प्रमाण 1 दशलक्ष लोकसंख्ये मागे 38 ऐवढे आहे, याचे मुख्य कारण जनजागृतीचा अभाव आणि अवयवदाना बाबत गैरसमज आहे, व्यापक जनजागृती करुन जनमाणसातील गैरसमज दुर करणे आज काळाची गरज आहे, सध्या देशात सुमारे 570 अवयव प्रत्यारोपन केंद्र असुन केवळ 140 नॉनट्रान्सप्लॉट सेंटर्स आहेत, जी लोकसंख्येच्या सध्याच्या गरजेनुसार खुपच कमी आहेत, सध्या भारतात शेवटच्या टप्यातील मुत्रपिंड आणि यकृताच्या आजारांच्या उपचारांसाठी 2 लाख मुत्रपिंड आणि, 1 लाख यकृताची गरज आहे, मात्र दरवर्षी केवळ 4 हजार मूत्रपिंड प्रत्यारोपन आणि 500 यकृत प्रत्यारोपन केले जातात, हृदयाची परिस्थिती आणखी बिकट असुन 5 हजार रूग्णांना हृदयाची गरज असुन केवळ 20 ते 30 हृदय प्रत्यारोपन केले जात आहे,1 ब्रेनडेड रुग्ण, 2 मूत्रपिंड, 1 यकृत, 1 हृदय, 2 फुफ्फुस, 1 स्वादूपिंड यांचे संभाव्य दाता असुन एकाच वेळी 7 जीव वाचवू शकतो कॉर्निया, त्वचा, हाडे यासारख्या ऊतीचे दान करू शकतो आणि अपंग रूग्णांना विविध अपंगात्वापासुन मुक्त होण्यास मदत करु शकतो, तसेच महाविद्यालया अंतर्गत नंदुरबार शहरामध्ये अवयवदान महत्व पटवून देण्यासाठी 3 ऑगस्ट रोजी अवयवदानाची जनजागृतीची रॅली काढण्यात आली सकाळी 9 वाजता धुळे चौफुली ते अंधारे चौक या मार्गाने काढण्यात आली, या रॅलीचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार यांच्याहस्ते करण्यात आले, यावेळी रैलित अवयवदानाचे विविध पोस्टर व बॅनर तसेच नंदुरबार येथील स्थानिक भाषेतिल स्लोगन विद्यार्थ्यांनी बोलवून दाखविले, सर्व प्रथम मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी अवयवदान अभियानाच्या रॅलीस हिरवी झेंडी दिली, या रॅलीचे सांगता नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजय राठोड यांनी जमलेल्या जनतेस अवयवदान कोणी करावे, अवयवदानाची कोणाला गरज आहे, याची सर्व माहिती यावेळी दिली, तसेच अवयवदान संमतीसाठी आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास संपर्क साधण्याचे आवाहण केले, जनजागृतीच्या रॅलीच्या वेळी महाविद्यायातील प्राध्यापक डॉक्टर निलेश तुमराम, डॉक्टर तुषार पाटील, डॉक्टर आनंद जामकर, डॉक्टर आरटी सुभेदार, डॉक्टर ज्योति बागुल, तसेच सहयोगी प्राध्यापक पैकी डॉक्टर योगेश बोरसे, डॉक्टर प्रविणकुमार ठाकरे, डॉक्टर संतोष पवार, डॉक्टर योगेश साळुंखे व सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सुधाकर बेटेवाड, डॉक्टर राजेश ठाकुर, डॉक्टर सारिका, डॉक्टर विजय कोकणी, डॉक्टर हरिश्चंद्र गावित, डॉक्टर अनिल जटाळ, डॉक्टर निलेश वळवी आणि संस्थेतील अध्यापक व महाविद्यालयातील कर्मचारी व विद्यार्थी यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला, या अवयव दान रॅलीचे नियोजन डॉक्टर निलेश तुमराम, प्राध्यापक विभाग प्रमुख, न्यायवैद्यकशास्त्र व किशोर शेळके, ग्रंथपाल यांनी केले, अवयवदान रॅलीची सांगता अंधारे चौक येथे संपन्न झाली, या वेळी डॉक्टर संजय राठोड यांनी उपस्थितांना अवयव दानाबाबत बहुमोलाचे मार्गदर्शन करुन, अवयव दान करण्याचे आव्हान केले.

Komentáře •