कवितेचा कोपरा | Kavitecha Kopara | Sandeep Khare | Marathi Poetry | Marathi Kavita | Episode 1

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 11. 2022
  • "कवितेचा कोपरा"
    कवितेचे शीर्षक : 'लिहायला लागलाच आहे तर...'
    काव्यसंग्रह : मौनाची भाषांतरे (कॉन्टिनेन्टल प्रकाशन)
    छायाचित्रण आणि संकलन : देवदत्त कशाळीकर (देवदत्त फोटोग्राफी)
    रंगभूषा : कांचीस मेकओवर
    क्रिएटिव्ह डिझाइन्स: क्षितीज विचारे
    व्यवस्थापन : कुशल खोत
    सहयोग : वाइड विंग्ज मीडिया ( / @widewingsmedia )
    कविता आणि सादरीकरण : संदीप खरे
    तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि Like, Share, Subscribe करायला विसरू नका.
    CZcams : / @sandeepkhareofficial
    Facebook : / sandeepkhareofficialpage
    Instagram : / sandeepkhareofficial
    #SandeepKhare #KavitechaKopara #MarathiKavita
  • Hudba

Komentáře • 475

  • @Chitrabhushan
    @Chitrabhushan Před rokem +68

    सादरीकरण कसं असावं हे तुमच्याकडून शिकावं. वातावरण निर्मिती, हावभाव, हातवारे, आवाजाचा चढउतार सारं काही कमाल!! तुमचा आवाज मंदिराच्या गाभाऱ्यात जसा मंत्रध्वनी होतो तसा आश्वस्त वाटतो आणि ऐकतच रहावं असं वाटतं. सध्याच्या काळात इंग्रजी भाषेचा प्रादुर्भाव मराठी भाषेवर झालेला असतानाही तुमच्या तोंडून मराठी भाषेचा गोडवा आणि मराठी भाषा किती समृद्ध आहे याचा प्रत्यय येत राहतो. माझ्याप्रमाणे बऱ्याच जणांना तुमच्यामुळे कवितेची गोडी लागली. तुमची कविता याआधी जरी वाचलेली असली तरी तुमच्याकडून ऐकताना ती अजून उलगडत जाते आणि मनात अलगद मिसळत जाते. वेगवेगळ्या कार्यक्रमातून, कविता-गाण्यांमधून आम्ही तुम्हाला नेहमी ऐकतच असतो पण आता कवितेचा कोपरा या सदरातून वेगवेगळ्या कविता तुमच्याकडून ऐकता येतील. दिवसभराच्या धावपळीत कुठे विसावा घ्यावासा वाटलाच तर एक हक्काचा कवितेचा कोपरा आपल्यासाठी आहेच याचा आनंद आहे. खूप खूप शुभेच्छा🙏😊💐 मैफिल अशीच कायम रंगत राहो. खूप खूप प्रेम😊❤️

    • @VilasD3392
      @VilasD3392 Před rokem +4

      काय शब्द रचना आहे राव तुमची.... प्रत्येक शब्द मोजून-मापून, कदाचित माझाही प्रयत्न असेल पुढे तुमच्यासारखच स्वतःला व्यक्त करण्याचा....

    • @Chitrabhushan
      @Chitrabhushan Před rokem +2

      @@VilasD3392 धन्यवाद🙏😊

    • @savitaghodchore2128
      @savitaghodchore2128 Před rokem +1

      खूप छान कल्पना

    • @bhagyeshavadhani7318
      @bhagyeshavadhani7318 Před rokem +1

      काय भारी लिहिलंय राव.
      सलाम दंडवत !

    • @mukulhendre
      @mukulhendre Před rokem +3

      दाद द्यावी तर अशी!

  • @SandeepKhareOfficial
    @SandeepKhareOfficial  Před rokem +15

    नमस्ते. पहिल्याच पुष्पाला तुम्ही प्रेमाने ओंजळीत घेतलंत आणि उदंड प्रतिसाद देत आहात! खूप उत्साह आणि प्रोत्साहन मिळाले आहे. मनःपूर्वक आभार 😃 कृतज्ञ आहे 🙏🏻🙏🏻
    निरनिराळ्या कविता घेऊन दर शुक्रवारी रात्री ९ वाजता हा कवितेचा कोपरा सजवत राहू 😃👍🏻👍🏻👍🏻 भेटूच.

    • @amitpatil9517
      @amitpatil9517 Před rokem

      Hello sir maji Yek kavita tumcha madhur avajatun tumi aikvavi hi apeksha ahe

    • @arvindkadapure4932
      @arvindkadapure4932 Před rokem

      जल्लोष झाला कवीचा कवितेचा तरी उगाचच हे सोहळे,
      ठीक असत चाललं जग बाकीच्यांचं त्याच्यात उठसुठ लागतात याना असले शब्दभावनायमक असले डोहाळे,

  • @swarnayuayurvedachikitsala9317

    ज्याने अनेक तरुण मने पुन्हा कवितेशी आणून जोडली असा संदीप... हो, संदीप असेच लिहिलेले असायचे त्याच्या प्रत्येक कवितेच्या खाली आणि गाण्याच्या क्रेडिटमध्ये... आणि आम्हीही तेच वाचलं नेहमी... त्यामुळे तो तोच राहिला, संदीप... आमच्याच मनातील दाटलेल्या, साचलेल्या किंबहुना गोठलेल्या मौनाची भाषांतरे करून ज्याने आमच्याच समोर ठेवली असा आमचा, आपला वाटावा असा संदीप...
    जो स्पायडरमॅनची बायको या विषयावर कविता लिहितो, जो अग्गोबाई ढग्गोबाई लिहितो, जो बुम्बुम्बा सारखे थरारपूर्ण बालगीत लिहितो, तोच दुसरीकडे अजून उजाडत नाही, व्यर्थ हे सारेच टाहो सारखी अद्भुत काव्यरचना करतो तेव्हा शहारून जायला होतं. बालगीत, प्रेमगीत, विरहगीत, थरारगीत, असंख्य मन हेलावून टाकणाऱ्या, अंतर्मुख व्हायला भाग पाडणाऱ्या कविता आणि मग यासर्वातूनही जो नामानिराळा होऊन उरतो तो संदीप...

  • @rajendrabhute7989
    @rajendrabhute7989 Před měsícem

    एका वाक्यात सांगायचं तर, अगदी माझ्या मनातलं तुमच्या तोंडून ऐकलं आणि मन मोकळ झाल्यासारखं वाटलं 💐

  • @vidyabokil981
    @vidyabokil981 Před rokem

    आई म्हणते वैद्याला
    जाणलं मी तुझं मन,
    ठेवेन भान ऐकेन तान,
    जपेन हे लाभलेलं धन.

  • @chitrabhave3786
    @chitrabhave3786 Před rokem

    काव्य हा भाषेचा सर्वोच्च आविष्कार आहे!
    आणि तो सगळ्यांना च उत्तम सादर करता येत नाही.
    तुमच्याकडे दोन्ही आहे

  • @chandrashekhardeshpande6090

    अप्रतिम. ही पहिल्यांदा आयुष्यावर मधे ऐकली होती. इथे ऐकून पुन्हा तो आनंद मिळाला 👌👌👌🌹🌹❤

  • @nayanajoshi8616
    @nayanajoshi8616 Před 4 měsíci

    असेच थांबवून कविता ऐकवत जा....आम्ही तिचा आस्वाद घेत आनंद मनमुराद घेऊ...धन्यवाद

  • @nitinrasne5466
    @nitinrasne5466 Před rokem

    ज्ञानियाचा वा तुक्याचा, तोच माझा वंश आहे हे सप्रमाण सिद्ध करत आहात संदिपजी !
    अप्रतिम आहे सादरीकरण आणि आशय !
    धन्यवाद

  • @saileemandavkar1193
    @saileemandavkar1193 Před 4 měsíci

    खूपच छान कविता. कवी व्हायला अस्वस्तता हवी लागते.थोडयाफार फरकाने खरं ही आहे ते.असते ती आपली पण नंतर जो वाचतो त्याचीच होऊन जाते. खूपच छान उपक्रम 👌👌👌👌

  • @aartipande9286
    @aartipande9286 Před rokem

    "मृत्यूच्या गूढ सुंदर लेण्यांमधील धुकं साचलाय अगदी जन्मापासून ...."
    क्षणभर मेंदूतल्या सगळ्या पेशी स्तब्ध झाल्या. इतकी सांगोपांग विचार करणारी कविता आहे तुमची की मन कुठेही इतरत्र हलत नाही शेवटपर्यंत. आणि जातही नाही मनातून लवकर. रुंजी घालत राहते खूप खूप वेळ.

  • @jayadapadhyee6558
    @jayadapadhyee6558 Před 7 měsíci

    🙏🏾khup avadali kavita. मला कविता वाचायला आवडतात. असच सादर करत राहा. वेगळंच आनंद आहे हार्दिक 🙏🏾

  • @mahaveerkagle7406
    @mahaveerkagle7406 Před rokem

    संदीप तुम्ही कविता लिहीता छान आहेत आयुष्यातवर बोलू कांही पासून मी व माझी पत्नी आपल्याशी जोडले गेलो आहोत कवितेचा कोपरा या उपक्रमास मनापासून शुभेच्छा

  • @swatipadhye2255
    @swatipadhye2255 Před rokem

    केवळ अप्रतिम. अंतर, आणि इतर बर्याच अडचणी यातून माझ्या सारख्या माणसाला मिळालेली ही मोठीच मेजवानी आहे. अचानक मोबाईल उघडते काय अन् चक्क कवितेनं व्यापलेलं विश्व.फार फार सुरेख.धन्यवाद .

  • @jyotiupadhye8402
    @jyotiupadhye8402 Před rokem

    खुप छान. कवितेचा कोपरा व सर्व निवेदनच आवडल. कवितेच वेड मात्र त्या कोपर्र्यातच पिंगा घालत मग शब्द फेर भरतात. स्फुर्ती धावत येते. आणि सुंदर शब्दांची माळ होते.

  • @ratikakashimkar5069
    @ratikakashimkar5069 Před rokem +1

    संदीपजी.......तुम्ही किती छान शांतपणे कविता ऐकवता.....तुम्ही म्हंटल्याप्रमाणे खरंच कवितेसाठी रसिकता आणि अस्व् स्थता असावी लागते तेव्हाच ती कविता खरी आणि जवळची वाटते !
    मी तुमच्या कविता नेहेमीच ऐकत असते.....मला आवडतात तुमच्या कविता आणि त्यासोबतच तुमचं सादरीकरण !असेच नविन प्रयोग करीत रहा !

  • @vandanakulkarni8400
    @vandanakulkarni8400 Před rokem

    खूप छान. हे सदर चालू केल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या सर्व कविता सुंदर असतात . सादरीकरण पण छान.आवाज ,भावना अतिशय सुंदर.

  • @niranjanbhide7710
    @niranjanbhide7710 Před rokem +1

    संदीपजी, कविता छान झाली आहे.
    नुसतीच कविता नाही तर इतर अनेक कलांचा ध्यास असणाऱ्या आणि तोच आयुष्यभर जोपासणाऱ्या प्रत्येक माणसाच्या आई वडिलांसाठी हा एक संदेश आहे. आई वडिलांना वाटणारी काळजी ही देखील स्वभाविक आहे. पण अश सगळ्यांना ह्या कवितेमुळे कदाचित एक नविन द्रृष्टिकोन मिळेल व कलासक्त मुला-मुलींना एक भक्कम आधार देखील 🙏

  • @suryakantkhade9029
    @suryakantkhade9029 Před rokem

    उत्तम सादरीकरण अप्रतिम शब्दयोजना एक दुःखारा कोपरा हळवा झाला

  • @anilgogawale6488
    @anilgogawale6488 Před 11 měsíci

    सादरीकरण उत्तम, कवितेतील शब्दाची गुफनं एकदम छान च 👌👌🙏

  • @chiusush343
    @chiusush343 Před rokem +1

    धन्यवाद सर, आज पहिल्यांदा ऐकतेय मी तुमचं. खूप motivation video ahe. Mla hi mahit nahi kdhi mi kavita लिहायला लागले. आनुवंशिक गुण नाही मिळाला मला कवितेचा वारसा. पण खूप आवड निर्माण झाली लिहीण्याची. खरंच बोललात तुम्ही. जेवढं personal lihaal तेवढं universal होत. परत खूप खूप धन्यवाद सर 🙏

  • @monalipardhi1913
    @monalipardhi1913 Před 4 měsíci

    खूप सुंदर.. सादरीकरणआणि कविता दोन्हीही... साधं सरळ आणि सुरेख हळव...

  • @vaibhavabhang920
    @vaibhavabhang920 Před rokem

    खूपच छान संदीप दादा तू जिंकून घेतोस आमचं मन प्रत्येक कवितेतून

  • @alkapuranik8
    @alkapuranik8 Před rokem +1

    फार सुंदर संदिपजी.मला तुमच्या कविता फार आवडतात. त्या जमीनीवर पाय घट्ट रोउन असतात.

  • @supriyakane3597
    @supriyakane3597 Před rokem

    खूप छान,नेमके शब्द.डाॅक्टरचे ऐकतात लोक ही आता जरा कविकल्पना होऊ लागली असली तरी ही डाॅक्टरकडून आलेला सल्ला मननीय आहे.

  • @minalyeole2091
    @minalyeole2091 Před 7 měsíci

    किती वेगळा,मनस्पर्शी विषय
    सादरीकरण तर फारच सुंदर

  • @karishmathange4076
    @karishmathange4076 Před 6 měsíci

    सुंदर रचना आणि सादरीकरण नेहमीप्रमाणे सुरेखच👏🏻👏🏻

  • @jyotinaik3081
    @jyotinaik3081 Před rokem

    खूप छान सादरीकरण आहे, पुढेही अस छान छान मिळेल ह्माची खात्री आहे

  • @balasahebbiradar128
    @balasahebbiradar128 Před rokem +1

    तुमची कवीता तूमच्या स्वरात ऐकणे हाच मूळात नितांत आनंददायी अनुभव असतो.....त्यात त्या अशा अनुभवण्यास मिळणार आहेत तर मग क्या बात है ।
    .....आजची कवीता सुरूवातीला जराशी अनोळखी , अशक्तही वाटली पण जसजसं शेवटाकडं गेलो , भरून पावलो .
    .....हा कोपरा असाच दरवळत राहो व तुमचं बोट धरून आयुष्यजत्रा भटकायला लाभो हीच त्या दयार्धन ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @rasikahinge2630
    @rasikahinge2630 Před rokem

    खूप छान
    तुमचा आणि सलीलजी चा live कार्यक्रम मी अकोला येथे attend केला आहे मस्तच

  • @devdattakashalikar3551
    @devdattakashalikar3551 Před rokem +4

    संदीप खरे या ग्रेट माणसाला कॅमेरात साठवताना मला व माझ्या टीम ला अपूर्व आनंद होतोय... आम्हाला संधी मिळाली हे आमचे भाग्य.. कविता आणि संदीप खरे हे समानार्थी शब्द आहेत.. ग्रेट कविता ग्रेट अनुभव.. खूप खूप शुभेच्छा 💐💐

    • @meghakolhekar
      @meghakolhekar Před rokem

      सुंदर सेटिंग छायाचित्रण आणि संकलन

  • @minalyeole2091
    @minalyeole2091 Před rokem

    हा कवितेचा कोपरा रसिक मनाला व्यापून टाकतो.आपली कविता,कवितेचे सादरीकरण यामुळे मराठी माणसाला कविता या साहित्य प्रकाराविषयी गोडी उत्पन्न होते.
    ही कविता तर आतिशय उत्तम.
    शुभेच्छा

  • @poonampatil9040
    @poonampatil9040 Před rokem

    कविता आवडण हे सजीव पणाच लक्षण आहे ......हे खरच खूप छान आहे

  • @sachinsuryawanshi102
    @sachinsuryawanshi102 Před rokem

    खूप छान सरजी, खूप आवडल तुमचं चॅनेल आणि तुमच्या कोपऱ्यातल्या कविता 😍😍🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vimalkale8960
    @vimalkale8960 Před rokem

    खूपच छान मि नेहमि आपले कार्यक्रम पहाते विषाय व सादणिकरण खूपच छानअसते.

  • @vijaymhatre9241
    @vijaymhatre9241 Před rokem

    संदीप सर मी तुमचा खूप मोठा चाहता आहे, आयुष्या वर बोलू काही तर अगणित वेळा पाहिला आहे, आणि सादरीकरण कसं असावं हे तुमच्या कडून शिकावं, आणि ही कविता तूम्ही सादर केलीत ती तर अप्रतिमच.

  • @pradnyalele7984
    @pradnyalele7984 Před rokem

    आत्ता ऐकली कविता. खूप छान. पुढच्या कवितेची वाट बघतेय. कारण तुमच्या कविता आवडतातच ऐकायला

  • @tejalkhanolkar2027
    @tejalkhanolkar2027 Před rokem

    सुंदर स्वप्नांच्या दुनियेत रमणारी

  • @pradnyawarankar
    @pradnyawarankar Před rokem

    अगदी बरोबर म्हणालात तुम्ही, कवितेचे classes लावता येत नाही. तो जन्मा पासून कवीच लागतो. खूप सुंदर sir. आज खूप दिवसांनी मी एकांतात होते. आणि तुमच्या कवितेचा कोपरा मला you tube वर सापडला. आणि बरोबर च थोडी फार मला मी ही सापडले....
    Thank you

  • @vandanatamhane7040
    @vandanatamhane7040 Před rokem

    मात्र अप्रतिम 👌 कविता म्हणजे यक्षिणी.... कवी होणं म्हणजे अस्वस्थ होणं ..एकटेपण ...असाध्य रोग ...जीवघेणा अगदी ... पथ्य पाळणं कठीण...सत्य सुंदर....अनुभवलेलं ... नुकत्याच लिहू लागलेल्या अशक्त मुलाच्या ....फळ पिकण्याआधी करू नका तोडायची घाई .... शहाण्यासारखं लिहितो म्हणून शहाणा म्हणण्याची करू नका घाई ... त्याचाच उडेल आत्मविश्वास स्वतःवरचा... तो असेल रानभर ... त्यातूनच ओसंडत...ज्ञानेश्वर.... 🙏🙏 प्रत्येक ओळ शब्द न शब्द काळजाला भिडणारा .... हळवा पण हवा हा कवितेचा कोपरा... जडावेत असे असाध्य रोग आणि जन्माव्यात अशा कविता .... ज्ञानेश्वरी ... ज्ञान ईश्वरी... संदीप जी ... अप्रतिम आणि अप्रतिमच कविता ....आपल्या कवितेच्या प्रेरणेने सुचल्या काही कविता ....( कवितेच्या शोधात ... ) आनंद मिळाला.... आपला आवाज सादरीकरण अफलातून ....अजूनच भावते कविता .... कवितेचं सौंदर्य अधिकच खुलतं ...आपल्या कविता वाचते व व विडीयो पाहते ...ऐकते आपल्याला ...खूप शिकायला मिळत॔य .... हा ओघ असाच चालू राहावा ... भरलेला कोपरा .... 🙏🙏💐💐🌹🌹

  • @ramkrishnaphadtare7657

    संदीप दादा.,.. उगाचंच नात जोडायच म्हणून नाही पण तुला आणि कवितेला फार जवळून या माध्यमातून खऱ्याअर्थाने ओळखता येईल असा सुंदर काव्यमय प्रवास वाटतो. हा कवितेचा प्रवास चिरंतर चालत राहो हीच शुभेच्छा.

  • @maninimahajan1610
    @maninimahajan1610 Před rokem

    खूप सुंदर रचना, आपला आवाज अप्रतिम आहे संदीप जी कविता हा जिव्हाळ्याचा विषय आहे,मी पण प्रयत्न करते लिहिण्याचा,माझं मन मानसी काव्यसंग्रह आत्ताच प्रकाशित केला आहे . त्यामुळे आपली ही कविता जास्त भावली, धन्यवाद

  • @anitabhosle8498
    @anitabhosle8498 Před 4 měsíci +1

    खूप सुंदर कविता आणि अप्रतिम सादरीकरण 👌👌👌👌🙏💐

  • @jeevanpatil2116
    @jeevanpatil2116 Před rokem

    उशीर झाला पाहायला परंतु खंत नाही तर चांगल झालं असं वाटते कारण आता सलग पाहता येतील सर्व भाग, आणि कवितेबद्दल सांगायचं तर स्तुती करणं स्वभावात नाही तरीही अप्रतिम 👌

  • @s.kcreation6851
    @s.kcreation6851 Před rokem

    अप्रतीम काविता सादरीकरण सर ,तुमच्याकडे छोट्या कवींनी शिकावं तुमचा आदर्श घ्यावा,मी कवि बोधीअशोक,, एक छोटा कवी

  • @succulentgardenermumbai

    संदीप दादा तू आणि तुझ्या कवितांवर खूप खूप प्रेम !
    तु वेगळं असं काही करतोस , सादर बिदर असं काही नसतच मुळी .
    तुझं असत ते अगदी सहज नैसर्गिक स्वाभाविक !
    हार्दीक हार्दिक शुभेच्छा 💐

  • @rekhakanade6707
    @rekhakanade6707 Před rokem

    खुप छान तुमच्या प्रत्येक शब्दांत काव्य आहे तुम्ही खरंच खुप छान प्रकारे ते मांडता

  • @nageshkulkarni1302
    @nageshkulkarni1302 Před rokem

    फारच अप्रतिम....
    किमान 1000 भाग होवु देत..

  • @satishvidhate7781
    @satishvidhate7781 Před rokem

    खूपच छान कविता आणि सादरीकरण संदीप सर एक हळवे मन लागतेच कवितेसाठी हे निश्चित समजू लागले

  • @dattatrayapotdukhe3867

    कविमन लाभणे ही तर दैवी देणगी
    कृपेने शारदेच्या शब्द पाझरे लेखणी

  • @anitadeshpande598
    @anitadeshpande598 Před rokem

    खूपच सुंदर. सादरीकरण ही छान.अनेक शुभेच्छा

  • @prakashgangal31
    @prakashgangal31 Před rokem

    संदीप जी, धन्यवाद !! राजकीय विश्लेषकांच्या गर्दीत, हे थंड वाऱ्याची झुळूक उत्साहित करून गेली. म्हणतात ना " whiff of fresh air" 'कोपरा' खूपच उबदार आहे हे जाणवले. अभिनंदन !! भेटूच इथेच, रोज नाही जमले तर जमेल तसे.

  • @madhurideshpande6332
    @madhurideshpande6332 Před rokem

    फारच सुंदर उपक्रम. तुमच्या कविता ऐकून चार ओळी लिहिण्याची प्रेरणा मिळत गेली. कविता कशी ऐकावी हे समजले. धन्यवाद आणि शुभेच्छा.

  • @vaishalibhatkhande3559

    खूप आवडली कविता आणि कवितेचा कोपरा....बाहेर अंधार असताना...समई कोपऱ्यात लावून ठेवल्यावर एक शांत उजेड पडतो...मन उजळवून टाकणारी ही समई आहे..खूप सुंदर कल्पना...स्पृहासोबत चा करोना काळातील तुमचा कार्यक्रम ऐकला होताच...त्यावेळच्या राधे रंग तुझा गोरा ह्या कवितेच्या तर मी प्रेमातच पडले होते ..त्यावर मी पण एक कविता केली होती ती तुम्हा दोघानी ऐकावी असे खूप वाटते मला असो हा कार्यक्रम म्हणजे तर आमच्या साठी खऱ्या अर्थाने दिवाळी आहे..खूप साऱ्या शुभेच्छा.. सुंदर कविता आणि तेवढेच सुंदर सादरीकरण .."गाडी सुटते...नसतेच घरी तू जेव्हा" ह्या कविता जेव्हा ऐकते तेवढयाच भावतात पुन्हा पुन्हा..खूप छान कार्यक्रम... रसिक मनांची पूर्तता होईल या कार्यक्रम मुळे..💐💐💐💐💐अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @snehamathkar9485
    @snehamathkar9485 Před rokem

    खूप सुंदर. हे सदर सुरू केल्याबद्दल मनापासून आभार.
    आमचाच आमच्या मनाशी साधलेला संवाद असं वाटलं
    Thank you once again

  • @manishraskar7336
    @manishraskar7336 Před rokem

    खूप छान रचना आणि भावस्पर्शी सादरीकरण , नवकवींसाठी मार्गदर्शक आणि लिहीत्या कवींसाठी सूचक..!!

  • @antarangakavita1428
    @antarangakavita1428 Před 2 měsíci

    सुंदर कविता व सादरीकरण अप्रतिम👌👌

  • @abhaygadre708
    @abhaygadre708 Před rokem

    वा, वा अप्रतिम. तुमच्या कविता वाचण्यापेक्षा तुमच्या तोंडून अर्थ उलगडताना ऐकणं हा भाग्ययोग आहे.
    हे असं छान सुरु केल्याबद्दल अत्यंत आनंदी आणि आभारी आहे. गोरेगावला सादर केलेल्या अप्रकाशित कवितांच्या कार्यक्रमात नवरा बायकोच्या भांडणाबद्दल एक कविता (खरं म्हणजे संवाद )सादर केली होतीत, ते पुन्हा एकदा ऐकायला आवडेल.
    आणि काय "जीते रहो और कविता सादर करते रहो "🙏

  • @prasadmahamunee
    @prasadmahamunee Před rokem

    अप्रतिम सादरीकरण, खुप खुप शुभेच्छा 💐

  • @shwetakulkarni693
    @shwetakulkarni693 Před rokem

    तुम्हाला ऐकणं हे आमचं भाग्यच...खूप खूप शुभेच्छा

  • @chandandhumane8194
    @chandandhumane8194 Před rokem

    आजच तुमचे " मी अन् माझा आवाज " सुरू केले... सुंदर आहे ...

  • @neetagaikwad5693
    @neetagaikwad5693 Před rokem

    खूप छान शेवटच्या ओळी खूपच खूपच सुंदर😇😇😇

  • @madhuragaonkar6566
    @madhuragaonkar6566 Před rokem

    तुमचा आवाजच ऐकला की छान वाटतं. कविता कशी सुंदर होते तुमच्या सादरीकरणातून..कविता अर्थातच सुंदर .....!!!!💖

  • @m.deshmukh2811
    @m.deshmukh2811 Před rokem

    खूपच अप्रतिम सर कवी नेहमी अस्वस्थच असतो हे अगदी खर आहे कारण त्या अस्वस्थतेतूनच त काहीतरी काव्य काहीतरी साहित्य जन्माला येत

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 Před rokem

    I liked This Video very much We are waiting for next.

  • @aratisamant6562
    @aratisamant6562 Před rokem

    खूप सुंदर कविता आणि सादरीकरण ही उत्तम 🙏

  • @mayuribarve4935
    @mayuribarve4935 Před rokem

    खूप खूप छान सादरीकरण
    अर्थात हे शब्द तुमच्यासाठी तोकडे च
    पण खरे तर तुमचे खूप खूप आभार असा हा विषय घेऊन आले तुम्ही
    किती सुंदर जणू आमच्याशी गप्पा मारत आहात असा भास झाला
    कविता खूप सुंदर 💐

  • @anjalijambhale5797
    @anjalijambhale5797 Před rokem

    मी पण काही चारोळ्या करण्याचा अथक प्रयत्न करते .फार काही उच्च नसतात पण रोजच्या जीवनात घडणाऱ्या घटनांवर आधारित असतात

  • @shubhangihawaldar8533

    खूप सुंदर. असच वाटतं कविता लिहिल्यावर

  • @vivekdeshmukh9308
    @vivekdeshmukh9308 Před rokem

    खुपच सुंदर सादरीकरण आणि कविता पण अप्रतिम

  • @amit51278
    @amit51278 Před rokem

    हे सदर सुरू केल्याबद्दल आपले खूप आभार

  • @kailasmali9047
    @kailasmali9047 Před 10 měsíci

    Nice poem 👌
    सर तुम्ही ह्या कवितेतून कवीचे जीवन गाणेचे सांगितले आहे ही कविता म्हणजे प्रत्येक कवी आणि कवीचे घर यांचे वास्तवचित्र आहे
    -कवियत्री रुपाली कैलास माळी

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 Před rokem

    अप्रतिम कविता आणि सादरीकरण देखील

  • @surabhisalgaonkar9729

    खुप छान. प्रत्येक पालकांना शिकवण आहे.

  • @manishamogre3026
    @manishamogre3026 Před rokem

    खरेच तुमच्या कविता माणसाचे अंतरंग उलगडून दाखवते, अगदी मग तो कोणीही असून देत

  • @anaghadeshpande6491
    @anaghadeshpande6491 Před rokem

    Khup chhaan watali Kawita… Jo na dekhe Rawi to dekhe Kawi….swathacha ani dusryancha anubhaw Tyachya shabdat sajwat rahi….

  • @sameergune1244
    @sameergune1244 Před rokem +5

    संदीप, ही कविता तुझ्या तोंडून ऐकायची फार फार इच्छा होती, यानिमित्ताने ती पूर्ण झाली, खुप आनंद झाला. कविता फार सुरेख आहे वर तुझे हातखंडा सादरीकरण, दुधात साखर धन्यवाद.
    अशाच तुझ्या उत्तमोत्तम कविता या उपक्रमात ऐकायला मिळाव्यात ही इच्छा!
    आणि कवितेचा कोपरा या उपक्रमाला मन:पूर्वक शुभेच्छा

  • @sagarghumatkar1081
    @sagarghumatkar1081 Před rokem

    मला खूप दिवसांपासून वाटत होतं की तुम्ही असं सादरीकरण का घेवून येत नाही CZcams वर....
    आता आलात खूप छान वाटलं...
    उत्तम कविता आणि अजून ची अपेक्षा ....
    चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही 🥰

  • @kalyanipatil8039
    @kalyanipatil8039 Před rokem

    खूप छान. अनेक कविता ऐकायची इच्छा. अनेक शुभेच्छा 🧿🙏💐

  • @shraddhawalvekar3083
    @shraddhawalvekar3083 Před rokem

    स्तुत्य उपक्रम.आता सुरू ठेवा...
    नक्की शेअर करु

  • @ruhi1158
    @ruhi1158 Před rokem

    khup khup sundar.tumcha kavita nehmich chan astst.sadrikaranhi mast.great poet.kay kavita ahe awesome

  • @rupalideshpande5108
    @rupalideshpande5108 Před rokem

    Ase karyakram khup khup vhayala havet, khup divasapasun vaat pahiliy

  • @mahendrakadu6360
    @mahendrakadu6360 Před rokem

    सादरीकरण गंभीर व प्रवाही ....विचारप्रवर्तक

  • @pramodlaxmiarts3066
    @pramodlaxmiarts3066 Před rokem

    Khoop sunder upakram. 👍 Mast Kabita. Baryach goshti relate zalya.
    मृत्यूच्या लेण्यांमले गुड सुंदर धुके👌🏻👌🏻👍🏻

  • @vishwanathmusic1302
    @vishwanathmusic1302 Před rokem

    दादा तुझ्या कविता ऐकायला सुरुवात केली आहे. काय सांगू माझी अवस्था तू जे वर्णन केले आहेस तशीच आहे. रात्री अपरात्री तिचा स्पर्श होतो. कुणाला सांगता येत नाही कुठे बोलता येत नाही. किती दिवस एकटेपणा आता चांगली सोबत लाभू दे आता. सुमित रामचंद्र काणे बदलापूर. तुझ्या कविता आत भिडतात म्हणुन मोठी ही प्रतिक्रिया देत आहे.

  • @dnyaneshwarpatil7
    @dnyaneshwarpatil7 Před 7 měsíci

    दादा तुझी आवडती कवितेची पुस्तकांची list आम्हाला सांगितली तर खूप बरं होईल..

  • @murlidharhambarde34
    @murlidharhambarde34 Před rokem

    खूप छान..आता पुढील भागांची उत्सुकता आहे .

  • @anujabarve6284
    @anujabarve6284 Před rokem +3

    तुमच्या कवितेची गेली कित्येक वर्ष चाहती आहे मी... कविता आणि एकंदर कवीचं जगणं,अतित्व आणि त्याच्या मनातील घालमेल ह्यावर ऐकून कवी न पाहिलेल्या माणसाला सुद्धा कवीची ओळख होईल... खूपच सुंदर मनाला भिडेल अशी कविता...
    पण संपूर्ण एपिसोड् मध्ये फक्त एक कविता नको.. तुमचे अनुभव ऐकायला नक्कीच आवडतील पण त्याबरोबर अजून एका कवितेची जोड असेल तर पर्वणीच ❤️

  • @desaisc
    @desaisc Před 11 měsíci

    Navi surwat parat Kelit abhinandan

  • @shripadsonule9529
    @shripadsonule9529 Před rokem

    फळ पिकण्याचा दाखला... सुंदर

  • @dilipkuthe1875
    @dilipkuthe1875 Před rokem

    Good morning sir very nice Explanation.

  • @dnyanadagore-kadam6855

    फार सुंदर कविता...मनाला भिडणारी...👌

  • @umeshpatwardhan6246
    @umeshpatwardhan6246 Před rokem

    Surekh kavita ani manapasun sadarikaran..dhanyavad!

  • @archanaborukar3674
    @archanaborukar3674 Před rokem

    हवाहवासा कवितेचा कोपरा

  • @arunkulkarni6075
    @arunkulkarni6075 Před rokem

    अप्रतिम.
    कवीतेचे लेणे अजून काय.

  • @chandrashekharpethe8276

    लाजवाब ........ लाजवाब. ....... लाजवाब........

  • @ganeshkute7716
    @ganeshkute7716 Před rokem

    अप्रतिम सुंदर, काय लिहता राव

  • @Archana_Panse
    @Archana_Panse Před rokem +1

    Khupch mast

  • @geetanjalidangat9801
    @geetanjalidangat9801 Před rokem

    खुप वर्षांनी इतकी सुंदर ओघवतं मराठी अम्ृतवाणी कानावर पडतेय
    मला भेटायचय तुम्हाला

  • @niveditabedekar3058
    @niveditabedekar3058 Před rokem

    अतिशय सुंदर... तुमच्या कविता अप्रतिम असतात, साध्या शब्दांना सहजच आपलेपणाने हळुवारपणे गुम्फत जाता आणि तुम्ही आमच्या मनातले लिहिले असेच वाटते. तुमच्या सादरीकरणाने कविता अजून जास्त उमगली. स्तुत्य उपक्रम. धन्यवाद
    कोपरा अस्वस्थ असावाच मनातला
    तुमच्या शब्दाधारांनी रुजावा मिळाला
    अशाच कवितांनी व्हावे जगणे सुंदर
    सार्थक जन्माचे, घडावे जंतर मंतर
    🙏🙏