शहरीकरणामुळे माणसाची निसर्गाशी नाळ तुटते आहे? | Think Books दिवाळी विशेष । Manoj Borgavkar

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 10. 2022
  • थिंकबँक आणि स्टोरीटेल प्रस्तुत, 'थिंकबुक्स दिवाळी विशेष' या मालिकेतील पहिली मुलाखत...
    विषय चाकोरीबाहेरचा आहे. शैली पहिल्या धारेची आहे. थेट कोंडूरा किंवा बनगरवाडीची आठवण करून देणारे लिखाण आहे. 'नदीष्ट 'ही' केवळ कादंबरी नाही, तो आहे प्रत्यक्षदर्शी आणि अनुभवसिद्ध घटनांचा कसदार ललित गद्य हुंकार.
    या कादंबरीचे लेखक, मनोज बोरगावकर यांची मुलाखत...
    #ThinkBooks #Storytel #DiwaliVishesh

Komentáře • 68

  • @dilippawar7030
    @dilippawar7030 Před rokem +1

    वाह छानच कार्यक्रम .. संवेदनशील लेखक

  • @vishalmahajan9762
    @vishalmahajan9762 Před rokem

    खूप तरल आणि संवेदनशील व्यक्तिमत्व आहे सरांचं. ❤
    खूप आवडली मुलाखत.

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 Před 8 měsíci

    मनोज बोरगावकर यांच्या 'नदीष्ट ही' ह्या कादंबरी निमित्ताने झालेली ही मुलाखत अतिशय तरल होती. नदीष्ट ही ह्या कादंबरी‌ बद्दल एकूण, ती साकार होण्याच्या प्रक्रिये‌ बद्दल एकूण ही कादंबरी वाचावाशी वाटते एवढे मात्र नक्की.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @tanujajagadeesh7485
    @tanujajagadeesh7485 Před rokem

    खूप छान..मी इतकी भारावून गेलीयं मला आत्ताच "नदिष्ट" हातात घेऊन वाचायची आहे.।

  • @satishgangurde758
    @satishgangurde758 Před rokem +1

    सर आपले शब्द एका योगी चे असावेत असे वाटले,ज्याने दृश्याच्या मागचे अदृश्य पाहिले आहे.🙏❤️

    • @manojborgaonkar7955
      @manojborgaonkar7955 Před rokem

      नाही मित्रा माणूस व्ह्याचा प्रयत्न चालू आहे

  • @manojborgaonkar7955
    @manojborgaonkar7955 Před rokem +1

    सगळ्यांचे मनःपूर्वक आभार... नदी वाहत राहावी

  • @sandeepmahekar5753
    @sandeepmahekar5753 Před rokem +5

    एव्हढ्या सुंदर मुलाखतीतून दिवाळीची सुरुवात करायची कल्पना सुन्दर!
    मी प्रत्येक प्रसंगाला स्वतः शी relate करीत होतो. कॉर्बेट माझाही आवडता लेखक.
    माझीही आई कर्करोगाशी अनेक वर्षे झगडून गेली.
    आणि गंगा ( नाशिकमध्ये आम्ही गोदावरीला गंगाच म्हणतो) तर माझ्या स्वप्नात देखील येते ( कोणी त्याला पितृदोष म्हणतात, म्हणोत बापडे!) तिच्या काठाने प्रत्येक किलोमीटरचा निसर्ग एक वेगळी स्वतंत्र सृष्टी असते ते उमजत गेलं आणि डोळ्यासमोर तिला मरणासन्न अवस्थेत बघणं नशिबी आले! बऱ्याचदा रामकुंडावर गोदावरीचेच श्राद्ध का घालू नये असेही उद्वेगजनक विचार आले.
    मानव हिच निसर्गाला लागलेली कीड असून त्याचा नायनाट झाल्याशिवाय सृष्टीचक्राची पुनर्रचना होणारं नाही, हे कितीही कटू असले तरी सत्य आहे.. असो, बोरगावकर सरांना ऐकण्याची संधी दिल्याबद्दल Tb आणि टीम चे मनापासुन आभार!

  • @ajaykulkarni758
    @ajaykulkarni758 Před rokem +2

    खूपच छान ! अप्रतिम दिवाळी भेट , मन:पूर्वक धन्यवाद !!

  • @leledhanashree
    @leledhanashree Před rokem

    खूप खूप छान मुलाखत. खरंतर गप्पाच.... विचारप्रवर्तक

  • @shaileshjambhale1697
    @shaileshjambhale1697 Před rokem +1

    अतिशय सुंदर मुलाखत, नदिष्ट च्या निर्मिती मागची प्रोसेस समजली. कादंबरी जेवढी प्रवाही, प्रामाणिक आहे तेवढीच ही मुलाखत वाटली. बोरगावकर जेवढे नदीशी घट्ट नाळ जोडून आहेत तसेच ते जमिनीशी ही घट्ट पाय रोवून आहेत. आजकालच्या जमान्यात हा प्रामाणिक पणा दुर्मीळ झालाय. कदाचित बोरगावकर म्हणतात त्या प्रमाणे त्याला काही प्रस्थापित भाबडेपणा किंवा बालिशपणा ही म्हणतील, पण मला वाटते हा निरागसपणा असेल. आणि हेच निरागस सादरीकरण ह्या कादंबरी च्या एवढया मोठ्या यशाचे सूत्र असेल. आम्ही वाचक बोरगावकरांच्या पुढील कादंबरी ची नक्कीच आतुरतेने वाट पाहतोय. ह्या साठी अनेक अनेक शुभेच्छा

  • @bravindralic
    @bravindralic Před rokem +2

    अत्यंत सुंदर.❤

  • @ruchadinkar9732
    @ruchadinkar9732 Před rokem +3

    किती सुंदर, साधं - सरळ आणि संवेदनशील🌿❤️

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Před rokem +2

    🙏 खूपच छान आहे विदिओ.नदीश्ट या कादंबरीकार लेखकांना ऐकण्याची संधी मिळणे ही साहित्यिक दिवाळी आवडली..यासाठी आपणा सर्वांचे खूप खूप आभार..अशा प्रकारचे विदियो येत राहो ही अपेक्षा..धन्यवाद.👌👌👍😊

  • @shrinaths.thigle6249
    @shrinaths.thigle6249 Před rokem

    थिल्लरपणा नाही करायचा, खानदानी जगायचं. 👌👌👌
    अप्रतिम 👌

  • @suvarnavelankar7357
    @suvarnavelankar7357 Před rokem

    खुप सुंदर मुलाखत....शब्द काळजात उतरले...मनःपूर्वक धन्यवाद. दिवाळीची सुंदर भेट ...

  • @anishinde27
    @anishinde27 Před rokem

    नदीष्ट कितीदा वाचलं तरी प्रत्येक वेळी नवीन अनुभव देणार पुस्तक आहे..❤❤❤️

  • @ajitdeshmukh6425
    @ajitdeshmukh6425 Před rokem

    फार फार सुंदर मुलाखत. 🙏

  • @suchitapadlikar2392
    @suchitapadlikar2392 Před rokem

    अप्रतिमच 👌🏽👌🏽💐

  • @vinayakshastri5198
    @vinayakshastri5198 Před rokem +2

    केंद्र सरकारच्या 10 लाख सरकारी नोकरीची सत्यता व यासाठी मराठी मुलांची तयारी यावर एक Video बनवा

  • @Marathi-hindi-Instrumental

    संथ वाहते कृष्णामाई गाणं आठवलं सहजच...

  • @pramodjagtap2029
    @pramodjagtap2029 Před rokem

    खूप छान कादंबरी

  • @ajinkyadeo9731
    @ajinkyadeo9731 Před rokem +5

    *नमस्कार सर* 🙏🙏,
    थिंकबँक वरची आपली मुलाखत पाहिली आणि ' *नदीष्ट* ' वाचावे असे वाटले. बऱ्याच काळाने पुस्तक विकत घेण्याचा योग आला. कुतूहल म्हणून वाचायला सुरुवात केली आणि पुस्तक वाचून संपले तेव्हाच थांबलो. आपण अधोरेखित केलेले नदीचे प्रवाहीपण वाचताना जाणवत गेले. खरे पाहता वेगवेगळ्या नावाने नदी अनेकदा बघितली पण अशा पद्धतीने कधी विचारही मनात आले नाहीत. पुस्तक वाचून संपले पण मनावरचं गारूड अजूनही तसच आहे. नेमकं काय वाटतंय ते सांगणं अवघड आहे पण आनंद, हुरहूर, रीतेपणा, समाधान, बेचैनी असं सगळं संमिश्र जाणवतंय. पुस्तकातील दादाराव, सगुणा अंतर्मुख करतात. आणखीन काय लिहिणे माझे शब्द थोटके आहेत. मागे एका सहली निमित्त गोदामाई मध्ये उतरण्याचा योग आला होता त्यावेळी पाण्याच्या ओढीमुळे माझ्या हातातील सैल झालेली सोन्याची अंगठी वाहून गेली, नदीष्ट च्या रूपाने गोदामाईने परतावा दिला असे वाटते.
    आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा....

  • @nareshpawde2983
    @nareshpawde2983 Před rokem

    मी ही कादंबरी सध्या storytel वर ऐकत आहे 👍👍

  • @ruDeshpande
    @ruDeshpande Před rokem

    ओघवती पण प्रवाही काळजाला भिडणारी लेखकाची मुलाखत खूप दिवसांनी ऐकली. Speechless 🙏 मराठी साहित्याशी तुटलेली नाळ परत जोडली जाईल. आमच्यासारखे वाचकच नाही तर नवोदित लेखकही प्रेरणा घेतील. पुढील कादंबरीच्या प्रवासासाठी शुभेच्छा!!

  • @udaydesai9634
    @udaydesai9634 Před rokem

    धन्यवाद..!!

  • @UmakantPachegaonkarhomeopath

    आपली मुलाखत ऐकली. जीवाला खोलवर कुठेतरी फार समाधान वाटले. मानवी हस्तक्षेपामुळे, शहरी वातावरणात राहून, क्षणोक्षणी निसर्गावर होणारा बलात्कार अनुभवताना मनाला फारच विषण्ण वाटते. आपली संवेदनशीलता मनाला फार खोलवर भावली!
    आपली "नदिष्ट"कादंबरी प्रकाशित करणारे प्रकाशकाचे नाव सांगाल काय?

  • @shashikantvaze6242
    @shashikantvaze6242 Před rokem

    Yes it's very much true.

  • @ganeshbagdare4968
    @ganeshbagdare4968 Před rokem

    Vinayakji keep it standered you are in right way

  • @mohanmhaske4683
    @mohanmhaske4683 Před rokem

    Very Nice🙏

  • @gaurideshpande8913
    @gaurideshpande8913 Před rokem

    अप्रतिम मुलाखत. लेखक आरती प्रभू यांच्या जातकुळी तील आहे.

    • @manojborgaonkar7955
      @manojborgaonkar7955 Před rokem

      ग्रेट compliment

    • @gaurideshpande9700
      @gaurideshpande9700 Před rokem

      मनोजजी, तुमचं जगणंच खूप वेगळ आहे. तुम्ही लिहिलं म्हणुन जगाला समजलं. ह्यापुढेही असच जगा . लिहिण महत्त्वाच नसून तुम्ही जगता तसं जगणंच गरजेच आहे. जगण्यासाठी लिहू नका. लिहिण्याची उर्मी दाटून आली तरच लिहा.
      तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !

    • @manojborgaonkar7955
      @manojborgaonkar7955 Před rokem +1

      @@gaurideshpande9700 ताई खूप मोठा काळ उभा आहे त्या पाठीमागे... जमेल तेवढे जगणं आणि लिहीण यात आंतर पडू नये असा पप्रयत्न असती माझा..

    • @aviash01
      @aviash01 Před rokem

      @@manojborgaonkar7955 प्रविण दवणेजींनंतर तुम्हाला ऐकत रहावसं वाटतं. कादंबरी घेऊन वाचण्याचा प्रयत्न करीन.

    • @manojborgaonkar7955
      @manojborgaonkar7955 Před rokem

      @@aviash01 जी धन्यवाद

  • @geetawarang9243
    @geetawarang9243 Před rokem

    It's true

  • @Marathi-hindi-Instrumental

    कुठे सध्याची फिल्म इंडस्ट्री , कुठे त्या सिरियल्स, आणि कुठे हे !!!! 2022 मधे एवढा pure माणूस सापडणारे का कुठे !!! ....हे साहेब निर्जीव गोष्टींचे पण भाषांतर करु शकतील बहुतेक ...मला पूर्वीचा दुरदुर्शन चा एखादा कार्यक्रम बघतोय असं वाटलं ...

    • @manojborgaonkar7955
      @manojborgaonkar7955 Před rokem

      खूप खूप आभारी आहे

    • @Marathi-hindi-Instrumental
      @Marathi-hindi-Instrumental Před rokem

      @@manojborgaonkar7955 नतमस्तक ....देवाने धाडलेला माणूस ....आमच्यात नाही हो एवढं धाडस ....फार कमकुवत आम्ही तुमच्यासमोर

  • @pratapkadam6211
    @pratapkadam6211 Před rokem

    आमचं भाग्य हे कीआम्ही बोरगांवकर सरांच्या विद्यार्थीनीं आहोत

  • @maheshwarlovekar9231
    @maheshwarlovekar9231 Před rokem

    लेखकाच्या प्रवाही,काव्यात्म कथनातून सतत जाणवते ती कमालीची सजग समरसता.अन्यथा या बहुपदरी कलाकृतीची निर्मितीप्रक्रिया केवळ शब्दात उलगडून दाखवणे शक्य झाले नसते.एकवेळ नियतीने कपाळावर गोंदलेली अक्षरे वाचता येतील पण निसर्गाने गिरवलेली अक्षरे वाचता येणे जवळपास अशक्य. ही अक्षरे लेखकाला स्वच्छ दिसतात,स्पष्ट ऐकू येतात आणि निसर्गालाही त्याच्याशी संवाद साधण्याची ओढ वाटते.त्यात समानधर्मा गवसल्याचा आनंद असतो.असा आनंद जवळपास अप्राप्यच.
    या कादंबरीतील पात्रांना पात्रं म्हणणं त्यांची तौहीन होईल.हे सारे त्याहून कितीतरी अधिक खरे, हाडामासाचे,उत्कट आहेत,वाचकांच्या मनात कायमचं घर करण्याची क्षमता असलेले.
    साधनेशिवाय एवढी सुंदर,असत्याचा स्पर्शही न झालेली कलाकृती निर्माण करणे अशक्य होते पण हेही तेवढेच खरे असणार की हे लिखाण करताना लेखकाने serendipity चे अनेक क्षण अनुभवले असणार.त्याशिवाय या जादुई रसायनाची निर्मिती झालीच नसती.
    या कादंबरीत निसर्ग वाचणारी माणसं आहेत. लेखकाच्या आगामी कलाकृतीत कदाचित माणसं वाचणारा निसर्ग प्रकटेल आपल्याला अधिक शहाणं करणारा,तुटलेली नाळ कशी जोडता येईल हे शिकवणारा.

    • @manojborgaonkar7955
      @manojborgaonkar7955 Před rokem

      किती सुंदर किती तरल.... कलाकृतीला न्याय देणारे....salute to you...

    • @manojborgaonkar7955
      @manojborgaonkar7955 Před rokem

      किती सुन्दर तरल कलाकृतीला उन्नत करणारं लेखकाचा हात लिहिता राहावं अशी प्रतिक्रिया

    • @manojborgaonkar7955
      @manojborgaonkar7955 Před rokem

      तौहीन...क्या बात है

  • @n.k.audiobook1818
    @n.k.audiobook1818 Před rokem

    My 1st Like

  • @TheAbhiramsathe
    @TheAbhiramsathe Před rokem

    निसर्गाशी नाळ तुटते आहे????
    केंव्हाच तुटली आहे!!!!

    • @shejwalkarhemant3110
      @shejwalkarhemant3110 Před rokem +1

      बरोबर बोललास भाऊ. ते दुर्दैवाने खरे आहे. शहरी जीवनात सामील झाल्यानंतर खरोखरच आपण आपली मुळे गमावली आहेत. आपल्या आयुष्यात काय झाले आहे हे आपल्याला माहित नाही. आणि आपण त्याला प्रगती म्हणतो. हे खोट्या सांत्वनासारखे दिसते.

  • @varshashendye8826
    @varshashendye8826 Před rokem

    तुम्ही संवेदनशील आहांत। तुमच बोलणे ऐकून सगले डोल्यापुढे उभे राहाते।

  • @n.k.audiobook1818
    @n.k.audiobook1818 Před rokem

    My 1st View.

  • @satishpatil992
    @satishpatil992 Před rokem

    he lekhak saharat rahatat ka?

    • @manojborgaonkar7955
      @manojborgaonkar7955 Před rokem

      मी नांदेड ला असतो

    • @ugalmuglemanishaugalmugale3350
      @ugalmuglemanishaugalmugale3350 Před rokem

      खर सांगायचं तर नदिष्ठ वाचनच एक अलौकिक अनुभव आहे जो बोरगावकर सरांनी आम्हाला दिला🙏

    • @manojborgaonkar7955
      @manojborgaonkar7955 Před rokem

      @@ugalmuglemanishaugalmugale3350 thanx Ji