अभ्यास कसा करायचा? | Avinash Dharmadhikari | TATS EP 65 ।Marathi Podcast

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 08. 2024
  • आपल्या सगळ्यांना अभ्यास करताना कधीना कधी stress आलेला आहे पण आपण या अभ्यासाच्या विषयाकडे कायम दुर्लक्ष करत आलो आहोत!
    तर आज आपण अभ्यास कसा करायचा? अभ्यासाची नेमकी व्याख्या काय आहे? Time management कसं करायचं? नावडत्या विषयाचा अभ्यास कसा करायचा? लक्षात राहण्यासाठी काय करायचं? अभ्यासाचा stress कसा manage करायचा? परीक्षेसाठी तयारी कशी करायची? या सगळ्यात पालकांचा approach काय असला पाहिजे? या सगळ्यावर अविनाश धर्माधिकारी (Founder, Director-चाणक्य मंडळ परिवार) यांच्याशी चर्चा केली आहे.
    अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद.
    We have all experienced stress and faced various problems while studying at some point. Yet, we often overlook the importance of addressing these issues head-on. This episode explores how to study effectively, the definition of studying, and how to manage time efficiently. We also delve into how to tackle subjects we dislike, techniques to remember information better, managing study-related stress, and preparing effectively for exams. Additionally, we discuss the crucial role of parents in a student's academic journey. Join us as we discuss these topics with Avinash Dharmadhikari, Founder and Director of Chanakya Mandal Parivar.
    Be sure to watch the full episode and remember to subscribe for more!
    आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!
    Amuktamuk.swiftindi.com
    Disclaimer:
    व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
    अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
    चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
    अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
    Credits:
    Guest: Avinash Dharmadhikari, Founder and Director of Chanakya Mandal Parivar
    Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav.
    Editor: Sangramsingh Kadam.
    Edit Assistant: Rohit Landage.
    Content Manager: Sohan Mane.
    Social Media Manager: Sonali Gokhale.
    Legal Advisor: Savni Vaze.
    Connect with us:
    Twitter: / amuk_tamuk
    Instagram: / amuktamuk
    Facebook: / amuktamukpodcasts
    Spotify: open.spotify.com/episode/2fVs...
    #AmukTamuk #marathipodcasts
    Note: The subtitles / closed captions for our videos are made via AI-generated transcription and we do not guarantee or hold any responsibility for the meaning, nuance, correctness, legibility, veracity, or legality of the same.
    00:00 - Introduction
    04:00 - Meaning of Study
    12:53 - Memorizing vs learning
    19:18 - How to study
    29:57 - Stress during study
    45:46 - Exam preparations
    55:17 - Techniques of Study
    01:13:55 - Relativity of Study techniques
    01:17:20 - Dealing with competitive exams

Komentáře • 258

  • @maheshgore2496
    @maheshgore2496 Před 25 dny +48

    मी महेश गोरे, अविनाश धर्माधिकारी सरांचा विद्यार्थी. सर शिकवताना नेहमी म्हणायचे आपल्या आवडीचे क्षेत्र निवडा आणि त्यात उत्तुंग कामगिरी करा आणि हेच ऐकत मी राजकीय जीवनात करिअर करायचं ठरवलं. आणि आज आवडीच्या क्षेत्रात काम करतोय, याचा मला फार आनंद आहे. अनेकांच्या आयुष्यात अविनाश धर्माधिकारी सर हे एखाद्या ध्रुव ताऱ्यासारखे येतात आणि आयुष्यच बदलुन जातं.. त्यातला मी एक❤

  • @user-ry6on9ef3c
    @user-ry6on9ef3c Před 27 dny +117

    तुम्ही तर आज आमच्या गुरुलाच बोलवले आहे....👌

  • @piyushkale3795
    @piyushkale3795 Před 27 dny +41

    तुम्ही जबरदस्त काम केलं आहे या माणसाला बोलवून. देव माणूस

  • @user-px7er7dg2q
    @user-px7er7dg2q Před 26 dny +20

    अभ्यासाच्या वयात नाही प्रत्येक वयातील माणसा साठी खूप उपयुक्त गोष्टी सांगितल्या 😊

  • @AnupamaAlavekar
    @AnupamaAlavekar Před 23 dny +10

    खूपच सुंदर 🎉🎉. फक्त शालेय अभ्यास नाही...तर आयुष्य जगण्याचा अभ्यास सरांनी उत्तम सांगितले आहे

  • @diksharanpise310
    @diksharanpise310 Před 24 dny +9

    धर्माधिकारी सरां मुळे मला वाचनाची गोडी लागली आणि माझ्या करिअर घडणया मध्ये सुधा त्यांचा मोठा वाटा आहे. मी कायम त्यांची ञुनी राहील.

  • @kalyanibhosekar4086
    @kalyanibhosekar4086 Před 25 dny +6

    उत्तम मुलाखत. सरांचं मार्गदर्शन पप्रत्येक विद्यार्थ्याला आणि पालकांना मिळालं पाहिजे 🙏🏻

  • @nishantjadhav0801
    @nishantjadhav0801 Před 27 dny +23

    मी सहा वर्ष रंगभूमीची सेवा केली. माझ्या निष्काळजी मुळे माझ शिक्षण राहिलं पण आता पुन्हा सुरुवात केली आहे शिक्षण घ्यायला आणि त्यात हा आजचा व्हिडिओ... मला भविष्यासाठी खूप मदत होणार यामुळे मला माहित आहे. तुमच्यामुळे माझ आयुष्य माझ भविष्य घडताना माझ्यातला एक चांगला आणि सुशिक्षित आणि सुसंस्कृत माणूस घडताना मी बघतोय. हे शक्य झालंय केवळ तुमच्यामुळे...

    • @amuktamuk
      @amuktamuk  Před 27 dny +6

      मनापासून धन्यवाद! तुमच्या पुढच्या तयारी साठी शुभेच्छा!

    • @avadhutatre
      @avadhutatre Před 24 dny +2

      अनेक शुभेच्छा मित्रा!

  • @sandeshsonawane1184
    @sandeshsonawane1184 Před 25 dny +12

    अमुक तमुक टिमचे मनापासून आभार
    गुरुवर्य श्री अविनाश धर्माधिकारी सरांच्या मंत्रमुग्ध वाणीने तुमचा स्टुडिओ देखील भारावून गेला आहे....
    फक्त mpsc नाही तर जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत यशस्वी होण्यासाठी अगदी सरळ साधं सोपं सांगणारे गुरू तुम्ही तुमच्या मंचावर आमंत्रित केले...
    खूप खूप धन्यवाद.....❤

  • @truptibawachkar
    @truptibawachkar Před 21 dnem +4

    "अभ्यास म्हणजे तपश्चर्या"संपूर्ण Podcast मधील भावलेली गोष्ट आहे....अनेक विद्यार्थ्यांचा महत्त्वाचा प्रश्न आणि तुम्ही अतिशय सविस्तर केलेले मार्गदर्शन...अविनाश धर्माधिकारी सर आणि अमुक तमुक टीम चे मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏...

  • @supriyajadhav-chavan5771
    @supriyajadhav-chavan5771 Před 27 dny +6

    ज्या विषयी माझ्या मनात चिंता सतावत होती नेमकी त्याच विषयावर हा पॉडकास्ट आहे. हा vdo मी माझ्या मुलाला नक्की दाखवेन
    खूप खूप धन्यवाद दोघांना खूप छान छान विषय घेऊन येत आहात . शुभेच्छा

  • @akashagnihotri2681
    @akashagnihotri2681 Před 25 dny +5

    अभिमान आहे सरांचा विद्यार्थी असल्याचा. गुरुवर्य!❤

  • @anandbhagawat7348
    @anandbhagawat7348 Před 22 dny +5

    खूप सुंदर झालाय हा भाग...
    श्री.अविनाश धर्माधिकारी सरांना बोलावून या कार्यक्रमाची उंची वाढवली आहेत....आता असेच उत्तमोत्तम guests बोलावत रहा..
    सरांचा अभ्यास ....त्यांची व्यक्त होण्याची पद्धत इतकी छान आहे की ऐकतच राहावंसं वाटलं...
    मी एक शिक्षक आहे...
    माझ्या शाळेच्या ग्रुपवर मी हे share केलंय...
    माझ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला याचा निश्चितच उपयोग होईल...
    पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन...
    लोभ असावा

    • @SarjeraoGhuge
      @SarjeraoGhuge Před 16 dny

      Same sir mihi ek vidyarthi aahe mala pn hi video aamchya sir aanich pathvali tumachya sarkhe shikshak margdarshan karayala aahet hi khup bhagyachi goshti aahe 🙏🏻

  • @nikhilkulkarni3858
    @nikhilkulkarni3858 Před 21 dnem +5

    कुणाशी compare krt nahi pan tumhi दोघं समोरच्याला खूप बोलू देता
    सौमित्र पोटे सुधा खूप छान मुलाखती घेतोय पण तो सारखा मध्येच अडवतो सगळ्यांना

  • @jayshreesukale9753
    @jayshreesukale9753 Před 21 dnem +4

    अतिशय अतिशय सुंदर, उपयुक्त, अभ्यासू मार्गदर्शन...अमुक तमुक आणि धर्माधिकारी सरांची खूप कृतज्ञता❤🙏

  • @pratimapatil4665
    @pratimapatil4665 Před 25 dny +14

    नको कार मोठी, नको लाल बत्ती, नको मस्त दारी झुलायास हत्ती...... सरांची कविता आजही गरजेची आहे.

  • @justentertainment7283
    @justentertainment7283 Před 23 dny +5

    माझं सगळ्यात आवडतं व्यक्तिमत्व❤
    आणि आज त्यांची पॉडकास्ट तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आणली
    Kharrch thank you so much❤

  • @sunitadeshpande2195
    @sunitadeshpande2195 Před 27 dny +3

    अभ्यासोनी प्रकटावे अशा व्यक्तीमत्त्वाला बोलावलत त्यासाठी तुमचे मनःपुर्वक अभिनंदन , ओंकार, शार्दुल 😊

  • @Shreyaaamore
    @Shreyaaamore Před 27 dny +19

    Manifest केलेला episode आहे हा! खरंच खूप मनापासून कृतज्ञता! ❤ असेच भरभरून ज्ञान वाटत रहा!🎉

    • @amuktamuk
      @amuktamuk  Před 27 dny +1

      तुम्हाला आणखी कोणा कोणाला अमुक तमुक वर बघायला आवडेल नक्की सुचवत राहा! ❤

  • @pranitadeochakke6913
    @pranitadeochakke6913 Před 27 dny +3

    ओंकार आणि शार्दुल दोघांना पण खूप धन्यवाद छान विषय घेता . मी तुमच्या दोघांची फॅन आहे रे . छान काम करताय . असेच अजून छान छान विषय घेत जा . समाजाची विचार करण्याची पद्धत या मुळे काही टक्के तरी बदलू शकते किंवा विचार करायला तरी भाग पडेल .

  • @atharvbagul9406
    @atharvbagul9406 Před 22 dny +2

    खूप सुंदर पोडकास्ट आजपर्यंत चा. विडिओ चा thumbnail पाहून मला वाटलं ते एखाद्या टिपिकल शिक्षक मार्गदर्शन असेल, पण तसा अज्जीबात न्हवता. खूपच भारी पद्धतीने समजावलं.

  • @charumurudkar6816
    @charumurudkar6816 Před 22 dny +3

    This was the best episode. I might have said this before ; but truly this was THE BEST! I actually took notes while listening to this episode. Thank you.

  • @harshadanalawade2023
    @harshadanalawade2023 Před 27 dny +5

    खूप खूप आभार ओंकार आणि शार्दूल 🙏🙏🙏🙏🙏 धर्माधिकारी सर ना बोलावत आज....... God bless you both of you and Amuk Tamuk Team.......

  • @akshayjoshi5578
    @akshayjoshi5578 Před 5 dny

    खूप दिवसांनी सरांच्या सत्राला बसल्यासारखं वाटलं....शुभेच्छा...🙏🏼

  • @harshadapadhye6259
    @harshadapadhye6259 Před 25 dny +3

    ओंकार, शार्दूल, छान झालेय हे session.
    तुमचे दोघांचे माईक बघा ना जरा. खूप शार्प ऐकू येताहेत तुमचे आवाज

  • @vinit09in
    @vinit09in Před 25 dny +2

    वाह खूपच छान विषय आणि तो ही गुरुवर्य धर्माधिकारी सरांबरोबर, खूप धन्यवाद

  • @shekru2144
    @shekru2144 Před 26 dny +17

    मी आरती कुलकर्णी. मी चाणक्यमंडलच्या पहिल्या बॅचची विद्यार्थिनी आहे. फार छान वाटलं हे ऐकून.

    • @ankushg2696
      @ankushg2696 Před 21 dnem +3

      @@shekru2144 सध्या कुठल्या पदावर आहात? की कुठल्या क्षेत्रात करियर करत आहात?

    • @prajwaljadhav2028
      @prajwaljadhav2028 Před 6 dny

      select nahi झाल्या vatat

    • @prajwaljadhav2028
      @prajwaljadhav2028 Před 6 dny

      Zala asal select , shevti aadnav kulkarni ahe aapl😂

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Před 27 dny +2

    हा विदियो प्रचंड आवडला..सर्वांना खूप खूप धन्यवाद व सरांना मनापासुन धन्यवाद.फारच छान वाटलं ऐकून..माझा आवडता विषय अभ्यास असल्याने मला विशेष हा विदियो आवडला..👌👌👏👍

  • @saritapatil8318
    @saritapatil8318 Před 26 dny +2

    🙏 खुप छान चर्चा ही आजच्या समाजाची गरज बनली आहे. खुप मोठा दिलासा देणारी आहे...👍👍

  • @vidulakarlekar443
    @vidulakarlekar443 Před 27 dny +14

    खूप खूप छान भाग... मा. श्री. धर्माधिकारी सरांना नमस्कार 🙏🙏🙏 आणि धन्यवाद 🙏

  • @neeta1312
    @neeta1312 Před 12 dny

    अविनाश सरांना आपण बोलाविलेत त्याबद्दल खूप धन्यवाद!
    किती वेगवेगळ्या उदाहरणांनी “अभ्यास कसा करायचा” हा विषय सरांनी उलगडून सांगितला.
    सरांकडे सांगण्यासारखे अजून बरेच मुद्दे असतील पण वेळेची मर्यादा असल्याकारणाने समारोप करावा लागला.
    पुन्हा कधीतरी वेगळ्या विषयावर बोलण्यासाठी त्यांना बोलवा. अफाट ज्ञानसाठा आहे त्यांच्याजवळ.

  • @harshadapadhye6259
    @harshadapadhye6259 Před 25 dny +2

    सर इथे आले हा मोठा पुरस्कार आहे तुमच्यासाठी!

  • @muktashanbhag2301
    @muktashanbhag2301 Před 27 dny +3

    खूपच छान आणि आवश्यक असा हा podcast…👌🏻👌🏻👌🏻🤍🤍
    respect for Avinash sir..thank you sir 🙏🏻 and thank you Amuk Tamuk 🙏🏻😇

  • @SarjeraoGhuge
    @SarjeraoGhuge Před 16 dny

    Mi ek vidyarthi aahe manun sangto ki hi video jyane sampurna bagitli aani aatmasaat keli tyach jivan vyarth kadhich jaanar nahi aani for amuk tamuk channel la sangto ki mala tumch channel mahit hi navhat pn aatachya ghadila mi ek tumcha fan bhavano love you yaar very nice ❤🙏🏻👍🏻he je siraanch bhashan aahe he kadhi sampavch nahi as mala vatat hot aani tyat tumhi ekhyadya sadharan vidyarthyachi ji matt pefect tech manadal v tyach margdarshan aamhala bhetal karach khup khup dhanyavaad🙏🏻🙏🏻🙏🏻👍👍🏻♥️🥹

  • @jyotsnasahasrabudhe7747
    @jyotsnasahasrabudhe7747 Před 20 dny +4

    Interview , विषय,चांगलेच असतात.पण त्या dignity ने घेतला जात नाही."हवा येऊद्या "कार्यक्रम वाटतो.हे विषय हाताळताना तुम्ही जरा सिरीयस असायला हवे.तुम्ही मित्राशी गप्पा मारायला जसे आघळ पघळ बसतो,हसतो,तसे करू नये असे माझे मत आहे. सुज्ञास जास्त सांगायला नको.

  • @pranitadeochakke6913
    @pranitadeochakke6913 Před 27 dny +3

    सुंदर मुद्दे उपस्थित करून व्यवस्थित उकलून सांगितलेत . विज्ञान अध्यात्म सगळ्याच मुद्द्यांचा विस्तृत उलगडा करून सांगितलत . खूप फायदा होईल सगळ्यांना . मी दोन मुलांची आई आहे . या आधीच तुमच्याशी भेट व्हायला होती पण असो आता मुलांना याचा फायदा होईल . मी खूप खूप आभारी सर तुमची . धन्यवाद🙏🙏

    • @amuktamuk
      @amuktamuk  Před 27 dny +1

      हा एपिसोड नक्की तुमच्या जवळच्या लोकांना share करा! खूप खूप धन्यवाद 🙏

  • @revatijoshi2539
    @revatijoshi2539 Před 26 dny +3

    कित्ती कित्ती सुरेख आहे हे podcast!! मला तुम्हाला धन्यवाद म्हणायला शब्द अपुरे पडतायत. असेच छान-छान podcasts तुमच्याकडून घडत राहू दे ही ईश्वर चरणी प्रार्थना !!

  • @mrinalkulkarni762
    @mrinalkulkarni762 Před hodinou

    सरांनी प्रत्येक शाळेत मुलं आणि शिक्षकांसाठी समजावून सांगावे. त्याची सध्या खूप गरज आहे.मी क्लास घ्यायचे तेव्हा मुलांना असेच समजावून सांगायचा प्रयत्न करायचे.मुलं त्या वेळेला खूप आवडीने ऐकायचे.पण आता कोरोना कळापासून मुलं खूप भरकटली आहेत,असं वाटतंय.

  • @chandrakantlakade5425

    अतिशय सुंदर आणि उपयुक्त मुलाखत. अभ्या सा विषयी अनेक जुन्या आपल्या असूनही आपल्या ला माहित नव्हत्या त्या गोष्टी समजल्या. धन्यवाद.

  • @URBANCLOUD
    @URBANCLOUD Před 16 dny

    Face your fears ✅
    The Time & Place Habit ✅ etc
    अगदी अचूक असे निरीक्षण आणि उत्तम अभ्यास पद्धती सांगितल्याबद्दल धन्यवाद सर..
    गुरू पौर्णिमेचा मंत्र भेटावा असा उत्तम Podcast..

  • @user-xs1dc3zh2i
    @user-xs1dc3zh2i Před 25 dny +5

    माझे आदर्श व माझे द्रोणाचार्य सरजी सप्रेम नमस्कार🙏

  • @bharatigogte7976
    @bharatigogte7976 Před 27 dny +3

    खूप उपयोगी आणी अप्रतिम पॉडकास्ट. धर्माधिकारी सर hats off to u too! आमच्या अभ्यासाच्या वयात हे techniques कळली असती तर!! अमुक तमुक खूपच छान आणी गरजेचा विषय घेतल्याबद्दल खूप धन्यवाद!

  • @user-zi2fw3mi6u
    @user-zi2fw3mi6u Před 27 dny +2

    आयुर्वेदिक औषधे आणि डॉक्टरांनी दिलेले औषध यतिल फरक, दोन्ही औषधातिल फायदा तोटा हा एक विषय::;;

  • @PratibhaPrasade
    @PratibhaPrasade Před 26 dny +1

    Kiti Sopya bhashet khup mahatvacha vishay sangitla Dharmadhikari Sir ni... Thank you so much🙏🙏😊Sir na ani AmukTamuk team la khup shubhechha😊🙏

  • @amrutapatil7872
    @amrutapatil7872 Před 22 dny +2

    Apratim khoopach jhan ,Tumche khup khup aabhar Sir chan margdarshan dilyabaddal 🙏🙏

  • @sonalimishra8017
    @sonalimishra8017 Před 27 dny +1

    Khup mhanje khup ch chan vatale ha subject aikun.. Thanks Amuk-Tamuk team😊👌

  • @nehakasar8554
    @nehakasar8554 Před 11 dny

    ज्याचं शिकणं संपलं त्याचं जीवनाचं प्रवाह वाहणे थांबले 👍👌 Great🙏

  • @sukhadaabhi
    @sukhadaabhi Před 9 dny

    अतिशय स्तुत्य👏🏼👍🏼
    विद्यार्थी अनेक प्रकारच्या ताणातून जात असतात. अभ्यासाच्या, पालकांच्या अपेक्ष्यांच्या, काही मुलांच्या बाबतीत बुलिंग सुध्दा.. त्याचे त्यांच्या एकूणच पुढच्या आयुष्यामध्ये emotionally, psychologically काय आणि कसे पडसाद उमटू शकतात
    आणि मोठ्यांसाठी inner child healing कसे उपयोगी ठरू शकतं ह्यावर एपिसोड झाला तर खूप आवडेल..

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 Před 27 dny +2

    Khup Bhari🎉 Dhanyavaad Team.....Dhanyavaad Avinaash Sir🎉

  • @prasadsatao4036
    @prasadsatao4036 Před 21 dnem +2

    This 1 hour 24 minutes and 54 second ध्यानप्रसाद i *enjoy* it.

  • @apoorvapingle8877
    @apoorvapingle8877 Před 27 dny +2

    Jabardast episode..ajun aikayla avdel. Khupch sundar. Thank you Amuk tamuk

  • @anujabal4797
    @anujabal4797 Před 26 dny +1

    सुंदर एवढेच म्हणू शकते खूप धन्यवाद अमुक तमुक चे आणि माननीय सरांचे

  • @utkarshaindulkar8360
    @utkarshaindulkar8360 Před 27 dny +1

    ahaha... hi mulakhat mhanje kewal apratim!! Thank you so much siranna bolawlyabaddal!! Love you sir... tumche wichar kitihi aikle tari kami ch watat!!!

  • @rohitrauti
    @rohitrauti Před 25 dny +4

    देवमाणुस 🇮🇳👏🏻

  • @archanaagarwal454
    @archanaagarwal454 Před 27 dny

    Sir is the best teacher, great human being too . Thank you for this episode 🖌️

  • @amitbiranje
    @amitbiranje Před 26 dny +1

    खुप मोठ आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व....सरांना नमस्कार 🙏🙏 धन्यवाद 🙏🙏

  • @sujatapendse1441
    @sujatapendse1441 Před 26 dny

    मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏
    वेगवेगळी टेक्निक्स वापरून अभ्यास कसा करावा ते खूपच छान समजावून सांगितले.
    पुन्हा एकदा धन्यवाद🙏

  • @anantyuvabharat5874
    @anantyuvabharat5874 Před 17 dny

    Sri.Avinash ji yanna...
    ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया ।
    चक्षुरुन्मीलितं येन
    तस्मै श्रीगुरवे नमः ॥
    Ya mazhya priya skikshakala mi 24 hrs salag aiku shakato. Amuk tamuk che anekanek dhanyavaad...
    episodes ...pratiksha....
    kasha notes ghyaychya jevha pratyek vaakya bullet point asato ni bullet sarakha aarpaar jaato.
    It's not just amuk tamuk now....channel is progressing to the level next.
    Shubhechcha 🎉

  • @kishorpatre3578
    @kishorpatre3578 Před 20 dny +1

    My best teacher❤ in competitive exam.

  • @palashadeshmukh8986
    @palashadeshmukh8986 Před 27 dny +1

    खूप छान विषय असतात तुमच्या podcast चे

  • @ketankawadi4962
    @ketankawadi4962 Před 27 dny +2

    सरांना नमस्कार 🙏
    अमुक तमुक चे आभार आणि शुभेच्छा

  • @pratikshajadhav753
    @pratikshajadhav753 Před 25 dny +3

    आमचे प्रेरणादायी सर ✌

  • @navinkale6129
    @navinkale6129 Před 19 dny

    Just Awesome ❤ Khup relevant ani actionable tips aahet . I am fortunate to get a chance to listen these 👍

  • @meerapawar149
    @meerapawar149 Před 26 dny

    खुप खुप, खुप छान सर साध्या सोप्या भाषेत आपण उत्कृष्ट मार्गदर्शन आजच्या विद्यार्थ्यांना केले.धन्यवाद सर .

  • @prajaktadatye4738
    @prajaktadatye4738 Před 27 dny

    महत्वाचा विषय.. thank you 😊

  • @user-px7er7dg2q
    @user-px7er7dg2q Před 26 dny

    फारच छान ऐकायला मिळालं, सुंदर एपिसोड ❤
    छान असतात नेहमीच, आवडतात

  • @JayshriMarathiMotivation

    E excellent excellent powerful session...... Thank you thank you Amuk Tamuk ❤👍...... साहेबाना बोलावल्याबदल

  • @vaishalisamant5306
    @vaishalisamant5306 Před 13 dny

    Great, episode sampu cha naye ase vatay hote, thank you

  • @archanapandit7598
    @archanapandit7598 Před 17 dny

    At par conversation and guidance by Respected Dharmadhikari sir!

  • @mrunmayeegat7750
    @mrunmayeegat7750 Před 26 dny

    Every student needed this!! Beautiful podcast, kudos to you both for getting such great people on the panel and helping many of us to get through our tough times happily and positively.

  • @saurabhbadave7484
    @saurabhbadave7484 Před 19 dny

    खूप चांगले विषय आणि अभ्यासपूर्ण वक्ते बोलवत आहात त्याबद्दल खूप आभार!
    एडिटमध्ये स्टॉक शॉट्स किंवा ऑडिओ इफेक्ट शक्यतो टाळा.

  • @sunitaraul2934
    @sunitaraul2934 Před 27 dny +1

    खूप छान वर्णन केले आहे अभ्यास करण्यासाठी धन्यवाद

  • @shitalchandrayan7293
    @shitalchandrayan7293 Před 27 dny

    Khup chan...khup diwas zale avinash sir na eikun

  • @user-em5io5xm9q
    @user-em5io5xm9q Před 25 dny

    मार्गदर्शन खूप छान पध्दतीने सांगितले.हे प्रश्न नेहमीच येत असतात. धन्यवाद!

  • @sumitragurav6622
    @sumitragurav6622 Před 25 dny

    खूप प्रेरक मार्गदर्शन मी सरांचे विचार नेहमी आचरणात आणण्याचा प्रयत्न करते

  • @archanagogawale3368
    @archanagogawale3368 Před 24 dny

    फारच छान विषय होता आणि छान मार्गदर्शन मिळाले.त्याबद्दल आभारी आहे.

  • @shubhramali4234
    @shubhramali4234 Před 27 dny

    Ek number podcast, thank you so much 😊 for everything 🙏

  • @swapnilvedpathak8890
    @swapnilvedpathak8890 Před 27 dny

    Great Human !! Always loved listening to him 😇

  • @meenakshishewale1046
    @meenakshishewale1046 Před 27 dny +1

    माती पंख आकाश ,❤. Sarache pustak

  • @gayatrikadam3825
    @gayatrikadam3825 Před 22 dny +1

    खूपच उपयुक्त माहिती सांगितली आहे

  • @pranalinarvekar1465
    @pranalinarvekar1465 Před 7 dny

    खरचं जेव्हा समजतं तो क्षण परमोच्च आनंदाचा!

  • @user-xi5uw7zv5u
    @user-xi5uw7zv5u Před 11 dny

    Thank you !! For bringing these episode to us....❤Love Avinash sir's thinking❤...

  • @diptikulkarni9558
    @diptikulkarni9558 Před 27 dny

    खूप खूप धन्यवाद 😊🙏🙏🙏
    Podcast संपूच नये, अजून अजून सरांना एकाव असं च वाटतं

  • @priyazilpelwar845
    @priyazilpelwar845 Před 27 dny

    खूप सुंदर म एक आई आहे मला तुमच्या vdo मुळे खूप उपयोग होणार.Thank you....

  • @dineshkadam4042
    @dineshkadam4042 Před 14 dny

    khup khup danyawada mahiti khup va yatil dhanyan khup molach ahe mana pasun aabhar

  • @snehasamant6100
    @snehasamant6100 Před 15 dny

    Hariom, d best guidelines by Dharmadhikari guruji🎉,वयाची 50 तसच 60 च्या वरील वरीष्ठ अभ्यासू व्यक्तिसाठी श्री.धर्माधिकारी सरांकडूनच ऐकायला नक्कीआवडेल, एक कार्यक्रम आयोजित करावा.श्रीराम

  • @shrutikagawande426
    @shrutikagawande426 Před 12 dny

    Khup Chan margadarshan kelay sir khup khup dhnywad 😊

  • @meragaonmeradesh8631
    @meragaonmeradesh8631 Před 25 dny

    Khup chhan Vishay
    Dhanyawad🙏🙏🙏

  • @padmashreeborkar5556
    @padmashreeborkar5556 Před 27 dny

    अप्रतिम
    शब्दातीत

  • @maheshmunde5546
    @maheshmunde5546 Před 20 dny +1

    अतिशय छान मुलाखत..!!

  • @pradnyasvlog8163
    @pradnyasvlog8163 Před 21 dnem

    Kharach khup madat zhali hya vedio chi thanks team

  • @shreyank2010
    @shreyank2010 Před 27 dny

    अतिशय सुंदर episode

  • @rekhataibhuyar3748
    @rekhataibhuyar3748 Před 27 dny

    सर खूप सुंदर मार्ग दर्शन देत आहेत .🙏💐👌

  • @shubhangimulay8289
    @shubhangimulay8289 Před 27 dny

    खूप महत्वाचा विषय 👌👌
    खूप छान

  • @sharang5481
    @sharang5481 Před 27 dny

    Was awaiting very eagerly for Sir to come on podcast ❤❤❤

  • @user-il8cu8re3g
    @user-il8cu8re3g Před 26 dny

    या विषयांवर अनेक videos व podcasts पाहिले आहेत...परंतु हे podcast अविनाश सर सोबत सर्वोत्तम पैकी नक्कीच आहे...अत्यंत उपयोगी व अनुकरणीय चर्चा...खूप खूप धन्यवाद...

  • @sudhanshujoshi2482
    @sudhanshujoshi2482 Před 26 dny

    Sir is such a multi-faceted persona, we need multiple episodes on topics like administration, international relations, indian history etc etc etc

  • @vinayakhasabnis7085
    @vinayakhasabnis7085 Před 27 dny +11

    रघुनाथ माशेलकर, जयंत नारळीकर यांना बोलवा करियर मार्गदर्शन करण्याबाबत

  • @palashadeshmukh8986
    @palashadeshmukh8986 Před 27 dny

    Thank you so much for this lecture very useful

  • @vaishaligaikwad3700

    Thank you khup chan mahiti