नंदुरबार तालुक्यात आदिवासी टायगर सेनेतर्फे 30 जुलै ते 7 ऑगस्टआदिवासी अधिकार संवाद यात्रेचे आयोजन

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे आदिवासी टायगर सेनेतर्फे आदिवासी अधिकार संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले असून. संवाद यात्रा 30 जुलै ते 7 ऑगस्ट या दरम्यान संपूर्ण नंदुरबार तालुक्यातून काढण्यात येणार आहे, नंदुरबार तालुक्यातील विविध आदिवासींच्या समस्यांवर चर्चा करून त्यावर उपाययोजना करण्यात येणार आहे, यात्रेत चर्चेसाठी जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या आदिवासींची असताना देखील, राज्यघटनेतील 5 वी व 6 वी अनुसूचित अद्याप का लागू केले नाही, जिल्ह्यात 5 वी व 6 वी अनुसूचित लागू करण्यासाठी जनजागृती म्हणून ही यात्रा काढण्यात येत आहे, त्याचप्रमाणे अन्य विविध विषयांवर या आदिवासी अधिकार संवाद यात्रेच्या माध्यमातून जल, जंगल, जमीन या संदर्भात चर्चा करून त्यावर उपाययोजना करण्यात येणार आहे, या यात्रेचे आयोजन आदिवासी टायगर सेनेने केले असून, या यात्रेची सुरुवात 30 जुलै रोजी नवापूर तालुक्यातील बर्डीधाम येथून आदिवासींचे कुलदैवत असलेल्या याहामोगी मातेचे पूजन करून करण्यात आली आहे, या कार्यक्रमास अजय गावित, अरविंद वळवी, सचिन पावरा, रवींद्र पाडवी, भिकू वळवी, धनसिंग वळवी, किरण वळवी, हिनेश वळवी, शैलेश गावित, अंकित मावची, सुनील गावित, सागर वळवी, कृष्णा पाडवी, भरत मोरे, सुरेश वळवी, अजय वळवी, लाजरस गावित, मधुकर गावित, किसन वळवी, राजकुमार वळवी, राजेश गावित, मोहन वसावे, बालाजी वळवी, अविनाश गावीत, रवींद्र गावित तसेच ही यात्रा परिसरातील उंचीसेवडी, सोनखांब, जामनपाडा, मोरकरंजा, निमदडे, चितवी, देवळीपाडा, वागदी ठिकाणाहून जाणार आहे, या यात्रेला 30 जुलैरोजी सुरुवात झाली आहे, सकाळी सात वाजता बर्डीपाडा, उंचीशेवडी, सोनखांब, जामनपाडा, पानबारा, मोरकारंजा, चितवी, देवलीपाडा, वागदी पिपला, तर 31 जुलै रोजी खोलवीहीर, हनुमानपाडा, आमसरपाडा, खोलघर, वांजळे, केवडीपाडा, बंधारपाडा, सुतारपाडा, आष्टा, ठाणेपाडा, वाघाळे, अजेपूर, 1 ऑगस्ट रोजी टोकर तलाव, वीरचक, बंधारपाडा, खामगाव, ढेकवद, पाचोराबारी, फुलसरा, जांबोली, भवाली, वेळावद, घोड्यावद, लोय, धानोरा, कोठली, उमज यासह संपूर्ण नंदुरबार तालुक्यात, 30 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान ही यात्रा पोचणार आहे, व या यात्रेच्या समारोप 8 ऑगस्ट रोजी आदिवासी अधिकार संवाद यात्रेचे समोपन तसेच आदिवासी सांस्कृतिक रॅली नवापूर येथे काढण्यात येईल व विश्व आदिवासी अधिकार दिवस साजरा करण्यात येणार असल्याचे, आदिवासी टायगर सेनेतर्फे सांगण्यात आले आहे.

Komentáře • 1

  • @balvantvasave111
    @balvantvasave111 Před měsícem

    जल, जंगल, जमीन
    ❤ अजय दादा गावित ❤️
    आदिवासी टायगर सेना