महाराष्ट्रातील एक टॉपचा डेअरी फार्म 💯🔥😱 खर्च कमी नफा जास्त | Trisha Dairy Farm

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 01. 2024
  • Trisha Dairy Farm in Vidani Tal-Phaltan Dist-Satara
    अनिल अभंग
    त्रिशा डिअर फार्म (विडणी ता.फलटण,सातारा)
    97633 88767
    फलटण तालुक्यातील विडणी हे गाव दुधाची पंढरी म्हणून ओळखले जाते. आज विडणी गावात घरटी आपल्याला उत्तम गायी पाहावयास मिळतात. विडणी येथील अनिल अभंग हे उच्च शिक्षित डेअरी फार्मर आहेत.डेअरी फार्मिंगच्या आपल्या स्वतःच्या काही पद्धती त्यांनी तयार केल्या आहेत. त्रिशा डेअरी फार्म हा ब्रँड आता महाराष्ट्रभरात ओळखला जातो याचे कारण आहे अनिल अभंग यांचा अभ्यास आणि अनुभव.🐄🐄
    आज महाराष्ट्रातील डेअरी क्षेत्र बदलाच्या वाटेवर आहे. सरकार कडून दराची हमी नसली तरी शेतकरी स्वतः आधुनिक पद्धतीने फार्म सांभाळत चांगल्या गायी तयार करत आहेत. अनिल अभंग यांचा त्रिशा डेअरी फार्म अभंग कुटुंबीयांच्या कष्टातून तसेच अभ्यासातून उदयास आलेला असा हा फार्म आहे. आज २० गाई तसेच ७ कालवडी त्यांच्या फार्मवर आहेत. सकाळी ५ वाजता गाईंची सर्व कामे चालू होतात ते संध्याकाळी ७ पर्यंत हि कामे चालू असतात. अभंग कुटुंबीयांची अडीच एकर शेती आहे यामधील अर्धा एकर वर त्यांनी नेपियर गवत केले आहे तर बाकीचा संपूर्ण चारा हा विकतचा असतो. आपल्या फार्मवरील गायींना बाराही महिना मका पुरवण्याचे काम अनिल अभंग त्यांचे बंधू व वडील करत असतात. आपल्या फार्मचे व्यवस्थापन उत्तम राहिले पाहिजे यावर त्यांचा भर असतो.
    त्रिशा फार्म मध्ये प्रामुख्याने गोठ्याची स्वछता ,गायींना स्वछ पाणी, गायींचे आरोग्य,अतिरिक्त खर्चाची बचत,गायीचं रेकॉर्ड मेंटेन अशा पंचसुत्रीवर काम केले जाते.आज अनेक फार्म्स वर मिनरल मिक्स्चर चा वापर होत असताना अनिल अभंग यांनी आता पर्यंत कोणत्याही प्रकारचे मिनरल मिक्चर वापरले नाही आहे तसेच गायी साठी फक्त ते गोळी पेंडेचा वापर करतात. अनिल अभंग यांना याबाबत विचारले असता सांगतात, बाराही महिने मक्याची उपलब्धता करून दिले जाते तसेच क्वचित प्रसंगी मुरघास चा वापर केला जातो. फार्मवरील ९० टक्के गायी या एकाच सीमेन मध्ये गाभण राहतात असा त्यांचा आतापर्यंतचा अनुभव आहे तसेच गायी आजारी पडण्याचे प्रमाण सुद्धा खूप कमी आहे.आपण जर योग्य व्यवस्थापन ठेवले तर नक्कीच आपण एक लिटर दुधाचा खर्च हा वीस रुपये पर्यंत ठेवू शकतो असे ते सांगतात. फार्मवरील गायीला दिवसातून २ वेळेस उत्तम दर्जाचा पोटभरून चारा तसेच २५० ग्रॅम गोळी पेंड लिटर मागे दिली जाते.
    अनिल अभंग हे पुढे सांगतात कि त्यांच्या कडे असणाऱ्या गायी या दिवसाला २० लिटर पर्यंत दूध देणाऱ्या आहेत मात्र या दुधात असणारे सातत्य जास्त आहे यामुळे गायीचे दूध हे दिवसाला न मोजता एका वेतात किती आले असे ते मोजतात.डेअरी फार्मवरील रेकॉर्ड ठेवण्यासाठी त्यांनी अभ्यासातून नोंद वही तयार केली आहे. आज त्यांच्या नोंदवहीचा अनेक शेतकरी वापर करत आहेत. अनिल अभंग स्वतः इंजिनिअर असल्याने फार्म मध्ये अनेक नाविन्यपूर्ण गोष्टींचा अवलंब त्यांनी केला आहे.आज फार्मवरील प्रत्येक गायीच्या नोंदी त्यांच्याकडे आहेत याचा फायदा खूप होत आहे असे ते सांगतात.
    ऑक्टोबर मध्ये ३.५-८.५ दुधाला असणारा ३५ रुपये दर कमी होऊन ,मागच्या महिन्यात २८ रुपये वर आणला होता. आज घडीला १७५ लिटर रोजचे दूध संकलन फार्ममधून होत आहे.आज जरी सरकारने ५ रुपये अनुदान दिले असले तरी मागील काही महिने नऊ ते दहा रुपये नुकसान सर्व डेअरी फार्मसला सहन करावे लागत होते. अनिल अभंग म्हणतात कि दराचा हा खेळ असाच चालू राहणार यामुळे आपण उत्पादन खर्च कमीत कमी ठेवण्यावर प्रयत्न करावेत.
    अनिल अभंग
    त्रिशा डिअर फार्म (विडणी ता.फलटण,सातारा)
    97633 88767
    -अनिकेत घार्गे
    Indian Farmer Entrepreneurs
    👍 Don't forget to LIKE, SHARE, and SUBSCRIBE for more exciting explorations into the wonders of agriculture! 🌎
    🔔 Turn on the notification bell to stay updated on our latest videos!
    📣 Connect with us:
    Instagram: aniketgharge23
    Facebook: Indian Farmer Entrepreneurs
    🌟 Thank you for joining us on this Dairy farming adventure! 🌾
    #dairy #dairyfarm #dairyfarming #dairyfarminginindia
    #dairyfarmingbusiness #dairyfarminginpunjab #dairyfarmingmaharashtra
    #hfcow #cowvideos #cowfarm #cowfarmindia
    #ifevideos #indianfarmer #indianfarmers #indianfarmerlife
    #indianfarmerentrepreneurs #agriculture #farming #agribusiness #agribusinesschannel

Komentáře • 59

  • @ajayshejul7377
    @ajayshejul7377 Před 5 měsíci +7

    अत्यंत प्रामाणिक, स्वच्छ नितिमत्ता इमाने-इतबार आणि अभ्यासपूर्ण कष्ट आहे दादा तुझे ❤
    जो शेणात रमला... तो जगात रमला ❤

  • @user-on7ml1qw7q
    @user-on7ml1qw7q Před 22 dny +1

    सर तुमचा न्हिडीओ बघुन प्रेरणा मिळाली धन्यवाद

  • @dinkarshinde7702
    @dinkarshinde7702 Před 2 měsíci +2

    जे स्वतः इमानदारीने धंदा करतात शेतकऱ्याला फसवत नाहीत हे त्यांन्चे अनुभवाचे बोल आहेत खरंच तुमच्यासारखे दूध उत्पादक फार कमी आहेत ती योग्य माहिती सांगणारे धन्यवाद दादा

  • @amartaware4086
    @amartaware4086 Před 4 měsíci +1

    भरपूर व्हिडिओ पाहिले परंतु एवढा अभ्यासपूर्ण तसेच दूध व्यवसायाचे आर्थिक गणित समजावून सांगणारा पहिलाच व्हिडिओ.

  • @Kharat527
    @Kharat527 Před 6 měsíci +9

    भयानक अभ्यास आहे भाऊचा
    याला म्हणतात अनूभवाचे बोल

    • @engineer8415
      @engineer8415 Před 5 měsíci

      मग माणूस कोण आहे .. इंजिनिअर, चांगली नोकरी मिळाली नाही म्हणून काय झाल.भविष्यात तो नोकरी देणारा होईल.👌

    • @bhappy7220
      @bhappy7220 Před 2 měsíci

      ​@@engineer8415लय वंगाळ हाल होतात इंजिनियर तरुणांचे😢😢😢😢

  • @swapnilkadam5325
    @swapnilkadam5325 Před 6 měsíci +17

    दादा जोपर्यंत दुधाला चाळीस पन्नास रुपये भाव मिळत नाही तोपर्यंत दूध धंदा परवडणार नाहीत ....... एक लिटर दूध तयार करण्यासाठी कमीत कमी 25 रुपये खर्च येतो....... यूट्यूब चे व्हिडिओ बघून बरेच जण फसलेली आहे..... 26 -27 रुपये दराने धंदा परवडणार नाही .... या दरात खाद्य वाली ,डेरी वाले, डॉक्टर लोक श्रीमंत झाले.....

    • @anilabhang325
      @anilabhang325 Před 6 měsíci +3

      दादा 40 50 भाव मिळत नाही म्हणून काय धंद्याच सोडून द्यायचा काय. दादा फक्त तुम्ही तुमच्या 25 rs उत्पादन खर्च मधून आजारपणाच् खर्च वजा करून बघा.किती येतोय 100% अठरा, रुपये येईल. सगळ्यात महत्त्वाचे आजारपण आहे यातच आपला उत्पादन खर्च वाढतो

    • @pappushelke-wl1hn
      @pappushelke-wl1hn Před 6 měsíci +1

      18rs कसा येतो जरा कॅल्क्युलेशन करून सांगा एका गाईचे एका वर्षात गाईचे किती हजार लिटर दूध जाते

    • @samadhanbodke1539
      @samadhanbodke1539 Před 5 měsíci

      12000

    • @shaileshvasplkar1500
      @shaileshvasplkar1500 Před 5 měsíci

      गाई एक असेल तर काहीच पुरत नाही...पण कमीत कमी 4गाई पाहिजे सर्व गोष्टी पुरतात.....तुमचं दूध 30रू जाऊद्या....तरी परवडते...योग्य सोय घ्या..गाई ल काय खायला लागतेच काय 40किलो चारा

  • @SantoshGhanwat-jy4dy
    @SantoshGhanwat-jy4dy Před 5 měsíci +2

    १० varsha til pahilela saglyat bhari video❤

  • @navnathpatilmirge6929
    @navnathpatilmirge6929 Před 6 měsíci +2

    एक नंबर निवोजन ❤❤

  • @pramodchavan1713
    @pramodchavan1713 Před 6 měsíci +2

    राम कृष्ण हरी अप्रतिम माहिती

  • @samadhanjagdale694
    @samadhanjagdale694 Před 6 měsíci +1

    Khup chan sir

  • @shrikantwaghade8370
    @shrikantwaghade8370 Před 4 měsíci

    ❤❤

  • @shetkariraja6616
    @shetkariraja6616 Před 6 měsíci +1

    अतिशय सुंदर माहिती

  • @swapniltorawane8831
    @swapniltorawane8831 Před 6 měsíci +3

    दादा आमच्या घरी ११व्या वेतात थाटात उभी आहे

  • @janardhandighore6665
    @janardhandighore6665 Před měsícem

    दुधामुळे गाईच्या शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होते ते कॅल्शियमचे प्रमाण टिकून राहावं म्हणून पाण्याच्या टाकीला चुना लावला जातो

  • @rakeshmuknak1868
    @rakeshmuknak1868 Před 6 měsíci +1

    Dada att kalbadi ahet ka

  • @bailgadalover590
    @bailgadalover590 Před 6 měsíci +2

    पशुखाद्य किती द्यायचे आणि गाईंच्या आजाराविषयी थोडीशी माहिती द्या मुख्य मस्टायटीस उपचार कोणता करावा

  • @dubolshots6671
    @dubolshots6671 Před 6 měsíci +1

    सर उत्तम चारा manjhe konta chara sir

  • @yuvrajsorate8690
    @yuvrajsorate8690 Před 6 měsíci

    Dhudhache bill dakhava

  • @user-px6pi8vs2y
    @user-px6pi8vs2y Před 6 měsíci +2

    दादा माझा पण दुधाचा धंदा आहे पन्नास रुपये लिटर जेव्हा गाईचे दूध होईल तेव्हा धंदा सक्सेस होईल

    • @anilabhang325
      @anilabhang325 Před 6 měsíci

      दादा जोपर्यंत आपला पशुपालक दर दर करत बसणार आहे तोपर्यंत तो नेहमी तोट्यात असेल

    • @ganeshyewale6647
      @ganeshyewale6647 Před 2 měsíci

      Mg tumhi band Kara Ani ustodila ja

    • @navnathindalkar6528
      @navnathindalkar6528 Před 2 měsíci

      ​@@ganeshyewale6647😂😂

  • @saurabhdiwan5512
    @saurabhdiwan5512 Před 6 měsíci +1

    Editor la Manha music Kami karayla.

  • @kantaramchavare6149
    @kantaramchavare6149 Před 6 měsíci +15

    तुम्ही मिल्क चार्जेर वापरून पाहावे खूप भारी रिझल्ट येईल

    • @jaykisan4128
      @jaykisan4128 Před 6 měsíci

      बोगस आहे कुठेहि सुरु च करता तुम्हि

    • @nitindoke9546
      @nitindoke9546 Před 6 měsíci

      कुठे मिळेल

    • @Akashsawant2024
      @Akashsawant2024 Před 6 měsíci +2

      Rate khup ahet pn

    • @somnathgheji7669
      @somnathgheji7669 Před 6 měsíci +3

      रेट माहीत आहे का ३५० कीलो आहे दुध दरात घसरण आहे कस परवडणार

    • @user-lz6yz5en6q
      @user-lz6yz5en6q Před 6 měsíci +1

      मिल्क चार्जर महाग आहे

  • @rahulkapure4990
    @rahulkapure4990 Před 6 měsíci +1

    कालवड मिळेल का?

  • @swapnilgarde
    @swapnilgarde Před 5 měsíci

    Cargill Milkgen 10000

  • @user-qb2rw4xu9t
    @user-qb2rw4xu9t Před 6 měsíci

    चुना कसला आहे दादा

    • @IndianFarmerEntrepreneurs
      @IndianFarmerEntrepreneurs  Před 6 měsíci

      कॉल करा नंबर दिला आहे व्हिडीओ मध्ये

  • @hanumantlohkare76
    @hanumantlohkare76 Před 2 měsíci

    Camera kharab aahe kay

  • @prashantkutwal1582
    @prashantkutwal1582 Před 6 měsíci

    मिल्क चार्जर खुप भंगार आहे