माननीय आमदार श्री. शशिकांत शिंदे | पावसाळी अधिवेशन २०२४ | मुंबई

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 07. 2024
  • माननीय आमदार श्री. शशिकांत शिंदे | पावसाळी अधिवेशन २०२४ | मुंबई
    विधानपरिषदेच्या अतिरिक्त अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेत आमदार श्री. शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्यातील जनतेची सुखदुख पूर्ण होण्याची अपेक्षा असते. मार्काचा आणि पराभवाचा अभ्यास करून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आल्याचा शेरा शिंदे यांनी लगावला. या अर्थसंकल्पातील योजना जाहीर केल्या आहेत त्यामध्ये मागील वर्षांपासूनच्या योजनेला पैसे उपलब्ध झाले का किंवा जनतेला योजनांचा फायदा झाला का याचा अभ्यास करताना कर्ज काढून दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न या सरकारने केला असे ते म्हणाले.
    लाडकी बहीण योजनेला मिळणारा प्रतिसाद आला आहे त्यातून या योजनेसाठी जी तरतूद करण्यात आली आहे ती पूरक होईल का असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला. अवकाळी, दुष्काळी, शेतकरी योजना. सोलार योजना अशा अनेक गोष्टींवर बोलता येऊ शकते.
    सार्वजनिक बांधकाम विभागात भ्रष्टाचाराला कसे पाठिशी घातले जाते हे शिंदे यांनी सभागृहात मांडले. तीस हजार कोटीच्या अर्थसंकल्पात २४०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. बजेटची तरतूद ही भ्रष्टाचारासाठी केली का असा शंका त्यांनी व्यक्त केली. या विभागातील टेंडर प्रक्रियेत झालेला गैरव्यवहार शशिकांत शिंदे यांनी सभागृहाला अवगत करून दिला.
    पुढे त्यांनी आरोग्य व्यवस्थेच्या गैरव्यवहारावर प्रकाश टाकला. ग्रामीण किंवा सिव्हिल रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या महिलांचे सिजेरियन करून त्याचा अतिरिक्त दर हा डॉक्टरांना मिळतो. त्यामुळे हा सर्रास राज्याच्या तिजोरीवर दरोडा टाकण्याचा प्रकार आहे. असाच प्रकार औषध आणि इतर विभागात प्रत्येकठिकाणी मोनोपॉली ठरली आहे.
    त्यामुळे सरकारने कितीही जाहीराती केल्या तरी त्या जाहीरातीचा, अर्थसंकल्पाचा फायदा सर्वसामान्यांना होण्याऐवजी त्याचा लाभ वरिष्ठांपासून खालपर्यंतचे ठेकेदार घेत असतील तर राज्याचे कर्ज वाढत नेऊन हे सरकार केवळ कंत्राटदारांना चालवण्याचा प्रयत्न हे सरकार करतय असे बोलून शशिकांत शिंदे यांनी याचा निषेध व्यक्त केला.
    #MonsoonSession2024 #MonsoonSession #maharashtra #vidhansabha #NCPSP #SharadPawar #ShashikantShinde

Komentáře •