Raj Thackeray MNS BJP पाठिंब्याबद्दल लोक काय म्हणतात? | BBC News Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 04. 2024
  • #BBCMarathi
    राज ठाकरेंनी गुढीपाडव्याला सभा घेत नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर केला. महायुतीत राज ठाकरेंच्या प्रवेशाबद्दल आणि लोकसभा न लढवण्याबद्दल लोकांना काय वाटतं? बिनशर्त पाठिंब्याबाबत लोक खुश आहेत की नाराज? पाहा मुंबईकरांना काय वाटतं?
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Komentáře • 2,8K

  • @nileshgotarne5912
    @nileshgotarne5912 Před měsícem +500

    मी स्वतः शिवसैनिक आहे असून राज ठाकरेंचा चाहता होतो पण डब्बल दोलकी आत्ता झालीय त्या बद्दल विश्वास उडाला

    • @pradipbairagi8591
      @pradipbairagi8591 Před měsícem

      😂😂 जे 2-4% मत मिळत होते ना ते पण मिळणार नाही देणार नाही. . ..चुकून एक आर्ध आमदार नगरसेवक निवडून आला ना तरी तो 5 वर्ष सुधा मनसेत राज ठाकरे मागे थांबणार नहीं... टोटल यू टर्न मरतो माणूस... काहीच तत्व नाही.... काहीच विचार नाही... पाठी मागे येणार गर्दी करून भाषण ऐकनारे लोकांना गृहीत धरून चालतो... निव्वळ बाळा साहेब ठाकरे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे ह्याचं राजकारण जमेल तसे संपवायला पाठींबा दिला आहे... दुश्मन का दुश्मन मेरा दोस्त... बाकी देश देव धर्म संस्कृती मुंबई महाराष्ट्र बदल मोडी शाओ च भाजप मत काय हे मागील 10 वर्ष पासून ओरडुन ओरडुन जगाला सांगत आहे व्हिडिओ लावून... कागद पत्र दाखवून.... दहा वर्ष नौटंकी केली की आता फडणवीस म्हणतात त्या प्रमाणे सुपारी घेऊन कॉमेन्ट्री करत आहे... असे असले तर कश्याला जनता मत देईल... हेचं चव ओळखून घेतली आहे म्हणून च लोक मत देत नाहीं आणि बालासाहेब नी बरोबर बाहेर च रस्ता दाखवला होता... ते हेच मुख्य कारण असावे

    • @Smiling-Monk
      @Smiling-Monk Před měsícem

      दलालसेना 😂😒

    • @Sssssss550
      @Sssssss550 Před měsícem +2

      Barobar

    • @nileshgaonkar8100
      @nileshgaonkar8100 Před 10 dny +1

      परफेक्ट बोललात साहेब 👍

  • @anindian1225
    @anindian1225 Před měsícem +814

    मी एक मनसैनिक होतो,पण राज साहेबांचे काळचे भाषण ऐकून मी निराश झालो, आणि ह्या पुढे मी मनसे ला मतदान करणार नाही😢😢😢
    काल राज साहेब BJP पुढे हदबल झाल्या सारखे वाटले

    • @pmg8425
      @pmg8425 Před měsícem

      😂😂😂😂
      येडा आहेस तू.

    • @santoshnandikole1715
      @santoshnandikole1715 Před měsícem +17

      ह्या आधीच चं झाले भाई ते कल सर्वा समोर आले

    • @santoshnandikole1715
      @santoshnandikole1715 Před měsícem +18

      तुझा सारखा चं भ्रम निरास झालाय ह्या साहेबा मूळ आम्ही तर पूर्ण राजगड पर्यन्त जाऊन आलोय पण त्यांना आपल्या सारख्या सर्व सामान्य सैनिकां चं काय पडले नाय म्हणून त्याला वेळी जय जय कर केला अन हात जोडले अन उद्धव साहेबानं पाठींबा दिला

    • @shrutikanandode3336
      @shrutikanandode3336 Před měsícem +3

      Maz pn hech same mat aahe. Kal khup asha hoti tyanchyakadun

    • @sagarw4197
      @sagarw4197 Před měsícem

      तुझ्यापाठी ईडी लाऊन केजरी सारखे जेल मध्ये टाकायला सांगितले तर तू पण असाच वागशील. आणि शहा साहेबानी ३ सीटवर आमदारकीला पाठींबा द्यायचा शब्द दिलाय त्यात विजयच आहे

  • @balkrishnamane6313
    @balkrishnamane6313 Před měsícem +100

    मराठी माणसाचा मोठा विश्वासघात!!लोकांना मूर्ख समजणे दुसरं काय

    • @user-ui3rr5vq6f
      @user-ui3rr5vq6f Před 14 dny +1

      मराठी माणसाने काय दिलं सांगा जरा

  • @avijadhav1407
    @avijadhav1407 Před měsícem +82

    आम्ही सुद्धा मराठी आहोत, पण आम्हाला नाही विश्वास राज ठाकरेंवर 😂😂😂

  • @narayanangane7169
    @narayanangane7169 Před měsícem +1064

    महाराष्ट्रातील उद्योग, कार्यालये ज्यांनी गुजरात मध्ये नेले त्यांनाच पाठिंबा दिला. महाराष्ट्रातील बेरोजगारीचे काय .

    • @mddastagir3655
      @mddastagir3655 Před měsícem +12

      Bhau he tumhi agdi khara bol le pan aplya ithlya dalalana samjhta nahi na

    • @rakeshkondhalkar9224
      @rakeshkondhalkar9224 Před měsícem +2

      Je dhande gujrat madhe gele te ekda uddhav thakre Yana vichar

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 Před měsícem +4

      आणि गुजराती उद्योजका कडे. तमाम मराठी माणूस कामगार आहे.
      आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राला वीजपुरवठा करणारे सुध्दा गुजराती आहेत .म्हणून....

    • @mukunddalvi4019
      @mukunddalvi4019 Před měsícem +8

      जय महाराष्ट्र। त्यांना भावाचा वाढता आलेख पाहून गुदमरून जात आहे।

    • @sbm9510
      @sbm9510 Před měsícem

      दादा कोळसा​ महाराट्रातला आहे हो हे कधी कळणार तुम्हाला@@rajshinde7709

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 Před měsícem +1272

    आता यापुढे याचं इंजिन देखील गुजरातीच्या एनर्जीवर धावणार.😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 Před měsícem +23

      खर आहे आज महाराष्ट्र राज्य ला वीजपुरवठा करणारे सगळे गुजराती आहेत .😅

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 Před měsícem +1

      गुजराती आहेत म्हणून तुमच्या आई बहिणी त्यांच्या घरी भांडी घासून तरी पैसे कमावतात. अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ. मराठी लोकांनी आधी यूपी बिहारी लोकांशी स्पर्धा करावी मग गुजराती लोकांना शिव्या घालाव्या. गुजराती लोक व्यवसाय करून जर मुंबईत मालामाल बनत असतील तर मराठी लोकांच्या गांडीला मिरच्या झोंबू नयेत. शेवटी गुजराती आणि मराठी हे दोघेही मुंबईत उपरेच. मुंबईचे खरे मालक पारशी आहेत, हे लक्षात असू दे.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před měsícem +3

      अरे राज ठाकरे।
      तुमने सपोर्ट किया या नहीं किया .... भाजपा ४०० पार करनेवाली है ।
      हिंमत है तो हारनेवाले गांधी परिवार और कांग्रेस को समर्थन करें ।
      तेरा भाई उद्धवजी ठाकरे साहब को एक भी जगह जितना असंभव। उनका समर्थन करो । जितनेवाले का समर्थन कोई भी कर सकता है ।

    • @kishorraut9381
      @kishorraut9381 Před měsícem +2

      Ho😊

    • @swapnilsabale697
      @swapnilsabale697 Před měsícem +22

      ​@@VijayManjrekar-xs9fe sab anpadh nahi bjp ko vote dene ko

  • @Vivek_S_Jadhav
    @Vivek_S_Jadhav Před měsícem +24

    राज ठाकरे ने मस्त पलटी मारली आहे।
    ०% विश्वास आहे राज ठाकरे वर लोकांचा।

  • @maharastramaharashtra7218
    @maharastramaharashtra7218 Před měsícem +15

    राजसाहेब तू जनतेचा विश्वास गमवून बसली आहेस आज आपल्या भावाची पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची गरज होती त्यामुळे महाराष्ट्र जनता ओळखून चुकली आहे

  • @user-ev9rm5mj8m
    @user-ev9rm5mj8m Před měsícem +266

    साहेब माफ करा, आपल्यासाकडून ही अपेक्षा न्हवती 🙏🏼🙏🏼🙏🏼त्रिवार अखेरचा जय महाराष्ट्र,

    • @TusharASKanawade
      @TusharASKanawade Před měsícem +6

      लाचारी जिंदाबाद😒😒

    • @SM-sg3lv
      @SM-sg3lv Před měsícem +2

      Jai Maharashtra !
      Existence will be finished of Maharashtra.
      There will be GG

    • @Sssssss550
      @Sssssss550 Před měsícem +1

      Kharach raj kadun hi apeksha navhati😢

  • @nitingangnaik9097
    @nitingangnaik9097 Před měsícem +211

    288 पैकी केवळ 1 च आमदार निवडून आणणार्याला कशाला डोक्यावर चढवून ठेवता????

    • @ASGXYZ
      @ASGXYZ Před měsícem +15

      तो आमदार सुद्धा....
      मनसेच्या ताकदीने नाही तर....
      स्वतः च्या जिवावर निवडून आलेला आहे...🙆🤷

    • @TusharASKanawade
      @TusharASKanawade Před měsícem +3

      ​@@ASGXYZहो खरं आहे तुमचं😅😅😅

    • @sachinjadhav3013
      @sachinjadhav3013 Před měsícem +2

      Tehi balasaheban mule yacha kartutva Kay. ?

  • @suryakantghanvat3223
    @suryakantghanvat3223 Před měsícem +12

    लहरों के साथ तो कोई भी तैर लेता है; पर असली इंसान वो है जो लहरों को चीरकर आगे बढ़ता है, उद्धव ठाकरे आगे बढो 🙏🏻

  • @ketanmore7635
    @ketanmore7635 Před měsícem +18

    आम्ही मराठी माणसांचा विश्वास फक्त,उध्दव ठाकरे

  • @SandeepMahagavkar-eh8xt
    @SandeepMahagavkar-eh8xt Před měsícem +908

    विधानसभा पण कशाला लढवता, तेव्हा पण फडणवीसला मदत घोषित करा

    • @udaykalake9358
      @udaykalake9358 Před měsícem +24

      बरोबर बोललात

    • @kishorraut9381
      @kishorraut9381 Před měsícem +13

      थोडे दिवस थांबा हा पाठिंबा देणार 😅

    • @avinashhulawale1569
      @avinashhulawale1569 Před měsícem +9

      विधानसभे वेळी हेचं फडणवीस त्यां वेळी राजलां कांलचां व्हिडीओ दाखवुन म्हणतील आपण बिनशर्त पाठींबा दिला होता. तर मग आतां कां काही ही मागतं आहांत जसे ऊद्धव ठाकरें बाबत घडले होते.

    • @maheshkhot6530
      @maheshkhot6530 Před měsícem +10

      तुमच्या पेक्षा राजू शेट्टी बरा

    • @Sbs_1590
      @Sbs_1590 Před měsícem +1

      😂😂

  • @sabkaadhikar
    @sabkaadhikar Před měsícem +118

    राज ठाकरे यांनी आपली ताकद स्वता संपवली व कार्यकर्तेच्या विश्वास घात केला. जय महाराष्ट्र

  • @sunilshirodkar1175
    @sunilshirodkar1175 Před měsícem +12

    राज ठाकरे यांच्याकडून मुंबई साठी अपेक्षा होत्या़ पण फार मोठा अपेक्षाभंग झाला या पुढे त्यांनी कुठलीही भुमिका घेतली तरी जनता विश्वास ठेवणार नाही

  • @tricktry777
    @tricktry777 Před měsícem +21

    आता सामान्य मराठी माणसाला गुजरात्यांपुढे मुजरा करावा लागेल, धन्यवाद राज साहेब.

  • @sharadgaikwad3496
    @sharadgaikwad3496 Před měsícem +588

    आखिर मोदी पुढे घुटने टेकली!!! हाच मोदी विरोधी बोलणारा माणूस होता!!! Ed,ची आणि अमित शाह ची कृपा!!!!

    • @santoshnandikole1715
      @santoshnandikole1715 Před měsícem +12

      त्याच एक चं कारण ED कारण हे पण 8 तास जाऊन आले 😂😂😂😂😂😂😊

    • @vedant5607
      @vedant5607 Před měsícem +1

      2019 la tika Keli hoti...shevati...lokanni kiti sathi dili tyana...je Kam karat nahi tyana ch lok pan nivdun detat..kharyachi kimat nahi rahili ata

    • @vasimshaikh1321
      @vasimshaikh1321 Před měsícem +1

      💯

    • @Dnger111
      @Dnger111 Před měsícem +2

      ​@@vedant5607 mg chati thokun bolaych jatoy bjp valya sobt ata paksha vadhvaych ahe nko ti karan nahi det basaychi tarunachya rojgarasathi ani he ani te modila jr rojgar dyaych asta na tr 10 varshat dila asta ya veli jr evm ghotala asel trch bjp yeil karan jntechya manat rosh ahe janta tri nivdun nahi denar raj saheb bolo ki ajun koni

    • @marutisalunkhe7851
      @marutisalunkhe7851 Před měsícem +5

      हा माणुस इतक्या लवकर वितळणारा नाही. काही तरी गौडबंगाल झालेले आहे. पण एक झाले सामान्य माणसाच्या मनातुन उतरले.

  • @avinashshinde7536
    @avinashshinde7536 Před měsícem +1004

    राज ठाकरे वरती मराठी माणसांचा भरोसा नाही आहे

    • @kiranrathod5491
      @kiranrathod5491 Před měsícem +20

      एवढे वर्ष ज्या राजकारणी भ्रष्टाचार केला तरी ते निवडून येतात ....म्हणजे एवढं भ्रष्टाचार करून पण लोकांचा त्याचा वर भरोसा आहेच ना

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 Před měsícem +12

      खर पण ज्यांच्या वर भरोसा ठेवला त्यांनी काय केलमराठी माणूस 80% वरुण 18% आला नसता.😮

    • @kishorraut9381
      @kishorraut9381 Před měsícem +16

      राज ठाकरेंनी चुकीचा निर्णय घेतला 😅

    • @purushottammhatre6752
      @purushottammhatre6752 Před měsícem +4

      बरोबर

    • @user-cw4pi2lc6s
      @user-cw4pi2lc6s Před měsícem +10

      हो का मग मराठी मासणाला त्रास झालं तर राज साहेबांची आठवण का येती आणि तोच व्हेक्ती न्याय देऊ शकतो तुझा उध्दव संजय शरद आणि नाना हे कोण येत नाही

  • @rakeshsalunke7506
    @rakeshsalunke7506 Před měsícem +61

    या ठिकाणी पिंजरा मराठी चित्रपटाची आठवण झाली
    खूपच वाईट अवस्था झाली होती यात मास्तरची
    ज्या फडाला गावातून हाकलून द्यायचे होते शेवटी त्याच फडात तुणतुणं घेऊन उभे राहायची वेळ आली
    वाटले नव्हते अशी वेळ येईल म्हणून

    • @bspatil2109
      @bspatil2109 Před měsícem +4

      खरंच,ज्याना फडातून नागडं करायचं त्यानाच यानं लुगडं नेसवून मंगळसूत्र बांधलं.

    • @khushalpadhghane2035
      @khushalpadhghane2035 Před 20 dny +1

      बरोबर दाखला दिला

    • @anilpawar.218
      @anilpawar.218 Před 7 dny +1

      हिम्मत असेल तर आपले स्वतःचे भाऊ उदय बाळासाहेब ठाकरे यांना बिनशर्त पाठिंबा द्यावा जय भीम जय महाराष्ट्र

    • @pradipshete4782
      @pradipshete4782 Před 5 dny +1

      जबरदस्तचं प्रतिक्रिया दिल्या बद्दल तुम्हाला. धन्यवाद 🙏👍💐🚩💐

  • @mohanpatil4029
    @mohanpatil4029 Před měsícem +14

    मी पण कट्टर मन सैनिक होतो पण राज जो निर्णय घेतला तो चुकीचं घेतला आता आम्ही उद्धव ठाकरे यांना जाहीर पाठिंबा देनार जय महाराष्ट्र❤❤

  • @vinodghatwal9125
    @vinodghatwal9125 Před měsícem +104

    हा निर्णय राज साहेबाना महागात पडणार कारण मराठी माणसाचा विश्वासघात केलेला आहे.

  • @Jai-qo7vl
    @Jai-qo7vl Před měsícem +489

    आता त्यांची गुजरात नमोनिर्माण सेना झाली

    • @francispalande9162
      @francispalande9162 Před měsícem +8

      एकदम मस्त

    • @user-fl5ti6iw4z
      @user-fl5ti6iw4z Před měsícem +2

      एकदम बरोबर

    • @shelkebhagvat2025
      @shelkebhagvat2025 Před měsícem +2

      एकच नंबर नामकरण केले

    • @RK-yf1qg
      @RK-yf1qg Před měsícem +2

      सोनिया सेना प्रमुख ऊ बा ता 😂😂😂

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 Před měsícem

      @@shelkebhagvat2025 BJP sarka halkat nalayak madorchod paksh dusra milnar nahi

  • @sandeepnikam755
    @sandeepnikam755 Před měsícem +10

    आज समजलं की माननीय बाळासाहेब ठाकरेंनी माननीय उद्धवजी ठाकरे यांना शिवसेनेचे नेतृत्व का का दिलं
    आणि राज ठाकरेंना का नाही दिलं

  • @VishH-kn2yf
    @VishH-kn2yf Před měsícem +15

    राज ठाकरे ने उद्धव ठाकरेना पाठिम्बा दयायला पाहिजे होता, महाराष्ट्रला गरज आहे त्यांची

  • @atharvashinde134
    @atharvashinde134 Před měsícem +114

    जो भावाचा नाही झालं तो जनतेचा काय होणार आहे आम्ही आयुष्यभर कष्ट करून आमच्या गरजा पूर्ण होत नाही आणि हे राजकारणी लोक बसुन मज्जा मारता काम न करता पैसा येतो कुठून हे जनतेने विचारले पाहिजे

  • @jitendrasalunkhe3561
    @jitendrasalunkhe3561 Před měsícem +369

    आज राजसाहेब यांचा सभेचे भाषण ऐकून मला पिंजरा सिनेमातला मास्तर आठवला ( डॉ. श्रीराम लागू) त्या सिनेमात कसं पूर्वार्धात (२०१९ ला) मास्तर गावात तमाशा चा फड नको म्हणून जीवाचं रान करतो..
    आणि उत्तरार्धात (२०२४ ला) त्याच तमाशा चा फडा वर तुणतुणं वाजवत उभा राहतो...
    बस तसं झाले साहेबांचं..
    दया तर मंदसैनिकांची येते .. 2019 ला घसा फोडून ज्या थापाडे कुमार , चंपा, रंगा बिल्ला यांना शिव्या घालत फिरत होते हाच त्यांचाच प्रचार करायची वेळ तुमच्यावर आणले...
    कशी नशिबाने थट्टा आज मांडली. 😆😆😆

    • @user-iw2ks9uh6d
      @user-iw2ks9uh6d Před měsícem +6

      👌👌🥱

    • @prachikate7951
      @prachikate7951 Před měsícem +12

      Ek number comment❤😂

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 Před měsícem +5

      उद्धवमिया सत्तेत बसले होते मोदीसोबत तेव्हा आठवला नाही का भाऊ....😊

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 Před měsícem +9

      ​@@Manish_Chavan7 tode diwas tamb tuma Marathi lokana mumbai madun lath galun haklun lavnar gujrati marwadi lok nestya kapdyaneshi

    • @ajaymulgaonkar9024
      @ajaymulgaonkar9024 Před měsícem +1

      @@Manish_Chavan7 SETTLEMENT
      NAVNIRMAN SENA....
      2019 LA CONGRESS AANI NCP PARTY CHA PRACHAR KELA. AATA DON GADDAR AANI BOGUS JANATA PARTY CHA PRACHAR ..DAYA YETE TI KATTAR MAN SAINIKANCHI...

  • @brredekar8849
    @brredekar8849 Před měsícem +19

    ठाकरेंनी मराठी लोकांच्या भावना हसी खेळले. त्याना ठेचा.

  • @shridharghadi5867
    @shridharghadi5867 Před měsícem +13

    महाराष्ट्राची गुजरात नाही बनणार एवढीच अपेक्षा आणि महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला तकदीर नाही झाली पाहिजे एवढीच अपेक्षा जय महाराष्ट्र.

  • @vilas7545
    @vilas7545 Před měsícem +143

    राज साहेबांनी मुंबईकर व मराठी मांसाचा विश्वास गमावला दूरूनच आता राम राम

    • @pradipbairagi8591
      @pradipbairagi8591 Před měsícem

      😂😂 जे 2-4% मत मिळत होते ना ते पण मिळणार नाही देणार नाही. . ..चुकून एक आर्ध आमदार नगरसेवक निवडून आला ना तरी तो 5 वर्ष सुधा मनसेत राज ठाकरे मागे थांबणार नहीं... टोटल यू टर्न मरतो माणूस... काहीच तत्व नाही.... काहीच विचार नाही... पाठी मागे येणार गर्दी करून भाषण ऐकनारे लोकांना गृहीत धरून चालतो... निव्वळ बाळा साहेब ठाकरे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे ह्याचं राजकारण जमेल तसे संपवायला पाठींबा दिला आहे... दुश्मन का दुश्मन मेरा दोस्त... बाकी देश देव धर्म संस्कृती मुंबई महाराष्ट्र बदल मोडी शाओ च भाजप मत काय हे मागील 10 वर्ष पासून ओरडुन ओरडुन जगाला सांगत आहे व्हिडिओ लावून... कागद पत्र दाखवून.... दहा वर्ष नौटंकी केली की आता फडणवीस म्हणतात त्या प्रमाणे सुपारी घेऊन कॉमेन्ट्री करत आहे... असे असले तर कश्याला जनता मत देईल... हेचं चव ओळखून घेतली आहे म्हणून च लोक मत देत नाहीं आणि बालासाहेब नी बरोबर बाहेर च रस्ता दाखवला होता... ते हेच मुख्य कारण असावे

    • @kunalpokharankar2096
      @kunalpokharankar2096 Před měsícem

      Aree makda hattt, apli akkal lavtayt, tumhi tyala Kay dila ? Mc evdha Marathi Marathi tyane kela tu kelas vote tyala?

  • @sadananddhuri2968
    @sadananddhuri2968 Před měsícem +251

    राजने गद्दाराना मदत केली हे महाराष्ट्रातील जनता कधीही विसरणार नाही आणि माफ देखील करणार नाही

    • @ravidrapatil9391
      @ravidrapatil9391 Před měsícem

      Dance baar madhe nachun lagn केलेली bai desh chalnar ka , garibi harav manun 70 varsh satta Keli , aani Kay kel , gharkul sati garib jante la paise dyave lagta hote , aani aaj paha gawa gawat gharanchr kaam , free rashan , fakt ghoshn karne aani satta aali ki muslim skin chalvne he congress che kaam , pakistan , aani jati wad chya pude congress ne kadhi jau dile nahi , aaj Pakistan cha sadha vishay sudhha koni kart nahi , army che sir kapin gheun jayche ,Galla gallit bhiti hoti kute bomspot hoil bhiti aaj paha 10varshat wk dangal nahi aani kahi nahi , congrese aani baki free deu , he deu evdch rajkarn karu shatat tyanchya kade kasla mudda nahi , free deun paise yanchi aai jananar ka desh karja madhe jail mahagai vadel vel aahe smjun ghya

    • @ravidrapatil9391
      @ravidrapatil9391 Před měsícem

      Pappu che pn sportar aahet he aikun jag hast , karna tyachya peksha kami dimag Wale ch tyala sport deu shkta

    • @jyotipole5269
      @jyotipole5269 Před měsícem

      @@ravidrapatil9391अगदीबरोबर बोलता तुम्ही

    • @amolpawar8845
      @amolpawar8845 Před měsícem

      खरा गद्दार तर उध्दव ठाकरे आहे .त्यांनी स्वतःच्या वाडीलाच्य विचारांची गद्दारी केली

    • @truestindian5243
      @truestindian5243 Před měsícem

      👌👌👌👌👌

  • @dineshmahadik3350
    @dineshmahadik3350 Před měsícem +12

    पण आम्ही दुपारी उठणार नाहीं जय महाराष्ट्र उ बा ठाकरे

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 Před měsícem +26

    इंजिन घसरलं. भाजपने महाराष्ट्राची पूर्ण वाट लावली. मराठी माणसाचं फार मोठं नुकसान केलं आहे.

  • @darkknight4313
    @darkknight4313 Před měsícem +196

    दिल्लीचेही तख्त चाटितो..
    - मा. गुजराती हृदयसम्राट लाज टाकरे ( अध्यक्ष गुजरात नवनिर्माण सेना)

    • @pravinsable8730
      @pravinsable8730 Před měsícem +6

      मग काय काँग्रेस sbt जाऊन नमाज पटन करायला जायचं होत का

    • @anantyele8259
      @anantyele8259 Před měsícem +6

      ​@@pravinsable8730 काँग्रेस मधे सगळेच आहेत.. हिंदू, मुस्लिम शीख इसाई..

    • @Kbhft
      @Kbhft Před měsícem +5

      ​​@@pravinsable8730 bjp वाले जातीय दोष आणि धर्म दोष करायचे शिकवते.. जातीय आणि धर्म दोष केला म्हणजे खरं हिंदुत्व हे भाजप शिकवते.

    • @user-wt8uu6id2m
      @user-wt8uu6id2m Před měsícem +2

      Waahhhh Ekdam bhaari perfect gaane banavale waahh--hhh

    • @Sssssss550
      @Sssssss550 Před měsícem +3

      ​@@pravinsable8730re Kai faltu Hindu, muslim karta rav, jage vha. Satta Badal garjeche ahe

  • @babasahebpawar7690
    @babasahebpawar7690 Před měsícem +154

    काळजी करू नका कोणी राज साहेबांच्या मागे मतदार पाळणार नाही

  • @mathuradasmankarnik6450
    @mathuradasmankarnik6450 Před měsícem +6

    आता विधान सभे ला काय गजरे भेटतील लोक उभे केले असते दोन तीन तर निवडून आले असते.म्हणजे माणसे क्या कार्यकर्त्यांनी फक्त सतारांज्या उचलायचा व यांचे हुकूम पाळायचे,मी तर सोडला पक्षा,वसंत मोरे बरोबर होते.

  • @shridharpalodkar2544
    @shridharpalodkar2544 Před měsícem +3

    पुणे ,नासिक, मुंबई सोडून राज्यात कुठे फिरत नाही ,आणि म्हणतात एकदा महाराष्ट्र माझ्या हातात द्या .

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 Před měsícem +278

    भुमिका अशा घ्या की कार्यकर्ते मानसिक रुग्ण झाले पाहीजे 😂🤣🤣
    - राज ठाकरे

  • @user-km2he3qb2g
    @user-km2he3qb2g Před měsícem +361

    राज ठाकरे भाजपमध्ये गेले नसते तर आज तुंरगात दिसले असते.

    • @PavanRaut-ky8tn
      @PavanRaut-ky8tn Před měsícem

      सगळे चोर भाजपा मधे समाविष्ट करा आणि माझ्या देशाला विकून टाका

    • @sujatakale1733
      @sujatakale1733 Před měsícem +38

      मग तो एकटा संजय राऊत राजकारणी मर्द म्हणावे लागेल
      बिचारे मोडले (जेल 100 दिवस)पण वाकले नाहीत

    • @user-bl5ro1ng6c
      @user-bl5ro1ng6c Před měsícem +3

      1 ch no

    • @su-in6lt
      @su-in6lt Před měsícem

      ha m n se cha Raj thakare mhanje ek joker mhanun navala aalela nich marvadi gujrathya PM modi, Amit shaha la satte sathi bhik kashi magayachi ya Raj thakare kadun shikave Ed CBI enquiry kuthe lagell mhanun lachari patkarayala swata gela ase thasun jante samor bolnara thakre gharanyach nav ujjwal kanun dakhaval aaple sachhe maratha vishwasu karykarte gamaoun basala tyachya ya bhashnane tya pexha uddhav thakare bare ase bolun shekado m n se che karykarte naraj houn shivsene madhye pravesh kela aatta basa tya marvadi gujrathya chi chakari karat tumchya pexha uddhav thakare bare etki b j p chi kutri PM modi, Amit shaha evdhe bolatat tari zat kimant det nahi mhanun b j p chya PM modi, Amit shaha, dalindar fadn20s chi fatali aahe tyamule kutrya sarkhi bhukat sutale aahet.

    • @all_in_one7805
      @all_in_one7805 Před měsícem +2

      Mag bhrashtachar kami karaycha

  • @jyotithakur7706
    @jyotithakur7706 Před měsícem +5

    I am MNS. But yesterday's speech I heard, supporting Mad Of Developing India means MODI. I left MNS joining Our Shiv Sena Of Our Respected Balasaheb Thackeray.

  • @archanaakade2253
    @archanaakade2253 Před měsícem +6

    मुंबई मधील मतदारांची दिशा भूल होतेय , मतदार निष्टावंत राहिलित पन पक्ष दुभाजनी झाली आहे , महाराष्ट्र हे जगाच्या नकाश्यात राजकीय क्षेत्रात नावाजलेल राज्य होत आता परिस्थिति वेगली झाली आहे तरीही , तुम्हा अम्हा सर्वांचा मूलभूत हक्क आहे, मतदान तर केलेच पाहिजे all is well .

  • @pramodbagale4601
    @pramodbagale4601 Před měsícem +197

    राज ठाकरे साहेब तटस्थ राहणे योग्य होते.

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Před měsícem +297

    राज संपला 😅😅😅😅😅😅😅

  • @amolnetcore3231
    @amolnetcore3231 Před měsícem +3

    किती वेळा भूमिका बदलणार? लोकांना एवढे पण गृहीत धरू नका. २००९ ला आम्ही सर्व तुमच्या पाठी उभे होतो पण आज काय परिस्थिती आहे, जे लोकांना नको आहेत त्यांच्या पाठी तुम्ही उभे राहता? का?

  • @learningprogramming7921
    @learningprogramming7921 Před měsícem +4

    जे काही जनता बघू शकत नाही, ते बघू शकणारा खरा नेता असतो.
    पण, इथेतर जनता सगळं काही उघड्या डोळ्याने बघत आहे की, देशाची काय अवस्था करून ठेवली आहे मोदी ने, तरी आमच्या राज साहेबांना हे दिसत नसेल तर, मग नवलच वाटते!!!!
    किती ही लाचारी साहेब???

  • @anandaugale5904
    @anandaugale5904 Před měsícem +42

    मुंबई मधील मराठी माणसाने आता विचार करावा लागेल.
    हा तर मराठी माणसाचा विरोधक आहे.

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar Před měsícem +141

    राज ठाकरे आता रोज दुपारी उठुन बुलेट ट्रेन ने गुजरात ला ढोकळा खायला जाणार

  • @pravinramchandrajadhav5716
    @pravinramchandrajadhav5716 Před měsícem +4

    बहुजन विरोधी इतिहास मानणारे लोकांबद्दल काय विश्वास ठेवावा,

  • @jayavantpatil6653
    @jayavantpatil6653 Před měsícem +2

    खरं राजकारण कोणाला माहीतच नाही. जी व्यक्ती एक उमेदवार देऊ शकत नाही ते कसला पाठिंबा देणार

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 Před měsícem +69

    दिशाहीन मनसेच इंजिन गुजरात दिसेने चाललेल दिसतय

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 Před měsícem +128

    Ed पुढे लोटांगण.. सत्ता नको पण मत खाण्यासाठी हप्ता मिळाला की काम झाले...

  • @SM-sg3lv
    @SM-sg3lv Před měsícem +4

    We are confused. MNS
    I don't know what to talk.
    People are suffering so badly.

  • @shabbirshikalgar4675
    @shabbirshikalgar4675 Před měsícem +3

    I don't support any party but my respect to Balasaheb Thackeray for Maharashtra growth, jobs and farmers and Marathi PM of India must be there...Jai Maharashtra

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 Před měsícem +347

    आत्ता मुंबई गुजरात मध्ये विलिनीकरण झाल्या शिवाय राहत नाही.😊😊😊

    • @ganeshpatil6020
      @ganeshpatil6020 Před měsícem +6

      म्हणजे आत्ता पर्यंत राज ठाकरेंनी मुंबई वाचवली होती. मान्य केलात तुम्ही😂

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 Před měsícem

      ​@@ganeshpatil6020mi ek kattar Hindu wadi majya sarka hindu wadi Tula purya bramandat milnar nahi tari sudha mi sangto BJP sarka halkat nalayak madorchod paksh dusra milnar nahi

    • @sangannagujare4075
      @sangannagujare4075 Před měsícem

      कोण चुतीया असला भरलाय रे तुमच्या डोक्यात मुंबई वेगळी

    • @BabluMumbaiWala
      @BabluMumbaiWala Před měsícem

      😂 मुंबईत राहणारे नक्की करतील कुठे जायचं ते...😂

    • @anindian1225
      @anindian1225 Před měsícem +1

      फक्त मुंबई चे बिझनेस 😥😥

  • @pandurangbhumanwad7913
    @pandurangbhumanwad7913 Před měsícem +132

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

    • @pradipbairagi8591
      @pradipbairagi8591 Před měsícem

      😂😂 जे 2-4% मत मिळत होते ना ते पण मिळणार नाही देणार नाही. . ..चुकून एक आर्ध आमदार नगरसेवक निवडून आला ना तरी तो 5 वर्ष सुधा मनसेत राज ठाकरे मागे थांबणार नहीं... टोटल यू टर्न मरतो माणूस... काहीच तत्व नाही.... काहीच विचार नाही... पाठी मागे येणार गर्दी करून भाषण ऐकनारे लोकांना गृहीत धरून चालतो... निव्वळ बाळा साहेब ठाकरे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे ह्याचं राजकारण जमेल तसे संपवायला पाठींबा दिला आहे... दुश्मन का दुश्मन मेरा दोस्त... बाकी देश देव धर्म संस्कृती मुंबई महाराष्ट्र बदल मोडी शाओ च भाजप मत काय हे मागील 10 वर्ष पासून ओरडुन ओरडुन जगाला सांगत आहे व्हिडिओ लावून... कागद पत्र दाखवून.... दहा वर्ष नौटंकी केली की आता फडणवीस म्हणतात त्या प्रमाणे सुपारी घेऊन कॉमेन्ट्री करत आहे... असे असले तर कश्याला जनता मत देईल... हेचं चव ओळखून घेतली आहे म्हणून च लोक मत देत नाहीं आणि बालासाहेब नी बरोबर बाहेर च रस्ता दाखवला होता... ते हेच मुख्य कारण असावे

  • @Sonu11143
    @Sonu11143 Před měsícem +3

    जो मुश्किल वक्त में अपने भाई का ना हुवा वो लोगो का क्या होंगा.अपने काले कारनामो को छुपाने के लिए बीजेपी में गया है.
    जय हिन्द जय भारत
    भारत माता की जय.

  • @prashantshirsat1723
    @prashantshirsat1723 Před měsícem +4

    Supaari👑

  • @pramodtambe4600
    @pramodtambe4600 Před měsícem +84

    ज्या पक्षाने नाव पैसा दिला त्या पक्षाला फोडणार्या नीच लोकाना पाठींबा देण्याचा अधमपणा की कृतघ्नपणा?

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Před měsícem +275

    फक्त उध्दव जी ठाकरे सरकार ❤❤❤❤

    • @rohidasbherje841
      @rohidasbherje841 Před měsícem +3

      ऊदवजि नाहि बै मोदि

    • @pravinb7080
      @pravinb7080 Před měsícem

      म्हणून बालासाहेब ठाकरे यांचे पुत्र सोनिया गांदीची चाटत आहे...

    • @narendrapanhalkar551
      @narendrapanhalkar551 Před měsícem +10

      फक्त उद्धव साहेब ❤

    • @sejalkaswankar2598
      @sejalkaswankar2598 Před měsícem

      फक्त्त उद्धव ठाकरे

  • @vijaynetawate4686
    @vijaynetawate4686 Před měsícem +2

    तारीख पे तारीख , तारीख पे तारीख.
    साहेब न्यायधिशांची भुमिका करत आहे...
    सद्या उलट तपासणी चालू आहे..
    असे वाटते.

  • @laxury_cars
    @laxury_cars Před měsícem +2

    खोके भेटले वाटतं.
    सेवटचा जय महाराष्ट्र

  • @pandurangahirarao4867
    @pandurangahirarao4867 Před měsícem +82

    मराठी माणसाच्या विरोधी आहे राज राज नाही तो महाराष्ट्राला खाज आहे जय महाराष्ट्र

  • @bhushangawde1409
    @bhushangawde1409 Před měsícem +62

    मराठी माणसाला विश्वास आहे 1 आमदार पण नाही येणार😂

  • @shahnazshaikh6533
    @shahnazshaikh6533 Před měsícem +2

    Its very sad n unfortuanate that mr raj is not supporting mr uddahv

  • @bharatidsouza789
    @bharatidsouza789 Před měsícem +3

    Raj Thackeray supporting Gujarat .... after all those projects shifted to Gujarat from Maharashtra .... Not even once opposed BJP on it ... that employment opportunities of Maharashtra youths have been deprived ..... something to introspect on

  • @user-ne7ns3li9f
    @user-ne7ns3li9f Před měsícem +51

    नमो महानिर्माण सेवा, साहेब तुम्ही बदललात, स्वार्थी माणूस झालात,

  • @T-Series_theatre
    @T-Series_theatre Před měsícem +171

    🚩🚩निःस्वार्थी नव्हे अमित शाह कडून ED ची धमकी वजा इशारा दिला मग काय महारष्ट्र च इंजन गुजरात कडे पलाल ....

  • @pacificelectronic519
    @pacificelectronic519 Před měsícem +2

    Jo bhai ka nahi hua wo janta ka kya hoga ❤❤❤

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 Před měsícem +1

    निदान मागच्या सभेत समोरच्या जनतेचा विचार्तरी घ्यायला हवा होता,परवानगी दूरच😢😢

  • @sagarkotkar8214
    @sagarkotkar8214 Před měsícem +82

    किती पन केला भाऊ, भाऊ असतो,
    साहेब, माझ्या घरात काय मित्र मण्डली ला सांगत होतो, राज साहेब,
    उद्धव ठाकरे ना पठिंबा देतील,
    तुमच भाषण आइकुन मन दुख ल
    उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे
    यांची महाराष्ट्र ला खुप गरज होती,
    राज साहेब हा तुमचा निर्णय नाही पटला
    एक सामान्य मतदान कर्ता
    🙏🏻🙏🏻🙏🏻😔🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @Sankutv-fs3vj
      @Sankutv-fs3vj Před měsícem

      उद्धव ने का नाही बोलवलं मग😂😂😂

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni Před 15 dny

      UT nitch manus y

  • @patilsonline8108
    @patilsonline8108 Před měsícem +99

    ही अवस्था म्हणजे... येऊ नकोस म्हंटल कि कोणत्या गाडीत बसू....😂😂😂😂

  • @DattaDhende-in4cn
    @DattaDhende-in4cn Před měsícem +2

    Will the engine be taken to Gujarat then?

  • @dattupatil3280
    @dattupatil3280 Před měsícem

    मुंबई ची व सर्व महाराष्ट्र ची जनता खूप हुशार आहे सर्व राजकारण समजून घेते आजकाल

  • @samirsamant3876
    @samirsamant3876 Před měsícem +138

    मराठी माणुस काय समजायचे ते समजला आता होऊन जाऊदे ईलेकशन मग बघा ☝🇮🇳

  • @mdsl606
    @mdsl606 Před měsícem +173

    मराठी बांधवांनो आणि मुस्लिम बांधवांनी प्लीज एक हुआ आणि उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरेंना भरपूर मताने विजय करा .
    जय महाराष्ट्र

  • @mohasinmujawar8668
    @mohasinmujawar8668 Před měsícem

    जनतेचं हित लक्षात घेऊन साहेब आपली भूमिका एकच ठेवा....

  • @sopanadhav4762
    @sopanadhav4762 Před měsícem +129

    राज ठाकरेंनी चुकीची भूमिका घेतली .
    महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायला हवा होता किंवा तटस्थ राहायला हवे होते .
    महाराष्ट्रातील जनता राज ठाकरेंना माफ करणार नाही .

    • @Macdemello
      @Macdemello Před měsícem

      Mahavikas manje musalman lokana pathimba dyaycha . Ek convert zala uddhavdin zala dusaryane pan convert karav asa watat ka tula mulla katbulla

    • @vivekchikankar9310
      @vivekchikankar9310 Před měsícem +1

      Tatstha ...rahu Mat khane yala ky arth ahe

    • @jyotipole5269
      @jyotipole5269 Před měsícem

      राज ठाकरेंचा निर्णय एकदम योग्य आहे. आपला मराठी माणुस काहीही योगदान देत नाही धंधा करण्यात आणि करणार्यावर टिका करतात

    • @user-fy2qk8jv6v
      @user-fy2qk8jv6v Před měsícem

      अहो

  • @ranjananarawade8116
    @ranjananarawade8116 Před měsícem +75

    भाजपा आणिन राज यांची भिती साप साप दिसुन आली..........राज शेवटचा पत्ता तोही फाॅल्प 😂😂

  • @Janhitartha
    @Janhitartha Před měsícem +3

    राज ठाकरेंनी निर्णय खूप उशिरा घेतला ....हीच भूमिका त्यांनी ७/८ महिने आधीच घ्यायला पाहिजे होती जेणे करून लोकांना ती भुमिका पटवता आलो असती किंवा जानेवारी २२ तारीख ला तरी केली असतं की राम मंदिर ज्यांनी बनवलं त्यांना आमचं बिन शर्त पाठिंबा तरी लोक खुश झाली असती आणि भुमिका पचली असती.....पण आता पुढील ६ महिने हेच पटवूनदेण्यात जातील तो वर विधान सभा लागेल पुन्हा तीच लफडी सुरू होतील ......असो पण सुरवात केली हे चांगलं.....😅
    जनहितार्थ...😅

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 Před měsícem +79

    राज संपला

  • @ajitdhokare8677
    @ajitdhokare8677 Před měsícem +54

    स्वतःच भलं करून घेणाऱ्या नेत्याकडून कोणती अपेक्षा ठेवणार

  • @sandeepjadhav3983
    @sandeepjadhav3983 Před měsícem +1

    अरे जो भावाचा झाला नाही तो सर्व सामान्य जनतेचा काय होणार?

  • @manikavhad3109
    @manikavhad3109 Před měsícem +1

    सक्का भाऊ पक्का वैरी

  • @ashokathawale1801
    @ashokathawale1801 Před měsícem +27

    महाराष्ट्रातील उद्योग, कार्यालये ज्यांनी गुजरात मध्ये नेले त्यांनाच पाठिंबा दिला.

  • @VijaykumarDharav
    @VijaykumarDharav Před měsícem +25

    ED आली पळा पळा आणि😅 वाशिंग मशीन मध्ये जाऊन लपा

  • @KeshavNaik-on5cy
    @KeshavNaik-on5cy Před měsícem

    अगदी बरोबर

  • @mokshkumar3938
    @mokshkumar3938 Před měsícem

    कोटि कोटि प्रणाम

  • @AAS-gl2uq
    @AAS-gl2uq Před měsícem +39

    राज साहेब🤦🤦🏾
    अहो .. राममंदिर भेटीला जायच्या वेळी bjp ने जो प्रकार केला तो तुम्ही तुमच्या राजकारणात विसरला असाल ..पण आम्ही मराठी माणूस म्हणून कस विसरू शकतो? नाही विसरू शकत!
    एक मराठी म्हणून त्या गोष्टीची आम्हाला अजूनही बीजेपीची खूप चीड आहे..

    • @pradipbairagi8591
      @pradipbairagi8591 Před měsícem

      😂😂 जे 2-4% मत मिळत होते ना ते पण मिळणार नाही देणार नाही. . ..चुकून एक आर्ध आमदार नगरसेवक निवडून आला ना तरी तो 5 वर्ष सुधा मनसेत राज ठाकरे मागे थांबणार नहीं... टोटल यू टर्न मरतो माणूस... काहीच तत्व नाही.... काहीच विचार नाही... पाठी मागे येणार गर्दी करून भाषण ऐकनारे लोकांना गृहीत धरून चालतो... निव्वळ बाळा साहेब ठाकरे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे ह्याचं राजकारण जमेल तसे संपवायला पाठींबा दिला आहे... दुश्मन का दुश्मन मेरा दोस्त... बाकी देश देव धर्म संस्कृती मुंबई महाराष्ट्र बदल मोडी शाओ च भाजप मत काय हे मागील 10 वर्ष पासून ओरडुन ओरडुन जगाला सांगत आहे व्हिडिओ लावून... कागद पत्र दाखवून.... दहा वर्ष नौटंकी केली की आता फडणवीस म्हणतात त्या प्रमाणे सुपारी घेऊन कॉमेन्ट्री करत आहे... असे असले तर कश्याला जनता मत देईल... हेचं चव ओळखून घेतली आहे म्हणून च लोक मत देत नाहीं आणि बालासाहेब नी बरोबर बाहेर च रस्ता दाखवला होता... ते हेच मुख्य कारण असावे

  • @pawarrajesh9199
    @pawarrajesh9199 Před měsícem +32

    राज साहेबांचे इंजिन 🚅 bullet train पेक्षा ही Speed ने गुजरात च्या दिशेने.😊

  • @saritarane4041
    @saritarane4041 Před měsícem

    राज साहेब तुम्हाला लोकसभेला उमेदवार उभे करायचे नव्हते तर कोणाला पाठिंबा देऊ नका. कारण आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे. आपण बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे मराठी जनतेसाठी चांगले काम करत आहे. सत्तेत नसतानाही आपण लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यामुळे तुम्ही कोणालाच पाठिंबा देऊ नका. लोकांना कोणाला मते द्यायची ते देतील. असे ही नाही की तुम्ही पाठिंबा दिला म्हणून लोक त्यांनाच मते देतील लोकांना ज्यांना मते द्यायची त्यांनाच लोक देणार. आज जी महागाई वाढली आहे. गॅस सिलेंडर, अशांसारख्या इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले ते तरी कमी करण्यासाठी सांगा लोकांना तेवढेच समाधान.

  • @purnimawagh4186
    @purnimawagh4186 Před měsícem

    बरोबर आहे काय गरज होती भावाला भाऊ होत नाही ते जनतेचे काय होणार गेले त्यांनी परत येऊ नका

  • @marutiwehale
    @marutiwehale Před měsícem +22

    राज ठाकरे यांच्या सभेला पब्लिक फक्त विनोद ऐकण्यासाठी येते.पण‌ मतं देत नाही

  • @NRR344
    @NRR344 Před měsícem +11

    आज खरे जाले की हा नेता सुपरीबाज माणूस आहे,,,,, याला काहीही किंमत नाही

  • @pradeepsuryawanshi3393
    @pradeepsuryawanshi3393 Před měsícem +1

    😮 टोलनाका प्रश्न असे अनेक प्रश्न सुपारी घेऊन दिल्लीला जाऊन खाली मान घालुन आलेला कोहीनुर सुंता......

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 Před měsícem +2

    बीबीसी लिहून ठेवा महाआघाडीची एक सीट मुंबई त येत नाही 😆😠😬

  • @shailendra6888
    @shailendra6888 Před měsícem +92

    या ठाकरेंचा लोकांना अक्षरशः उबग आला आहे. हे स्वतः AC घरात राहतात, Luxury AC गाडीत फिरत असतात. लोकांच्या प्रश्नांकडे काडीचही लक्ष नाही.

    • @rajratnakshirsagar7251
      @rajratnakshirsagar7251 Před měsícem +2

      😂😂

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 Před měsícem +2

      Raj thakre ch mhan. Uddhav ji pramanik aahet

    • @pradeepambhore572
      @pradeepambhore572 Před měsícem

      आता तरी सुधरा मराठी माणसानो हे फक्त स्वतःच फायड्या साठी मराठी मराठी करतात. काल पर्यंत मोदी ला विरोध करत होते आणि आज त्यांनाच जागा माघायला दिल्ली ला गेले आणि शाह नि त्याना जागा दिली नाही तरी पण त्यांच्या सपोटला उभे आहे वा माझ्या मराठी माणसा.. आता नाही दिसत का राज thakryana कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझां..

    • @dattatrayyadav4001
      @dattatrayyadav4001 Před měsícem +1

      Modi. Sha. Chi. 00Kr

    • @Kbhft
      @Kbhft Před měsícem +1

      मोदी नी फिरायला आतापर्यंत 20 हजार कोटी खरंच केलाय 8 हजार कोटी च तर विमान आहे. अमेरिका मधून बनवलेले.

  • @manishsorate5522
    @manishsorate5522 Před měsícem +35

    माझ्या मते राजसाहेबांनी स्वतंत्रपणेच लढायला पाहिजे. यावेळी स्वतंत्रपणे लढायला त्यांना चांगली संधी होती. स्वतः चे अस्तित्व कायम ठेवायला पाहिजे होते..........

  • @mahendrachawan5047
    @mahendrachawan5047 Před měsícem

    आता या निर्णया नंतर मी राजकारणाला नदीत सोडले आणि व्यवसाय धंदा याकडे लक्ष केंद्रित केले आहे. बाकी राजकारण चुलीत घातल

  • @ConfusedBaseballStadium-bz5xh

    आज पर्यंत काय दिलं तुम्ही साहेबांना की त्याच्या बदले तुम्ही अपेक्षा ठेवता का साहेबांना निवडून आणलं होतं थोडा विचार करा आधी.. जय महाराष्ट्र..🙏🙏

  • @puneshdeshmukh7625
    @puneshdeshmukh7625 Před měsícem +30

    राज ठाकरे हे ऐक महान द्विधा मनस्थितीत तील नेतृत्व आहेत

  • @rajveerraajput8306
    @rajveerraajput8306 Před měsícem +12

    साहेब , फक्त बोलतात करत कीहीच नाही हे आज सिध्द झालं आहे , बंद दरवाज्याच्या आत काय देवाण घेवाण झाली काय माहीत की लगेच विरोध संपतो , यांच्या अशा वागण्या मुळे जो कार्यकरता आहे तो कधी खाजदार अथवा आमदार बनणार नाही ते फक्त कार्यकरताच राहील तो मोठा कधी होणार ?