Sharad Tandale | उद्योजक होण्याचा यशस्वी मार्ग - शरद तांदळे | Successful Businessman |

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 11. 2020
  • वंजारवाडी (जिल्हा बीड) ते लंडन व्हाया पुणे हा प्रवास आहे शरद उत्तमराव तांदळे या तरुण उद्योजकाचा आणि अर्थातच, हा प्रवास आहे एका यशोकथेचा. वंजारवाडी या छोट्याशा गावातून सुरुवात करून, पुण्यासारख्या ठिकाणी येऊन धडपडत, कष्ट करत, अडचणींना सामोरे जात उद्योजक बनलेल्या शरद तांदळे यांच्या यशावर मोहोर उमटली ती इंग्लंडचे युवराज प्रिन्स चार्ल्स यांच्याकडून. त्यांच्या हस्ते शरद यांना लंडनमध्ये तरुण उद्योजकतेचा पुरस्कार मिळाला. पुरस्कार मिळाला तेव्हा ते छत्तीस वर्षांचे होते आणि साल होते 2016. शरद यांच्या उद्योजकतेच्या प्रवासातील तो उत्कंठावर्धक क्षण.
    शरद यांचे वडील उत्तमराव तांदळे यांनी वंजारवाडी सोडून बीड शहर गाठले. ते माध्यमिक शाळेत शिक्षक होते. शरद यांचे बीडच्या ‘सावरकर विद्यालया’त व ‘बलभीम कॉलेज’मध्ये बारावीपर्यंत शिक्षण झाले. नंतर त्यांनी मेकॅनिकल इंजिनीयरिंगसाठी मोठा वाव असल्याच्या ऐकीव माहितीवर औरंगाबाद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांना लहानपणापासून वेगळे काही करण्याची इच्छा असे. त्यांनी तरुणांनी उद्योजक व्हावे, दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील तरुणांना छोट्या छोट्या उद्योगांची माहिती व्हावी यासाठी ‘विजयी युवक’ नावाचे मासिक कॉलेजात सुरू केले. मासिकामध्ये स्वयंरोजगारांची माहिती दिली जात असल्याने त्याला काही प्रमाणात यश मिळाले. परंतु मासिक आर्थिक अडचणीत सापडल्याने बंद झाले. शरद विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवून त्यांना मदत करत. ते विद्यार्थ्यांमध्ये ‘शरदभाऊ’ या नावाने ओळखले जात. शरद यांना त्यांची ‘भाऊगिरी’ वाढत गेल्याने इंजिनीयरिंगच्या शेवटच्या वर्षी एका पेपरमध्ये अपयश आले, पण त्यांनी जिद्दीने इंजिनीयरिंग पूर्ण केले.
    शरद यांची दखल राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. त्यांना लंडनचा पुरस्कार त्यानंतर मिळाला. त्यांना प्रिन्स चार्ल्स यांच्या हस्ते ‘वायबीआय यंग आंत्रप्रेन्यूअर ऑफ दि इयर, 2013’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तो समारंभ त्यांच्या लक्षात आयुष्यभर राहणार आहे. ते दृश्यच तसे होते. ते चमचमत्या सोन्याचा मुलामा असलेले भव्यदिव्य छत, जगावर राज्य केल्याची साक्ष सांगणाऱ्या ऐटदार भिंती, उमरावी बाज असणारा पायाखालील लाल गालिचा अशा लंडनच्या सभागृहात समारंभ झाल्याचे ओढीने सांगतात. शरद यांना महत्त्वाच्या संस्थांमध्ये मार्गदर्शनासाठी भारतभर बोलावण्यात येते. त्यांनी तीसहून अधिक जणांना उद्योजक बनवले आहे. ते त्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या कामगारांना आणि संघर्षात मदत केलेल्या सर्वांना देतात. ते उद्योजकता विकसित करण्याचे कार्य अव्याहतपणे पुढे सुरू राहणार याची ग्वाही देतात.
    Visit us -
    PUNE - Sagar Arcade, 3rd floor, Goodluck chowk, FC Road, Pune
    goo.gl/maps/nDftGaytrwUmTNgi6
    Nashik - 2nd Floor , Updahya Classes , Ashokstambh , Vakilwadi , Nahik.
    Aurangabad - Winners Academy, NBCC-C Type Bldg. Near Savarkar Statue Samrath Nagar Aurangabad
    --------------------------------------
    Follow us -
    Visit us www.infinitycivilacademy.com
    Follow us Telegram link t.me/infinitympsccivil
    t.me/infinitycurrentevents
    Facebook pg/Infinitycivilacademy
    Instagram - / infinitycivilacademy
    --------------------------------------
    About us -
    Infinity Academy is No. 1 institute for MPSC Civil Exam [MES] in Maharashtra and we have earned this position through years of hard work and producing successful batches of students.
    Infinity is known for making available the best and unique resources, such as brilliant and expert teaching faculty, comprehensive study materials for MPSC Civil Exam [MES], online study materials, and expert guidance time to time with the years of experience and knowledge on what students need, where the lack while preparing for MPSC CIVIL EXAM [MES], and where they should put their efforts, Infinity has gained the top position among MPSC CIVIL EXAM [MES] and other engineering exams classes in Maharashtra. Infinity academy achieved the highest number of selections in MPSC CIVIL EXAM [MES] in Maharashtra.
    successful
    business
    success story
    business success story
    business success
    josh talks
    josh talk
    josh talks marathi
    small business
    rags to riches
    businessman
    successful business
    marathi business
    entrepreneur
    business tips
    business ideas
    motivational videos
    maharashtra
    start a business
    motivational speech
    inspiration
    struggle to success
    best motivational video
    marathi news
    best business ideas
    business 2020
    marathi 2020
    maharashtra business
    startup ideas
    Sharad Tandale | उद्योजक होण्याचा यशस्वी मार्ग - शरद तांदळे | Successful Businessman |

Komentáře • 41

  • @adeshgole5105
    @adeshgole5105 Před 3 lety +6

    Sharad sir is always my inspection

  • @bhushanbhairannavar4059
    @bhushanbhairannavar4059 Před 3 lety +6

    What a dynamic personality !

  • @drbhagvanmutthe1074
    @drbhagvanmutthe1074 Před 3 lety

    खूप छान सर माझे वय २६ वर्ष आहे आणि मी आता आयुर्वेदिक पंचकर्म चालवतो तुमच्या या सावधा मुळे माझ्यात आतून आग पेटून उठली आहे मी ऐक मराठी आहे औरंगाबाद उन आणि सातारा dist मधे पंचकर्म चालवतो धन्यवाद

  • @vasantikale1999
    @vasantikale1999 Před 3 lety

    मुलाखत छान घेतली आहे, मार्गदर्शन चांगले लाभले

  • @EWorldHub
    @EWorldHub Před 3 lety +2

    *Being Entrepreneur* 😎🔥🔥🔥

  • @yogeshkokate8624
    @yogeshkokate8624 Před 3 lety +1

    Superb sirji...

  • @LokshaktiTV1
    @LokshaktiTV1 Před 3 lety +1

    सर आपण नवीन मत्रं दिला... खूप मस्त

  • @abhijeet_7860
    @abhijeet_7860 Před 3 lety +2

    My idol Mr sharad ji tandale Sir 👍👍👍❤❤❤

  • @manishkharodemanya1619
    @manishkharodemanya1619 Před 3 lety +1

    Khup chan sir

  • @sonalinanavare-pawar5724

    सर धन्यवाद

  • @bhushanchincholkar7413
    @bhushanchincholkar7413 Před 3 lety +1

    खुप भारी सर

  • @ExaM_StudY_Engineering
    @ExaM_StudY_Engineering Před 3 lety +1

    NICE...INSPIRING

  • @123RAMAD
    @123RAMAD Před 8 měsíci

    Motivational

  • @rajshrinawale6558
    @rajshrinawale6558 Před 3 lety +1

    Mast

  • @Smart_business_man
    @Smart_business_man Před 3 lety

    Great

  • @nivruttimvlog8140
    @nivruttimvlog8140 Před 2 lety

    Nice video

  • @delcroninfrastructurepvt.l753

    खूप छान माहिती....👍👍

  • @ravdineta1355
    @ravdineta1355 Před 3 lety

    👏

  • @motivationmeditationvideos9419

    very nice motivation sir

    • @bvb1432
      @bvb1432 Před 4 měsíci

      खूप छान मुलाखत .....

  • @vinayakkamble7491
    @vinayakkamble7491 Před 3 lety +1

    Sir what is your current location .. your ( pune = kasba peth , deecan ) both office are closed whenever i go there.. so what should i do if i want meet you personally only for 5 min.... at what time you will be free in both the offices

  • @anilpatil3203
    @anilpatil3203 Před 3 lety

    sir poltry bisness Changle ahe ka

  • @gauravtare426
    @gauravtare426 Před 3 lety

    Inspayr businessman. Motevashnal Speakers goods intervou shard Tandala sar

  • @princemali3757
    @princemali3757 Před 3 lety +5

    Saglya video mde ekch jaly jara New havy ata 🙏🙏

  • @aakankshaingle7462
    @aakankshaingle7462 Před 3 lety +2

    Sir Kahi Nahi barka koni madht Nahi karitbrka he fakt bandl ahet brka

  • @shrinivasmade
    @shrinivasmade Před 3 lety +1

    Tandale sirancha no ahe ka

  • @piyushsharma7324
    @piyushsharma7324 Před 3 lety +2

    Bedekar sir nagar che ahat ka tumhi?

  • @pushpakpanchabhai1700
    @pushpakpanchabhai1700 Před 3 lety +1

    तांदळे सरांची The entrepreneur ही पुस्तक दोन वेळा वाचली तरी पण boared नाहीत झाली

    • @kapilmaske7501
      @kapilmaske7501 Před 3 lety

      सरांची The entrepreneur ही पुस्तक कुठे मिळतील. मी नांदेड येथील आहे.

    • @pushpakpanchabhai1700
      @pushpakpanchabhai1700 Před 3 lety

      @@kapilmaske7501 amzon वर उपलब्ध आहेत

    • @sachinkhambe3054
      @sachinkhambe3054 Před 3 lety

      @@kapilmaske7501 the entrepreneur पुस्तक खास सवलतीमध्ये मिळवण्यासाठी संपर्क 7208966372

  • @shrinathshinde9354
    @shrinathshinde9354 Před 2 lety

    Number dya

  • @rajeshnilabaatlekaratlekar497

    Babeya,,tandhali,,piti,,vadu,,ka,,aayi

  • @shrinivasmade
    @shrinivasmade Před 3 lety

    Plt

  • @vinayaksawant5139
    @vinayaksawant5139 Před 3 lety

    L
    p

  • @Ganesh_pawar46
    @Ganesh_pawar46 Před rokem

    म्हणजे शरद भाऊ फ्रॉड नाही का करत😮मी यांच्या बदल नुसत् frod पणा ऐकला आहे