🍇द्राक्ष🍇 बागेतील गर्भधारणा आणि काडी पक्वता.

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 05. 2023
  • बळीराजा ऍग्रो व्हाट्सआप ग्रुप लिंक:- chat.whatsapp.com/BqQiXclenu6...
    द्राक्षातील गर्भधारणा मो,7066952094/मो,7020305264
    ➖➖➖➖➖➖➖➖➖
    द्राक्ष गर्भधारणेसाठी/ कोणत्या औषधांची फवारणी करावी?
    ➖ मार्केटमध्ये गर्भधारणेची अनेक औषध उपलब्ध आहेत परंतु अनुभवी व तज्ञ द्राक्ष उत्पादकांच्या मते द्राक्ष गर्भधारणा ही नैसर्गिक क्रिया आहे यामुळे कोणतेही गर्भधारणेचे औषध हे द्राक्ष गर्भधारणेसाठी उपयुक्त नाही.
    ➖➖➖➖➖➖➖➖➖
    द्राक्ष गर्भधारणेसाठी काड्यांची विरळणी करावी, अगोदर फुटलेल्या व जाड काड्या काढून एकसारख्या जाडीच्या काड्या सुर्यप्रकाशात येतिल या पध्दतीने ठेवाव्यात. ६ ते ७ पानांवर सबकेन केल्यानंतर नियोजनबद्ध पाणी द्याव. नवीन फुटव्यांचा जोम कमी करण्यासाठी व नत्राचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी सल्फेट ऑफ पोटॅश, मोनो पोटॅशिअम फॉस्फेट प्रोपिकोनेज़ोल हेक्झाकोनेझोल इत्यादी खते व रसायनांचा नियंत्रित वापर करून अनावश्यक खर्च कमी करून चांगले उत्पादन घेता येईल.
    ➖➖➖➖➖➖➖➖➖
    द्राक्ष पिकात खरड छाटणीनंतर युरासील व 6 BA ची फवारणी कधी करावी ?
    ➖खरड छाटणीनंतर ४० व्या दिवसी ६ बीएची १० पीपीएम या प्रमाणात व ४५ व्या दिवशी युरासीलची २५ पीपीएम या प्रमाणात फवाणी करावी.
    किंवा
    जर बागेत ६ किंवा ७ पानांवर सबकेन केली असल्यास त्यानंतर निघालेली बगलफूट ३-४ पानांची झाल्यावर
    ६ बीए ची पहिली फवाणी व त्यानंतर बगलफूट ६-७ पानांची झाल्यानंतर युरॉसीलची फवारणी करावी.
    ➖➖➖➖➖➖➖➖➖
    धन्यवाद 🙏

Komentáře • 15

  • @mahadevsheleke7414
    @mahadevsheleke7414 Před rokem +2

    खुप छान माहिती दिली सर

  • @adityashitole9983
    @adityashitole9983 Před rokem +1

    Kay sir Tata ralis che gio green waprayala sagtay kay ahi tymadhe.

  • @birappamote6958
    @birappamote6958 Před rokem +1

    दादा सबकेन म्हणजे काय आणि ते कधी करावे व त्याचे फायदे पण सांगा

    • @FarmingoCropCare
      @FarmingoCropCare  Před rokem +1

      सुरुवातीचा जो शेंडा मारतो साधारण 6 ते 7 पानावर तिथपर्यंत च्या कंदील सबकेन म्हणतात . आणि सबकेन ही आपला शेंडा 10 11 पानावर असताना करतात

  • @avinashgade3119
    @avinashgade3119 Před rokem +2

    Sir 6 ba and uracil kiti spray zale pahije please advise me

    • @FarmingoCropCare
      @FarmingoCropCare  Před rokem

      लवकर छाटणी 3 स्प्रे ,उशिरा छाटणी 4 स्प्रे

    • @avinashgade3119
      @avinashgade3119 Před rokem

      Br saheb

  • @akashjadhav9944
    @akashjadhav9944 Před 2 měsíci +1

    6BA ani Uracil sobt dile tr chalte kay ?
    Jr nahi tr adhi kay dyave 6BA ki Uracil.

    • @FarmingoCropCare
      @FarmingoCropCare  Před 2 měsíci +2

      द्राक्षबागायतदार संघाच्या शिफारशीनुसार दोन्ही एकत्र चालत नाही पण शेतकरी सर्रास एकत्र करून फवारणी घेतात,मात्र आपण 6BA अगोदर घ्यावे 3 दिवस अंतर ठेवून युरसिल फवारणी घ्यावी.

  • @GhanshyamKadam-uz3bb
    @GhanshyamKadam-uz3bb Před rokem

    Sir amhla bhirud sathi kahitri saga

    • @FarmingoCropCare
      @FarmingoCropCare  Před rokem

      हो 7066952094 व्हाट्सआप वर hi करा

    • @FarmingoCropCare
      @FarmingoCropCare  Před rokem

      विडिओ येईल लवकरच भाग 1 आणि भाग 2 असे फोन भाग असतील

  • @vikaspadwal5880
    @vikaspadwal5880 Před rokem

    नत्र कमी करण्यासाठी काय करता येऊ शकेल?

    • @FarmingoCropCare
      @FarmingoCropCare  Před rokem +1

      पोटॅशिअम मॉलिब्डेनम ची फवारणी करा 100grm 300litr पाणी ,किंवा 0:52:34, 0:0:50 किंवा 0:60:20 यापैकी खतांची फवारणी करा.(uracil सोबत)