बारामती साहित्यकट्टा Pradnyesh Molak | Saaku | संवाद | Shashank Mohite | Budget Travel | How to live

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 01. 2023
  • मी शक्यतो जाहिर कार्यक्रम कधी केले नाहीत पण बारामती साहित्यकट्ट्याला नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता कारण मला Intimate कार्यक्रम म्हणजेच कमी लोकात झालेले कार्यक्रम आवडतात. अशा प्रसंगात जमलेल्या लोकांशी थेट संवाद साधता येतो, डोळ्यात डोळे घालून पाहता येतं, प्रत्येकाला स्मित हास्य देता येतं. बरं वाटतं आणि उगाच खोटं नाटं नाहीये याचा आनंद व समाधान ही वाटतं!
    ‘बारामती साहित्यकट्टा’ याबद्दल जाणून होतो. अनेक माझेच मित्र मंडळी तिथे पूर्वी बोलून आलीयेत याची कल्पना देखील होती. मोठी मंडळी तिथे येऊन गेलीयेत व आपण तिथे काय बोलणार असा विचार मनात होता. पण आपण जगण्यावर बोलूयात… फिरण्यावर बोलूयात… बजेट ट्रॅव्हलवर बोलूयात… जिंदगी वसूल करण्यावर व इत्यादी विषयांवर बोलूयात असं ठरवलं होतं आणि तसा व्यक्त होण्याचा प्रयत्न ही केला.
    बऱ्याचदा आपण सारेच मुखवटे घेऊन जगत असतो का? असा प्रश्न कायम पडतो. त्यातून सावरण्याचा प्रयत्न ही करतो. आपण केलेल्या कृती बरोबरच असतात याची ग्वाही देता येत नाही. हळू हळू आपण बदल स्वीकारत आयुष्य विकसित करत असतो. आणि तसंच असलं पाहिजे. प्रवाही राहता आलं पाहिजे. ‘Journeys make people wise!’ असं मी कायम म्हणतो. मला ही प्रवासातून शहाणपण आलंय व पुढेही येत राहिल.
    साहित्यकट्ट्याला फक्त प्रश्न-उत्तरं झाली. खरी मजा त्यातच असते. काही माणसं फार लांबून आली होती. त्यांचे विशेष धन्यवाद! व्यक्त होताना काही कमी-अधिक बोललो असेल. बरोबरच असेल असं नाही, काही philosophical ही वाटेल परंतु जाहिर कार्यक्रमात मनासारखं व्यक्त होता येणं ही पर्वणीच असते. कट्ट्यानंतर पुन्हा २/३ तास संयोजकांसोबत एक वेगळाच कट्टा रंगला, तोही लई दिलखुलास निखळ गप्पांचा झाला. सर्वच्या सर्व संयोजकांचे मनपूर्वक आभार. बारामतीकर भारी लोकं आहेत यात तीळ मात्र शंका नाही!
    - साकू
    ८ जानेवारी २०२३
    #ZindagiVasool #EuroSaa #SlowTalks #TheGoodLife
  • Zábava

Komentáře • 5