Renuka Devi | Yatra | 2024 | Kolhapur |Ambil yatra | Soundatti | Yallama

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 01. 2024
  • Renuka Devi | Yatra | 2024 | Kolhapur |Ambil yatra | Soundatti | Yallama #temple #devi #renukadevi #vamphotostudio
    ओढ्यावरच्या यल्लमाची आंबील यात्रा म्हणजे अवघ्या कोल्हापूरकरांच्या विरंगुळ्याचे आणि श्रद्धेचे ठिकाण . मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेला सौंदत्ती डोंगरावर यात्रा जाऊन आली की येणाऱ्या लगेचच्या काही दिवसात विशेषता बुधवारी किंवा शनिवारी रेणुका देवीची आंबील यात्रा भरवण्याचा प्रघात आहे. ही यात्रा म्हणजे कोल्हापूरच्या शाकाहारी खाद्य संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग म्हणावा लागेल. एरवी कोल्हापूर म्हटलं की तांबडा पांढरा मिसळ भेळ असे पदार्थ डोळ्यापुढे उभे राहतात. बाहेर गावच्या लोकांच्या दृष्टीने कोल्हापूरकर जणू 24 तास याच पदार्थांवर जगतात पण असंही एक शाकाहारी जेवणाचं ताट कोल्हापूरकरांच्या अगदी आवडीचं असतं ते म्हणजे या यल्लमाच्या नैवेद्याचे ताट. ज्वारीची भाकरी, वरणं म्हणजे पावटा आणि वांग्याची एकत्र केलेली भाजी. मेथीची डाळ न घालता फक्त तेलावर परतून शिजवलेली भाजी. थापट वड्या अर्थात पाटवड्या, गाजर ,कांद्याची पात, लिंबू, केळ,वरण-भात दहीभात आणि त्यानंतर ताकाला बेसन किंवा ज्वारीचे पीठ लावून आलं लसणाची जाडसर भरड घालून फोडणी दिलेली आंबील हा या यात्रेचा महत्त्वाचा मेनू. या यात्रेचा विधी इतकाच की घरात हा सगळा नैवेद्य शिजवायचा . भाकरी वरती हे सगळे पदार्थ वाढायचे आणि एका बुट्टीत घालून ती बुट्टी कापडाने बांधून मंदिराजवळ यायचं नैवेद्य भाकरीवर वाढलेला असतो तो उचलायचा आणि क्रमाने रेणुका परशुराम मातंगी मानाच्या जगाना द्यायचा हा नैवेद्य देऊन झाला की दिलेल्या नैवेद्याचा प्रसाद म्हणून आपल्यालाही देवळातून असच वाढलेलं ताट परत मिळतं देवळातून आलेला प्रसाद आणि आपण आणलेल्या जादाचं अन्न याचा एकत्र आस्वाद मंदिर परिसरात घ्यायचा आणि यात्रेचा आनंद लुटायचा हा गेल्या कित्येक वर्षाचा शिरस्ता. गेल्या काही वर्षा पूर्वी नैवेद्य देताना होणाऱ्या अन्नाच्या नासाडी बद्दल बऱ्याच लोकांचे एकमत झाले आणि हा प्रकार टाळण्यासाठी लोकांचा आग्रह सुरू झाला काही लोकांनी यावर पर्याय म्हणून देवीला थेट शिजवलेला नैवेद्य न देता शिधा देण्याचा प्रघात सुरू केला पण हे काही मनाला पटेना एका बाजूला अन्नाची नासाडी ही बघवत नाही आणि दुसऱ्या बाजूला जत्रेचा पारंपारिक बाज हरवतानाही पटत नाही यावर देवळाची नेमकी बाजू काय हे समजून घेण्यासाठी देवीचे जोगती पुजारी मदन आई शांताबाई जाधव यांच्याशी चर्चा केली त्यावेळेला या जत्रेचा एक अनोखा पैलू समोर आला.
    ही जत्रा भरते ती सौंदत्ती डोंगराला जाऊन वैधव्य पत्करून आलेल्या रेणुका देवीच्या सांत्वनासाठी. अजूनही कोल्हापुरात एखाद्याच्या सांत्वनाला जाताना घास भर अन्न बरोबर नेण्याचा प्रघात आहे दुःखातल्या माणसाला भरवायचं आणि त्याच्याबरोबर आपणही दोन घास खाऊन परत यायचं हा एक माणुसकीचा रिवाज. जो रिवाज आपण माणसाबरोबर पाळतो तोच देवी बरोबर पाळण्यासाठी ची ही यात्रा. दुःख सोड आणि पुन्हा एकदा नव्याने उभी रहा आणि हेच सांगण्यासाठी आंबिल यात्रेच्या निमित्ताने भाविक गण नैवेद्य घेऊन देवीला भेटायला येतात आणि जणू त्यांच्या आग्रहालाच मान देत पौर्णिमेपासून कुंकू मंगळसूत्राचा त्याग करून विरागी अवस्थेत बसलेली जगदंबा संपूर्ण साज शृंगार लेऊन भक्तांच्या मनाला आनंद देते. हा यात्रेचा भावनिक कांगोरा मग अन्नाच्या नासाडीचं काय त्यावर उत्तर म्हणून मदन आई जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या सहा ते सात वर्षापासून नैवेद्याची सांडलवंड ही गाभाऱ्यात नैवेद्य देण्याच्या अट्टाहासामुळे जास्त होते हे लक्षात घेऊन भक्त दर्शन रांगेत उभे राहतानाच त्यांना नैवेद्य सोडवून हातामध्ये घेण्याचे आवाहन केले जाते. मंदिराच्या प्रवेशद्वारा जवळ असलेले स्वयंसेवक रेणुका आणि परशुराम यांचे नैवेद्य भक्तांकडून स्वीकारतात त्यानंतर मातंगी चा नैवेद्य मातंगी मंदिरात दिल्यावर प्रदक्षिणा पूर्ण करून पाठीमागे जाताना प्रत्येक भाविकाला प्रसाद म्हणून नैवेद्याचे ताट दिले जाते. ही एक धार्मिक परंपरा तर आहेच त्याचबरोबर एक वेगळा समानतेचा प्रघात आहे त्यामुळे नैवेद्य शिल्लक राहून मात्रा होण्याचे प्रमाण अगदी कमी होते शिधा देण्याचा तोटा म्हणजे प्रत्येक भक्त आपापल्या परीने शिधा देतो त्याचा एकत्रित प्रसाद करणे हे त्याच दिवशी शक्य होत नाही त्यामुळे शिधा देणाऱ्या भाविकाला प्रसाद देणे शक्य होत नाही शिवाय सर्वच भक्तांकडून येणारा शिधा हा सारख्याच प्रमाणात व सारख्या प्रतीचा नसल्याने तो एकत्र करून प्रसाद तयार करणे सुद्धा कठीण जाते. यात्रे दिवशी शिधा देणारा भाविक केवळ प्रसाद घेण्यासाठी पुन्हा येणे शक्य होत नाही त्यामुळे आलेला नैवेद्य प्रसाद म्हणून पुढच्या भाविकाला देण्याचा प्रकार सहज सोपा वाटत राहत एकूणच शिधा देण्यामध्ये आपुलकीचा भक्तीचा तर ऱ्हास होतोच पण त्याचबरोबर ही प्रथा एक कर्मकांड म्हणून शिल्लक राहते त्यापेक्षा ज्याला आपण नैवेद्य देताना नासाडी होते असं वाटतं त्याने खुशाल घरातल्या देवघरात नैवेद्य दाखवावा तो अर्थातच जगदंबेला पोहोचेल पण ज्याला यात्रेचा पारंपारिक बाज जपायचा त्याने नैवेद्याचे पान वाढून मंदिरात द्यावे आणि त्याचा प्रसाद प्रेमाने ग्रहण करावा हेच खरे
    श्रीमातृ चरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीकः
  • Krátké a kreslené filmy

Komentáře • 1

  • @supriyachavan4037
    @supriyachavan4037 Před 6 měsíci +1

    खूप छान व्हिडियो 🙏🙏👌👌👌👌👏👏👏👏आमची कुलदेवी 🙏🙏