जि.प.अध्यक्ष यांच्यावरीलअविश्वास ठरावावरसत्ताधारी व विरोधकदोघेही बाजूनेमतदान न केल्याने,ठरावबारगळला

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • अखेर मागील गेल्या 19 जुलै 2014 रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावरील प्रक्रियेवर आज निर्णय झाला असून, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष यांच्यावर टाकण्यात आलेल्या अविश्वास ठरावबाबत कोणतीही प्रतिक्रिया न आल्याने अविश्वास ठराव बारगळल्याचे समोर आले असून, आज 31 जुलै 2024 रोजी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात घेण्यात आलेल्या विशेष सभेतून, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्यावरील ठरावावर सत्ताधारी व विरोधक दोघेही बाजूने कोणीही मतदान न केल्याने, अविश्वास ठराव बारगळला असल्याचे दिसून आले. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावितांवरिल अविश्वास ठराव हा नामंजुर झाल्याने, आदिवासी विकासमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित गटाने बाजी मारत जिल्हा परिषदेमधील आपली सत्ता कायम ठेवली आहे, अविश्वास ठरावाच्या बाजुने उपस्थित 51 सदस्यापैकी एकानेही हात वर न केल्याने हा अविश्वास ठराव बारगळला आहे, आज अविश्वास सभेच्यावेळी उपस्थित 51 जिल्हा परिषद सदस्यापैकी सत्ताधारी भाजपाचे 28 सदस्य उपस्थित होते, तर 23 सदस्य हे विरोधी बाकावर बसले असल्याचे दिसून आले, तर दोन सभापतींसह पाच सदस्य हे अनुपस्थित राहीले, यात सत्ताधारी भाजपाचे तीन, त्यांना पाठींबा देणार्या शिवसेना उबाठा गटाचे एक, तर काँग्रेसच्या 1 सदस्याचा अनुपस्थित सदस्यांमध्ये समावेश आहे, तर सत्ता स्थापनेवेळी काँग्रेसमधून फुटून भाजपाला साथ देणारे उपाध्यक्ष सुहास नाईक हे विरोध बाकावर बसलेले दिसून आले, तर राष्ट्रवादीचे सत्ता स्थापनेवेळी भाजपा सोबत असलेले मोहन शेवाळे हे देखील विरोधी बाकावर बसलेले दिसून आले, हा अविश्वास ठराव सत्ताधारी गावित गटाचा बनाव असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे, तर विरोधकांनी अविश्वास आणण्यासाठी सत्ताधारी सदस्यांची दिशाभुल केली, मात्र ऐनवेळी सदस्य माघारी झाल्याने विरोधी तोंडघशी पडल्याचे सत्ताधार्यांकडून सांगण्यात आले आहे, महिला बालकल्याण सभापती संगीता गावित, शिक्षण व अर्थ सभापती गणेश पराडके, भाजपाचे भरत गावित, ऐश्वर्यादेवी रावल, तर काँग्रेसकडुन निवडून आलेले मात्र राष्ट्रवादीत गेलेले रतन पाडवी, असे पाच सदस्य यंदा अनुपस्थित राहीले, त्यामुळेच अनुपस्थित राहीलेले सर्वच सदस्य हे भाजपाच्या सत्ता समिकरणात सोबत असतांना, त्यांची आत्ताची अनुपस्थिती म्हणजे थोडक्यात त्यांच्या नाराजीचा सुर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत, यासंदर्भात नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित विरोधी गटाचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे, तर प्रशासनातर्फे अविश्वास ठराव सभेचे पीठासन अधिकारी, उपजिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी या प्रक्रिया संदर्भात माहिती दिली आहे.

Komentáře • 40

  • @abhimanthakare8314
    @abhimanthakare8314 Před měsícem +12

    2.5 वर्ष तुमची सत्ता तेव्हा भागीदारी नव्हते का ? लोकांना येडा काय बनवत आहे सत्ता असतांना काय केलं विकास ते पण सांगा नगर पालिकेत कित्येक वर्षा पासून लूट चालू आहे ते कोण सांगणार

  • @pankajahire1861
    @pankajahire1861 Před měsícem +6

    गोलमाल है भाई सब गोलमाल है

  • @yadavmali9873
    @yadavmali9873 Před měsícem +7

    गावीत परिवार वर कुणीही आरोप केलेत तरी पण गावीत साहेबांच्या विकास कामा वर लोकं खुश आहेत म्हणुन पुन्हा आमच्या नंदुरबार विधानसभेत गावीत साहेब ज आमदार होतील विजयी भव गावीत परिवार

  • @JagdishValvi-qw1vp
    @JagdishValvi-qw1vp Před měsícem +9

    ज्याने सह्या केले होते त्यांनी कोर कागद वर सह्या केले होते का

    • @devakokani9310
      @devakokani9310 Před měsícem +1

      हे खर आहे 😂😂😂😅😅😅

  • @VijayPawara-ol1mr
    @VijayPawara-ol1mr Před měsícem +5

    अविश्वास जिंकता आला नसल्याचे खोटं आरोप करत आहे,,

    • @vasavesuresh8289
      @vasavesuresh8289 Před měsícem

      बरोबर बोलात दादा आपण. रघुवीर. परिवार
      . कोटा आरोप करतो

  • @bharatvasave6918
    @bharatvasave6918 Před měsícem +1

    लोकसभेत पण असेंज सांगत होते हिना गावित हेट्रीक मारनार आहे अस पण त्याना जागा दाखवली गोवाल पाडवीनि विधानसभेत पण तस होणार आहे दादा माहाविकास आघाड़ीचा सीट निवळून येनार आहे विधानसभेंत पण❤❤❤❤❤❤

  • @vasudeogangurde4200
    @vasudeogangurde4200 Před měsícem

    नंदुरबार जिल्हा परिषदेचा विकास दरडोई कधीच विकास आराखड्यात दिसत नाही.... विकास निधी...हा जास्तीत जास्त रस्ता,पुल, फरशी, निकृष्ट दर्जाची कामे.... यातूनच सत्ताधारी आणि विरोधक दोनो भाई भाई...जय जोहार...जय आदिवासी...आप की जय...!

  • @ajvishal6942
    @ajvishal6942 Před měsícem +4

    Only GAVIT saheb

  • @vasudeogangurde4200
    @vasudeogangurde4200 Před měsícem

    वारे सत्ता तेरा खेल... जहाँ जावू वहा मेराच मेल...! सत्ताधारी आणि विरोधक एकत्र....जय जोहार...जय आदिवासी...आप की जय...!😂😂😂😂😂

  • @paradkeparvati4213
    @paradkeparvati4213 Před měsícem +3

    Mg tula tanuri betli ka ?
    Tula betli asti tr tu brbr kelo amhala mahot ahe ...tu kiti adivasi la virad kart ahe ...tumi amdar khasdar ,tumla ticket betat nahi ....manun drama baji krt ahe bas ....nahi tr apli majority rahily asti tr adivashi kade bat dakvle naste .....

  • @vasudeogangurde4200
    @vasudeogangurde4200 Před měsícem

    जास्तीत जास्त आदिवासी भागातील निधी...मातीत घालून आदिवासी विकासाची माती करण्यास सत्ताधारी आणि विरोधक यांचा खेळ खंडोबा...जय जोहार...जय आदिवासी...आप की जय...??????

  • @amazingvideos4847
    @amazingvideos4847 Před měsícem

    मान गये गुरू गावीत साहेब सिनियर सिनियर होता हें...

  • @vasavesuresh8289
    @vasavesuresh8289 Před měsícem +1

    पंचवीस वर्ष. कागेस. होती. रघुवंशी. तुम्ही लोकांना. फार. दिश्या बुल केली आता. नही

  • @YogaVasave-i6r
    @YogaVasave-i6r Před měsícem

    अक्लकुवा विधानसभा अब की बार किरसिंग दादा आमदार

  • @paradkeparvati4213
    @paradkeparvati4213 Před měsícem +1

    Chandracanto roghovanchi he adivashi la sanpavala nigale ...pn apali mojarity vadava teva hoil ta parnto palika ladva

  • @vimanvasave
    @vimanvasave Před měsícem +1

    तुझ्या सारखे भै रिकामे दोंदे ny करत गावित साहेब

  • @CrikRushy18
    @CrikRushy18 Před měsícem

    Chandu Bhaiyaa tumi aat Santa Bas😂😂

  • @k.dudave4871
    @k.dudave4871 Před měsícem

    क्या बात है 😂😂😂😂 सह्या करणारे विश्वास नाही म्हणून विरोध जावून ठराव दिला आणि आता.... परत त्यांचेच बाजू परत गेतले त्यापेक्षा राहु दिले असते.... वेळ, खर्च सर्व बजत झाली असती 😂😂😂😂😂ना

  • @jaywantpadvi6961
    @jaywantpadvi6961 Před měsícem

    Only gavit saheb

  • @paradkeparvati4213
    @paradkeparvati4213 Před měsícem +1

    Vijay aso 🎉

  • @Aditya6569-v8v
    @Aditya6569-v8v Před měsícem

    अगोगर रस्ते दुरुस्त करा आणि काही विकास कामे करा नंदुरबार तळोदा रास्ता मागील काही वर्षा पासून खराब झालेला आहे तो दुरुस्त करा खुप लोक मृत्युमुखी पडले आहेत लोकांची नाराजगी पत्कारु नका परिणाम लोक सभेत दिसले आहेत विधान सेभेची वाट पाहू नका कामाला लागा

  • @rahulbagul1831
    @rahulbagul1831 Před měsícem

    सोताहून अविश्वास टाकून ग्याचा आणि नंतर 6 महिने बिंदास कसे बी निर्णय ग्याचे....

  • @VASAVESANDIP-mw5ig
    @VASAVESANDIP-mw5ig Před měsícem

    विधानसभेत ह्यांची जागा दाखवू ???

  • @-yh3wg
    @-yh3wg Před měsícem

    Only Congress..

  • @devakokani9310
    @devakokani9310 Před měsícem

    😅😅😅😅😅 सर्व नाटक आहे bjp च जनता जबाब देईल विधानसभाला bjp ला.
    ज्यांनी सह्या केल्या आहेत त्यांची पण प्रतिक्रिया घ्या जय म्हलार news ने
    त्यांनी ज्या सह्या केल्या होत्या त्या खरच का कोऱ्या कागद वर सह्या केल्या होत्या का 😄😄😄😄

  • @CrikRushy18
    @CrikRushy18 Před měsícem

    Are tu kuthe chagal ahe re Ragu Bhaii 😂😂😂pahayla tuj bg mg aarup lava😂😂

  • @kamaleshvalvi
    @kamaleshvalvi Před měsícem

    Sapane.sajanke.

  • @ajvishal6942
    @ajvishal6942 Před měsícem +1

    Tu bombalat bas😂

  • @rahul.blocks.3283
    @rahul.blocks.3283 Před měsícem

    Dheere dheere Hina Tai ka khoob khatm ho jaega😂😂

  • @ravindravalvi2112
    @ravindravalvi2112 Před měsícem

    Tumari dukan khali he islye to kuch bhi drama kar rahe ho

  • @Pawara_Rinesh_Vloger
    @Pawara_Rinesh_Vloger Před měsícem

    😂

  • @TffTftt-fe7nw
    @TffTftt-fe7nw Před měsícem

    और कितने दिन बचेंगे, आमदार ते अध्यक्ष च्या निवडणूकीत मा.चंदुभैय्या यांना धुळ चारुन यांच्या सर्व दुकान बंद केल्याशिवाय राहणार नाहीत. जय चंदुभैय्या साहेब, जिंदाबाद.

  • @user-iy2jv6mc8h
    @user-iy2jv6mc8h Před měsícem

    Tula dusar kam nahi ka bus hej kar tu

  • @kasirampadvi8398
    @kasirampadvi8398 Před měsícem

    Gavit parivar bhrasht ahe