Video není dostupné.
Omlouváme se.

हैदराबाद मुक्ती संग्रामाची कहाणी | Operation Polo (1948) | Avinash Dharmadhikari sir

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 08. 2024
  • ऐका हैदराबाद मुक्ती संग्रामाची कहाणी, धर्माधिकारी सरांच्या वाणीतून...
    भारताचा ७५ वर्षांचा सुवर्ण इतिहास जाणून घेण्यासाठी धर्माधिकारी सरांची 'सुवर्णयुगाच्या स्वप्नासाठी' हि व्याख्यानमाला जरूर ऐका : • सुवर्णयुगाच्या स्वप्ना...
    हैदराबाद राज्य ब्रिटिश राजवटीच्या अस्ताच्या वेळेपर्यंत टिकून असलेले भारतातील सर्वांत मोठे स्वायत्त संस्थानिक राज्य होते. सध्याच्या तेलंगणा, मराठवाडा, उत्तर कर्नाटक, विदर्भाचा काही भाग या भारताच्या दक्षिण-मध्य भागात या संस्थानाची व्याप्ती होती. इ.स. १७२४ पासून इ.स. १९४८ पर्यंत निजाम हैदराबाद राज्याचे संस्थानिक होते. स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रदीर्घ हैदराबाद मुक्ति संग्रामाचा शेवट इ.स. १९४८ मध्ये भारत सरकारने निजाम शासनाविरुद्ध केलेल्या पोलीस कारवाईने झाला आणि हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारत देशात समाविष्ट झाले. १९४७ मध्ये बिटिशांनी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पास केला. या कायद्यानुसार १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत ब्रिटिशांच्या राजकीय वर्चस्वातून मुक्त झाला. म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळाले .वरील कायद्यानुसार देशी राज्ये आणि संस्थानिकांनाही त्यांनी आपले राज्य भारतात की पाकिस्तानात विलीन करावयाचे की, स्वतंत्र राहावयाचे या बाबतीत स्वातंत्र्य दिलेले होते. त्यामुळे देशी राज्ये व संस्थाने भारतीय संघराज्यात कशी विलीन करून घ्यावयाची हा मोठा प्रश्‍न भारत सरकारपुढे निमाण झाला. शेवटी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी बहुतेक संस्थाने भारतात विलीन करून घेतली. परंतु हैदराबाद राज्याचा सत्ताधिश निजाम मीर उस्मान अली खान याने ११जून १९४७ रोजी आपले राज्य स्वतंत्र राहणार असल्याचे जाहीर केले.
    निजामाने आपले राज्य स्वतंत्र राहणार असल्याचे घोषित केल्यामुळे भारत सरकार आणि हैदराबाद राज्यातील जनतेपुढे मोठा पेच व प्रश्‍न निर्माण झाला. हैदराबाद राज्याचा सत्ताधिश मुसलमान होता. परंतु राज्यात ८८ टक्के हिंदू, ११टक्के मुसलमान आणि १ टक्का इतर लोक होते. याशिवाय देशाच्या व दख्खनच्या मध्यभागी असलेले आणि देशात आकाराने दुसऱ्या क्रमांकाचे असलेले हैदराबाद राज्य स्वतंत्र राहणे राज्यातील जनतेच्याच नव्हे तर देशाच्याही हिताचे तसेच हैदराबाद राज्याच्या भारतातील विलीनीकरणाशिवाय भारताच्या स्वातंत्र्याला पूर्ण प्राप्त होणार नव्हते. त्यामुळे राज्यातील जनतेने हैदराबाद राज्याचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण करण्यासाठी सत्याग्रह व सशस्त्र आंदोलन केले. शेवटी १३ सप्टेंबर १९४८रोजी भारत सरकारने हैदराबाद राज्यावर लष्करी कारवाई करून ते भारतीय संघराज्यात विलीन करून घेतले. हैदराबाद राज्याच्या विलीनीकरणासाठी जनतेने जे सत्याग्रह व सशस्त्र आंदोलन केले, हेच आंदोलन भारतीय इतिहासात 'हैदराबादचा स्वतंत्र -संग्राम ' या नावाने ओळखले जाते. हा स्वातंत्र -संग्राम भारतीय स्वातंत्र आंदोलनाचाच एक भाग होता. या स्वातंत्र लढ्यात दलितांचाही सिंहाचा वाटा आहे.
    #independence #hyderabad #marathwada #india #swamiramanandtirth #marathawadamuktisangram
    चाणक्य मंडलच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : t.me/chanakyam...
    आमच्याशी (Instagram) इंस्टाग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
    chanakyamandalpariwar
    आमची अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
    play.google.co...
    आमच्या CZcams चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
    / @chanakyamandalpariwar
    आमच्याशी (Telegram) टेलिग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
    t.me/chanakyam...
    फेसबुकवरती ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
    / chanakyamandalpariwar
    For further details contact us on chanakyamandal...
    For Online Courses, visit: lms.chanakyama...
    To get more details, Phone: 080-69015454 ,080-69015455
    To get more study materials & important information, join our official telegram group :
    t.me/chanakyam...
    Subscribe and follow us on CZcams: / @chanakyamandalpariwar
    For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar

Komentáře • 25

  • @lalitachidri275
    @lalitachidri275 Před 11 měsíci +8

    मी प्रत्यक्ष पाहिले आहे त्या वेळी मी ९ वर्षाची होते

  • @govindbhise7344
    @govindbhise7344 Před rokem +6

    मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छां🙏💐

  • @madhavraovadhwane2755
    @madhavraovadhwane2755 Před 11 měsíci +1

    मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा सर 🌹🌹🙏🙏

  • @sagarnaik3360
    @sagarnaik3360 Před rokem +3

    मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @ravigurav3878
    @ravigurav3878 Před rokem +2

    साक्षात बृहस्पती

  • @pargayanpuri7439
    @pargayanpuri7439 Před 10 měsíci

    हैदराबाद मुक्ति संग्राम जिस चीज का शुद्ध नाम है हमको धार्मिक आजादी चाहिए जो की निजाम हैदराबाद रियासत के अंतर्गत धार्मिक आजादी थी नहीं हिंदू लोग अपने सिर के ऊपर चोटी रखने का कर चुकाना पड़ता था दूसरे धर्म के लोगों को धार्मिक आजादी

  • @yashwantraojadhav7481
    @yashwantraojadhav7481 Před rokem +2

    उत्तम माहिती दिलीत सर

  • @jagdishranshinge4609
    @jagdishranshinge4609 Před rokem

    एकमेवा द्वितीय व्याख्याते..

  • @rohitsolkar111
    @rohitsolkar111 Před rokem +2

    My favourite

  • @dnyandevbobade5118
    @dnyandevbobade5118 Před rokem

    स्वामी रामानंद तिर्थांना माझा सलाम

  • @rajeshwarboduwad7771
    @rajeshwarboduwad7771 Před 11 měsíci

    💐🙏 अतिशय सुंदर व्याख्यान

  • @sagarwavare8054
    @sagarwavare8054 Před rokem +1

    धन्यवाद

  • @ashishjogi579
    @ashishjogi579 Před rokem +1

    Great sir

  • @sagarwavare8054
    @sagarwavare8054 Před rokem +1

    शुभेच्छा

  • @vrushaliwaghmare8171
    @vrushaliwaghmare8171 Před rokem +1

    Thank you sir

  • @aniljadhav3115
    @aniljadhav3115 Před rokem +2

    Nice sir

  • @VijayJadhav-oq8cc
    @VijayJadhav-oq8cc Před 11 měsíci

    खुप छान माहिती दिली सर

  • @rajanphadkale5460
    @rajanphadkale5460 Před rokem +1

    🎉🎉👍👍🎉🎉 Sir 🙏🙏

  • @ramankulkarni9609
    @ramankulkarni9609 Před 11 měsíci

    Helpfull information 💯

  • @samadhankamble3281
    @samadhankamble3281 Před rokem +3

    Symbol of knowledge.

  • @sontakkemahadev6900
    @sontakkemahadev6900 Před 10 měsíci

    ह्या संग्राम मधे जे जिवाच बलिदान व्यर्थ जाउ दिल जाणार नाही

  • @bhagwanjadhav4049
    @bhagwanjadhav4049 Před 11 měsíci

    Nice information

  • @xyz.521
    @xyz.521 Před 10 měsíci

    मराठवाडा मुक्ती सग्रामाची सुरुवात ही धाराशिव जिल्ह्यातील हिप्परगा या गावातून झाली .

  • @sangamesh555
    @sangamesh555 Před rokem +1

    👏👏👏👏👏

  • @PATANGERAJRATNA
    @PATANGERAJRATNA Před rokem +4

    गोविंदराव पानसरे मराठवाडा मुक्तिसंग्राम मातील पहिले बळी होते त्यांचे समाधी,स्मारक आमच्या गावामध्ये आहे. (अर्जापूर ता.बिलोली जि.नांदेड)
    😢गोविंदराव पानसरे यांना विसरत चाललो काय