महाराष्ट्राची ग्रामीण जीवनशैली सातासमुद्रापार नेणाऱ्या जोडप्याची गोष्ट Ft.

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 11. 2022
  • ही गोष्ट आहे एका अशा जोडप्याची ज्यांनी आपल्या मातीत काहीतरी नवीन घडवण्यासाठी मुंबईहुन गावाकडे स्थलांतर केले. शहरातली lifestyle सोडून गावातील पारंपारिक जीवन, महाराष्ट्रीयन पाककृती, इथली समृद्ध संस्कृती, स्थानिक कला यांना जगासमोर वेगळ्या पद्धतीने मांडणे या उद्देशाने सुरू केलेलं एक आगळं वेगळं CZcams channel... @RedSoilStories म्हणजेच लाल मातीतल्या गोष्टी.... शाश्वत जीवनाच्या शोधात एक कलात्मक रित्या केलेला प्रवास; शहरी जीवनाच्या गर्दीपासून दूर. आधुनिकीकरणाच्या मागे लागलेल्या पिढीला पुन्हा ग्रामीण भागातील शाश्‍वत जगण्‍याचा मार्ग दाखवण्‍याचे, इथल्या culinary art ला asthetically सुंदर दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न...
    कोकण आणि महाराष्ट्रातील निसर्गसौंदर्य, इथल्या नद्या, डोंगर , दऱ्या, धबधबे, इथली माती, त्यात उगणारी पिके हे सगळेच एक कथा सांगतात... आणि ह्याच कथा आपल्यासाठी घेऊन हे जोडपं दर आठवड्याला भेटायला येत...
    "Red Soil Stories" हे फक्त एक you tube channel नसुन ग्रामीण जीवन आणि हे न अनुभवता येणाऱ्या शहरातल्या तमाम लोकांसाठी बनवलेला साकव आहे... मी सुद्धा शिरिष आणि पूजा ला भेट देऊन त्यांच्या ह्या आगळ्या वेगळ्या venture बद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय. आणि विशेष म्हणजे त्यांच्या सोबत Red Soil Stories channel साठी एक व्हिडिओ सुध्दा शूट केलाय... जो तुम्ही त्यांच्या चॅनेल वर पाहू शकता... Red Soil Stories channel ला भेट देऊन नक्की तुमचा अनुभव कळवा🙏❤️
    / redsoilstories
    redsoilstories?...
    Instagram👆🏼
    profile.php?...
    Facebook
    Email id - mail.redsoilstories@gmail.com
  • Zábava

Komentáře • 790

  • @bharatpagire2117
    @bharatpagire2117 Před rokem +283

    🌻कोकणा सारखे सूख कुठेच नाही,,,,!
    असे सर्वच म्हणतात...!
    🌻मग कोकणात लोकं थांबायला का मागत नाहीत?
    🌻 कोकणी माणूस खूप मेहनती आहे...!
    🌻 मग तीच मेहनत तो गावी का करत नाही...?
    🌻 शहरात जाऊन मेहनत करून काहीच साध्य
    झाले नाही की मग गावी जातो... तेव्हा
    ताकत व वय संपून गेलेले असते...
    🌻 मुंबईची आयुषयभराची कमाई म्हणजे
    ४ भिंतीची खोली... या पेक्षा काही नाही.. पण
    त्या खोलीत फक्त रात्री ९ ते सकाळी ६ एवढा वेळच आपण राहतो.. बाकी वेळ आपला ट्रेन व ऑफिस यामधेच जातो ...
    🌻 गावी राहण्यासाठी पुढची पिढी कदापी तयार होणार नाही ही काळया दगडावरची पांढरी रेघ आहे कारण.. त्यांना गावी राहण्यासाठी काहीच आपण करून ठेवलेले नाही
    🌻 कोकणातली मुख्य समस्या..
    १) पाणी, (उन्हाळी शेतीसाठी पाणी नाही)
    २) पाऊस खुप आहे पण ते पाणी सगळे समुद्रात वाहून जात असल्याने त्याचा काहीच उपयोग होत नाही... ज्या दिवशी ते पाणी आपण साठऊन उन्हाळी शेतीसाठी ठेऊ त्या दिवशी कोकण खरे सुखी होईल...
    ३) त्या पाण्यावर पैसा येईल अशी शेती करावी
    पारंपरिक शेती नको तर त्यातून आपल्याला लाखो रुपयांची रक्कम हातात येईल अशी शेती करावी... आणि हे शक्य आहे.. फक्त पाणी पाहिजे व योग्य नियोजन...
    🌻 एकदा सर्वांनी अवश्य विचार करून बघावा
    वेळ अजून ही निघून गेलेली नाही..
    काही लिखाणात चूक असल्यास क्षमा असावी..💚💚

    • @amitkharat07
      @amitkharat07 Před rokem +5

      अगदी बरोबर

    • @rupalikadam3551
      @rupalikadam3551 Před rokem +4

      तुमचा शब्द न शब्द खरा आहे 👍👍

    • @Maheshshetye02
      @Maheshshetye02 Před rokem +2

      खूप सुंदर बोललात. अगदी खरे आहे.

    • @sushamaporwar6674
      @sushamaporwar6674 Před rokem +5

      अभ्यासपूर्ण विवेचन आहे 👍

    • @rahulmalekar252
      @rahulmalekar252 Před rokem +2

      ❤️

  • @umanatu2825
    @umanatu2825 Před rokem +114

    धन्यवाद प्रसाद 🙏
    शहरी जीवन सोडून तरुण वयातच ग्रामीण जीवनाला आपलंसं करुन हे शिवधनुष्य सक्षमपणे पेलु इच्छिणारी पूजा खरंच दूर्मिळ. God bless you dear Pooja!!

  • @savitakubal3732
    @savitakubal3732 Před rokem +23

    खूप आवडलं
    मी पण जन्मापासून 25 वर्ष अगदी सुखासमाधानाने मुंबईत राहिली आहे
    पण 31 वर्षांपूर्वी लग्न होऊन गावात,सिंधुदुर्ग मध्ये आली,अगदी पहिल्यांदा शेणात हात घालून जमीन सारवली,विहिरी चं पाणी काढल,मातीच्या घरात राहिली, पूर्णपणे ह्या जीवनात समरस झाली,पण वाईट वाटतं की इकडे त्याच कोणाला काही पडलं नाही,30 वर्षात खूप बदललं सगळं,सगळ्यांना स्लॅब ची,सिमेंट ची घरं पाहिजेत,प्रत्येक घरात अगदी tv, फ्रीज पासून , मॉडर्न kitchen पर्यंत सगळ्या सुविधा हव्यात,आणि आहेत
    मी अजूनही ह्या सगळ्या पासून लांब राहिले,म्हणून मला गावढंळ समजतात गावातली माणसं, आपलं असलेलं 50% मातीचं घर वाचवायचा प्रयत्न आहे ,no support

    • @ManoharMorajkar
      @ManoharMorajkar Před 2 měsíci +1

      खरे आहे, स्थानिक पातळीवर पाठिंबा मिळत नाही.

    • @HimmatBhoir
      @HimmatBhoir Před měsícem

      {मातीचं घर वाचवायचा प्रयत्न आहे} .... Matichya gharacha video asel tar link share kara. Baghayla avdel mala

    • @abhishekpadwal4067
      @abhishekpadwal4067 Před 12 dny

      Kuch to log kahenge,logo ka kaam he kehana
      Pan tumhi tumachi life style enjoy Kara tyanchyapeksha jast samadhanani jagal

  • @pravinbhosale2807
    @pravinbhosale2807 Před rokem +410

    खरंच ग्रेट ..... तुम्ही तिघेही आदर्शवत आहात ..... आणि ही बेटी जे.जे. स्कुल ऑफ आर्ट्सची विद्यार्थिनी आहे हे खरंच वेगळेपण आहे ...... तुम्ही सर्व एकत्र आलात तर आपला निसर्ग पुन्हा पूर्वीसारखा मोहराने बहरून जाईल ......

    • @matoshrialloyspvtltd6023
      @matoshrialloyspvtltd6023 Před rokem +8

      खूप छान काम करताय आपल्यासाठी व आपल्या माती साठी ग्रेट सर्वांना खूप खूप शुभेच्छा असेच निरंतर प्रगती करत रहा आपला गाव आपला तालुका जिल्हा राज्य देश खूप खूप शुभेच्छा

    • @LotusArtnDesign
      @LotusArtnDesign Před rokem +12

      आर्टिस्ट आहे म्हणूनच एवढे क्रिएटिव्ह व्हिडिओज आहेत 👌🏻👌🏻👌🏻शुभेच्छा!

    • @priyaulhassalvi2140
      @priyaulhassalvi2140 Před rokem +5

      Villege name please

    • @chanchalsherekar3708
      @chanchalsherekar3708 Před rokem +1

      @@matoshrialloyspvtltd6023 j

    • @chanchalsherekar3708
      @chanchalsherekar3708 Před rokem +1

      @@matoshrialloyspvtltd6023 ppl

  • @rajanlad6476
    @rajanlad6476 Před rokem +9

    लाल मातीतील गोष्ट....वां, मी प्रथमच म्हणजे रानमाणूस नंतर प्रथमच कोकणांतील युट्यूब चॅनलचं अगदी मनापासून समर्थन करतोय, रानमाणूस आणि रेड साॅईल स्टोरी या दोन्हीं चॅनल्सला अगदी मनापासून शुभेच्छा.

  • @shwetathakur4652
    @shwetathakur4652 Před měsícem +1

    खुप छान आहे कल्पना तुमच्या भविष्यातील सगळी स्वप्ने पूर्ण होऊ दे हिच सदिच्छा

  • @sudhirgawade6196
    @sudhirgawade6196 Před rokem +23

    मीत्रा तुझ नाव प्रसाद आहे हा प्रसाद
    तू सगळ्यांना देवाचा प्रसाद समजून
    वाटून देवा सर्वानाच सुखी ठेव अस
    तू तुझ्या कृतीतून तू लोकांपर्यंत पोहचवत आहे खुपच सुंदर 🙏👌✌️👍

  • @dnyandagawas3678
    @dnyandagawas3678 Před 2 měsíci +2

    तुमचे Red soil stories channel मी बघते,ते खुपच inspiring आहे .मी आणि माझे पती आम्ही पण कोकणात 2000 सालापासून राहतो.आम्ही मुंबई त 20 वर्षे नोकरी केली.तरीपण कोकणात आल्यावर मनःशांती मिळाली.

  • @user-it1lo5of8o
    @user-it1lo5of8o Před rokem +4

    Thanks prasad tuze kokanavarche prem pahun abhiman vatat0

  • @satishbelekar4991
    @satishbelekar4991 Před rokem +33

    प्रसाद तू खूपच सुसंस्कृत सुंदर आणि प्रेमळ माणूस आहेस, कोकण विषयी असणारी तळमळ आणि मातीशी असलेली नाळ ह्याचा एक संगम आहेस तू , proud of you brother 🙏❤️,

  • @sairmaharashtrachi
    @sairmaharashtrachi Před rokem +26

    आपल्या मातीशी नाते जोडणाऱ्या माणसांना प्रकाश झोतात आणण्याचे खुप छान काम करत आहेस तू भावा त्यासाठी तुझे मनपुर्वक आभार🙏🙏

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar8452 Před rokem +22

    प्रसाद तुझं अभिनंदन की तुझ्या माध्यमातून आम्हाला या उभयतां चे नविन व्हिडिओ बघायला मिळाले जे कोकणात येवुन आपल्या मातीतील जीवन शैली अनुभवत आहेत.. खरोखर तुम्ही आदर्श ठेवला आहे आपल्या कोकणातल्या पिढी समोर.. जीवन जगणे ही एक कला आहे.. आणि ते कसे जगावे हे ज्यांनी त्यांनी ठरवावे... भौतिक सुखाच्या पाठी आपण धावुन आपण आपल्या आयुष्यातले मोलाचे क्षण च विसरून जातो, अनुभवत नाहि... छान तुमच्या या नवीन वाटचाली साठी आमच्या कडून तुम्हाला शुभेच्छा..

  • @SudhirRasal-qo5hq
    @SudhirRasal-qo5hq Před rokem +5

    कोकण आपले स्वर्ग आहे जगाचा पाठीवर

  • @cricketworld4894
    @cricketworld4894 Před rokem +7

    अभिमान आहे यांचा।कोंकणाला आशा लोकांची गरज आहे।

  • @vinayakmone3790
    @vinayakmone3790 Před 2 měsíci +2

    खरच निसर्ग भरभरून देतो घेणाऱ्यान कस घ्याव याच उत्तम उदाहरण आहे रेड सॉईल स्टोरी गावाला येऊन राहण हा त्यांनी घेतलेला निर्णय त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन

  • @nehabagwe6887
    @nehabagwe6887 Před rokem +4

    अगदी खर बोललात तुम्ही,तुमचे व्हिडिओ बघून खरंच गावी असल्याचा अनुभव,आनंद मिळतो

  • @kaustubhambekar2224
    @kaustubhambekar2224 Před rokem +7

    खूपच छान,तुमचे विचार ऐकून खूप खूप आनंद वाटला,ऐव्हढी शिक्षण घेतलेली मुलगी सर्व सोडून गावात येते ही खूप कौतुकाची बाब आहे,तुमचे इतरही व्हिडिओ मी पाहिले आहेत, तुम्ही जेवण खूप छान करता, तुम्ही या चालू केलेल्या उपक्रमासाठी मनःपूर्वक शुभेच्छा,keep it up

  • @madhu_soso
    @madhu_soso Před rokem +15

    There story is very inspiring. खूप शहरी माणसांची स्वप्ने अशी असतात, पण ती खरे होण्यासाठी शहर सोडण्याची हिम्मत नसते. तुम्हाला hats off....
    आणि, त्या सगळ्याला adapt करणे हे absolutely commendable आहे

  • @vandanasutavane5736
    @vandanasutavane5736 Před 11 měsíci +3

    तुम्हा दोघांचे खूप कौतुक व अभिनंदन

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 Před rokem +7

    प्रसाद मस्तच आपल्याला जे आवडतं ते मनापासून केलं की त्यात आनंद मिळतो हे या जोडप्याने दाखवून दिल तू त्यांना हायलाईट केलंस त्याबद्दल तुझे आभार धन्यवाद असेच चालू राहू दे

  • @miparab
    @miparab Před rokem +13

    प्रसाद कोकण सन्मान तुला भेटावा अशी मना पासून इच्छा होती.... असो तुझं कोकणा प्रती प्रेम हाच कोकण सन्मान....

  • @madhukarmithbavkar1546
    @madhukarmithbavkar1546 Před rokem +3

    छान. देव आपणास सदैव सुखी ठेवो , अशी प्रार्थना करतो धन्यवाद.

  • @pravinmayekar6169
    @pravinmayekar6169 Před měsícem +1

    अगदी खरं आहे... आज खरोखर आम्ही विचार करतो आहे गावी जाऊन settle ह्यायचं.... Thanks to प्रसाद आणि ह्या couple..

  • @madhurimhatre1023
    @madhurimhatre1023 Před 2 měsíci +1

    ताई मला तुमचा चैनल बघायला खूप आवडतं आणि सतत मी तुमच्या रेसिपीज बघत असते पण मी स्मार्ट टीव्ही वरती बघत असते ते मला लाईक करायला येत नाही तुमचं चैनल बघितले की मी कोकणातच आहे असे मला वाटते खूप आवड आहे माझा स्वतःचा आयुर्वेदिक मेडिकल आहे मी अशी सगळीकडे फिरत असते औषध गोळा करण्यासाठी जुन्या सगळ्या आठवणी जाग्या होतात त्याबद्दल धन्यवाद

  • @rajeshkamath3350
    @rajeshkamath3350 Před 12 dny +1

    I too am an born and brought up in Bombay man, living peacefully in dharwad. So, liked your decision.😊😊

  • @sanjayghone6624
    @sanjayghone6624 Před rokem +3

    खरोखर आपण दोघंही उच्च शिक्षित असून कोकणात जाऊन लोकांन पुढे आदर्श आहात. आपले कौतुक करावे तेवढे कमी आहे. आपण करत असलेल्या उदयोगास आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा. 💐👍

  • @mahendramane299
    @mahendramane299 Před rokem +2

    खुप छान असा उपक्रम आहे.
    मी दुबई मधुन तुमचा प्रोग्राम पाहतो आहे. मला तुमचा अभिमान आहे.
    असेच व्हिडिओ अपलोड करा.
    धन्यवाद.

  • @malatighorpade2939
    @malatighorpade2939 Před rokem +7

    पूजा आणि शिरिष , तुमचं खरंच कौतुक वाटतं...!!
    तुमच्या भावी आयुष्याच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा..!!!

  • @geetasakpal3910
    @geetasakpal3910 Před rokem +2

    प्रसाद ह्या red soil stories साठी मी प्रतिक्रिया तर दिल्याचं आहेत परंतु तुझं सुद्धा कोकणी रानमाणूस ह्या चॅनल वर तुझं कोकणाविषयीचं प्रेम आणि त्याविषयी अतिशय प्रगल्भ ज्ञान, जाण आणि माहिती असणारा प्रसाद गावडे बारसु बद्दल बोलताना ऐकून मी थक्कच आणि कोकण प्रेम पाहून भावूकही झाले. तुझ्याही येणाऱ्या प्रत्येक एपिसोडसाठी आणि कामासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @nandanasalvi
    @nandanasalvi Před rokem +8

    खुप खुप छान!
    हे असे contents आहेत सगळ्या पुरस्कारांच्या लायकीचे!
    तू आमच्या साठी, भविष्य पिढीसाठी जे काही करत आहेस, त्यासाठी तुला आजन्म पुरस्कार दिले, तरी हे ऋण उतरू शकणार नाही आम्ही🙏

  • @jyotsnadhuri6754
    @jyotsnadhuri6754 Před rokem +3

    मला तुमचा हा निर्णय आवडला आणि छानच जीवनशैली दाखवतात येणाऱ्या काळाला तुमचा सारख्याची आवश्यकता आहे

  • @shailaapte6136
    @shailaapte6136 Před rokem +2

    तरीच म्हटलं... हे ज्या पद्धतीने बनवलंय👌👍.रानमाणूस लाल पण सलाम...दुसर्याच्या चांगल्या कामाची दाद देणं याला मोठं मन लागतं

  • @kishoreesaitawadekar1132

    तुम्ही खूप ग्रेट आहात कारण तुम्ही जो गावी राहण्याचा विचार केलात तो खूप सुंदर आहे, तुम्ही हया मुंबईच्या धावापलीतुन बाहेर पडू न एक छान आयुष्य जगत आहात आणि असच प्रत्येक कोंकणी माणसाने आपल्या मातिला धरूंन राहिल पाहिजे तरच आपल्या येनार्या पीढ़ीला आपल्या मातीची ओलख राहिल आणि आपल्या मातीची आवाड ही होई, आणि त्याना आपल्या पणजी आजी लोक कस जगत होते त्यांच्या कालात हे जवलून बघाता येईल

  • @jyotizore4350
    @jyotizore4350 Před rokem +4

    तुम्ही ,खरं आयुष्य जगताय👌👌तुमच्या निर्णयाचा हेवा वाटला, प्रेरणा मिळाली,😊😊

  • @ramsawant7652
    @ramsawant7652 Před rokem +8

    आवड असली कि सवड मिळते. 👍साधी राहणी खूप सुंदर उच्चं विचार सरणी 👌👆 येवा कोकण आपलाचं आसा 🌴 तो आपणांकंच वाचवचो आसा 🌴🥭

  • @raghunathsabale4932
    @raghunathsabale4932 Před rokem +4

    तुमचे आपल्या गावाविषयी विचार फार great आहेत best luck ताई for your redsoilstories ☺️

  • @varshakarekarsadgurudhanya3193

    Sundar jivanshaylee.🙏💐👌

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 Před 2 měsíci

    प्रसाद दादासाहेब तर खूपच लाडका आहे.कोकणाचा जीव की प्राण आहेस. कोकणाबद्दल तुला खूपच आपुलकी आहे हे तुझ्या विचारातून समजतेय. मी दापोलीतील कोकणाचीच एक कन्या आहे याचा मला सार्थ अभिमान आहे आणि तुम्ही तिघेही कोकणातील संस्कृती जपत आहेत याचा खूप आनंद झालाय. पुढील वाटचालीस मनापासून हार्दिक शुभेच्छापत्र...!! असेच तुमच्याकडून सुंदर प्रेरणादायक कार्य घडत राहुदे .....!!

  • @geetathakare5797
    @geetathakare5797 Před rokem +1

    छानच

  • @sumeshsawant2971
    @sumeshsawant2971 Před 16 dny +1

    ग्रामीण कोकण महती छान पटवून देत आहात 👍

  • @user-le6ct5zu3v
    @user-le6ct5zu3v Před rokem +3

    आज समाज्याला तुम्हच्या सारख्या माणसांचा आदर्श 🙏

  • @sforbhosale
    @sforbhosale Před rokem +2

    खूप खूप छान आहे मी गावला गेलं नैसर्गिक वातावरणात जे सामाधन मिळेल तेवढे कोठे नाही आपण नैसर्गिक साधनसंपत्ती जवळ येत आयुष्यात कोठे धावपळ नाही आयुष्य एकदम समाधान मिळतं निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासारखं सुख कुठे आहे का . मुंबईमध्ये रंगबिरंगी आयुष्य आहे. त्यामध्ये पैसा पैसा फक्त दिसतो दिसतच नाही त्या पैशाच्या पाठीमागे पळता पळता आयुष्य निघून जातात काही मिळत नाही सुखाची जेव्हा आनंद मिळतो तेव्हा खूप खूप आजार लागलेले असतात. जेव्हा आजार होतात तेव्हा कळतं की आपण काय मिळालं पैसा करून आणि काय सुख मिळालं

  • @vikasdabir
    @vikasdabir Před rokem +2

    ह्यांना जीवन कळले हो.आजच्या तरुणाईला तुम्ही जोडप्याने आदर्शवत जीवन दाखवित आहात.ब्रह्मचैतन्य सदिच्छा.

  • @MsBlueshark
    @MsBlueshark Před rokem +1

    Kiti sunder!!!

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 Před rokem +3

    प्रसाद ऊतम ठीकानि पोहचला योग्य मार्गदर्शन ऊतम
    जोडप्यातील विचार मातीत मिसळून मातीसाठी काम करण्याची तयारी खुपच भारी वाटले नमस्कार 🙏

  • @gajendrahaldankar1822
    @gajendrahaldankar1822 Před rokem +1

    तुम्ही खरं आणि सुखी आयुष्य जगत आहात.. खुप खुप.शुभेच्छा

  • @shradhagaonkar2474
    @shradhagaonkar2474 Před rokem +3

    निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जाणाऱ्याआणि मातीशी नाळ जोडून अपार कष्ट करणाऱ्याया जोडप्यासाठीतुझा मोलाचं मार्गदर्शन देऊनआणि कौतुक करूनतुझ्या मनाचा खूप मोठेपणा दिसून आलानवीन लोकांच्या प्रवासासाठीतुझा मदतीचा हात नेहमीच पुढे असतोत्याबद्दल धन्यवादअसेच चांगले कार्य तुझ्या हस्ते नेहमी घडत राहोआणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत ही ईश्वरचरणी प्रार्थना

  • @ashasaarang6720
    @ashasaarang6720 Před rokem +1

    नक्की.फुल सपोर्ट.काय सुंदर जागा आहे..वा!

  • @vilassawant8286
    @vilassawant8286 Před rokem +2

    फार छान

  • @vivekthakare6734
    @vivekthakare6734 Před rokem +2

    खुप छान वीडियो आणि स्टोरी 💐💐👌👍👍

  • @sachinkhambe113
    @sachinkhambe113 Před rokem +2

    खरचं great channel red soil

  • @motivationshortsvalavj792

    Khup Chan video ahe

  • @suhasgosavi1310
    @suhasgosavi1310 Před rokem +1

    खूप छान........ तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा........

  • @shailabagwe393
    @shailabagwe393 Před rokem +1

    अप्रतिम,खुप खुप शुभेच्छा तुम्हाला

  • @jyotsnakhamkar3854
    @jyotsnakhamkar3854 Před rokem

    खूप सुंदर सुरेख छानच

  • @LokshahirachiSahityaCharcha

    खुप छान काम करंत आहेत हे दोघे. त्यांना आणि त्यांच्या कार्याला खुप खुप शुभेच्छा

  • @rohitshete629
    @rohitshete629 Před rokem +3

    Great....
    Traditional Touch...
    Educated Thought...
    Profesional Way...
    Enjoy All...
    Superb....
    Great once again...

  • @priyakadam
    @priyakadam Před rokem +9

    खूप अभिमान वाटतो आहे तुम्हा दोघांचे, मलाही असेच जगायला आवडेल. All the very best to your work

  • @priyankakadam83
    @priyankakadam83 Před rokem +19

    Shirish ani pooja very proud of u both....khup inspire aahat tumhi new generations la...long way to go....keep doing more videos....my best wishes are always with u...

  • @vijaysunkale9921
    @vijaysunkale9921 Před rokem +1

    तुम्हा उभयतांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

  • @smitagori8490
    @smitagori8490 Před rokem +1

    फारच छान

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Před rokem +1

    मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि कोटी मोलाचा संदेश मिळाला

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Před rokem +1

    नमस्कार पुजा,शिशिर.....कोकण संस्कृती, परंपरा, चालीरीती, व्रतवैकल्ये उपवास तापास,रूढी....सुंदर आविष्कारच पहायला मिळतो या वैभवशाली, गौरवशाली, निसर्ग संपन्न कोकणचा.....कोकणाचे मनुष्याला भरभरून दिले आहे पण काळाच्या ओघात , पैशाच्या लोभापायी कोकणी माणूस हे वैभव हळुहळू सिमेंटच्या जंगलात रूपांतरीत करणार्यांना पाठीशी घालताना दिसत आहे....हा स्वर्ग जगाच्या पाठीवर कुठेही नाही म्हणून कोकणी बांधवांनो आपल्या जमिनी कोणालाही विकु नका हो.......

  • @jyotitergaonkar6224
    @jyotitergaonkar6224 Před rokem +3

    खूप छान उपक्रम राबवत आहात पूजा ताई आणि दादा..तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 💐

  • @sonalijadhav7184
    @sonalijadhav7184 Před rokem +1

    प्रसाद दा तुझ्यामुळे आणि अश्या लोकांमुळे कोकणातलं असल्याचे अभिमान आहे.great

  • @mrunmayeekoyande9110
    @mrunmayeekoyande9110 Před rokem +2

    अतिशय सुंदर व्हिडीओ छान माहिती दिली आहे सर्वांचे मनापासून स्वागत आहे 👌👌

  • @manishabhoirkar7502
    @manishabhoirkar7502 Před rokem +1

    Khup chan ahe

  • @vinayakvlogs4296
    @vinayakvlogs4296 Před rokem +1

    😍❤️❤️हे खर जीवन.. ❤️😍🙏💯🎉✔️

  • @sunetramainkar5138
    @sunetramainkar5138 Před rokem +1

    Bhari....khup bhari

  • @preetigaonkar9320
    @preetigaonkar9320 Před rokem +2

    खूपच छान रानमाणूस आणि Red soil stories both channels too good. really nostalgic ओढ लाल मातीची

  • @shravanikadam8084
    @shravanikadam8084 Před rokem +1

    खूप सुंदर विचार🙌🙌🙌

  • @sachinthakur-ex8yi
    @sachinthakur-ex8yi Před rokem +2

    प्रसाद तुला follow करता करता मलापण अचानक pop up आला होता पण त्यांच्या लोकल receipe bhagat गेलो आणि फार पूर्वी पासून follow करत आहे
    प्रसाद u all r doing great job

  • @sundertambe269
    @sundertambe269 Před rokem +1

    आज समाज्याला तुम्हच्या सारख्या माणसांचा आदर्श

  • @ujwalak4204
    @ujwalak4204 Před rokem +1

    Kiti sunder nisarg watawaran🙏👍🏻

  • @sushamapathak6369
    @sushamapathak6369 Před rokem

    खरच खूप चांगला प्रयत्न आहे खूप खूप शुभेच्छा

  • @sharwarimhatre4389
    @sharwarimhatre4389 Před rokem +1

    हॅलो प्रसाद, पूजा आणि शिरीष, तुमचा हा व्हिडीओ खूपच आवडला, प्रसाद तुझे तर सगळेच व्हिडिओ आम्ही बघतो, ज्या तळमळतेने तू कोकणासाठी काम करतोयस, कोकणातलं निसर्ग सौंदर्य लोकांसमोर आणतोयस, तिथल्या दुर्मिळ वनस्पती जपण्याचा प्रयत्न करतोयस ते खरंच कौतुकास्पद आहे, आणि आता पूजा आणि शिरीष तुझ्या जोडीला आहेत, खरंच खूप छान वाटतंय, पूजा तुझं स्वयंपाकघर तर इतकं सुंदर आहे, साधं स्वच्छ आणि नीटनेटकं, ती सारवलेली चूल, मातीची भांडी, फडताळातल्या बरण्या अगदी बघत राहावंसं वाटतं, राजा आणि मोगलीही आम्हाला खूप आवडतात, तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडून शुभेच्छा

  • @Ashwathborkar
    @Ashwathborkar Před rokem +1

    खरंच खूप छान प्रवास आणि विचार आहे तुमचा ....तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शभेच्छा ❤

  • @tejasvithakur424
    @tejasvithakur424 Před rokem +1

    अभिमान आहे.

  • @vijayalakshmikamat5399
    @vijayalakshmikamat5399 Před rokem +11

    All the very best to red soil stories and konkani raanmanus. You youngsters are setting very good example. 👏👏👏

  • @makarandpitre6638
    @makarandpitre6638 Před rokem +2

    Great video

  • @deepalimundye4704
    @deepalimundye4704 Před rokem +1

    Khup khup shubhesha

  • @geetathakur9351
    @geetathakur9351 Před rokem +1

    Khupch sundar mahiti.

  • @rajashripuri4934
    @rajashripuri4934 Před rokem +1

    Khup sunder

  • @rajraje58
    @rajraje58 Před rokem +3

    आदर्श जीवन अशी माणसं देखील असतात आज आपल्या चॅनल वर बघितले फारच आनंद झाला हा आदर्श जोडप्याला मनापासून धन्यवाद आज मुली मध्ये शहरी आकर्षण आहे लोक गावाकडून शहरात जात आहेत पण ताई तुमच्या आदर्श घेतील अशी आशा करतो आपल्याला मनापासून शुभेच्छा पुढील वाटचालीस

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 Před rokem

    फारच छान , शहरातून कोकणात येणं हे फार मोठं धारिष्ट्य आहे ,ते तुम्ही दाखवलं या बद्दल तुमचं अभिनंदन, असेच छान छान व्हिडिओ पाठवत जा ,आम्हाला कोकणात येणं शक्य नसलं तरी आम्ही आमच्या कोकणातील घरी जाऊन आल्या सारखं वाटतं .आपले पुन्हा एकदा आभार, आणि उभयतांना शुभेछ्या!

  • @jayprakashnarkar9012
    @jayprakashnarkar9012 Před rokem +1

    छान.सुंदर.साधं.निसर्गाचा सुंगध.आणि रंग आहे.

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Před rokem +1

    Bhari Mast chan Khupp Chan Message 👌👌👌👌👌👌

  • @milindkumarkhabade9915
    @milindkumarkhabade9915 Před rokem +4

    👌👌खरच खुप प्रभावित केलेत. वाईटातून चांगलेच होते याचे ऊदाहरण तुम्ही दाखवून देत आहात. कोरोना कालखंड वाईटच होता पण त्यातुन तुम्हास नवीन दिशा मिळाली. आणि हेही खरे आहे कि गावात रहायची आवड असायला हवी ओढुन ताणुन नाईलाज म्हणून गावी आलो यात अर्थ नाही. आवड तुम्हास इथवर घेऊन आली. यामुळे इतर सुशिक्षित तरुणांना inspiration नक्कीच मिळेल तेही अक्षरशा गाव घर विसरलेत त्याना ओढ लागेल. आणि तसे झाले तर कोकण परत सुजलाम सुफलाम होईल. तुमच्या प्रयत्नास भरघोस यश लाभो अशा शुभेच्छा व आशीर्वाद. 👌👍🙏🙏

  • @sonalilad6366
    @sonalilad6366 Před rokem +1

    Khup chan

  • @deepaksawant2967
    @deepaksawant2967 Před rokem +1

    आम्हाला अभिमान आहे तुमच्या सारख्यान मुळे आम्हा शहरवासीयांना आमच्या लाल मातीची ओढ लागत आहे...... शुभेच्छा

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Před rokem +1

    Wa...Laxmi - Naraynachsma Joda...wa khup mast...Tumchya kamala salute....🙏..Konkanashi asalel nat tumhi japta ..Konkan japata..🙏 God bless you both🙏..

  • @amitmhatre3911
    @amitmhatre3911 Před rokem +4

    खूप छान भावा तू सगळ्या युट्युबर पेक्षा वेगळा आहेस

  • @sugandhabait3751
    @sugandhabait3751 Před rokem +1

    लाल माती.....
    कोकण
    ऐकुन मन प्रसन्न झाले
    अशाच छान छान गोष्टी सांगा

  • @prashantaher7421
    @prashantaher7421 Před rokem +1

    Great👍

  • @surendrapisat8144
    @surendrapisat8144 Před rokem +1

    Great 👍

  • @ShreyJoil
    @ShreyJoil Před rokem +2

    होय हे खर आहे! कोकणाच्या प्रेमात पडण्या सारख सुंदर आहे कोकण .

  • @udayadhatrao6304
    @udayadhatrao6304 Před rokem +1

    खरच तुम्ही खुप असामान्य अहात उत्तरोत्तर उत्तरोत्तर आपली तिघांची प्रगती होवो ही देवाकडे प्रार्थना

  • @r.n.bansode
    @r.n.bansode Před rokem +1

    मला प्रसाद दादाचे सगळीच व्हिडिओ आवडतात आणि आज प्रसाद दादाला तुम्ही सुद्धा आवडलात म्हणजेच आम्हा सर्वांना आवडलात

  • @tausifpathan2957
    @tausifpathan2957 Před rokem +3

    आपण सर्वांचे आभार ... निसर्ग जतन ठेवण्यासाठी तुमची धडपड दिसून येते . इतिहास लक्षात ठेवेन. 🇮🇳🙏

  • @user-tn2qy2mw4f
    @user-tn2qy2mw4f Před 11 měsíci

    Khup sunder video v khup changle vichar