आईने बनवला शेलभेल मच्छीचा कालवण 😍 | Fish Curry In Kokan Village | S For Satish | Ambavali (Kokan)

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • आईने बनवला शेलभेल मच्छीचा कालवण 😍 | Fish Curry In Kokan Village | S For Satish | Ambavali (Kokan) #AaineBanavalaShelbhelMachhichaKalvan #FishCurry #FishCurryRecipe #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    आमचा परिचय :
    आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.

Komentáře • 289

  • @leenamhatre1405
    @leenamhatre1405 Před rokem +6

    आई खूपच मेहनती आहे, मुलगा मुंबई वरून आला की तिच्या आनंदाला पारावार उरत नाही,म्हणूनच जेवण अधिक रुचकर बनते, तुम्हा माय लेकराची जोडी लय भारी.भाग्यवान आहात तुम्ही.गावचे तळलेले मासे व कालवण पाहून तोंडाला पाणी सुटते.मजा आहे तुमची.

  • @maheshbhagat8186
    @maheshbhagat8186 Před rokem +4

    आईने खुप छान मंछी बनवली खरच तोंडाला पाणी सुटते झाडांना पाणी घालणे खुप सुखद वाटते

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 Před rokem +19

    आई खूप प्रेमळ आणि मायाळू आहे गावची माणसं एकदम मन मिलाऊ आसतात मस्त व्हिडिओ दादा आणि आई 👌♥️♥️🙏🙏

  • @riyashirsekar4474
    @riyashirsekar4474 Před rokem +6

    आईसाठी एक like.दादा मच्छी नुसती तिखटात छान होते.तुम्ही मच्छी दाखवतात पण तोंडात पाणी सुटत.

  • @vaishalimayekar9141
    @vaishalimayekar9141 Před rokem +6

    कोकण ची मानस साधी भोली🥰❤️ I Love kokan❤️🌴🌳

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 Před rokem +3

    थिपून थिपून शेलभेल मच्छीचा सार आणि खेकडा रस्सा रेसिपी लय भारी मस्तच अफलातून रेसिपी आई एक नंबर मास्टर शेफ आहे

  • @smitajadhav5874
    @smitajadhav5874 Před rokem +3

    मासेची,रेसिपी,खुपच छान आईची,जेवणाची,पध्दत छान आहे,आईचे,खुप, कष्ट

  • @aforairplane
    @aforairplane Před rokem +174

    महाराष्ट्र मधून कोण कोण आहे 🖐️💖👍

  • @sushmayelve9333
    @sushmayelve9333 Před rokem +6

    खूप खूप सुंदर व्हिडिओ होता, आईच्या बनवलेला मच्छी खेकड्याचा रस्साखूपच छान वाटला , गावचा वातावरण पण खूप छान वाटलं. मन तृप्त झालं 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 Před rokem +1

    कोकणातील वातावरण मस्त आहे,तुमचा जन्म कोकणात झाला भाग्यवान आहात.

  • @manishlotankar1593
    @manishlotankar1593 Před rokem

    मस्त,आईच्या हातचे जेवण म्हणजे स्वर्गच .शेळभेल मछी कालवण सुंदर

  • @pranalimanjarekar8703
    @pranalimanjarekar8703 Před rokem +2

    कुठचं छान आहे गावांच वातावरण आई आणि तु

  • @vijayjadhav4674
    @vijayjadhav4674 Před rokem +3

    गावाकडे मच्छीविकायला येतात त्यांच्याकडून मासे खेकडे विकत घेऊन आईने आपल्या जुन्या पध्दतीने मासे खेकडे बनविले फार अति सुंदर वाटले त्याचबरोबर काजुच्या झाडांना पाणी घातले मनाला बरे वाटले हा व्हीडिओ फार आवडला आहे

  • @sportavinashbharpur2909

    तुमच्या गावचे वातावरण खूप भारी आहे रेसिपी खूप भारी बनवतात आई त्यांच्या हाताला चव काय भारी असतं मग😋🥰

  • @nayanakale1274
    @nayanakale1274 Před rokem +21

    आई किती छान आहे 👌🏻👌🏻❤️

  • @user-nt2ed8qu3j
    @user-nt2ed8qu3j Před měsícem

    आई आणि मुलांची जोडी लय भारी रेसिपी एक नंबर विडीयो खुप खुप छान

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 Před rokem +4

    आईच्या हातची रेसिपी छान व सुंदर 👌👌👌👍👍👍

  • @vandanapawar9222
    @vandanapawar9222 Před rokem +2

    आईचे जेवण पाहून तोंडाला पाणी सुटतं लय भारी जेवण बनवला

  • @sunilhyalij8491
    @sunilhyalij8491 Před rokem +3

    आई खूप छान ,खेकड्यांची रेसिपी तर एकच नंबर 👌👌👌

  • @piyushandarushishorts7056

    आईच्या हाताचे जे वण ऐक नंबर 😍😍😍

  • @jagrutiayare6965
    @jagrutiayare6965 Před rokem +7

    आईच्या हातचे जेवण खूप छान दादा तु lucky आहे

  • @desai74
    @desai74 Před rokem +1

    Dada tumchi aai faar mehenti aahet
    Ani varsha pan ekdum samanjas aahet

  • @prashantzagade9377
    @prashantzagade9377 Před 11 měsíci

    सतीश तुला जी प्रेमळ आई लाभली आहे, तिची आयुष्यभर काळजी घे, तु नशीबवान आहेस की तुला अशी आई मिळाली, सतीश तिची काळजी घे ही माझी कळकळीजी विनंती, तुझ्या पाठीशी तुझ्या आई वडिलांची पुण्याई आहे हे बघून माझे मन भरून आले, तुझी लडकी लेक प्रांजू आणी प्रदनू यांना माझा आशीर्वाद

  • @rutwikkarekar4666
    @rutwikkarekar4666 Před 5 měsíci +1

    10:28 🤣😂 OK 👌🏼

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 Před rokem +1

    Satish Dada ek number video hota ha. Khar sangto gavcha video bagayla khup bhari wat t.

  • @sujatadaware2547
    @sujatadaware2547 Před rokem +2

    आई खूप छान आहेत 👌

  • @rameshayar5033
    @rameshayar5033 Před rokem +1

    खुप छान!या विडीओ मध्ये आपण रिसीपी फक्त न दाखवता आपल्या गावाकडील इतर संस्कृतीचे दर्शन घडवले आणि हेच मुख्यतेकरुन अशा गोष्टी समोर आणुन कोकण संस्कृतीचे चांगल्या प्रकारे ऐक ठेवा इतरांसमोर ठेवता येईल.

  • @sanjayparte2107
    @sanjayparte2107 Před rokem

    फारच सुंदर अनुभव...तुझ्या आईकडे पाहून मला माझ्या आईची आठवण आली. चांगला अनुभव दिल्याबद्दल आभार 🙏🙏🙏

  • @sheetalshelar233
    @sheetalshelar233 Před rokem +1

    Gavache Vedio bghaylay khup mjja yete as vatt amhich te jivan jagatoy....sadh rahaniman sadh jewn khup bhari

  • @ashokshinde4499
    @ashokshinde4499 Před rokem +1

    अप्रतिम दादा खुप छान तुमचे व्हिडिओ पाहील्यावर मनाला समाधान मिळते खुप शुभेच्छा तुम्हाला वर्षा ताई ची रेसिपी लवकर दाखवा आम्ही सातारकर

  • @Mallharkoli.2021
    @Mallharkoli.2021 Před rokem +5

    हो आमचा कडे पण भेटते 20 ची मच्ची

  • @ravikiranrawool457
    @ravikiranrawool457 Před rokem

    गावाकडच वातावरण खूप छान. मिस करतो आपल्या कोकणाला😘😢

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 Před rokem +9

    खूपच रसदार कालवण.. स्वस्त आणि मस्त..! खेकडे रस्सा..😋😋😋😋मस्त बेत..आहे आज छान 👍👌👌🤗🤗😋😋 बघून पाणी सुटले रे बाबा 😃😃😃

  • @nehak6145
    @nehak6145 Před rokem +1

    गावचा नजारा खूप सुंदर,जेवण पण एकदम भारी

  • @sheetalgargote7881
    @sheetalgargote7881 Před rokem +1

    Dada aai gavich ramate...
    Tichi rojachi kam...mehnat...
    Ani tichya maitrini sagal kahi ithech ahe ..
    Khup chan gav...aai❤️

  • @sanjaykamble7924
    @sanjaykamble7924 Před rokem +9

    सतीश तुला तूझ्या आई बरोबर बघतो ना मला माझ्या दिवंगत आईची आठवण येते. तुम्ही दोघेही खूप मेहनती आहात.
    खूप छान व्हिडीओ
    👌👌👌👍👍👍

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 Před rokem

    मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शेखर बुचडे तीळगुळ घ्या आणि गोड गोड बोला

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 Před rokem +1

    Ahyee chea hatchi receipe khub bhari

  • @sampadabhagat3502
    @sampadabhagat3502 Před rokem +4

    मस्त जेवण बनवलं आहे आई. कलर मस्तच आला आहे 👌👌👌👌मस्त रेसिपी😊

  • @roshanmahadik6927
    @roshanmahadik6927 Před rokem +1

    Bhari video lovely resipe mast superb 🌹🌹

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 Před rokem +1

    आई ला नमस्कार... खूप मेहनत घेते आई. तुम्ही पण सगळे.... मासे कालवण एक नंबर केले.. आणि मसाला आणि पाणी गावचे टेस्ट असणारच... कलम आणि झाडें... खूप छान.... मस्त वाटतेय...

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 Před rokem +1

    आई मेहनती, छान👏✊👍

  • @bhausahebmalkar1591
    @bhausahebmalkar1591 Před rokem

    आपले गाव आपली आई आपलेच कोकण

  • @swatipaithankar7572
    @swatipaithankar7572 Před rokem +2

    आईंचा सदैव हसरा चेहरा पाहिला की प्रसन्न वाटते. अन्नपूर्णा आहेत. आम्ही तुमचेच मसाले शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांसाठी वापरतो. वर्षा सुध्दा आईसारखीच आहे, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @sushama4714
    @sushama4714 Před rokem +3

    मस्त बेत!

  • @ashumanwar6273
    @ashumanwar6273 Před rokem

    खूप छान. तोंडाला पाणी सुटले जेवण पाहून 😋😋

  • @gracyuke3474
    @gracyuke3474 Před rokem +1

    Khup chhan fish curry loncha yummy tondala paani ala

  • @gsj3312
    @gsj3312 Před rokem

    आई नमस्कार🙏 खूप छान व्हिडीओ

  • @ashwinigaonkar55
    @ashwinigaonkar55 Před rokem +1

    Lepa fish mast lagte Mla khup avdte Bhari aai ne Jevn kel

  • @dilipthakur8406
    @dilipthakur8406 Před rokem

    Aai jevan massttch banavte , 👌👌

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 Před rokem +5

    दादा कवळ तोडणी पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या. गावच्या चुलीवरच्या जेवण भारी पाहून छान 👌 वाटते.धन्यवाद दादा

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 Před rokem +1

    खूप खूप छान👏✊👍 मस्त 🐟🎣🐠 चींबाेरी

  • @meerachaudhari3094
    @meerachaudhari3094 Před rokem

    आई.छानच आहेत

  • @maheshsalaskar83
    @maheshsalaskar83 Před rokem +2

    कवल तोडणी पाहून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आणि कवल तोडताना खाज खूजली ( कुईले ) लागल्यावर होणारी गडबड आठवून हसू आलं.
    मस्त व्हिडिओ

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 Před rokem +1

    खूप खूप छान विडिओ

  • @narayanvalvi6809
    @narayanvalvi6809 Před rokem

    Kaku far mast raishipi

  • @upansare3135
    @upansare3135 Před rokem +5

    दादा आईला एक छान कढाई घेऊन दे ही खुप खराब झाली .

  • @geetashetti9420
    @geetashetti9420 Před rokem

    आई छान जेवण बनवते तोंडाला पाणी सुटते बघूनच. ती मासे धुवून धुवून घेते ते मला आवडले.मला पण मासे स्वच्छ धुतलेली लागते. तीचे काम नीट नेटके असते.

  • @patelvijay3983
    @patelvijay3983 Před rokem +1

    Jordar racipi ahe..

  • @kunalkashid5668
    @kunalkashid5668 Před rokem +1

    Bhava bakichyanpeksha tuzya video bagayla majja yete 😘

  • @anilsagvekar209
    @anilsagvekar209 Před rokem +1

    जेवण बघुनच भूक लागली 🦀🦀🦀😋😋😋

  • @tejashreekalsekar2823
    @tejashreekalsekar2823 Před měsícem

    Khup khup chhan

  • @pradnyavelaskar984
    @pradnyavelaskar984 Před rokem

    Dada tuze aai khup sadhi aahe khup hardworking aahe tyanchya mule tuze Chanel khup famous aahe no one Aai

  • @mayurishinde3629
    @mayurishinde3629 Před rokem +1

    आई खूप सुंदर जेवण 👌😋😋

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před rokem

    Khupach chaan tasty jevaan aai chya hatacha mast video dada

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 Před rokem +1

    Super fish recipe ak number aai 👍👍👍

  • @sandeshkemble2179
    @sandeshkemble2179 Před rokem

    Nice cat

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 Před rokem +1

    सतिश . गावाकडे फारच मजा असते
    गड्या आपला गाव बरा🙏🏻👌

  • @chitranshworld8335
    @chitranshworld8335 Před rokem +1

    Mast receipe...mi pan lonche ani tyacha sar kadhi bhaji madhye ghalte...khup chan hote

  • @sharathamin9957
    @sharathamin9957 Před rokem +1

    U r a lucky person..to live in such a beautiful place

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra Před rokem +2

    वाटण न चालता रस्सा मस्त दिसतोय अशी भेळ कधी नाही खाल्ली.
    सर्दी गायब झाली असणार. छान वाढली झाडं. आंबा पालवला आता मोहोर येणारं काय?

  • @meenamhatre1232
    @meenamhatre1232 Před rokem +1

    छान रेसिपी

  • @bhausahebmalkar1591
    @bhausahebmalkar1591 Před rokem +1

    Mast zkas video

  • @kanchanbhor6274
    @kanchanbhor6274 Před rokem

    Khup chan vĺog

  • @MeMarathi9999
    @MeMarathi9999 Před rokem +3

    Satishrao Vlog ekdum mast,kakuna namaskaar sanga 🙏🏻✨✨

  • @jayashreechaudhari4633
    @jayashreechaudhari4633 Před rokem +2

    मस्त च👌👌

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 Před rokem

    आईंना माझा नमस्कार जेवण खूप छान बनवले

  • @pradnyachawan5187
    @pradnyachawan5187 Před rokem

    Tumchya Aaila Maza Namskar.

  • @rupalikatkar
    @rupalikatkar Před rokem +3

    तुमच्या गावाचे द्रुश्य पाहुन मन अगदी प्रसन्न होते

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 Před rokem +15

    Kaku ek NO1 fish recipe mouth watering THANKS for exploring dada very nice video 🙏😋😋✌👍👌

  • @sawativikaskalgude9437
    @sawativikaskalgude9437 Před rokem +1

    Kiti swast ahe mhavra

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 Před rokem

    दादा शेलभेल म्हणजे काय ते सांगा तुमचे व्हिडिओ खुप छान असतात तुम्ही नेहमी मच्छी खातात तर त्यामुळे तुम्हाला त्रास होत नाही का खुप छान रेसिपी असतात

  • @payalpahelkar226
    @payalpahelkar226 Před rokem

    Tumcha gavch khup chan aahe

  • @nitinlende86
    @nitinlende86 Před rokem +1

    Simple food best food ...

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 Před rokem +1

    खूप छान गावचे video आणि मासे रेसिपी , गावची मजा काही वेगळीच, मी पण गावी alibag la जाणार आहे आता पोपटी banvaila मच्छी khaila..Nice video.

  • @snehalthakur2329
    @snehalthakur2329 Před rokem

    Superb video astat dada tumche

  • @sarojshivalkar7789
    @sarojshivalkar7789 Před rokem +2

    आई खूप गोड आहे.
    V.beautiful vlog

  • @savitalifestyle5399
    @savitalifestyle5399 Před rokem +1

    Dada gavakdeche video chan aahet 👌👌👌

  • @nandinibhandare13
    @nandinibhandare13 Před rokem +1

    Dada khekdyan mdhe besan ch te batter kel na besan ani masale vgre te khekdyanchya aat takun tyacha rassa kraych khup Chan lagt tyavr ekda video houn de😁😁... Me pn mandangad chi ahe 😊

  • @pravinasalvi2458
    @pravinasalvi2458 Před rokem +1

    मस्त मच्छि किती स्वस्त रे वा

  • @manashiajambhulkar5166
    @manashiajambhulkar5166 Před rokem +3

    Mast 👌

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Před rokem +1

    Yummy Tasty Mast Apratim 👌👌👌😋😋😋😋😋😋

  • @shilpa37pathak
    @shilpa37pathak Před rokem

    Chan video ahe

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 Před rokem +1

    Mast Recipe

  • @kavitabhosale4022
    @kavitabhosale4022 Před rokem +1

    Kup bhari vatat💕💕🥰👏🙏👍

  • @pushkartravels
    @pushkartravels Před rokem

    Sathish my suggestion aaila Sparx chat walking shoes gheun Dey gaavi ghaltil raanat vagaire jaatana

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 Před rokem +4

    आई राहणार का कायम chi panvel la

  • @sandeshkemble2179
    @sandeshkemble2179 Před rokem

    Chhan

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 Před rokem +1

    वाह वाह..काय मंस्त रेसीपी..कलर..भारी...😋😋👌👌 विडीयो..👍✌️ आई..,🙏🙏 हो हे खर आहे..गांव चा पाणीत जादु आहे..चव खूप छान लागतें...😁😁 गांव च वातावरण..मांणस..कीती मंस्त...❤️

  • @Bhaktiskitchen3
    @Bhaktiskitchen3 Před rokem +1

    Khup sunder 😊