Bhairavgad treak | Overhang climb | GoPro | moroshi, malshej ghat, Maharashtra, India | Bhairavgad

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 02. 2022
  • भैरवगडाचा थरार नक्की बघा.. एक नैसर्गिकरीत्या संपन्न असलेला किल्ला.. #मोरोशीचा_भैरवगड #मोरोशीचा_भैरोबा #भैरवनाथ
    Bhairavgad
    #maharashtra_desha
    पहाण्याची ठिकाणे :
    गडाच्या माचीवर कुठलेही अवशेष नाहीत. माचीवरून बालेकिल्ल्याकडे जातांना आपण डाईकच्या(बालेकिल्ल्याच्या) पायथ्यापाशी पोहोचतो. तिथेच पाऊल वाटेच्या वरच्या बाजूला पाण्याच टाक आहे. पाण्याच्या टाक्याच्या उजव्या बाजूला कातळात कोरलेली एक आयताकृती गुहा आहे, परंतू या गुहेत जाण्यासाठी गिर्यारोहण तंत्राचा वापर करावा लागतो. पुढे त्याच पाऊल वाटेने आपण बालेकिल्ल्याच्या पूर्व टोकापाशी पोहोचतो. येथे साधारण ५० फूट उंचीवर कातळात खोदलेली आयताकृती गुहा आहे. या गुहेत जाण्यासाठी सुध्दा गिर्यारोहण तंत्राचा वापर करावा लागतो.Bhairavgad
    बालेकिल्ल्याच्या पूर्व टोकाला वळसा घातल्यावर आपण भैरवगड व बाजूचा डोंगर यामधील खिंडीत पोहोचतो. येथून बालेकिल्ल्याच्या कातळ कड्यावर खोदलेल्या पायर्‍या दिसतात. अंदाजे ५० पायर्‍या चढल्यावर आपण एका कातळात खोदलेल्या गुहेपाशी पोहोचतो. या गुहेत शिरण्यासाठी गुहेच्या पायथ्याला एक भोक पाडलेले आहे. त्यातून सरपटतच गुहेत प्रवेश करावा लागतो. ४ फुट लांब, २ फूट रुंद व ८ फूट उंच असलेली ही गुहा चारही बाजूने बंद आहे. फक्त गुहेच्या दर्शनी बाजूच्या ५ फूट उंचीवरील कातळ आयताकृती कापलेला आहे. गुहेच्या मागच्या भिंतीवर लाकडी वासे अडकवण्यासाठी खोबण्या खोदलेल्या आहेत. या वाशांवर गवताचे छप्पर तयार केल्यावर गुहेत बसलेल्या पहारेकर्‍याचे ऊन - पाऊस यापासून संरक्षण होत असे.. Bhairavgad
    पोहोचण्याच्या वाटा :
    मुंबई - कल्याण - मुरबाड मार्गे माळशेज घाटाच्या पायथ्याचे मोरोशी गाव गाठावे. (नाणेघाटला जाण्यासाठी आपण वैशाखरे या गावात उतरतो, या गावा पुढेच मोरोशी गाव आहे.) मोरोशी गावातून गडावर जाण्यासाठी २ वाटा आहेत. Bhairavgad
    १) मोरोशी गावाहून माळशेजच्या दिशेने जातांना पोलिस चेकपोस्ट व जय मल्हार धाबा आहे. येथे उजव्या बाजूस ( जय मल्हार धाब्याच्या विरुध्द बाजूस) एक पायवाट जंगलात शिरते. या पायवाटेने १० मिनीटात आपण सुकलेल्या ओढ्यापाशी पोहोचतो. येथून डाव्या बाजूची वाट पकडून समोरची टेकडी चढायला सुरुवात करावी. दोन टेकड्या पार केल्या की आपण एका छोट्या पठारावर पोहोचतो. येथे दुसरी वाट येऊन मिळते. अजून एक टप्पा चढून गेल्यावर आपण किल्ल्याच्या माचीवर पोहोचतो. पायथा ते माची साधारणत: १.५ ते २ तास लागतात. माची वरुन डाईकच्या (बालेकिल्ल्याच्या) पायथ्याशी पोहोचण्यास १५ मिनीटे लागतात. डाईकच्या पूर्व टोकाला वळसा घालून खिंडीत पोहोचण्यासाठी १५ मिनीटे व बालेकिल्ला दोरांच्या सहाय्याने सर करण्यास १ तास लागतो. Bhairavgad
    २) मोरोशी गावाहून माळशेजच्या दिशेने जातांना पोलिस चेकपोस्टच्या पुढे उजव्या हाताला वनखात्याने " किल्ले भैरमगड गुंफा मार्ग , वनविभाग ,ठाणे " अशी पाटी रंगवलेली कमान उभारलेली आहे. त्या कमानीच्या बाजूने जाणारी वाट डोंगर उतारावरील शेतां मधून गडावर जाते. हि वाट पहिल्या वाटेला पठारावर मिळते. पुढील मार्ग वर दिल्या प्रमाणेच आहे. एक Bhairavgad भैरवगड
    राहाण्याची सोय :
    गडावर रहाण्याची सोय नाही, पण मोरोशी गावात किंवा धाब्यांवर रात्री पुरती रहाण्याची सोय होते.
    जेवणाची सोय :Bhairavgad भैरवगड
    गडावर जेवणाची सोय नाही, मोरोशी गावातील धाब्यांवर ऑर्डर देऊन गड चढण्यासाठी जावे.
    पाण्याची सोय :
    बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी (बारमाही) पाण्याचे टाक आहे.
    जाण्यासाठी लागणारा वेळ : Bhairavgad भैरवगड
    मोरोशी गावातून पायथा ते माची साधारणत: १.५ ते २ तास लागतात. माची वरुन डाईकच्या ( बाले किल्ल्याच्या) पायथ्याशी पोहोचण्यास १५ मिनीटे लागतात. डाईकच्या
    सूचना :
    जून ते ऑक्टोबर गडावर जाणे टाळावे. Bhairavgad भैरवगड
    १) भैरावगड (मोरोशी) किल्ला सर करण्यासाठी गिर्यारोहण तंत्राची माहिती असणे व साहित्य बरोबर असणे असणे आवश्यक आहे. Bhairavgad भैरवगड
    २) सोबत ३०० फूटी दोर घेतल्यास कातळटप्पे चढता उतरताना खोळंबा होत नाही.
    ३) किल्ला उतरतांना रॅपलिंग तंत्राचा वापर करावा.
    ४) सुळके व भिंती चढणारे गिर्यारोहक हा कातळटप्पा फ्रि क्लाईंबींगने चढू शकतात.
    Bhairavgad भैरवगड
    • Majhya Raja Ra Song - ... - song
    Mazya Raja re..
    Bhairavgads is located at the moroshi village 5 km from Malshej Ghaat in the Murbad taluka of Thane district.
    Bhairavgad fort is located in the Sahyadri mountains of the Indian state of Maharashtra.

Komentáře • 28

  • @GiriShri
    @GiriShri Před 2 lety +1

    Mitra tuza jiddi la salam
    Tu khup mehanat ghetlis gad sar karayla
    Ani dhanyavad amha sarvana safety harness deun climbing sathi help kelyabaddal 🙏🏽
    जय शिवराय ⛳️

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety +1

      दादाराव मनापासून धन्यवाद..
      मुळात तुमच्या हातातला हिंदवी सवराज्याचा भगवा ध्वज.. त्या साठी लागणारा बांबू आणि बरंच काही.. तुमची चिकाटी खुप होती.. म्हणून आमचे सहकारी वैभव सर यांनी तुम्हाला वर नेले..
      अशीच चिकाटी कायम ठेवा..
      एक दिवस नक्कीच आपला असेल 😊🙏🚩
      पुन्हा भेट होईलच..
      तुमचा नंबर मला पाठवा..
      जय शिवराय 🙏🚩🚩

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety +1

      7387242789

  • @ganeshpatil2899
    @ganeshpatil2899 Před 2 lety +1

    Very nice Chaudhari sir n team💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @BuntyShinde4252
    @BuntyShinde4252 Před 2 lety +2

    दादा अतिशय छान माहिती मिळाली..!🚩☺️👌🏻

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety +1

      मनापासून धन्यवाद बंटी दादा 🙏🔥🚩

  • @gopinathgite653
    @gopinathgite653 Před 2 lety +1

    खुप छान सर.
    जय जिजाऊ जय शिवराय.

  • @vikrantmali2594
    @vikrantmali2594 Před 2 lety +1

    बंधू खूप छान 🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩

  • @Shivsuryajaal
    @Shivsuryajaal Před 2 lety +1

    हर हर महादेव 🚩🙏🏻

  • @sanjayjadhav-ld5gk
    @sanjayjadhav-ld5gk Před 2 lety +1

    अप्रतिम आशुतोष भाऊ खूप छान 👍👍👍👍

  • @yogesh_kale
    @yogesh_kale Před 2 lety +1

    Mast bhau 🙏

  • @JAYHANUMAN909
    @JAYHANUMAN909 Před 2 lety +1

    छान जय शिवराय

  • @niteshpimplevlogs
    @niteshpimplevlogs Před 2 lety +1

    सह्याद्रीचं रौद्र रूप 👌 🚩🚩🚩

  • @shubhamdhanorkar1361
    @shubhamdhanorkar1361 Před 2 lety +1

    Bhava apn bhetlo ahe tych divshi bheravgada var Shubham for Nagpur Solo Traver khup chan video keep it up 🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍 jai maharashtra jai Shivray 🚩🚩🚩

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety

      धन्यवाद दादा
      जय शिवराय
      जय महाराष्ट्र पुन्हा लवकरच भेटू 😍😊🙏🚩

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety

      तुमचा नंबर पाठवा दादा
      sahyadri2519@gmail.com

    • @shubhamzilla84
      @shubhamzilla84 Před 2 lety

      @@MaharashtraDeshaVlogs ok 👍👍👍

  • @niteshpimplevlogs
    @niteshpimplevlogs Před 2 lety +1

    🚩🚩🚩

  • @Ghumakkad_Sachin
    @Ghumakkad_Sachin Před rokem

    Episode 1 Trirashmi-Pandav caves, Nashik
    czcams.com/video/73CUfQCD4H4/video.html
    Episode 2 Trirashmi-Pandav caves, Nashik
    czcams.com/video/oNXdBVe--w0/video.html
    Episode 3 Trirashmi-Pandav caves, Nashik
    czcams.com/video/5Taed5aYcqw/video.html
    Kanheri caves, Mumbai:
    czcams.com/video/VaqWBSUpCXk/video.html
    Lothal-Indus Valley Civilization:
    czcams.com/video/Gw_gluB0gyg/video.html
    Dholavira- Kutch Sindhu culture:
    czcams.com/video/xrxliZ7eZuM/video.html
    Karle caves, Lonavala:
    czcams.com/video/kOxBIkb3mPo/video.html