नंदुरबार येथे रेवा फाउंडेशनतर्फे 4 ऑगस्ट रोजी विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • नंदुरबार येथे रेवा फाउंडेशनतर्फे 4 ऑगस्ट रोजी विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन. नंदुरबार जिल्ह्यातील वाढत्या आरोग्य समस्या, या समस्यांवर कायम स्वरूपी उपाय योजना व्हावी, असा मानस असून आरोग्य शिबिराच्या रूपाने सामाजिक सेवेचा वारसा जपण्यासाठी 4 ऑगस्टपासून जिल्ह्यातील आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ करण्यात येत असल्याची माहिती रेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर समिधा नटावदकर यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे, 4 ऑगस्ट रोजी नंदुरबार शहरातील कन्यादान मंगल कार्यालय येथे आयोजित आरोग्य तपासणी शिबिरा संदर्भात माहिती देण्यासाठी श्रीद्वारकाधीश संस्थानच्या संत सभागृहात शनिवारी पत्रकार परिषद घेण्यात आली, 4 ऑगस्ट 2024 रोजी कन्यादान मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिरात नंदुरबार जिल्ह्यात सिकलसेल, ॲनिमिया, कुपोषण, बालमृत्यू, माता मृत्यू तसेच किशोरवयीन मुलांमध्ये आत्महत्येचे वाढते प्रमाण, आरोग्यविषयक अनास्था, अंधश्रद्धा, कमी वयात होणारी लग्ने अशा अनेक समस्या नंदुरबार जिल्ह्यात आहेत, या समस्यांवर ठोस उपाय शोधण्या साठी खूप कमी उपाययोजना झाल्या आहेत, या सर्व गरजू रुग्णांसाठी रेवा फाउंडेशन लवकरच रेवा हेल्थ कार्ड आणणार आहे, या हेल्थ कार्डच्या माध्यमातून गरजू रुग्णांशी रेवा फाउंडेशनचा थेट संपर्क राहील, रेवा फाउंडेशनच्या तज्ज्ञ डॉक्टरांची टीम नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाऊन आरोग्य शिबिर राबविणार आहे, या टीममध्ये सर्व क्षेत्रातले डॉक्टर आहेत, रुग्णांच्या समस्या लक्षात घेऊन त्यावर पुढील उपाय योजना सुद्धा करण्यात येणार आहेत, फिरता दवाखाना, रुग्णवाहिका असे उपक्रमही रेवा फाउंडेशन मार्फत लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहेत, पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक प्रशांत पवार यांनी केले, तर सूत्रसंचालन सुलभा महिरे यांनी केले, 4 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेपासून दुपारी चार वाजेपर्यंत अखंडपणे आरोग्य तपासणी शिबिर होईल, या विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचा शहर व जिल्ह्यातील गरजू नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन रेवा फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

Komentáře • 8

  • @mk2lj
    @mk2lj Před měsícem

    ❤❤

  • @RajuGavit-bv9bq
    @RajuGavit-bv9bq Před měsícem

    Nice

  • @milindgavit4588
    @milindgavit4588 Před měsícem +3

    आता फक्त समिधा ताई साहेब 💐🙏🙏

  • @shar619
    @shar619 Před měsícem

    चांगला उपक्रम डाॅ,सुमीधा मॅडम 🎉 🎉

  • @vikramchavhan8503
    @vikramchavhan8503 Před měsícem

    छान

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 Před měsícem +3

    डॉ.समिधा जी जिंदाबाद ✊ व आपले अभिनंदन 🌹🙏 अतिशय महत्वपूर्ण विषय आपणं हाथी आपणास धन्यवाद व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ....जय मल्हार न्युज चॅनल आपणं नंदुरबार मधील प्रत्येक घडामोडी जनतेच्या पर्यंत पोहोचवता धन्यवाद 🌹

  • @sulbhapane3939
    @sulbhapane3939 Před měsícem +2

    अप्रतिम उपक्रम बेटा 👍🏽

  • @anildhole4621
    @anildhole4621 Před měsícem +2

    जय मल्हार 🙏🙏🙏🙏🙏