खजिना (Khajina) | Marathi | Poems | Vaibhav Joshi | Suresh Bhat | Spruha Joshi

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 05. 2020
  • आज 'खजिना' या कार्यक्रमाच्या एपिसोड मध्ये सुप्रसिद्ध गीतकार वैभव जोशी यांच्या सोबत त्यांच्या आवडत्या पुस्तकांबद्दल, कवितेंबद्दल खूप गप्पा मारल्या. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला नक्की comments मध्ये कळवा.
    वैभव जोशी यांच्या Official CZcams Channel ची link 👉 / @vaibhavjoshiofficial8901
    In today's episode of 'Khajina' I got an opportunity to talk to Lyricist Vaibhav Joshi about his love for books, poems and Suresh Bhat.
    #SpruhaJoshi #Marathi #Khajina
    ------------------------------------**************************----------------------------
    DISCLAIMER : This is official youtube channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional Purpose and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
    ___________________________________________________________________
    Follow for regular updates about my work on
    👉 Facebook : / spruhavarad
    👉 Twitter : / spruhavarad
    👉 Instagram : / spruhavarad

Komentáře • 326

  • @drlatabichile9596
    @drlatabichile9596 Před 2 měsíci

    डॉक्टर व्यवसायात असल्याने, आणि भावनिक असल्याने मला मराठी साहित्य ऐकण्याची सवय आहे. आपला खजिना ऐकताना तरुण कवि, कवयत्रिंचे अर्थपूर्ण विवेचन ऐकताना खूप संपन्न वाटते. ताण निघून जातो..

  • @nalugogate463
    @nalugogate463 Před 4 lety +3

    वैभवजी आपली मुशाफिरी ज्ञानाच्या विविध क्षेत्रात असूनही आपण खूपच विनम्र आहात म्हणूनच "विद्या विनयेन शोभते " हा सुविचार मनापासून भावला. नवीन पिढीने ही महत्वाची गोष्ट शिकावी.आपल्याला अनेक शुभेच्छा

  • @Amabhijeetmane
    @Amabhijeetmane Před 4 lety +12

    Hi Spruha, I started reading/understanding poems because of this show. Khajina with Vaibhav sir is one of the best episode. Thanks

  • @prabhakartiwatane192
    @prabhakartiwatane192 Před 3 lety +2

    ! स्पृहा जोशी. एक अल्लड बालिका. अगदी माझ्या मुली सारख्या व्यक्तीमत्वाची. ही मुलाखत तोच आनंद देणारी. आठव रहावे असे वाटते. हाच स्वभाव राहुदे. शुभाशीर्वाद

  • @aartipande9286
    @aartipande9286 Před 4 lety +3

    औदुंबर कवितेचा हा नव्याने सापडलेला अर्थ मी 10 वेळा तरी मागे जाऊन जाऊन ऐकला. धन्यवाद दोघांनाही !!!

  • @archanajadhav5294
    @archanajadhav5294 Před 2 lety +2

    वैभव सर खुपच छान . माझेही भाग्य अशाच ऐका पावसाला मीही भेटलो आहे. धन्यवाद ताई वैभव सरांचे खुपछान अनुभव ऐकायला मिळाले .

  • @dipakgurnule7438
    @dipakgurnule7438 Před 3 lety +1

    स्पृहा तू म्हटल्याप्रमाणे वैभवने कविता आस्वाद नि समीक्षक या नव्या भूमिकेतून मराठी साहित्यात भर टाकावी,ही विनंती

  • @shreenathjehurkar9054
    @shreenathjehurkar9054 Před rokem +2

    कितीही वेळा मी हा episode पहिला तरी माझं मन भरत नाही. मी परत परत पाहत राहतो.. आस्वाद घेत राहतो.... माझ्या कित्येक रात्री या episode मुळे सुखकर झाल्या आहेत . कधी विचारात गेल्या आहेत. कधी फक्त निःशब्द पण झालोय आणि कधी मनात खूप विचार आणि बाहेर निरव शांतता असही झालं आहे.
    मी दुसऱ्या भागाची वाट पाहतोय.
    एक रसिक म्हणून मी तुमच्यावर जितकं प्रेम करतो त्या अधिकारवाणीने तुम्हाला request करतोयं please स्पृहाताई आणि वैभव दादा मी याच्या दुसऱ्या भागाची वाट पाहतोय...

    • @dattaprasadkulkarni6302
      @dattaprasadkulkarni6302 Před 3 měsíci

      खुपच सुंदर काव्य वाचन आणि समीक्षा

  • @apurvasahasrabuddhe4220
    @apurvasahasrabuddhe4220 Před 4 lety +4

    खरंच खूप मोठा खजिना सापडला.... Waiting for one more session... कविता म्हणजे केवळ शब्द नव्हे त्यात किती काय काय दडलेलं असतं... हा session बघताना आजूबाजूचं जग जाणवतच नव्हतं.... फक्त ऐकत राहावं आणि साठवत रहावं एवढंच वाटत होतं..... खूप खूप मिळालं... Amazing experience...

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 Před 4 lety +2

    मराठी भाषेचे 'वैभव'आहे.निव्वळ अप्रतिम कार्यक्रम आहे. स्पृहा खुप धन्यवाद तुला.♥️♥️

  • @madhurideshpande6332
    @madhurideshpande6332 Před 4 lety +1

    खूप अप्रतिम. मलाही कविता ऐकायला खूप आवडतात. कविता कशी वाचावी किंवा कवितेत काय शोधाव हे कळाले. वैभव जोशीसोबत अजून भाग होण आवश्यक आहे.

  • @swatikarle4792
    @swatikarle4792 Před 3 lety +1

    मी त्यांचा पुण्यातला एस एम जोशी सभागृहात झालेला कवितांचा लाईव्ह कार्यक्रम पाहिला आहे त्यात इलाही जमादार प्रदिप निफाडकर व संदिप खरे हेही होते खूप आवडला होता कार्यक्रम

  • @apurvakulkarni5387
    @apurvakulkarni5387 Před 4 lety +7

    2 जोश्यांची जुगलबंदी अजून एकदा होऊन जाऊ द्या..👍

  • @anujaagashe9003
    @anujaagashe9003 Před 3 lety +1

    वा खूपच छान कार्यक्रम
    मला ही कविता म्हणजे बालकवींचे जीवन वाटते त्यातील औदुंबर म्हणजे स्वत बालकवी ज्यांच्या कविता रूपी छायेत आजही आपण एक वेगळी अनुभूती घेत आहोत (चुकीचे वाटल्यास क्षमस्व)

  • @nehadhar9141
    @nehadhar9141 Před 4 lety +2

    अत्यंत शब्दातीत असा अनुभव आज मिळाला. ह्या कार्यक्रमाचा श्रोता होताना धन्य वाटले. अशा नितांतसुंदर कथनाची संधी आम्हाला उपलब्ध करून देण्यासाठी तुम्हाला खुप खुप धन्यवाद. श्री. वैभव जोशींबरोबर अजून एक भाग नक्कीच व्हावा अशी आग्रहाची विनंती आहे.

    • @nehadhar9141
      @nehadhar9141 Před 4 lety

      अजून एक आग्रहाची विनंती की कृपया श्री. संदीप खरे आणि श्री गुरु ठाकूर यांच्या बरोबर ही एक एक भाग जरुर करावा.

  • @pramodprasadbhujbal603
    @pramodprasadbhujbal603 Před 4 lety +3

    ताई खूप खूप धन्यवाद हा सेशन CZcams वर पोस्ट करण्यासाठी नाही तर खोप मोठ्या खजिन्याला मुकलो असतो.

  • @deepalikarajgikar6730
    @deepalikarajgikar6730 Před 4 lety +2

    खूपच छान कार्यक्रम . बऱ्याच दिवसाने एवढा उत्तम कार्यक्रम ऐकता आला मन अगदी तृप्त झाले बालकवींची औदुंबर कविता नव्याने कळली. कवी वैभव जोशी यांचा साधेपणा व प्रामाणिकपणा मनापासून भावला. मस्तच

  • @kiranpadyal2471
    @kiranpadyal2471 Před 4 lety +2

    कार्यक्रम खूपच छान झाला..
    वैभव जोशी सर ना कार्यक्रमात कविता एकवताना पाहिलं आहे पण आज त्यांचा प्रवास एकता आला हे केवळ तुमच्यामुळे... खजिना ❤️💚
    लव्ह उ❤️💚 वैभव सर

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 Před 4 lety +13

    "औदुंबर" explaination extra ordinary ... hats off to u vaibhav joshi. Thnx spruha 🌷❤

  • @mayamule3274
    @mayamule3274 Před rokem

    खरंच खूप मनमोकळ्या गप्पा झाल्या. वैभव जोशी अगदी सहज, साध्या, सरळ भाषेत लिहितात. कुठलीही किचकट, अवघड, प्रक्रिया नसते यांच्या लेखनात असतो केवळ आस्वाद! आणि ज्या धर्तीवर ते कवितेपर्यंत आपल्याला घेऊन जातात. कविता जगायला भाग पडतात ही जादू असते ती कुणाच्याही शब्दाला साध्य होत नाही. ही नैसर्गिक देण आहे !

  • @sushamakulkarni216
    @sushamakulkarni216 Před 4 lety +2

    औदुंबर कवितेचा अर्थ कमाल सांगितलाय...मला आठवीला होती,त्याचा अर्थ काही वेगळाच लिहीलेला आठवतोय.४२वर्षानंतर खरा अर्थ कळाला.✌️👌👌

  • @coherent5605
    @coherent5605 Před 4 lety +2

    खूपच सुंदर सकाळी उठल्यावर लख्ख सूर्यप्रकाश स्वच्छ आभाळ पाहिल्यावर जो अनुभव येईल तसा आला

  • @MySnehal
    @MySnehal Před 4 lety +3

    Dada....औदुंबर चं विश्लेषण ऐकून अंगावर शहारे आले. मनापासून धन्यवाद. खरचं Thank you🙏🏻

  • @swatikarle4792
    @swatikarle4792 Před 3 lety +1

    खूपच छान मी ही कविता वेडीच असल्याने कार्यक्रम संपूच नये अस वाटतंय खूप छान स्पृहाजींच निवेदन विचारणं तसच वैभव सराचं सांगणं त्याच्यां कवितेचा गजलचा प्रवास ऐकायला खूप छान वाटले

  • @shubhamjoshi8498
    @shubhamjoshi8498 Před 3 lety +4

    Watching 10th time this program in 1 year and still impressed by every time...Always and forever ever fan of Spruha ma'am and Vaibhav Sir

  • @rupaleep
    @rupaleep Před 4 lety +1

    मग माझा जीव या कावितेचा भावार्थ इतक्या सुंदर सहज रित्या समजवल्या बद्दल वैभव दादा आपले मनपूर्वक आभार

  • @makarandchobe154
    @makarandchobe154 Před 2 lety +1

    कसल प्रेम हे .... बेटावरील राहील .....तर शेवटी ऐक शेर लीहू शकलो तर बस .........वा खूप छान

  • @dipakgurnule7438
    @dipakgurnule7438 Před 3 lety

    औदुंबराच्या समीक्षनात वैभव ची वैभवशाली समीक्षकाची झलक दिसते,स्पृहा तू नक्की पुढाकार घेऊन वैभवला रामायण, महाभारत सारख्या ग्रंथावर समीक्षण करायला सुरुवात कर,हा पठ्ठा जागतिक स्तरांवर आपल्या साहित्याला नावलौकिक देईल यात शंका नाही👌👍

  • @surekhashete4720
    @surekhashete4720 Před 4 lety +1

    माझ्या मराठीचा बोलू कौतुके परी अमृतात ही पैजा जिंके...
    औदुंबर कवितेच विश्लेषण अप्रतिम

  • @vaidehiathalye8373
    @vaidehiathalye8373 Před 4 lety +2

    खुप छान...औदुंबर कवितेचा अर्थ निव्वळ शब्दातीत.....वैभवजी शब्दांच वैभव अजुन अनुभवायला आवडेल ..

  • @mandarkelkar
    @mandarkelkar Před 4 lety +1

    वैभव जोशी यांच्या बरोबरच्या "खजिना" भाग खूपच भारी होता. अजून पुढच्या भागात त्यांच्याकडून कविता ऐकाव्यात - मग माझा जीव तुझ्या ... काय कवितेच वर्णन केलंय ... वाह ... !

  • @madhavimore2246
    @madhavimore2246 Před 4 lety +1

    Spriha khajina ha prakar khoopach avadala ahe.ya lockdown chya kalat ase kahi iektana khoop anand hot ahe.vaibhav joshina salam khoop avadalya gappa.pramanik vatalya.kavitatar avadtatch.atta anakhi javal alyasarkhya.vatalya.all the best Vaibhav joshi.n spruha.

  • @vrushalishrikant6248
    @vrushalishrikant6248 Před 3 lety +1

    स्पृहा मला तुझा हा कार्यक्रम पार आवडतो ‌आहे... खूप छान गप्पा मारतेस तू.. आणि त्यातून खूप काही उलगडत जातं..मस्तच

  • @madhurijoshi2569
    @madhurijoshi2569 Před 4 lety +1

    Thanks Spruha
    वैभव जोशी यांच्या कविता मला खूप आवडतात.कविता कशी समजून घ्यावी हे सरांनी खूप छान सांगितले.

  • @chhayakhare
    @chhayakhare Před 4 lety +1

    वैभव , औदुंबर कवितेचा अर्थ वेगळ्या दृष्टीने मांडला आहे तो superb !! दुसरा शब्द सुचत नाही

  • @madhaviarolkar5548
    @madhaviarolkar5548 Před 3 lety +1

    Hi.... Spruha , sorry ekeri sambodhala, pan no option. Me khajinyache daar Aattach ughadalay ani eka magun ek lakhalakhati ratna , hire , jawahire pahatey, mazach mazyavar vishwas basat nahi. Including Spruha ratna.
    Khupach sundar upakram zala.
    Shri Vaibhav Joshi mhanaje tar kalasach aahe. I'm totally speechless.
    May you all be Blessed!!! 🙏🏻🙏🏻

  • @seemamukherjee7361
    @seemamukherjee7361 Před 4 lety +1

    Atishay sunder episode. Vaibhavjincha kavitebaddalcha ekun abhyas kharach khup chan ahe.Jasa kunitari adhi mhantalai tasa manat yeta ki shala college madhe astana ashi kavita kuni samjavlich nahi.
    Spruha nehmipramanech atishay god ahe.

  • @shalakakokate6917
    @shalakakokate6917 Před 4 lety +4

    Got goosebumps throughout , several times while he was decdoing those gazals, poems...
    Am obsessed with his writing.
    Vaibhav dada, salaam 🙌

  • @TradeWithDisciplineVinodJadhav

    Bhag 2lwkr ch yeude...
    Mahit nsnara artist aj awdun gela
    Pahilych bhetit fan jhalo vaibhv sir ncha.
    Hats of u sir

  • @sandipvmante7870
    @sandipvmante7870 Před 4 lety +1

    व्वा..व्वा..व्वा......!!!!!
    म्हणजे माझ्याकडे शब्दच नाहीये. वैभवजी, तुमच्या कविता, गझला ऐकून तुम्ही काळजात घर केलंय. आणि या मुलाखतीने तर त्या घराचं छप्पर पक्क झाल्यासारखं वाटतंय...ह्या गप्पा ऐकून, तुमचा जीवन प्रवास ऐकून तर आपण जणू मित्रच आहे आहे भास होतोय. एकदा जरी आयुष्यात तुम्हाला प्रत्येक्षात भेटता आलं तरी विठू भेटल्याचा आनंद होईल... thank you Vaibhav sir, thank you spruha... दोघंही आवडते कवी-कवयित्री💕😍

  • @akshata2358
    @akshata2358 Před 4 lety +4

    बालकवींची कविता...वैभवदादामुळे नव्याने पाहिली

  • @gajananjoshi1146
    @gajananjoshi1146 Před rokem

    अप्रतिम गप्पा भेट . वैभव फारच सुंदर आणि लक्षात राहतील अशा अनुभवांचं शेअरिंग
    स्पृहा , तुझी सुध्दा छान साथ व सहज शैली .
    धन्यवाद😊
    गजानन जोशी ठाणे

  • @rushabhlatagaonkar
    @rushabhlatagaonkar Před 4 lety

    🙏
    धन्यवाद स्पृहा जी तुमच्या मुळे इतकं सुंदर वेळ गेला.
    वैभव जी नी इतकं खोल असलेलं जे औदुंबर च वर्णन केलंय ते श्रेष्ठ च आहे.
    मी पहिल्यांदाच औदुंबर ऐकलं आणि ते ओल्या मातीवर दगड अडकल्या सारखा घुसला हृदयात.
    दोन जोशी मिळून तिसऱ्या जोशीच्या भावनेला भर दिल त्याबद्दल,,
    धनयवाद, धन्यवाद.

  • @prof.rupalirasane4542
    @prof.rupalirasane4542 Před 2 lety

    कवितेचा आस्वाद कसा घ्यावा हे नव्याने वैभव दादाने शिकवले. खरच आम्हालाही कविता अशी शिकवली असती तर. ... असे मला प्रामाणिक पणे वाटते. वैभव दादाचे औदुंबर कवितेचे रसग्रहण खूपच अप्रतिम. ..Thank you for that. Hats off to both of you.

  • @anaghakokane4182
    @anaghakokane4182 Před 4 lety

    खूपच आनंद देऊन गेला खजिना रिता n होणारा आनंद audumber कविता vegala अर्थ देऊन गेली असाच कधीही रिता होणार नाही असा खजिना देत रहा स्पृहा खूप शुभेच्छा

  • @sushamapawar4604
    @sushamapawar4604 Před 3 lety +1

    औदुंबर, अलौकिक अनुभूतीत घेऊन गेली कविता

  • @madhavimestry21
    @madhavimestry21 Před 4 lety +2

    स्पृहा ग ...... love u tons for this.
    मला अंमळ उशीराच कळलं 'खजिना'बद्दल. वैभव जोशीचा एपिसोड आत्ता पाहिला मी. इतका आनंद ... इतका आनंद .... की काय सांगू ....
    फारा पूर्वी मी सलिल कुलकर्णी आणि हृदयनाथ मंगेशकर यांचा एक कार्यक्रम ऐकला होता. हृदयनाथांनी ज्ञानदेवांच्या ओव्यांचं इतकं छान निरुपण केलं होतं. आता वयोमानामुळे हृदयनाथ कार्यक्रम करत नाहीत तर मला भिती वाटायची की असं छान समजावण्याचा वारसा चालवणारं आताच्या काळात कोणीच नाही बहुतेक. पण नाही .... तसं नाहीये .... आता आपल्याकडे वैभव जोशी आहेत. कित्ती कित्ती छान झाला हा कार्यक्रम. Thank you so much.

  • @amolmore29
    @amolmore29 Před 3 lety +1

    Khup majja Ali... Mi pan Suresh Bhat Sirrancha khup fan aahe... Aani Vaibhav Sir tumhi navin fav...

  • @komalbhapkar2443
    @komalbhapkar2443 Před 4 lety +3

    Vaibhav Dada... My favorite... Tumcha saglyach Kavita khuuuup mast... "Doh" kavita Apratim👌👌

  • @arunmulye4600
    @arunmulye4600 Před 3 lety +1

    छान कार्यक्रम! भट साहेबांना रात्रभर ऐकल होत. माझा मित्र कल्याणचे प्रशांत वैद्य जे कवि आहेत त्यांच्या घरी...साधारण ९४/९५ च्या दरम्यान.

  • @mrudulatalwelkar7763
    @mrudulatalwelkar7763 Před 4 lety +1

    औदुंबर - खरच वेगळी द्रृष्टी दिलीत पाहण्याची, वाचण्याची.

  • @geetakashikar722
    @geetakashikar722 Před 2 lety

    औदुंबर कवितेचे स्पष्टीकरण कमाल होते

  • @sudhirbokil
    @sudhirbokil Před 4 lety +1

    वैभव जोशींच्या कविता वाचतोय, ऐकतोय. आज आणखी वेगळ्या प्रकारे भेटायची पर्वणीच आहे

  • @pankajjavalekar989
    @pankajjavalekar989 Před 4 lety +1

    खूप छान वाटलं , वैभव दादांनी खूप सुंदर रित्या कविता समजून सांगितली

  • @Jordan_negatiive
    @Jordan_negatiive Před 4 lety +1

    नव्या कवींसाठी उपयुक्त असं सगळंच बोललात वैभव दा.. निदान मला तरी झालाच.. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rajendrapadture92
    @rajendrapadture92 Před 2 lety

    वैभव जोशींच्या व्यासंगाला माझं सादर नमन.

  • @amolsonawale-cy5kg
    @amolsonawale-cy5kg Před rokem

    कविता...आणि वैभव चे अनपेक्षित किस्से...एक वळण ऐकलं...❤खूप सुंदर

  • @rajendrapadture92
    @rajendrapadture92 Před 2 lety

    वैभव जोशी ला शब्दांची तहान आहे. ही तहान मला लागावी, ही मनोमन इच्छा.

  • @shubhanginayar1965
    @shubhanginayar1965 Před 2 lety

    खूप दिवसांनी आज मस्त आणि समृद्ध आशय असलेल्या गोष्टी ऐकायला मिळाल्या.मज्जा आली

  • @apurvagore4541
    @apurvagore4541 Před 4 lety +3

    अप्रतिम!❤️ औदुंबर - इतका सुंदर दृष्टिकोन ❤️

  • @YetheKavitaLihunMiltil
    @YetheKavitaLihunMiltil Před 4 lety +11

    दादा तू अप्रतिम आहेस ❤️🙌😇
    लिखाणाच्या प्रवासात वैभव दादाचा सहवास लाभावा अशी माझी खूप जुनी इच्छा आहे,
    म्हणजे अगदी त्याला जवळ बसून मी माझे प्रश्न किंवा विचार ऐकवीन असं राहून राहून सारखं वाटतं.
    आशा करतो की तो दिवस लवकरच येईल😇
    पुन्हा एकदा स्पृहा thank you So Much
    Love from #YKLMPoetry

  • @shubhamjoshi8498
    @shubhamjoshi8498 Před 4 lety +2

    Thank you Spruha Ma'am...I really big fan of Vaibhav sir...I was waiting him in this series since long.. thank you so much...

  • @rupaleep
    @rupaleep Před 4 lety +1

    Khupch chan.... Apratim vaibhav dada cha khajina anubhav swarupat milala tyabaddal......Thank you so mhanun

  • @nikhilmujumdar8657
    @nikhilmujumdar8657 Před 4 lety

    औदुमबर चा अर्थ ऐकुन थक्क झालो, goosebumps वाह वैभव जोशी तुम्हाला देणगी आहे शब्दIची.

  • @chandrakantsutar4094
    @chandrakantsutar4094 Před 4 lety +2

    audumbar kavita v ticha arth far far apratim

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal5982 Před 2 lety

    Spruha, khup dhnyvad New Jersey hun.Audumbar cha arth asahi……vah kya bat hai…..

  • @sujatadeshpande1507
    @sujatadeshpande1507 Před 4 lety +1

    खूपच छान वाटलं वेगवेगळ्या कविता ऐकून. अशाप्रकारे कवितांचा अर्थ समजाऊन सांगणारे कार्यक्रम व्हायला हवेत.

  • @pradeepkakade7741
    @pradeepkakade7741 Před 2 lety

    रात्रीचा 1 30 वाजले आहेत पण अशीच राहावी रात साजणा कधी न व्हावी सकाळ असाच feel आहे नवा सुंदर औदुंबर फार उंचीचा वाटला धन्यवाद

  • @nayankamble2708
    @nayankamble2708 Před 4 lety +1

    औदुंबर कवितेचे विश्लेषण अप्रतिम👌👌👌

  • @chandrakantdhamal1061
    @chandrakantdhamal1061 Před 4 lety

    स्पृहा , वैभव जोशींबरोबरचा हा एपिसोड नेहमीप्रमाणेच खूप छान.

  • @shubhangikulkarni2002
    @shubhangikulkarni2002 Před 2 lety

    वा... सुंदर कार्यक्रम.
    वैभव दादासारखं ...मलाही सुहास शिरवाळकरांची पुस्तकं प्रचंड आवडतात...त्यांच्या
    समांतर आणि जाई ची तर मी फँन आहे.
    कैकदा वाचली ह्याला लिमिट नाही..😊

  • @atulbenkar6606
    @atulbenkar6606 Před 2 lety

    अंम्ही पुंन्हा या कार्यक्रमाची वाट पाहतो.

  • @archanamuley5399
    @archanamuley5399 Před 4 lety +1

    औदुंबर आज खर्या अर्थाने कळली.वैभवजी वा!

  • @ajaykulkarni6670
    @ajaykulkarni6670 Před 4 lety +1

    डोह
    खूप छान कविता आहे वैभव जी यांची👍👍👌

  • @darshanakulkarni2230
    @darshanakulkarni2230 Před 4 lety +1

    फारच सुंदर,कविततेच्या प्रेमात पडले

  • @sunilbelaj7952
    @sunilbelaj7952 Před 4 lety +2

    It's just amazing... thank you spruha madam and Vaibhav sir.

  • @ashwinipjoshi
    @ashwinipjoshi Před 4 lety +1

    Khoopch sunder bhag... Mejwani... Khoop khoop dhanyawad... Tumha doghanche... Hya avaghad asha vatavarna madhe ek sukhad zuluk ahe. 🤗

  • @bharatimate6296
    @bharatimate6296 Před 4 lety +2

    Spruha and Vaibhav amazing. Dialogue, so melodious

  • @prafulkambli3722
    @prafulkambli3722 Před 4 lety +1

    Shruha, tu kharch evadhi evadhi Changli ahes ani ya karykramane kiti Anand dete ahes. Vaibhav Joshi are kiti tari farch Chan Mahesh Kale ani Sandip khare kharch Chan Thet manakade Jates

  • @samirmakarandkukade
    @samirmakarandkukade Před rokem

    स्पृहा - अजून एक कार्यक्रम वैभव सोबत करणार होतीस.. केव्हा करणार..तुझ्या पण कविता ऐकायला आवडतील.

  • @asilatakulkarni4553
    @asilatakulkarni4553 Před 3 lety +1

    औदुंबर कवितेचा अर्थ खूपच सुंदर सांगितला आहे

  • @shivramparab7943
    @shivramparab7943 Před 3 lety

    अतिशय काव्यत्मकच !
    वैभवजी कवितांच्या आस्वादाचा कार्यक्रमाची कल्पना खूप छान कविता प्रेमींना खूप आवडेल.

  • @user-kd1uy9wt4e
    @user-kd1uy9wt4e Před 3 lety

    कमाल एपिसोड झाला आजचा स्पृहा. मला खजिना च्या सगळ्या भागांमध्ये हा भाग सर्वात जास्त आवडला. शब्दशः मेजवानी होती ह्या गप्पा म्हणजे. मी औदुंबर कविता इतक्या वेळा वाचली होती. निसर्ग कविता तर ती आहेच, पण तिच्या मध्ये दडलेला भावार्थ पण माझ्या कल्पनेप्रमाणे लावला होता. पण आज वैभवने जो अर्थ उलगडून दाखवला, तो केवळ अप्रतिम !"मग माझा जीव "या सुरेश भटांच्या कवितेचा अर्थ पण काय सुरेख उलगडून दाखवला त्यांनी !खरेच माझी विनंती आहे, त्यांनी कविता उलगडून दाखवण्याचा काहीतरी कार्यक्रम करावा आणि एकदा करून थांबू नये, सतत करत राहावे, जेणेकरून कविता लोकांना पूर्णपणे समजू शकेल. खूप खूप खूप धन्यवाद त्यांना खजिना मध्ये बोलावल्याबद्दल. मन नाही भरले खरेच या गप्पांनी. नक्की करा याचा दुसरा भाग तुम्ही.

  • @sarojjondhale8930
    @sarojjondhale8930 Před 4 lety +3

    Wow , LIFE is so beautifully explained , can't imagine !!!

  • @rohinishukla7753
    @rohinishukla7753 Před 4 lety +1

    औदुंबरचे विश्लेषण खुप touching...

  • @avmitra
    @avmitra Před 4 lety +1

    हे फार भारीये. CZcams वर टाकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

  • @dp9500
    @dp9500 Před rokem

    खूपच छान भाग होता हा ..
    वैभव सर ग्रेट आहे 👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏

  • @pradipjoshi259
    @pradipjoshi259 Před 3 lety +1

    Simpali Great.Spruhamam & Vaibhav joshi sir.. माझी आवडती बालकवी ची आवडीची औदुंबरचा एक वेगळाच पैलू समोर आला .खूप सुंदर.. धन्यवाद.

    • @sunilambadkar6029
      @sunilambadkar6029 Před 3 lety

      खुप सुंदर ऐकवत रहावस वाटते ,मस्त

  • @amitkelkar4501
    @amitkelkar4501 Před 3 lety +1

    Vaibhav Dada Aflatoon, Afattttt Adbhuttt 👌🏻👌🏻. Audumbar Kavitecha Artha Apratimm Ulgadun Dakhvala Dada 👌🏻👌🏻

  • @asmiitadhoble9596
    @asmiitadhoble9596 Před 4 lety +2

    "अप्रतिम" हा एकच शब्द 👏👏👏👏👏👏👏👏

  • @vidyabarje1
    @vidyabarje1 Před 5 měsíci

    Superb!! sagalech episodes khup.... chan....

  • @nehaoak1208
    @nehaoak1208 Před 4 lety +2

    अप्रतिम. खूप खरा माणूस

  • @_kavibhushan
    @_kavibhushan Před 4 lety +2

    Vaibhav Sir, you are great! Thank you Spruha for conducting this, waiting for the next part!

  • @sanjivanitelkar9571
    @sanjivanitelkar9571 Před 2 lety

    वा! औदुंबर विश्लेषण अति अंतर्मुख करणारे, काळजाला भिडणारे पहिल्यांदा च समजले.अति वेगळ्या कविची ओळख करून दिल्याबद्दल स्पृहाताई खूप धन्यवाद.आणि तुमच्या या उपक्रमाला खूप शुभेच्छा

  • @rajendrakhaire6715
    @rajendrakhaire6715 Před 3 lety +3

    Kya bat

  • @prashantvelhankarPV
    @prashantvelhankarPV Před 2 lety

    नतमस्तक आहे मी या सिरीझ ला .. Hats off. पुन्हा एकदा सगळे Episodes बघतोय मी ..

  • @vaishalibhatkhande3559

    वाह वाह वाह....खूप खूप खूप आणि खूपच छान...खरंच हा कार्यक्रम कधी च संपूच नये वाटतंय... फक्त आणि फक्त ऐकतच रहावं असे वाटतय..औदुंबर ऐकताना तर अंगावर रोमांच उभे राहिले...आज तुला आणि वैभव जोशी ला ऐकताना ,पाहताना मन तृप्त झालं..प्लीज प्लीज प्लीज अशाच कविता आणि त्याचे अर्थ ऐकवत रहा..मला तर वाटतय ह्या जगतातील प्रत्येक कविता वैभव जोशी च्या मनातून समजून घायव्यात..आयुष्य नव्याने अनुभवायला मिळेल..वैशाली सामंत यांना अनेक आनेक धन्यवाद की तिच्यामुळे हा माणूस गवसला आमच्या पर्यन्त पोहीचला...आणि या कवीला तळहात वर जपणाऱ्या त्याच्या पत्नीला Hats off कारण हे जपण् खूप कठीण बऱ्याच वेळी ते अशक्य असते..स्पुहा खरचं तुझंही मनापासून कौंतुक ..ह्या कार्यक्रम ची गोडी खूप पटीने तू वाढवत आहेस आणि खऱ्या आयुष्याचीही...भटांची कविता पहिल्यादा आशा भोसल्यांच्या गळ्यातून पोहोचली आणि आज वैभव जोशींच्या अर्थातून...नव्याने जगताना तुला आज मी काय सांगू?? जुनेच शब्द जुन्याच लहरी नव्याने अनुभवताना काय बोलू?? नकोच आता काही बाकी... फक्त तुज ऐकत रहावे...संपलेले श्वास माझे पुन्हा स्पदताना मी च पुन्हा माझ्या ओंजळीत मलाच हलकेच झेलावे...स्पृहा तुला पाहताना ,ऐकताना ,वाचताना मला माझ्यातील मैत्रीण भेटते असे वाटते...खूप खास

  • @babasahebchavan4088
    @babasahebchavan4088 Před rokem

    वैभव दादा, म्हणजे प्रतिभेची अगाध लीला.🌹🙏

  • @priyashaikh7709
    @priyashaikh7709 Před 3 lety +1

    Tumhala sashTaang dandavate 🙏🏻🙏🏻

  • @priyankachaudhari7056
    @priyankachaudhari7056 Před 4 lety +1

    Epic. asa kavita samjavna mhanje kai kiti sunder apratim .Hats off vaibhav sir