1 किलो मिरचीचा काळा मसाला / कांदा लसुण मसाला। कुणीही आत्मविश्वासाने बनवू शकेल एवढी सविस्तर कृती

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 04. 2021
  • आजच्या video मध्ये आपण प्रत्येक महाराष्ट्रियन घरत बनवला जाणारा आणि रोजच्या जेवणात वापरला जाणारा कांदा लसुण मसाला कसा बनवायचा हे पाहणार आहोत.
    मसाला बनवण्याची पद्धति गावा नुसार थोडीफार बदलते.
    सोलापुरी भागात याला काळं तिखट म्हणतात, कोल्हापुरी भागात कांदा लसुण मसाला किंवा कोल्हापुरी झणझणीत लाल मसाला म्हणतात. तर पुण्यात याला काळा मसाला म्हणतात, विदर्भात येसूर म्हणतात. नावं बदलतात तसं मसाला बनवण्याची पद्धत पण थोडी बदलते. पण काळा मसाला / कांदा लसूण मसाला / येसूर / काळं तिखट ही महाराष्ट्राची शान.
    हा मसाला रोजच्या भाज्यांमध्ये वापरला तर दुसरा कोणता मसाला वापरण्याची फारशी गरज उरत नाही. Nonveg तर अफलातुन बनते.
    तुम्हाला मसाला झणझणीत बनवायचा असेल तर मिरची प्रमाण कसं घ्यायचे ते पाहूयात.
    **झणझणीत तिखट काळा मसाला (1 किलो मिरची प्रमाण) खालीलप्रमाणे -
    1) लवंगी मिरची - अर्धा किलो / 500 gms
    2)बेडगी मिरची - अर्धा किलो / 500gms
    **मध्यम तिखट मसाला (1 किलो मिरची प्रमाण) खालील प्रमाणे
    1) शंकेश्वरी मिरची - पाव किलो / 250gms
    2) लवंगी मिरची - पाव किलो / 250gms
    3) बेडगी मिरची - पाव किलो / 250gms
    4) कश्मीरी मिरची - पाव किलो / 250gms
    मिरच्या आणि सर्व मसाले चांगल्या quality चे असावेत, स्वच्छ निवडून घ्यावेत. वीडियो मध्ये सांगितलेला सर्व टिप्स वापरल्या तर तुमच्या मसाला पण चवीला उत्तम, रंग पण छान येईल आणि भरपूर टिकेल (1 ते दीड वर्ष)
    इतर साहित्य खालील प्रमाणे -
    1 किलो मिरची साठी लागणारे मसाल्यांचे प्रमाण - 👇
    कांदा - 1/2 kilo
    लसुण - पाव किलो
    इंदोर धणे - पाव किलो
    सुके खोबरे - पाव किलो
    मोहरी - 50 gms
    जिरे - 100gms
    शेंग तेल पाव किलो
    खडे मीठ 200gms
    तमालपत्र 10 gms
    दगड फुल 10 gms
    पांढरे तिळ 50gms
    खसखस 50gms
    हिंग खडे 10 gms
    जायफळ 1
    हळकुंड 30 gms
    सुंठ 30 gms
    जावीत्री 10 gms
    लाल फूल 10 gms
    दालचिनी 20 gms
    कबाब चीनी 10 gms
    नाकेश्वर 10 gms
    मेथी दाणे 20 gms
    त्रिफळा 20 gms
    शाही जिरे 20 gms
    मसाला वेलची 20 gms
    हिरवी वेलची 20 gms
    लवंग 20 gms
    चक्री फूल 20 gms
    काळी मिरी 20 gms ( जास्त झणझणीत पाहिजे तर 10 gms वाढवू शकतो)
    एखादा दुसरा खडा मसाला नसेल तरी चालेल.
    #कांदालसुणमसाला
    #साठवणीचामसाला
    #काळामसाला
    #काळंतिखट
    #कोल्हापुरीझणझणीतकांदालसुणमसाला
    #सोलापुरीकाळंतिखट
    #kalamasala
    #kandalasunmasala
    #mahatarshtrianmasala
    #kolhapurimasala
    #saritashomekitchen

Komentáře • 1,4K

  • @sanchit_4514
    @sanchit_4514 Před 3 lety +173

    धन्यवाद ताई मी तुमच्या प्रमाणे मसाला करून बघितला खुपच छान झाला. अशाच प्रकारे आम्हाला मसाले व उन्हाळी वाळवण
    सांगा. 🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 3 lety +18

      पुण्यात पाऊस आणि ढगाळ वातावरण कायम आहे.. त्यामुळे यावर्षी वाळवण पदार्थ बनवले नाहीत.. बघू may पर्यंत उन राहिलं तर नक्की शेअर करेन

    • @Bloodislive138
      @Bloodislive138 Před 3 lety +3

      👍👌

    • @kamleshkadam928
      @kamleshkadam928 Před 3 lety +2

    • @markandipimpalshende6124
      @markandipimpalshende6124 Před 3 lety +3

      @@saritaskitchen U

    • @anilpatil2205
      @anilpatil2205 Před 3 lety +1

      @@saritaskitchen 0

  • @mahendramahajan2426
    @mahendramahajan2426 Před rokem +3

    सरीताताई खूपच छान, तुम्हीं मला आईची आठवण करुन दिली, मांझी आई असाच मसाला बेगमी करुन ठेवायची,त्यामुळे भाज्या खूपच टेस्टी वहायच्या.तुम्हाला परमेश्र्वर उदंड आयुष्य देवी.👌👍💐🙏

  • @anilkulkarni4211
    @anilkulkarni4211 Před 3 lety +5

    👍👍👍 thanks Best and Details Information

  • @GitanjaliBaviskar-yc3ye
    @GitanjaliBaviskar-yc3ye Před měsícem +1

    अतिशय स्वादिष्ट एक नंबर

  • @user-nr8oq5qb6e
    @user-nr8oq5qb6e Před 5 měsíci +2

    नमस्कार ताई,मी मागील वर्षी हा मसाला तयार केला होता . पूर्णवर्ष चव जशीच्याताशी राहिली.जे कोणी पाहुणे घरी जेवायला आले, ते आवरजून विचारतात चटणी कशी केली.
    नॉनव्हेज तर अफलातूनच.
    आज पुन्हा अशाच मसाला बनवून आणला.
    Thanku you so much.
    कायम मी अशीच चटणी बनवणार 🎉

  • @padmakarpatil7526
    @padmakarpatil7526 Před 3 lety +4

    खुपच सुंदर
    उपयुक्त टीप्स आणी अगदी खरी खरी माहिती.
    थैंक्स अ लॉट.

  • @amitawalavalkar292
    @amitawalavalkar292 Před 3 lety +3

    सुंदर माहिती दिली

  • @sapnadongre6787
    @sapnadongre6787 Před 3 lety +1

    खरंच खुप छान पद्धतीने सांगितल आहे धन्यवाद

  • @snehagaikwad4895
    @snehagaikwad4895 Před 3 lety +1

    धन्यवाद ताई खुपच छान मसाला प्रमाण खूपच छान दिले आहे🙏🙏🌹

  • @renukarecipies9344
    @renukarecipies9344 Před 3 lety +24

    खूप खूप छान माहिती दिलीत ताई.. खरंच तुम्हाला हा व्हिडिओ बनवायला खूप कष्ट पडले असणार..खरंच खूप उपयोगी माहिती दिलीत या व्हिडिओमध्ये..किती thank you म्हणावं तेच कळत नाही.. तरी पण,खूप खूप आभार..🙏🙏🙏👍👍

  • @sunitabhakare1293
    @sunitabhakare1293 Před 2 lety +14

    खूप छान सरिता.. तुझ्या हुशारीला तोड नाही.. 👌👌😍😍👍🏻❤️😅

    • @gauravkhurd2500
      @gauravkhurd2500 Před rokem +2

      आम्ही पण असंच बनवतो काळ तिखट मि पण सोलापूर मधे राहते

  • @manishakore-zadbuke
    @manishakore-zadbuke Před 2 lety +1

    खूप छान माहिती सांगितली सरिता खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @sanjivanimane1193
    @sanjivanimane1193 Před rokem

    मसाला करण्याची सविस्तर पद्धत खूप छान धन्यवाद

  • @shampasglobal7479
    @shampasglobal7479 Před 2 lety +3

    Beautiful

  • @niteshmaind5740
    @niteshmaind5740 Před 3 lety +5

    खूप छान माहिती दिली आहे 🙏👍

  • @meenarajguru7646
    @meenarajguru7646 Před 2 lety +1

    खूपच छान झाला आहे रेसिपी आवडली धन्यवाद

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 Před 2 lety

    खूपच छान कांदा लसूण मसाल्याची रेसिपी
    धन्यवाद ताई 🙏👍

  • @aishwaryavaijapurkar9671
    @aishwaryavaijapurkar9671 Před 3 lety +9

    किती सविस्तर सुंदर माहिती मॅडम❤️god bless you

  • @simintinipatil2808
    @simintinipatil2808 Před 3 lety +6

    Thank you for sharing your recipe and diligently explaining the process as well as tips.If available for sale, would like to try.Thank you

  • @nirmalakalaskar4055
    @nirmalakalaskar4055 Před 2 lety +1

    धन्यवाद ताई तुमच्या सारखच मी आज तिखट केलय खुप छान झालय.सर्वांना खुप आवडल. भाजी पण खुप मस्त टेस्टि झाली

  • @dhanrajtaley3092
    @dhanrajtaley3092 Před rokem +1

    खुप च छान साध्या आणि सोप्या पद्धतीने मसाला सांगितला 👌👌धन्यवाद ताई 🌹🌹

  • @priyankashinde2431
    @priyankashinde2431 Před 3 lety +4

    Most awaited video is here.....❤️thnq😘😘

  • @gayatribankeshwar618
    @gayatribankeshwar618 Před 2 lety +5

    Lovely instructions, thankyou, so much patience, bless you

    • @sharadasoudagar3955
      @sharadasoudagar3955 Před 2 lety

      खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @shrutikale4095
    @shrutikale4095 Před rokem

    खूप छान सांगितल आहे अगदी सविस्तर माहिती दिली आहे मस्त बनला आहे

  • @subhashwalse9315
    @subhashwalse9315 Před 2 lety

    रेसिपी खुपच छान आहे धन्यवाद मॅडम

  • @ishanpawar2889
    @ishanpawar2889 Před 3 lety +3

    Mastch👍🏻👍🏻

  • @anitanikalje8016
    @anitanikalje8016 Před 3 lety +6

    👌👌👌

  • @ujwalakalel6582
    @ujwalakalel6582 Před 3 lety

    Khup chan ...sampurn mahiti delit ... Thank q mam

  • @vihaneditar9393
    @vihaneditar9393 Před 3 lety +4

    Thank you so much khupch garaj hoti ya video chi

  • @rohinimatange7858
    @rohinimatange7858 Před 3 lety +5

    मला इंडोरला राहून माहेरी गेल्याच आनंद दिलात अतिशय सखोल सांगितलंय तुम्ही मी अकलूज जवळच्या श्रीपूर ची आहे आता 35 वर्ष इकडे ।
    खूप फरक आहे इकडच्या पद्धतीत ।
    आपला समाज खूप आहे कंडप मशीन पण आहे खूपच मन भरून आले

  • @samarthk9129
    @samarthk9129 Před 2 lety

    Thank you tai
    Garaj hoti asha (detail) video chi
    Khupch helpful video

  • @snehajogalekar5921
    @snehajogalekar5921 Před 2 lety +1

    नमस्कार ताई मी आपल्या प्रमाणाने मसाला बनवला अर्धा किलो मिरचीचा खूप छान झालाय.मिक्सरवर केला. खूप खूप धन्यवाद.

  • @vijayaroor5174
    @vijayaroor5174 Před 2 lety +6

    Perfectly made.

  • @rohinibhosale6721
    @rohinibhosale6721 Před 3 lety +3

    आमच्याकडे पण असेच करतात from सातारा

  • @rajanishanbhag7487
    @rajanishanbhag7487 Před 2 lety +1

    Very nicely explained Thank you for sharing

  • @pallavigode6699
    @pallavigode6699 Před 3 lety

    खूपच छान आणि सहज भाषेत सांगितले....🙏🏻🙏🏻

  • @nihu1086
    @nihu1086 Před 2 lety +7

    Saritaji तुम्ही खऱ्या Kitchen Star आहात. 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @SulosKitchen
    @SulosKitchen Před 3 lety +7

    Super and Colorful recipe Sister

  • @shobhajagdale2294
    @shobhajagdale2294 Před 3 lety

    खूप छान मसाल्याची माहिती सांगितली 👌👌👍👍 मी नक्की करून बघेन भारी मस्तच

  • @manishakumbhar4890
    @manishakumbhar4890 Před 3 lety

    खूपच छान माहिती मिळाली🙏🙏🙏

  • @kalyanipatil6487
    @kalyanipatil6487 Před 3 lety +17

    सरिता खूपच छान झालाय मसाला, असेच साठवणीतले तिखट पण सांग ना म्हणजे योग्य मिरच्याच प्रमाण कळेल

  • @roshanijadhav6842
    @roshanijadhav6842 Před 3 lety +4

    Thank you so much mam. Khup Chan

  • @GMletsLEARN
    @GMletsLEARN Před 3 lety

    Thank you very much mam mi barech divsani hi masalchi recipe serch kart hoti aaj mala perfect recipe bhetli
    Thnaks

  • @rajeshwarimore1589
    @rajeshwarimore1589 Před 3 lety +1

    सरिता तुझं खूप कौतुक.मुले सांभाळून तू मसाला केलास . खूप छान.

  • @sujatagunjal5266
    @sujatagunjal5266 Před 3 lety +3

    Khupch chan and thanks for sharing 👍

  • @SuchitrasQuickVegDelight
    @SuchitrasQuickVegDelight Před 3 lety +6

    खूप छान deteiled माहिती दिलीये👍👍

  • @savitabhalerao773
    @savitabhalerao773 Před 2 lety

    खरंच खूपच छान माहिती मिळाली आहे कांदा लसूण मसाला ची मी नक्की करून बघेन

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 Před 3 měsíci

    सरिता, अप्रतिम मसाला.अतिशय साध्या सोप्या पद्धतीने,अगदी घरगुती भाषेत शांतपणे टीप देत देत, बारकाईने सांगितलेस.ऊगाच नाटकीपणा नाही,,👌👌👌👌💐💐💐.

  • @ramizabukhari3692
    @ramizabukhari3692 Před 3 lety +8

    Very detailed information. Great job

  • @yeshodakharat6072
    @yeshodakharat6072 Před 3 lety +4

    Very nice👌👌👍🙏

  • @sandhyatendulkar1560
    @sandhyatendulkar1560 Před 3 lety +1

    Pharach chaan mahiti neet samjavun sangitle Thanks a lot

  • @ruchirayadav
    @ruchirayadav Před rokem

    Thank you tai khup sundar method ney masala recipe sangitle

  • @DreamGirl-qn5dh
    @DreamGirl-qn5dh Před 3 lety +7

    Thanks a lot madam. For giving all the measurements, u r 👍

  • @bakulphule
    @bakulphule Před 3 lety +6

    Hello mam, very good recipe of masala. Do you sell your product of this masala? At my place there is no exposure of direct bright sunlight. So feel like buying it ready made. 😊

  • @ravindrapawar5056
    @ravindrapawar5056 Před 3 lety +2

    Mast 👍👍 chhan aahe purn video....chhan mahiti milali

  • @jaywantkhandale130
    @jaywantkhandale130 Před 3 lety

    अतिशय छान माहिती.....पारंपारिक मसाला

  • @gaurimshirke
    @gaurimshirke Před rokem +4

    @saritaskitchen so the wet vatan and garlic was mixed in the masala when you went to grind it? Or u mixed it later by yourself?

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před rokem +3

      pahilyanda chillies kutun ghetat, mag chalun ghetat , to remove or separate seeds .
      parat tyamadhye spices add karun kutatat aani last they add wet ingredients and Grind all together.

    • @gaurimshirke
      @gaurimshirke Před rokem

      @@saritaskitchen thank you so kuch

    • @tsgeeta
      @tsgeeta Před rokem

      @@saritaskitchen surely this is appreciation as you value your viewers and reply to clarify doubts

  • @madhurishinde2286
    @madhurishinde2286 Před 3 lety +7

    आम्ही पण सोलापूरचे आहोत

  • @sangitamaskar6937
    @sangitamaskar6937 Před rokem +1

    खुप खुप छान सरिता खरच कमाल आहेस तू किती डिटेल्स मध्य सांगितले ग good girl

  • @vandanasalave3550
    @vandanasalave3550 Před 2 lety +1

    खूपच छान माहिती देतेस सरिता

  • @swatigalkatte223
    @swatigalkatte223 Před 3 lety +19

    वा मस्त मिपण सोलापुरी आहेविकत देणार का

  • @adinathshinde9232
    @adinathshinde9232 Před 3 lety +6

    Adrak, आले नाही add kele

  • @Big_gaming120
    @Big_gaming120 Před 2 lety +1

    छान महत्वपुर्ण माहीती दिलीत ताई 🙏🏻🤗

  • @bhavanaband7804
    @bhavanaband7804 Před rokem

    उत्तम माहिती दिली आहे धन्यवाद मी सुध्दा असच करते .

  • @aratigore4184
    @aratigore4184 Před 3 lety +9

    Sagla milun kiti masala zala

  • @shravyashinde6422
    @shravyashinde6422 Před 2 lety +8

    कच्चे मसाले का टाकले ताई, पण मसाला खुप छान झाला अगदी आजी बनवत होती तसा, आम्ही पण सोलापुरी आहोत

  • @pratibhaozarkar4530
    @pratibhaozarkar4530 Před rokem

    Khupch cchan pdhatene sangetle msala bnvnyache resepy dhanyvad taaie

  • @diwatesunanda8804
    @diwatesunanda8804 Před 3 lety

    खूप छान प्रमाण व माहिती

  • @10khadsesuresh
    @10khadsesuresh Před 3 lety +3

    Tumhi order ghetha Ka aamala hava hota

  • @archanachoudhari2860
    @archanachoudhari2860 Před 3 lety

    माहिती खूप छान सांगितली

  • @rohinithorave540
    @rohinithorave540 Před 2 lety +1

    धन्यवाद सरिता, मी आजच तुम्ही सांगितल्याप्रमाणे मसाला बनविला. खुपच छान झाला आहे.इतरही वीडियो मधील टिप्स खूप उपयोगी आहेत.पुन्हा एकदा धन्यवाद🙏🙏

  • @harshartipramodpatil652

    खूप छान झाला मसाला मी केला तुमच्या पद्धतीने thanks

  • @vijaymore7520
    @vijaymore7520 Před 2 lety

    Khup chhan dhanyawad mam👌👌👌🙏🙏

  • @dhanrajtaley3092
    @dhanrajtaley3092 Před rokem +1

    ताई तुझी सांगण्याची पद्धत साधी आणि सोपी आहे. लवकर समजते मसाला छान सांगितला, करून बघते. धन्यवाद 🌹👌👌👌👌

  • @malanicholas6241
    @malanicholas6241 Před rokem

    Very nice recipe thanku so much madam 👍

  • @jyotibamane4417
    @jyotibamane4417 Před 6 měsíci +1

    ताई मी पण सोलापूरची आहे मला तुमचे केलेले पदार्थ फार आवडतात कारण ते सोप्या पद्धतीचे असतात थँक्यू

  • @vaibhavsasne6127
    @vaibhavsasne6127 Před 2 lety

    Thanks for detail information.

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923 Před 3 měsíci

    खूप छान, मसाला करताना खूप छान सोप्या पध्दतीने आणि अगदी बारीकसारीक गोष्टी तुम्ही सांगीतल्याबद्दल धन्यवाद ताई

  • @varshamore6713
    @varshamore6713 Před rokem

    Mst recipe sangitil tai, thanks 🙏

  • @pushpapatil2343
    @pushpapatil2343 Před 3 měsíci

    खरच खुपच छान आणि धन्यवाद दिले ताई

  • @deepalisalunke6401
    @deepalisalunke6401 Před 2 lety

    Mastach mam khupch sunder zhalay masala mi aajch banvlay thank you so much

  • @swatichitre12
    @swatichitre12 Před 2 lety

    Tumchi dakhavnya chi paddat chan ahe....evda lahan vayat ..evda knowledge...great...thanku

  • @sunitapatil9955
    @sunitapatil9955 Před 4 měsíci

    सरीता तुझी कांदा लसूण मसाला रेसिपी पाहून मी पण बनवला खूपच छान झाला. सर्वांना खुप आवडला. धन्यवाद

  • @vishakhamhaske884
    @vishakhamhaske884 Před 3 lety

    Khup chaan paddhatine sarva sangiatle aahe..

  • @sangitajadhav6948
    @sangitajadhav6948 Před 3 měsíci

    धन्यवाद ताई तुम्ही सांगितलेल्या प्रमाणानुसार मसाला केला खूपच छान झाला 🙏🙏

  • @mukeshmithbawkar793
    @mukeshmithbawkar793 Před 2 lety

    Khupach chaan mala tumcha sarv recipe aavdtat aaj tumcha madalacha video baghun msala banvat aahe so thank you very much

  • @rajashreeghatte7850
    @rajashreeghatte7850 Před 3 lety

    Khupach Chan mahiti dilit tai 🙏🙏

  • @suradhini
    @suradhini Před 3 lety

    खूप छान माहिती.

  • @smitabedarkar8770
    @smitabedarkar8770 Před 2 lety

    Great... 👌🏻👌🏻😘😘😘, खूप छान... अगदी छोटया छोटया पण महत्वपूर्ण टिप्स, सांगितल्या... मी कांदा लसूण घालून मसाला कधी केलाच नाही.. कारण नीट प्रमाण कळतं चं नव्हतं... पण या वर्षी नक्की करून बघणार... Thank you

  • @rajeshreevichare6843
    @rajeshreevichare6843 Před 2 lety

    धन्यवाद ताई तुमची मसाला बणीवणया पद्धत खुपचं अफलातून आहे

  • @kobraexpressnews3916
    @kobraexpressnews3916 Před 3 lety

    खूप छान माहिती दिलीत

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 Před 2 lety

    अत्यंत सुंदर अशी मसाला बनवण्याची कृती आपण करून दाखवली जी आई आजी बनवायची.👌👌💐💐💐💐🙏

  • @sandhyapawar6802
    @sandhyapawar6802 Před rokem

    ताई तुमच्या पद्धतीचा मसाला बनवलाय खूप छान झालं Thanks

  • @annapurnachavan5141
    @annapurnachavan5141 Před 2 lety

    छान बनवला मसाला धन्यवाद 👌👌👌👌👌

  • @priyankaawale5969
    @priyankaawale5969 Před 2 lety +2

    खूपच छान😍

  • @kalpnamahajan7068
    @kalpnamahajan7068 Před 2 lety

    अप्रतिम... केवळ अप्रतिम

  • @vandananirmal3764
    @vandananirmal3764 Před 2 lety

    Khup chhan mahit dili thanks

  • @surekhadevadkar2006
    @surekhadevadkar2006 Před 3 lety

    Khupach chan banvla masala tai...mla tar khupach aavadla 👌👌👌👌👌thanks

  • @nishapatel-qu1ew
    @nishapatel-qu1ew Před 2 lety

    Thank you tai mast mahiti sangeet li

  • @a-02sagarjadhav53
    @a-02sagarjadhav53 Před 3 lety +2

    Excellent Masala che method, Everyone should try these...👍100000000....K👍