Pune car accident नंतर चर्चेत आलेलं Santosh Mane bus driver प्रकरण काय होतं, त्याच्या बसचं काय झालं?
Vložit
- čas přidán 6. 10. 2023
- #BolBhidu #SantoshMane #puneaccident
सहा ऑक्टोबरच्या रात्री पुण्यात एक अपघात झाला. एका भरधाव फोर व्हीलरनं चार-पाच जणांना उडवलं. लोकांना उडवल्यानंतरही ही फोर व्हीलर पुढे जातच राहिली. अपघातात एका माणसाला आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर कित्येकांना पुण्यात घडलेल्या एका जुन्या प्रकरणाची आठवण झाली, हे प्रकरण होतं, संतोष मानेचं. एक एसटी ड्रायव्हर ज्यानं काही मिनिटात सगळं पुणे वेठीला धरलं होतं.
२५ जानेवारी २०१२ ला घडलेलं संतोष मानेचं प्रकरण कुठलाही अपघात झाल्यावर चर्चेत येतं. त्या दिवशी सकाळी अर्ध्या तासाच्या वेळात ९ जणांचा मृत्यू झाला, ३७ लोक जखमी झाले. या घटनेनंतर संतोष मानेला अटक झाली, त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण तो संतोष माने सध्या काय करतो ? त्याला शिक्षा काय झाली ? पुण्यातलं हे प्रकरण नेमकं होतं काय ? पाहुयात या व्हिडिओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
ह्या घटने मध्ये ज्या तरुणाने स्वतःच्या जीवाची बाजी लाऊन त्या संतोष मानेला पकडले तो माझा मित्र पोलीस कॉन्स्टेबल बापू लोणकर होता सध्या तो psi ची तयारी करत आहे
Convey my wishes to your friend
बापू लोणकराना मनापासून धन्यवाद, नमस्कार, आणि आशिर्वाद.
Bappu lonkar amchya colony madhe rahto amhala tyacha abhiman ahe 🙏
अभिनंदन असेच यश मिळवा
arey bhai ka chukicha mahiti detoy, tya 22 varsha chya mulacha naav kutty ahe... ani toh army madhe ahe
मी त्यावेळी पुण्यात नोकरीला होतो. वडगांव पुलाजवळ, जयप्रकाश नगर येथे राहत होतो. नेहमी लवकर कार्यालयात जात असे. परंतु त्या दिवशी मी नेहमी पेक्षा उशीरा निघाल्यामुळे मी थोडक्यात बचावलो होतो. त्यादिवशी कार्यालयात हया अपघातावरच चर्चा होती.
ही बस मंत्रिमंडळाला सप्रेम भेट द्यायला पाहिजे...तिथे खुप गरज आहे या बसची
😂
😂
😅
लई भारी 👌👈😂😂
माझ्या मैत्रिणीचे वडील या अपघातात गेले. एका माथेफिरुमुळे कुटूंब उद्ध्वस्त झालं.. 😢
अशा वेळी फाशीची शिक्षा रद्द होऊन जन्मठेप होणं म्हणजे पूर्ण न्याय झाला नाही असं वाटतं..
Pulchat kayde dusra kay
फाशी देऊन तो एकदाचं मरणार.... पण जेल मध्ये जन्मठेप शिक्षेमध्ये तो रोज रोज मरणार...
तुरुंगात जन्मठेप काढणे ही सर्वांत त्रासदायक आणि कठोर शिक्षा आहे. फाशी दिली की गुन्हेगार एकदाच मरतो. जन्मठेपेत तो रोज मरतो.
@@mustangroy21 त्याला जर पश्र्चाताप होत असेल केलेल्या कृत्याचा तरच मरतो दररोज. नाहीतर गुन्हेगार फार निर्लज्ज असतात त्यांना काही फरक पडत नाही
अधिकारी झोडपले पाहिजेत
मी स्वतः तिथे उभा होतो ज्याने हे सर्व समोर होताना बघितले . संतोष माने ला सामोरा समोर बघितले. खूप भयानक बघितले मी टी दिवशी.
एक आठवण
२५ जानेवारी ला माझी सकाळी पिंपळे गुरव येथून ०५:३० वाजता first shift ची कंपनीची बस मला मिळाली नाही ,म्हणून २६ जानेवारी साठी गावी बारामतीला जाण्याचे नियोजन केले आणि सकाळी सकाळी मला स्वारगेट गाडी सापडता सापडली नाही आणि शेवटी PMT ने पुल गेट ला गेलो , ते सकाळी ०९ वाजता घरी पोहचल्यावर घरी न्यूज ला एकाच बातमी चालू होती माथेफिरू चालक संतोष माने ची आणि घटनेची वेळ बघितली तर ठीक त्या वेळेस जर मला स्वारगेट PMT बस भेटली असती तर आपलं नाव सुद्धा नऊ जनात आले असते ,पण ........
या घटनेमध्ये बळी निष्पाप बळी गेलेल्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली.
ह्याच बस चा दुसरा अपघात 2017 मध्ये कोल्हापूर मध्ये आमच्या घरा समोर च झाला......😢 तेव्हा आम्ही ह्याच भयानक घटनेचे साक्षीदार होतो, आणि धक्का तेव्हा बसला जेव्हा समजले हीच ती पुणे अपघातातील बस होती......... निशब्द
उमा चौक....?
@@rajatshaikh5723 बरोबर ✅ उमा चौक ✅
Amol एवढे अपघात होत आहेत म्हणल्यावर ती बस वापरात काढायला न्हवती पाहीजे..
Te bus cha nashik la sudha accident zala hota
Uma chowk ka ??
बोल भिडू मुळे काही केससचे पुढे काय झाले ते कळते,thanks bol भिडू
हे एका एसटी ड्रायव्हर ने केलं म्हणून लगेच केस निकाली निघाली पण इथे एका सेलिब्रिटी ने हे केल असत तर तिथच केस बंद झाली असती त्या सलमान खाने दारू पिऊन गाडी चालवून एवढ्या माणसांना चिरडून टाकलं पण त्याच्यवर साधी केस पण झाली नाही
मग संतोष साठीही खून माफ करून टाकूयात!
@@Afsane_Dil_Ke... संतोष दोषी आहेच त्याला तर फाशी होयाला पाहिजे होती पण तो गुन्ह्याची शिक्षा भोगतोय सुद्धा ना की त्याने त्या सलमान खान सारखा पळ पुटेपणा केला
अहो जीव गेला लोकांचा तिते तुझा भाव, किंवा बाप असता तर काय बोलला असतास,,,
हे एकदम बरोबर आहे तुमचं दादा सामान्य माणसामुळे सलमान खान होऊ शकतो सलमान खानमुळे सामान्य माणूस नाही
आणि प्रत्येक सामान्य जर सलमान खान झाला तर पॉलिटिक्स संपली
संतोष ला मानसिक आजार असताना त्याला कामावर ठेवणारे अधिकारी तितकेच जबाबदार आहेत. मी तो थरार अणूभवला आहे.
Kasa Kay jhala hota nemka
Mansik ajar interview mdhe kinva selection process mdhe grahya dharla jat nahi bala (police ani army mdhe sodun)...asa asta tr kititari jan ghari basle aste..
@@tejasmondhebarobar
अरे❤udya ti bus sapit होती
हि एक दुखद घटना होती
पण आज हि एसटी कामगार हा आज हि अनेक यातना सहन करत आहे जरा यावर पन दाखवा
संतोष माने ...मी आणि माझ्या मित्राने दहावीला घेतलेला अनुभव....सिंहगड रोड वरून बस ने जाताना.... शेवटच्या शीट वर बसलेलो आम्ही... आणि आमच्या खिडकीच्या शेजारून गेलेली ती बस😢.....आज पण तो भीतीदायक क्षण डोळ्यासमोर येतोच.....
Mi Pan 10vi la hoto 2012 la
GREAT
😢😢
फेका मारू नका...सिंहगड रोडचा काय संबंध.स्वारगेटकडून बस गोळीबार मैदानाच्या दिशेने आली होती होती.मी धोबीघाट बस स्टॉपवर थांबलो होतो.बस माझ्या अंगावर आली होती आणि मी जोरात मागे पळालो होतो.
@@Marathimanus1591 2.55
माझा वैयक्तिक अनुभव - संतोष माने आणि मी जवळ जवळ 15 दिवस येरवडा तुरुंगात हॉस्पिटल मध्ये लोकौप मध्ये एकत्र काढले त्यांना देखील या गोष्टीचा खूप पश्चाताप होतोय आजही ते मनोरुग्ण असून रोज कमीत कमी 10/12 गोळ्या घेतल्या शिवाय राहूच शकतं नाहीत मी पाहिलंय त्यांना वडिलांच्या वर्षश्रधास साठी राजा मंजूर झाली नाही या 1 कारणानं चा राग डोक्यात ठेवल्यामुळे माझ्याकडून अपघात झाला असं मला बोले होते... आता यात नक्की कोण दोषी ते विचार करण्याची वेळ आहे...
रजा मंजूर झाली नव्हती तर घरी बसायचं होत.. अशावेळी राग मनात ठेऊन कामाला जायचच कशाला? घरी बसला असता तरी नोकरी गेली असती आणि राग मनात ठेऊन accident केला आणि इतके निष्पाप लोकांचे जीव घेतले तरी पण नोकरी गेलीच ना? घरी बसला असता तर फक्त नोकरी गेली असती.. दुसरी करता आली असती... Private bus वर ड्रायव्हर म्हणून लागला असता. दुसऱ्यांचा जीव घ्यायचा आणि मग आपली कारण देत बसायचं.. कारण पण देताना काय देतात लोक कारण?
@@devendrahonawarkar3136agadi barobar bolalat ghari gavi jaun sheti kara pan kunache jiv ghenyacha kunala adhikar nahiye
Khun ha khun asto tyat kaslich baju naste. Ugach tyacha pulka yaychi kahi garaj nahiye. Raja manjur nahi zali mhanun te kela he tumhala barobr vatat asel tr tumhala parat yeravdyat jaychi garaj ahe.
भाऊ , मी अभिजित धोत्रे, तुझ्या या vdo मध्ये फोटोतील जे दोन गाड्या दिसत आहे यातील सिल्व्हर कलरची गाडी माझी होती.मला धडकून संतोष माने थांबला.
Pan tu saglyanche shrdh ghatles amchya Nate vaikancha mulaga adhu houn gela purn Ghar udhvast zale
जन्मठेपेनंतर बाहेर आल्यावर सुप्रीम कोर्ट चे जज व इतर 3 वकिलांचा संतोष मानेला फाशीच्या शिक्षेपासून वाचावल्याबद्दल पुणेकरांनी आणि पूर्ण महाराष्ट्राने सर्वांचा जाहीर सत्कार करावा. 9 निष्पाप माणसे जीवनीशी गेली त्यांच्या आत्म्याला आणि त्यांच्या मुलांना खुप बरे वाटेल 😢
Ya madhe court cha judge chi chuk nahi, jya lokani ti case *Weak* keli tyancha vishai bola
केस विक केली म्हणजे काय ? 9 लोक मारले ते काय एलीअन आले होते का मारायला ? सुप्रीम कोर्ट च्या जज ला एवढीही अक्कल नसावी ?
Are baba gujrat madhe tya bilkis banochya dolya samor tichya pariwaraxhya 11 lokancgi hattya zali tichya aai baroba rape kelu time swataha garodar hoti kiti tari zananni tichyawar rape keli pariwararil annya mahilanwar tichya samor rape kela gela tichya mulila tichya dolya samor aptun aptun marun takla gela tula meleli samzun nagna awasthet sodun gele ashya rakshasanna shiksha purna wahaychya agodar sarkarchya sangnyawarun sodnyat ale mhanje kiti nirdai nyay palika ahe kiti nirdai loka ahet ani he fakta bhartatach shakkya ahe ase mala watta tyaweli hech dayawan pradhanmantri CM hote
तुझी स्टोरी सांगण्याची पद्धत 1 नं आहे भो.
या घटनेपूर्वी संतोष माने चे ट्रॅक रेकॉर्ड एकदम clear होते ,कधीही सुट्टी न मारणारा शिस्त पाळणारा ड्रायव्हर होता पण वरिष्ठांनी त्याला जाणून बुजून त्याला सोयीस्कर होतील अशा duty दिल्या नाहीत ,डबल डबल duty करायला लावली त्यामुळे संतोष माने विचलित झाला.
असं असेल तर त्या वरिष्ठाना मारायचं सोडून निष्पाप लोकांना का मारले ? माने व्हिक्टिम नाही विकरूत होता .
अत्यंत चुकीची पाठराखण..
म्हणून माणसं चिरडायची का? किड्या मुंग्या सारखी,
एक दम बरोबर त्याना
@@anilkoditkar9344 nahi
संतोष माने मुळे आज पण माझा manager मला बोलतो. काय माने सगळं नीट आहे ना. 😂
😂😂😂😂😂
😂😂
😂😂😂
That's not good. Eka माने chi shiksha इतर माने मंडळीना का बरे? Manager la म्हणाव जरा जपून!
😂😂😂
संतोष माने भरधाव वेगाने बस चालवून लोकांना उडवत सुटला होता त्यावेळी पोलीस नियंत्रण कक्ष पुणे शहर येथे मी कर्तव्यावर होतो. मीच या घटनेची माहिती पोलीस आयुक्त माननीय मीरा बोरवणकर तसेच सर्व संबंधित पोलीस अधिकारी यांना वायरलेस यंत्रणेद्वारे कळवली होती
त्याने हे क्रूर कृत्य का केले याची माहिती मिळू शकली का?नक्कीच घरगुती वाद ,पगार कमी असली काही कारने असणार यामागे.संतोष माने याने जे केले ते एकदम चूक होते.स्वतःचा जीव गंमविण्याचा प्रत्येकाला अधिकार असू शकतो पण दुसऱ्याला मारण्याचा अधिकार नक्कीच कुणाला नाही.नक्किच संतोष माने डिप्रेशनचा शिकार झाला असणार.आजकाल 100 लोकांमधील 50 लोक डिप्रेशनचा शिकार झाले आहेत,ही खूप मोठी समस्या होत चालली आहे
Tyaveli timing kay hota divsa ki ratri
@@ravindranikam3006Divsa ghadal he.
धन्यवाद साहेब
मी आता पर्यंत संतोष माने च नावं खुप लोकांना सागितलं आणि ही च माहिती दिली आहे खुपचं मस्त सागितलं......😢😢❤❤
चिन्मय भाऊ फक्त तुमचे विषय भारी असतात म्हणून बगतो नायतर ते राजकीय व्हिडिओ बगून वैताग आला🙏
Baapa cha have ghyaala laaj vaatti
मी शाळेत असताना ही घटना झाली होती.. हीच बस आमची शाळा सुटण्याच्या थोड्या वेळा पूर्वी च आमच्या शाळे समोरून ( गुलटेकडी पासून लक्ष्मी नारायण थेटर कडे) गेली होती.. शाळा सुटल्यावर मुलांची खूप गर्दी असायची शाळे समोर.. नशिबानं खूप मोठी घटना होण्या पासून वाचली अस म्हणव लागेल
आमचे सिंहगड वर शॉप आहे माझे वडील समोरच्या दिशेने पलीकडे, शॉप उघडण्यास निघाले होते, तेवढ्या त्यांना समोरून, एस टी, उलट्या दिशेने येताना दिसली, मंग काय ते पळत समोरच्या सायकल वाल्याच्या दुकानात घुसले, आणि तिथेच समोर एसटी थांबली, संतोष माने ला, सगळ्यांनी मिळून चोप दिला, माझ्या वडिलांचा अपघात वाचला पण इतर, निर्दोषी नागरिक बळी पडले, किती तरी लोकांचे नुकसान झाले, असे पुन्हा घडू नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना, ( अपघातात मृत्यू पावलेल्या सं पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली 💐 💐 🙏🏻🙏🏻
एस.टी कामगारांची व्यथा समजून घेण्यासाठी एकदा आगारात जाऊन भेट द्या..
म्हणून संतोष ने एवढे कांड केला 😶
संतोष माने च्या मूर्ख पणाचा मी पण शिकार झाले ... डिलिव्हरी नंतर काही कारणासाठी 5 तास मी फक्त hospital chya samor नुसती गोल गोल फिरत होते. Maz 6 दिवसाचं बाळ घरी...आणि मी रोड वर..प्रचंड वेदने मध्ये.....तो दिवस कधीच विसरू शकत नाही.....
१९५९ साली त्या कालीन सोव्हिएत युनियनने आपली सर्वात पहिली Nuclear Submarine K-19 कार्यरत केली. तिच्या बांधणी पासून ते trial run आणि पहिल्या मिशन पर्यंतच्या कारकीर्दीत अनेक अधिकारी, कर्मचारी बळी गेले म्हणून तिला Widowmaker हे टोपण नाव पडले. आज आपल्या लाल परीची गोष्ट ऐकताना K-19 ची आठवण झाली. तुम्ही ही माहिती कशी जमवलित हे एक कोडेच आहे.😅
परत एकदा संतोष माने ची पुण्याला गरज आहे रोडवर जरा जास्त च छपरी फिरायला लागलेत
😂😂😂😂👌🏻👌🏻
😂😂😂
😝😝😝😝
😂😂😂😅
😂😂😂
पण त्या ड्रायवर ला बाहेर ओढण्याचं महत्वाचं काम कोणी केलं ते सांगितलं असतं तर बरं झालं असतं असो पण आपलं सांगणं ऐकण्या सारखं असतं 💐🙏
Baapa cha NAV GHYALA LAAAJ VAATTI 😂😂
आणि सरकार नी त्याचा काही सत्कार वगैरे केला की नाही ते पण सांगायला पाहिजे होतं
Muslim hota to tymule nasel ghetal bhava
Sharif kutti hota...
@@DESIGNER_ELEMENTS ase kiti baap ahet tuze?
फाशीच्या शिक्षे विरुद्ध दाद मागणारा मानसिक कसा हा महत्वाचा प्रश्न आहे.
तो काही आभाळातून पावसा सारखा खाली नाही पडला
@@dnyaneshwarshegokar4779 तेच तर मी सांगतोय हा मानसिक कसा?
प्रभात सिनेमा गृहात सिनेमा पाहत असताना बस ची बातमी कळली... आणि त्या दिवशी मी सलग 3 सिनेमे पाहिले होते.
संतोष मानेन GTA ला लाईच seriously घेतलं वाटत!!!!
शेवटची दोन मिनिटे...अती महत्वाची ..अतुप्त आत्मा फटकत असतोच 😢😢
पण नक्की कोणाचा आत्मा ?
@@kedarj44410कित्तेक निष्पाप जीव गेलेत ह्या बस मुळे त्या पैकी कोणाचा तरी असेल. आता लोक ह्याला अंधश्रद्धा म्हणतील पण काही गोष्टी अशा असतात ज्यांचे पुरावे नसतात पण तरी आपले अस्तित्व दाखवतात. त्या पैकीच हे एक.
@@kedarj44410एस्तीचा आत्मा, त्याला स्क्राप मध्ये देऊन मुक्ती द्यावी
त्याचा आत्मा नाही. त्याचा बाटली प्रभाव. 🍾🍺🍻
ह्याच कारण एकच ड्रायव्हर बाहेर बाहेर जातात त्यात त्यांना लोकल पब्लिक खुप त्रास देतात येवडा की ड्राईव्ह भान सोडून काहीही करायची तयारी ठेवतो 😢 ह्या साठी ऐकादा तरी नियम आसवा ड्रायव्हर ची पण जिंदगी आहे 🙏
वरिष्ठांनी संतोषला double duty करायला लावली होती. त्याने वारंवार विनंती केली तरीही वरिष्ठ ऐकत नव्हते. संतोष चा गुन्हा दिसला पण त्या वरिष्ठांचे काय?
कामाचा ठिकाणी होणाऱ्या शोषणाच काय हो? संतोष माने गेला त्याच्या बुद्धिमते ने तो व्यक्त झाला पण खासगीकरण करून सरकारी मालमता विकून पण प्रश्न कर्मचाऱ्यांचे तिथेच आहेत
त्याच बसचा पुन्हा कोल्हापुरात उमा चौकात अपघात झाला 2-3लोक मेली शापीत बस
भूत असेल bus मध्ये
संतोष माने ला एकदा मरीन ड्राईव्ह वर सोडा तिथे काय छपरी असतात🥲
एखादा व्हिडिओ बुरारी मर्डर केस चिन्मय भाऊ कडून detail मधे यावा..
ही घटना एक milestone set करून गेली. माझ्याकडे एक ७ सीटर कार आहे. माझी बायकोचे दुचाकी चालवणे मला माहीत आहे. त्यामुळं तिने कधी मला कार मागितली की मी तिला म्हणतो, "तुझ्या हातात कार देणे म्हणजे संतोष मानेच्या हातात ST देण्यासारखे आहे."😊
😂😂😂
चांदीचे गाव हुपरी जिल्हा कोल्हापूर वरती एक व्हिडीओ होउदे चिन्मयराव❤️
❤❤😊
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद...
चिन्मय भाऊ तुम्ही मराठा आरक्षण त्याचा इतिहास अण्णासाहेब पाटील त्यांचा बलिदान याच्यावर व्हिडिओ बनवा
@chinmay 👍👍🙏🙏
जर हे सगळं खरं आहे तर त्या बस 👽तकि म्हणायची😢
अजूनही तो दिवस आठवतोय.
आम्ही MMCC चे विद्यार्थी annual festival शेवटचा दिवस असल्यामुळे सकाळी ७-७:३० ला लगबगीने कॉलेज ला गेलो.
१ इव्हेंट संपून आम्ही ९-९:३० च्या सुमारास DJ लाऊन नाचायला लागलो.. पण बाहेर काय सुरू आहे ह्याची कोणालाही खबरबात न्हवती.
१५-२० मिनिटांनी कोणीतरी DJ बंद करून माईक वर घडलेली घटना सांगितली आणि आम्ही सगळे सुन्न झालो, सगळी कडे दहशतपूर्ण शांतता होती.
घरी जायची पण हिम्मत होत न्हवती.
😢😢
त्यावेळी मी जस्ट स्वारगेट च्या मेन गेट मधून बाहेर आलो आणि पुढील 5 मिन मध्ये हा येडा बस घेऊन बाहेर आला
असे अनेक संतोष माने आपल्या अजू बाजूला असतात, ऑफिस मधेही असतात.... वेळीच ओळखला पाहिजे आणि ....आपला प्रोग्राम होणार नाही याची कळजी घेतली पाहिजे
संतोष माने असो व कोणीही माने म्हंटल की एकच आठवणार
धनंजय माने इथेच राहतात का 😁😂😂🤣
भावा जिंकलस
आज ही तो दिवस आठवतो... मला खूप फोन आले त्या दिवशी...मग कळले काय होतंय ते...मी शंकरशेठ रोड ने कोंढव्याकडे गेलो होतो... मग मी सुद्धा फोन करून अलर्ट केलं सहकाऱ्यांना आणि विशेष म्हणजे शेवटी त्याला माझ्या घरापाशी सिंहगड रोड जवळ एका तरुणाने कसलीही पर्वा न करता पकडल... त्याच्या धाडसाचे आजही कौतुक वाटते...🙏🏻🙏🏻🙏🏻
No hate सगळेच चांगले आहेत पण विश्लेषण करावं चिन्मय साळवी ने च💝 अफलातून एकदम👌
एकाच बसचे एवढे अपघात ? ते पण साधारण अपघात नाही तर त्या अपघातामध्ये अनेक मृत्यू झाले आहेत. याला योगायोग म्हणावा की आणखी काय ?🤔😱😱
भुतिया बस के चुतीया ड्रायव्हर बोलते ,😅
एकाच बसचे एवढे अपघात? ( अंधश्रद्धा)
- बसमध्ये तांत्रिक बिघाड असू शकतो , अजूनही 2023 मध्ये 40-50 वर्ष जुनी वाहने चालवतात
@@Ulpzexkgwjjzx8655बस चे एवढे अपघात होऊन ही एस टी महामंडळ वाले chutiya आहेत का ? बस तांत्रिक बिघाड तसाच ठेवून चालवायला देत होती 🤦
त्यादिवशी ही बस 14 किलोमीटर पुणे शहरात संतोष मानेन चालवली.. त्यामध्ये त्यांनी समोर येईल त्याला उडवले..
तांत्रिक बिघाड फक्तं एकाच बसमध्ये?
काही दिवसापूर्वी अशीच एक घटना घडली होती त्याच रोडवरती त्याचा काही स्टोरी बनवले का तुम्ही का काय माहिती आहे का नाही तुम्हाला त्यावेळेस गाडी ईरटीगा याा मॉडेलची होती आणि त्या नदीपत्रात ढोल सराव पूर्ण करून घरी जाणाऱ्या मुलांना त्या गाडीने धडकावलं होतं काही वादक मित्रमंडळी भरपूर जखमी झाले
संतोष माने चा किस्सा खुप नावलौकिक आहे त्या वरती ३ तासाचा मराठी अँक्शन त्रिलर tragedy चित्रपट उभा राहू शकतो with good conclusion to our vivers. Chinmay bhau ne khup Chan timing sadhat kissa सांगितला भविष्यात जर चिन्मयला संतोष माने चा रोल मिळाला तर वावगं वाटायला नको 😅😊😂
२०१२ मध्ये मी सुध्दा अशीच बस चालवायचो (GTA मध्ये)
मागच्या महिन्यात कल्याण बस डेपो मध्ये दोन बसच्या मधी चिरडून आई आणि तिच्या मुलीचा मृत्यू झाला माझ्या समोर ही घटना घडली बस ड्रायव्हर लोकांची विकृती खराब झाली आहे
Pagar wadhwa sagale wyavsthit chalvtil 😢
अतिशय उत्तम कथन
👌👌👌
How can you verify the 2nd n next incidents
मानसिक आजार वगैरे काही नाही त्याचा आई आणि बहणीनिना बस खाली आण्यचा त्याचा समोर मग डोकं ठिकाणावर आला आसता लगेच
ते सर्व ठिकआहे. पण त्या बस मधे कोण बसलेला आणि त्यांच काय झाल पुढे😢😢
Bus rikami hoti. koni aat asta tar evdha sagla zalach nasta
भावा छत्रपति शिवाजी महाराजांचा इतिहास सगत जा ना यार
MH 14 BT 1532
You should have mentioned the name of the brave boy who stopped Santosh Mane.
Yes he should have mentioned his name
Constable Bapu Lonkar, he is that daredevil young hero, he's preparing now for PSI.
@@deequanimous1181 the boy name is Shareef Ibrahim kutty please google it why people like you always spread hate
his name is kutty and hes now in army
संतोष माने तर खऱ्या आयुष्यात GTA Vice City खेळत होता 😂😂
😂😂😂😂😂
Mission failed
Respect -
This is not funny at all. Please be sensible. Just think about the families who lost their loved ones in this tragedy.
Bhad khau ithe lok mele ani tula joke suchtayt
Tula hasayla kay zal tuzya घराचं कोणी मरल असल तर कळते
लहानपणी माने ची गोष्ट पेपरात वाचली होती 😮
संतोष माने ची जन्मठेप पुर्ण झाल्यावर त्याचा सुप्रीम कोर्टाचे ते तिन जज बोलवुन त्याचा जाहीर सत्कार करावा😂 काय ते कोर्ट काय ते कायदे बढिया है😂
आजच्या घडीला पुणे मद्दे ट्रैफिक yevdh zalay ki संतोष माने part yayla पहिजे 😅
Ani tula udavl pahije tevha samjel..je tya ghatnet mele tyanchya family ch Kay zal asel te kalal ast tula
बरेच दिवसापासून चिन्मय भाऊ दिसत नव्हते. मला वाटलं बोल भिडू चॅनल सोडून दिला की काय.😅
thanks bol bhidu for update. No news paper give update about what happen next to that case
Bol bhidu cha kyy vishay
Maza bhacha Chi Akshay Pise got caught in this accident..To two wheeler ne college la nigella hota .Wrong side ne ST aali .He was caught into the wheels .Alongwith the ner motorbike he came into front wheels and was totally smashed.His body hardly appeared. We still remember this incident. His motorbike was shown into the news constantly.
RIP Akshay❤
🙏 💐💐💐💐💐 🙏
ओम शांती🙏
😮.
Sir ek tr Marathi bola nahi tr English madhe ....aso .RIP akshay
RIP Akshay. Detailing of this incident shows how bad it would be to the closed ones who lost their lives.
Santosh Mane jauday jaychy घरचे लोक गेले ते काय करतात ते बघा
याचा दुसरा अर्थ असा होतोका जो सुप्रिम कोर्टा पर्यंत जाण्याची ऐपत व तयारी असते एक तर ते निर्दोष सुटतात अथवा शिक्षा कमी होते. पण आपल्या कायद्या मध्ये ज्याचे नुकसान झालेले असते ते काही भरून येत नाही.
संतोष माने हा आमच्या गावाच्या जवळचा आहे
संतोष माने सारख्या ,,मेटल मनोरुग्णांना,, डोक्यात गोळी झाडली पाहिजे...हीच खरी मृत्य झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...😢😢😢
Can you make a video on 2007 lonikand PMT bus accident ?
I am a victim of that bus accident
कसा काय वाचलास भावा
फार दिवस झाले मी शोधत होतो या केसचे पुढे काय झाले . धन्यवाद बोल भिडू
कमी पगार आणि कुटुंबाची जवाबदारी. या मुले खूप एसटी कर्मचार्यानि आत्म,,,त्या केल्या. मला वाटते लोकन्नी आंदोलन केली ते बर झाल. पन सरकार ने कालजी घेन khup गरजेच आहे.
हॉरर बस 🥲🥲
❤❤
छान माहिती मिळाली
भाऊ आमच्या राधानगरी बदल पण बोला की❤
ज्याने संतोष ला पकडले त्या हिरो च नाव सांगायला हवे होते.
Mala pn tyachich utsukta hoti
Jyane sarwpratham 'santosh mane ,la pakadnayache dhadas dhakwale to Tarun 'muslim ,hota.
@@imranmh0847 are bhava ata hya madhye Kay Hindu Ani Muslim 😐😐😐
Nav mahit asel tr sang...
Sudhra re jara tri...
@@factisfact8568Hya Lokanche sagli kade Hindu Muslim aste 😂😂😂.
@@factisfact8568Santosh Mane la pakadnara Tya vyaktiche nav Constable Babu Lonkar ahe.
Justice is denied, when justic is delayed..Considering gravity of situation, the person who killed innocent people and ruin their innocent family members should have punished retaining the first verdict announced..
Law should be common to all.. murder is murder . Veda ahe mhanun murder chi fashi maaf is ridiculous...
काही वरिष्ठ अधिकारी खूप मनमानी करून छक्केपंजे न येणार्याना खूप त्रास देतात.अशावेळी कमकुवत मनाच्या व्यक्ती,किंवा अतिरागीट अशाकडून अशी कृत्यहेऊ शकतात.पोलीस,ड्रायव्हर अशा डिपार्टमेन्ट मध्ये सर्रास अस चालत.अस करू नये
आपकी बस मे भयानक आत्मा हैं😅😅 असच म्हणावं लागेल तिचे सारखेच अपघात होत आहेत आणि त्यात निष्पाप लोकांना जीव जातोय म्हणल्यावर.
त्याच दिवशी मी माझ्या लग्नासाठी मुंबई वरून गावी गेलो होतो,,, स्वारगेट वरून माझी ST सुटल्यावर ही घटना घडली.
Horror movies Banvnya sarkhi story ahe Bus Chi 😅,
Khooni Bus
Correct. Picture banel अशी real story aahe. कदाचित संतोष माने खुनी bus मुळे कसा झपाटल्या गेला असे दाखवू शकतात. कारण नंतर त्या bus ne केलेले खुनी अपघात.
खुप भारी माहिती देता
Pn baapa NAV ghyaala laaj vatti😂😂😂😂😂
त्या न्यायाधीश च्या घरातलं कुणी मरण पावलं असतं तर त्याने जन्मठेेची शिक्षा दिली असती का.
मस्त
एक व्हिडीओ DSK बिल्डर वर पण बनवा
संतोष मानेला पकडणारे पीएमपीएल कामगार श्री अमर चव्हाण हे आमचे परममित्र आहेत
आशा मनोरुग्ण राक्षसांना जिवंत जाळले पाहिजे
मी कोल्हापुरातील अपघात स्वतः पहिला आहे उमा टॉकीज जवळ झाला होता.
संतोष ला त्याच बस मध्ये टाका....आणी द्या पेटवून
तुझ्या आईला झvle आहे का संतोष ने
एका खुळ्या ला st मधे रुजू करणाऱ्या लोकांना काहीच शिक्षा झाल नाही😢
Mental distorder mhnje ved nahi...
@@tejasmondheमानसिक आजार बद्दल खुपच अज्ञान आहे अजून भारतीय समाजात 😂. शरीर आजारी पडतं तेव्हा कार्यक्षमा नसते पण बरं झाल्या वर कार्य करते तसंच मन हि आजारी पडू शकते व नतंर नीट जगू शकते.
मनाच्या आजारी मानसाला अज्ञानी समाज खूपच वाईट वागणूक देतात त्याने त्याला आजार पेक्षा जास्त त्रास होतो.
reservation ne post milali ashnar
I was in Camp that day I still remember that day like yesterday, I was on my Pulsar going from East Street to my home in Bhavani Peth
Baap re
हनायचा ना त्याला
❤ बोल bhidu की जय हो
बोल भिडू च्या नावानं चांगभलं 😃😃
मी राधानगरी मधील आहे शेवटी ती बस कोल्हापूर आगर ला परत दिली
शिवाजीनगर नको बोलत जाऊ रे भावा
छत्रपती शिवाजी महाराज नगर म्हण
सुरूवात आपल्या पासुन करा
Nice
मी त्या वेळी ९ वी ला होते ह्या संतोष माने ची खूप जास्त चर्चा झाली होती पुढे किती तरी दिवस मला शाळेत जाताना पण भीती वाटायची 😢😢
Dada tuji Marathi khup hard aahe yaar 😢 mala kahi smjat nhi aami nagpur kadle aahot tumchi mumbai pune chi Marathi che Shabd khup hard jato dada thode easy shabd vaprat ja re baki kahi nhi love you ❤️
धनंजय माने.