#kirtan

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 10. 2021
  • Organ - Pt.Vishwanath kanhere.
    Tabla - shri.Ramesh modak.
    This is the live recording of kirtan by Dattadasbuva ghag. The video is second part i.e.akhyan. This is the story of an elephant which is very famous story in the #bhagwat.
    #like and #subscribe and #share
    ऑर्गन - पं.विश्वनाथ कान्हेरे.
    तबला - श्री.रमेश मोडक.
    गुहागर तालुक्यातील साखरीआगर येथील गणेश जयंती उत्सवामध्ये कीर्तनसूर्य ह.भ.प.दत्तदासबुवा घाग यांनी केलेल्या कीर्तनसेवेचे हे ध्वनिमुद्रण आहे. ह्या भागात मागील पूर्वरंगाच्या पुढचे आख्यान आले आहे. श्रीमद्भागवत पुराणातील लोकप्रसिद्ध 'गजेंद्र मोक्ष' ही कथा आख्यानासाठी घेतली आहे. विविध वृत्ते, सुरेल पदे, संस्कृत श्लोक, विनोद आणि सुयोग्य रसपरिपोष तसेच कथेची सामान्यातल्या सुद्धा सामान्य माणसाच्या जीवनाशी घातलेली सांगड या सर्वांचा सुरेख समन्वय यामुळे हे आख्यान खऱ्या अर्थाने रंगले आहे - रंजक झाले आहे. बुवांचा गाण्यातील अभ्यास, रियाझ आणि सादरीकरण असामान्य होते, हे वेगळेपणाने सांगण्याची गरज नाही. कीर्तन-संगीत यातील व्यासंग, प्रभुत्त्व आणि वाणीतील मार्दव यांमुळे स्व.घाग बुवांचे कीर्तन एक वेगळ्याच उंचीवर जात असे. तसेच या कीर्तनाकरिता पं.विश्वनाथ कान्हेरे यांनी ऑर्गन साथ केली होती. त्यामुळे कीर्तनाच्या कार्यक्रमाचे एका सोहळ्यातच रूपांतर झाले असे म्हणण्यास हरकत नाही.
    #kirtan #marathi #sanskriti #gajendra #gajendramoksham #organ #music #tabla #marathikirtan #harikirtan #quality #guhagar #कीर्तन #मराठी #ऑर्गन #संगीत #तबला #गुहागर

Komentáře • 9