धैंचा हिरवळीचे खत ९ टन एकरी फक्त ४५००/-

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • आधुनिक शेतीचा गोडवा या युट्युब चायनलवर आपले सहर्ष स्वागत आहे.
    शेतकरी मित्रांनो या भागात आपण हिरवळीच्या खताविषयी म्हणजे धैंच्या या पिकाविषयी माहिती पाहणार आहोत....
    एकरी बियाणे :-
    धैंच्या या पिकाचे ज्यावेळी आपण हिरवळीचे खत म्हणून घेणार असतो त्यावेळी एकरी २१ ते २५ किलो बियाणे वापरले पाहिजेत.
    पाणी :-
    या पिकासाठी फक्त तीन पाणी देणे आवश्यक आहे. जास्त पाण्याची गरज नाही.
    खत व्यवस्थापन:-
    या पिकासाठी खत देण्याची गरज नाही परंतु चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी एकरी २० किलो १०:२६:० वापरल्यास फायदेशीर ठरते.
    काढणी:-
    या पिकाचे ४५ ते ५० दिवस म्हणजे शेंग कोवळी असताना नांगराच्या मदतीने मातीआड करावा.
    एकरी उत्पादन:-
    धैंच्या या हिरवळीच्या पिकातुन आपणास एकरी ८ ते ९ टन खत तयार होते.
    हिरवळीचे खते माहिती असावी
    हिरवळीचे खत म्हणजे शेतात वाढलेल्या हिरव्या वनस्पती ,झाडांचा पाला किंवा पानांसह कोवळ्या फांद्या बाहेरुन आणून अथवा मुद्दाम जमिनीमध्ये पेरुन वाढलेली पिके फुलो-यावर आली म्हणजे शेतात नांगरून ती गाडून एकजीव करणे या वनस्पतींच्या हिरव्या व कोवळ्या अवशेषांपासून तयार झालेल्या खतास "हिरवळीचे खत "असे म्हणतात.
    हिरवळीच्या खताचे फायदे :-
    •ही जवळजवळ प्रति हेक्टरी ५० -१७५ किलो नत्राचे योगदान करते .
    •फार मोठ्या प्रमाणात जमिनीत कर्बाचे प्रमाण वाढवते .
    •मातीची पाणी व अन्नद्रव्ये धरून ठेवणयाची क्षमता वाढवते .
    •मातीत फायदेशीर सुक्ष्म जीवाणूंच्या निर्मितीचे प्रमाण वाढवते
    •मातीच्या भौतिक रासायनिक व जैविक पोतावर किंवा वातावरणात कुठल्याही प्रकारचे प्रदुषण होत नाही.
    •सर्वसाधारपणे शेंगवर्गीय पिकांपासून बनलेले १ टन हिरवळीचे खत २.८ ते ३ .० टन शेणखताच्या बरोबर असते.
    या खतांच्या आच्छादनाने जमिनीची धुप होत नाही .
    हिरवळीच्या खतांचे प्रकार
    हिरवळीच्या खतांचे दोन प्रकार आहेत .
    १) शेतात लगवड करून घेण्यात येणारी हिरवळीची खते :- जेव्हा हिरवळीच्या खतांचे पीक शेतात सलग ,मिश्न किंवा एखाद्या पिकांमध्ये आंतरपीक म्हणून पेरतात व त्याच शेतात ते पीक फुलो-यावर येण्यापूर्वी शेतात नागंरून मिसळतात ,तेव्हा त्याला शेतातच घेण्यात येणारे हिरवळीचे खत असे म्हणतात .या प्रकारच्या हिरवळीच्या खतामध्ये ताग, गवार ,चवळी ,धैचा ,मूग ,मटकी ,मेथी ,लाख ,मसूर ,वाटाणा ,उडीद ,कुळीथ,सेंजी,शेवरी ,लसुरघास ,बरसीम या पिकांचा समावेश असतो.
    २) हिरव्या कोवळ्या पानांचे हिरवळीचे खत :- पडीक जमिनीवर अथवा जंगलात वाढणा-या वनस्पतीची कोवळी हिरवी पाने आणि फांद्या गोळा करून शेतात गाडणे अथवा पडीक जमिनीवर किंवा शेताच्या बांधावर हिरवळीच्या झाडांची लगवड करून त्याचा पाला आणि कोवळ्या फांद्या शेतात पसरवून नांगरणीच्या अथवा चिखलणीच्या वेळी मातीत मिसळणे होय .हिरवळीच्या खतासाठी गिरिपुष्प , शेवरी ,करंज ,सुबाभुळ ,टाकळा,कर्णिया,ऎन ,किंजळ यांची झाडे व झुडपे पडीक जमिनीत वाढ्वून त्यांच्या हिरव्या पानाण्चा व कोवळ्या फांद्याचा हिरवळीच्या खतासाठी वापर करतात .
    हिरवळीचे खत तयार करण्याच्या पध्दती -
    १) निरनिराळ्या हंगामातील पिकांचे हिरवळीचे खत करण्याच्या वेळी हिरवळीचे पीक फुलो-यावर आलेले असावे .ही पिके ६ ते ८ आठवड्यात फुलो-यावर येतात .ही पिके ज्या शेतात घेतली असतील त्याचे खत तयार करावे .या हिरवळीच्या पिकांची पाने बाहेरून आणतात ती जमिनीवर पसरवून नांगरामागे टाकून गाडावीत .ट्रायकोडरमा चा उपयोग केल्यास ह्या खताची प्रत वाढविता येईल .
    २) नुकत्याच फूलो-यात आलेले हिरवळीच्या पिकांची जमिनीलगत कापणी करावी . कापलेले हिरवळीचे पीक शेतात लोखंडी नागंराने तास घेउन नागंराच्या प्रत्येक सरीमध्ये उपलब्ध प्रमाणात टाकावे .नंतर नागंराच्या दुस-या तासाच्या वेळी अन्यथा धानाच्या चिखलणीच्या वेळी संपूर्ण गाडले जाईल याची काळजी घ्यावी .हिरवळीचे पीक जमिनीत गाडून झाल्यावर वरुन फळी किंवा मैद फिरवावा .त्यामुळे जमिनीत गाडलेले सेंद्रिय पदार्थ पूर्णपणॆ झाकले अथवा दाबले जाऊन ते कुजण्याची क्रिया वेगाने सुरु हाते.
    ३) हिरवळीचे पीक कुजण्यास जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असावा लागतो म्हणून सर्वसाधारणपणे हिरवळीच्या पिकांची पेरणी जून अथवा पावसाच्या सुरवातीस करुन आँगस्टमध्ये गाडणी करावी . हिरवळीचे पीक गाडण्याच्या वेळी जर पाऊस पडला नाही किंवा जमिनीलगत ओलावा कमी असेल तर पाणी द्यावे .त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया जलद होईल .
    ४) शेतात उपलब्ध काडी कचरा व गवत ह्यांचे ढिग शेतात जागोजागी करुन कुजण्यास ठेवावे व योग्यवेळी जमिनीत गाडावे कुजण्याची प्रक्रिया लवकर होण्यास ३ .५ फुट x ३.५ फुट खड्डयात गवत व काडी कचरा कुजवता येईल .
    हिरवळीच्या खतांची पिके :
    धैचा - तागापेक्षा काटक असे हिरवळीचे हे पीक असून कमी ,पर्जन्यमान ,पाणथळ िकाण ,क्षारमय अथवा आम्लधर्मीय जमिनीत सुध्द हे पिक तग धरु शकते .या वनस्पतीच्या मुळांवर तसेच खोडावरही गाठी दिसून येतात या गाठीमध्ये रायझोबियम जीवाणू सहजीवी नत्र स्थिरीकरणाच्या प्रक्रियेने हवेतील नत्राचे स्थिरीकरण करतात .
    या पिकांच्या लगवडीसाठी हेक्टरी २५ ते ४० किलो बियोणे पावसाळ्याच्या सुरूवातीस शेतात पेरावे . बियाण्याची उगवण लवकर होण्यासाठी त्यास गंधकाची प्रक्रिय करून परत थंड पाण्याने धुवावे आणि त्यानंतर रायझॊबियम जीवाणू संवर्धनाची प्रक्रिय बियाण्यास करावी .पिकाच्या वाढीसाठी आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा करून पीक ६ ते ७ आठवड्यात ९० ते १०० से .मी .उंचीपर्यत वाढले असता जमिनीत नांगराने गाडून टाकावे .या काळात धैच्यापासून १० ते २० टनापर्यत हिरव्या सेंद्रिय पदार्थाची निर्मिती होते .या वनस्पतीत नत्राचे शेकडा प्रमाण ०.४६ ट्क्के इतके आहे .भाताची लावणी करण्यापूर्वी आठ दिवस पीक जमिनीत गाडल्यास हेक्टरी ८० किलो नत्राची उपलब्धता होऊ शकते .
    अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चायनल नक्की सबस्क्राइब करा.
    Tag,dhaynchya,ताग,धैंच्या,हिरवळ,खत,नांगरट,पाडवा,योग्य वेळ,एकरी,बियाणे,hektri,
    Marathi,
    #धैंचा #ताग #आधुनिकशेतीचागोडवा #हिरवळीचेखत

Komentáře • 124

  • @gajananpalewar8756
    @gajananpalewar8756 Před rokem +4

    धेंच्या गाडल्या नंतर किती दिवसांनी पिक लागवडीसाठी तयार होते

  • @ghanshambharshankar2046
    @ghanshambharshankar2046 Před 3 lety +13

    लागवडीबाबत माहिती द्यावी. ओळीतील अंतर,खते,ओलीत इत्यादी

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety +6

      पुढील भागात आम्ही सर्व माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करु...... धन्यवाद...

    • @dhaneshnakate1664
      @dhaneshnakate1664 Před 3 lety +3

      @@adhuniksheticagodva mn

    • @vk29869
      @vk29869 Před rokem +1

      एकरी 25 kg विसकडून टाका

  • @babruwanshinde3727
    @babruwanshinde3727 Před 2 lety +13

    भाऊ बियाणे कुठं उपलब्ध आहे
    आणि दर काय आहे

  • @balasahebmarkad3441
    @balasahebmarkad3441 Před 3 lety +2

    भाऊ आपण किती दिवसाचे पिक आहे हे सांगीतले नाही .बाकी खुपचं छान माहिती दिली

  • @ecobragaming2708
    @ecobragaming2708 Před 3 lety +4

    खुपच उपयुक्त माहिती दिली 👌👌👍👍

  • @pallavichavan182
    @pallavichavan182 Před 2 lety +2

    Sir कापूस पिकासाठी हिरवळीचे खत तयार केले चालेल का? हरभरा, मका, कांदे, भुईमूग,आणि त्याच्यात शेणखत टाकले तर चालेल का

  • @amitkalshetti1920
    @amitkalshetti1920 Před 3 lety +3

    रब्बी हंगामामध्ये पेरणी करून नांगरणी करून खरीप हंगाम मध्ये पेरणी केली तर चालेल का

  • @pallavichavan182
    @pallavichavan182 Před 2 lety +3

    सर, ४० दिवसां नंतर हिरवळीचे खताची नांगरणी केल्यावर आणि १५ दिवसांनी हिरवळीचे खत कुजले तर त्याच्यात शेणखत टाकले तर चालेल का ? आणि त्यानंतर रोटर मारले तर चालेल का?

  • @FarmersSon
    @FarmersSon Před 3 lety +2

    खुपच उपयुक्त माहिती दिली ❤😍👏🙏

  • @pravingharge8692
    @pravingharge8692 Před 3 lety +2

    छान माहिती
    धेंचा बी कुठे मिळेल

  • @lankeshjoge5261
    @lankeshjoge5261 Před 2 lety +5

    Seed कुठे मिळेल

  • @altabshaikh1937
    @altabshaikh1937 Před 2 lety +1

    धैंचा पेरनीनंतर किती दिवसानंतर येतो जमिनीत गाडण्यासाठी

  • @anilk4679
    @anilk4679 Před 3 lety +4

    सर..नांगरणी केल्या नंतर किती दिवसांनी शेत दुसऱ्या पिकासाठी तयार होत..म्हणजे धैचा किती दिवसांनी कुजतो?

  • @activeShetkari
    @activeShetkari Před 3 lety +5

    Namaskar
    9 ton khat
    Shenkhatabarobr tyachi tulna keli tr sadharan kiti tractor khatachi lagtil
    Kiva tyacha power kiti rahil

    • @vinayakdhere3599
      @vinayakdhere3599 Před 3 lety +5

      Raghit question 👍

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety +4

      शेणखत व हिरवळीचे खत यांची तुलना होउ शकत नाही सर कारण शेणखतातील घटक हे वेगळे आहेत आणि हिरवळीचे खतामुळे नायट्रोजनचे जमिनीत स्थिरीकरण केले जाते तसेच सेंद्रिय कर्ब वाढते.

    • @activeShetkari
      @activeShetkari Před 3 lety +2

      Thanks sendriy karb vadhat asal tr mg changl ahe

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety +2

      धन्यवाद

  • @Amgaming759
    @Amgaming759 Před rokem +1

    Bhau gavran dethachi lagwad kashi kartat

  • @vishalmane4068
    @vishalmane4068 Před 3 lety +2

    खुप छान 🙏

  • @vishwambarlankalwar1136
    @vishwambarlankalwar1136 Před rokem +2

    ओळीतील अंतर व बियाणे कोठे मिळेल

  • @user-qm1xy5te1m
    @user-qm1xy5te1m Před rokem +1

    साहेब जानेवारी मध्ये करता येईल का धेंचा

  • @deepakghadge6876
    @deepakghadge6876 Před 2 lety +1

    खूप छान माहिती दिली साहेब

  • @StarGaming-ms5gn
    @StarGaming-ms5gn Před 2 lety +2

    Shree Swami Samarth

  • @govindgite6807
    @govindgite6807 Před rokem +1

    हरीन आणि डुकरा चा त्रास आहे का याला

  • @pandurangveer2134
    @pandurangveer2134 Před 2 lety +1

    मार्च च्या पहिल्या आठवड्यात पेरणी केली तर चालेल का ??

  • @Yuvy31785
    @Yuvy31785 Před 3 lety +1

    Aamhi reshim sheti karto.. Tuti chya pikat he lau shakto ka?

  • @bhagwatmalekar9702
    @bhagwatmalekar9702 Před 3 lety +2

    उन्हाळी पाण्याचे नियोजन साठी नंबर हवा

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 Před 3 lety +1

    🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻

  • @pallavichavan182
    @pallavichavan182 Před 2 lety +2

    Sir,हिरवळीचे खत तयार करून आणि त्याच्यात शेणखत टाकले तर चालेल का?

    • @pallavichavan182
      @pallavichavan182 Před 2 lety +1

      Reply dya sir, ☺️🌻 लवकर माहिती द्या सर.

    • @pallavichavan182
      @pallavichavan182 Před 2 lety +1

      सर, हिरवळीचे खत १५ दिवसांनी कूजले तर आणखी त्याच्यात शेणखत टाकले तर चालेल का?

  • @ganeshikhar648
    @ganeshikhar648 Před 3 lety +2

    बियाणे कुठे मिळेल व भावं किती आहे.

  • @abhaynakade2031
    @abhaynakade2031 Před 3 lety +3

    बिजाई साठी कोणत्या महिन्यात पेरणी करावं व किती किलो एकरी पेरावे

  • @rathodrohan7618
    @rathodrohan7618 Před rokem +1

    धेंचा che बियाणे कुठे मिळेल

  • @tanajikolekar3638
    @tanajikolekar3638 Před 3 lety +5

    धैँचाचे बियाणे कोठे मिळेल.

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety +2

      बियाणासाठी व अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाइल नंबर वर संपर्क करा.... धन्यवाद...

  • @GameStar4038
    @GameStar4038 Před 4 měsíci

    पाणी किती दयावी लागतात

  • @SGN2024
    @SGN2024 Před 3 lety +3

    हे हिरवळीचे खत पिक पेरणीपासून किती दिवसात तयार होते 🙏🙏

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety +3

      ६० ते ६५ दिवसात ते जमिनीत मिक्स करावे.

    • @SGN2024
      @SGN2024 Před 3 lety +2

      धन्यवाद साहेब 🙏🙏

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety +2

      धन्यवाद दादा...

  • @Er.Avinash_Patil.14
    @Er.Avinash_Patil.14 Před rokem +1

    बियाणे हवे आहे...? कुट भेटलं

  • @krishnashirsat5820
    @krishnashirsat5820 Před 3 lety +2

    9 टन म्हणजे किती ट्रॅक्टर खत

  • @parag7v
    @parag7v Před rokem +1

    Dhaincha and hadga are same

  • @vedantattal3638
    @vedantattal3638 Před 2 lety +1

    कोणत्या महिन्यात पेरले

  • @shantanug652
    @shantanug652 Před 3 lety +2

    Kahi janawarancha tras ahe ka... ? Fencing pahije ka yala ?

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety +1

      आमच्याकडे जनावरांचा काहीच त्रास नाही सर...

  • @rahulbiradar5287
    @rahulbiradar5287 Před rokem +1

    शेळ्या खतात का याला

  • @p.r.deshmukh4931
    @p.r.deshmukh4931 Před rokem +1

    Vijay bhaiya ne apne ghar ko Kay

  • @pravingawade3231
    @pravingawade3231 Před 3 lety +1

    याचा चारा जनावरे खातात का ? शेळी वगैरे.....

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety +1

      चारा म्हणूनही चांगल्याप्रकारे सद्या धैंच्याचा उपयोग होत आहे.

  • @krishnavaidya4991
    @krishnavaidya4991 Před 3 lety +2

    Dhencha cha seeds kilel ka aani kuthe milel sir ani kiti ru kg aste

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety +3

      धैंच्याचे बियाणे तयार केले आहे सर... धैंच्याचे बियाणे कोणत्याही बियाणे विक्रीच्या दुकानात मिळतात.....७५ ते ८० रुपये किलो बियाण्याचा दर असतो..... अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा..... धन्यवाद..

    • @krishnavaidya4991
      @krishnavaidya4991 Před 3 lety +1

      @@adhuniksheticagodva thank you sir

    • @vijaykumarvaidya2813
      @vijaykumarvaidya2813 Před 3 lety +1

      रब्बी.हंगामात.येते.का.एकरी.बीयाणे.किती

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety +1

      रब्बी हंगामात येते... एकरी बियाणे २० किलो वापर करावा.

    • @nileshpatil6090
      @nileshpatil6090 Před 3 lety +1

      @@adhuniksheticagodva unhali hangam

  • @swarakishorhandibag8254
    @swarakishorhandibag8254 Před rokem +1

    15 मार्च ला पेरू शकतो का

  • @sagarjadhav750
    @sagarjadhav750 Před 5 měsíci

    Kuthe milte yache seeds

  • @p.r.deshmukh4931
    @p.r.deshmukh4931 Před rokem +1

    Kaise taiyar karen

  • @dattasangle979
    @dattasangle979 Před měsícem

    बियाणे कुठे मिळेल

  • @vickythakare
    @vickythakare Před 4 měsíci

    biyana kuthe bet nar

  • @dipakchaure698
    @dipakchaure698 Před 3 lety +4

    कोणत्या महिन्यात करावे

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 Před 3 lety +1

    Kiti diwas lagatat

  • @kiranmunfan116
    @kiranmunfan116 Před 2 lety +2

    याला वर खाताची गरज आहे का

  • @shailendrarathore9492
    @shailendrarathore9492 Před rokem +1

    Mujhe is ke bij chahiye

  • @pandurangjagtap4497
    @pandurangjagtap4497 Před 3 lety +3

    Saheb..mast

  • @bhaskarpawar3557
    @bhaskarpawar3557 Před 3 lety +3

    बी पेरणी पासून नांगरणी (काढणी)चा काळ किती

  • @cartoonfanboy1
    @cartoonfanboy1 Před 9 měsíci

    Seads kuthe milel?

  • @akshypatil2772
    @akshypatil2772 Před 2 lety +1

    धन्यवाद🙏💕

  • @sunilmali2695
    @sunilmali2695 Před 3 lety +1

    Biyane milel ka ky bhav ahe

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 2 lety +1

      अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.धन्यवाद...

  • @shivashankarpatil3817
    @shivashankarpatil3817 Před 2 lety +1

    बियाणे मिळते का

  • @pravin4041
    @pravin4041 Před 2 lety +1

    Number dya saheb

  • @ppasutkar
    @ppasutkar Před 2 lety +1

    या पिकास जनावरं खातात काय

  • @parag7v
    @parag7v Před rokem +1

    Mahabeej 20kg Rs 1500

    • @yogeshsonar2863
      @yogeshsonar2863 Před rokem +1

      दादा महाबीज चे ढेंचा बिज कोठे मिळेल आणि रेट काय आहे कृपया माहिती द्या

    • @parag7v
      @parag7v Před rokem +1

      @@yogeshsonar2863 kontya pan khat dukanat,sakhar karkhana khat dukanat pn asta

    • @yogeshsonar2863
      @yogeshsonar2863 Před rokem +1

      @@parag7v धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल.!

  • @bhagwatmalekar9702
    @bhagwatmalekar9702 Před 3 lety +1

    खूप छान छान फोन नंबर द्या

  • @sachingavli2694
    @sachingavli2694 Před 3 lety +2

    आपला फोन no taka bhau

  • @bhaskarshinde2820
    @bhaskarshinde2820 Před rokem +1

    Biyane kute bhetal sagu shkal

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před rokem +1

      कोणत्याही बियांणे विक्रेत्यांकडे मिळेल..

  • @topyoutubear420
    @topyoutubear420 Před 2 lety +1

    Sir, tumch numbar dya

  • @abhinandanmali7063
    @abhinandanmali7063 Před 2 lety +1

    मोबाईल नंबर please

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 2 lety +1

      अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.धन्यवाद...

  • @oneinone9048
    @oneinone9048 Před 2 lety +1

    sir seed bhetl kaaa
    Whatapps number Dayaas

  • @dhirajchoudhary6628
    @dhirajchoudhary6628 Před 3 lety +1

    बीयाने कुठे मिळेल प्लीज सांगा, ८३७९०६५४१७..मार्गदर्शनाची अपेक्षा.

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety +1

      बियाणे सर्व बियाणे विक्रीच्या दुकानात मिळतात. पाहिजे असल्यास अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.... नक्कीच आम्ही सहकार्य करु.