सकाळी उठल्यानंतर या 4 गोष्टी चुकूनही पाहू नका कंगाल व्हाल|| Don't see these 4 things after waking up

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 05. 2023
  • सकाळी उठल्यानंतर या 4 गोष्टी चुकूनही पाहू नका.. कंगाल व्हाल! || Do not see these 4 things after waking up in the morning.. You will be poor!
    सकाळी उठल्यानंतर या 4 गोष्टी चुकूनही पाहू नये. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र असे मानते की या गोष्टी पहिल्याने संपूर्ण दिवस वाईट जातो, आपण जी काही महत्वाची कामे करणार आहात ही कामे सुद्धा यशस्वी होत नाहीत, त्यांमध्ये अपयश येते. दुर्भाग्य आपल्या पाठीशी लागते. आपलं नशीब आपली साथ देत नाही... आणि मग घरामध्ये गरिबी आल्याशिवाय राहत नाही.
    चला तर पाहूया या 4 गोष्टी कोणत्या आहेत.
    1. मित्र-मैत्रिनींनो सर्वात महत्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे अनेकांना सकाळी उठल्याबरोबर आरशामध्ये स्वतःचा चेहरा पाहण्याची सवय असते. मित्र-मैत्रिनींनो ही सवय अत्यंत अशुभ आहे. कारण वास्तुशास्त्र असं मानत की सकाळी उठल्याबरोबर स्वतःचा चेहरा आरशात पाहणे ही एक अशुभ घटना आहे. अशाप्रकारे आरशामध्ये स्वतःचा चेहरा पाहिल्याने आपलं नशीब आपली साथ सोडून जात.
    या ऐवजी ज्योतिष शास्त्र असं म्हणतं की, सकाळी उठल्याबरोबर प्रत्येक मनुष्याने स्वतःचे दोन्ही हात पहावेत आणि..
    “कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती| करमुले तू गोविंद: प्रभाते कर दर्शनम्‌”
    या मंत्राचा जप करावा.
    मित्र-मैत्रिनींनो हा मंत्र केवळ तीन वेळा म्हंटल्याने आपला संपूर्ण दिवस चांगला जातो याबद्दल कुणीही शंका बाळगू नका.
    2. मित्र-मैत्रिनींनो दुसरी गोष्ट, जर आपण सकाळी उठल्यानंतर सूर्योदय झालेला असेल, तर सूर्यप्रकाशात आपली जी छाया म्हणजेच सावली पडते त्या सावलीकडे चुकूनही पाहू नका. मित्र-मैत्रिनींनो वास्तूशास्त्रामध्ये उल्लेख आहे, की सकाळी छाया पाहिल्याने, स्वतःची सावली पाहिल्याने दुर्भाग्यचा फेरा सुरू होतो. आणि जर तुम्ही पुन्हा पुन्हा अशाप्रकारे स्वतःची सावली पहात असाल, तर दुर्भाग्य इतकं प्रबळ बनतं की कितीही मेहनत करा, यश मिळत नाही. सोबतच मनात एक प्रकारची सतत भीती बसते, ताण तणाव निर्माण होतो, गोंधळाची स्थिती मनात निर्माण होते. परिणामी कोणताही निर्णय अशा व्यक्तीला योग्य प्रकारे घेता येत नाही. म्हणून सकाळी उठल्यावर स्वतःची सावली पाहणं हे कटाक्षाने टाळा.
    3. तिसरी गोष्ट, अनेक महिला भगिनींना सवय असते की रात्री आपण जे जेवण करतो ती खरकटी भांडी धुवून काढली जात नाहीत. रात्रभर बेसीन मध्ये ती तशीच असतात. या खरकट्या भांड्यातील जी तेलकट भांडी असतात, ती भांडी पाहिल्याने शनी देवांची
    अवकृपा होते. आपल्या कुंडलीतील शनी ग्रह खराब होतो. पूर्ण दिवस खराब जातो. दिवस भर कोणतेही काम यशस्वी होत नाही.
    म्हणूनच शक्‍य असेल तर रात्री जेवलेली भांडी रात्रीच स्वच्छ करून ठेवायला हवी. वास्तू शास्त्र अस म्हणत ज्या घरात रात्रभर खरकटी भांडी पडलेली असतात, त्या घरात माता लक्ष्मी कधीच वास करत नाही.
    4. चौथी गोष्ट तुम्हाला अचंबित करणारी, मात्र खरी आहे. बऱ्याच जणांना याचा वाईट अनुभव आला आहे. मित्रानो सकाळी उठल्यावर तुम्हाला तुमच्या छतावर किंवा घरासमोर, घराच्या आसपास एखादं माकड जर दिसलं तर त्याच्याकडे चुकूनही पाहू नका. एकवेळ माकडाकडे पाहिलेलं चालेल परंतु पण माकडा चे नाव मात्र घेऊ नका. ऐकायला विचित्र वाटते, मात्र हेच खरे आहे. जेंव्हा आपण सकाळी सकाळी माकडाचे नाव घेतो तेव्हा दिवसभर आपली स्थिती गोंधळलेली असते. आपण स्वतः अनुभव घेऊ शकता. छोटे छोटे निर्णय आपल्याला स्वतः ला घेता येत नाहीत! वेळेवर जेवण सुद्धा मिळत नाही. ज्यांना याविषयी शंका वाटत असेल त्यांनी स्वतः याचा अनुभव घेऊन पहावा.
    5. आपल्या घरासमोर जर सकाळी उठल्यावर कुत्र्यांची भांडणे सुरू असतील, कुत्री मोठमोठ्याने भुंकत असतील अशी कुत्र्यांची भांडणे पाहत बसू नका. कारण ही एक अशुभ घटना मानली जाते.
    6. घरामध्ये हिंस्त्र प्राण्यांचे फोटो असतील तर हे फोटो सकाळी उठताच पाहणं आपण कटाक्षाने टाळा. कारण सकाळी अशा प्राण्यांचे फोटो जेव्हा आपण पाहतो तेंव्हा दिवसभर कोणाशी ना कोणाशी आपले वाद होत राहतात, भांडण होत राहतात. दिवसभर गोंधळाची स्थिती राहते. म्हणूनच आपण जिथे झोपणार आहोत त्या ठिकाणी हे फोटो लावणे अवश्य टाळा.
    7. मित्र-मैत्रिनींनो, सकाळी उठल्यावर शक्यतो आपण देवाचं नामस्मरण करावे. आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद घ्यावे. कोणाशीही भांडू नये. आपण जर एखाद्याशी भांडत बसलो, तर त्याचा नकारात्मक प्रभाव आपल्या मानसिकतेवर निश्चितच पडतो. आपली मानसिकता ही वाद विवादाची बनते. कोणत्याही कामात यश येत नाही. आपलं मन कोणत्याच कामात लागत नाही.
    सकाळची वेळ ही देवाचे नामस्मरण करायची आहे. मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायची आहे. अशा प्रसन्न सकाळी या 4 गोष्टी चुकूनही पाहू नका. आपली सकाळ चांगली गेली, तर आपलं नशीब सुद्धा आपल्याला दिवसभर साथ देतं, हे कायम लक्षात ठेवा.
    माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी व्हिडिओला लाइक करा, कमेन्ट मध्ये “जय महालक्ष्मी” लिहा.. मित्रांना, कुटुंबीयांना हा व्हिडिओ whats app, फेसबूक इ. वर शेयर करा.
    अजूनही आपल्या Real Marathi चॅनलला subscribe केलेले नसेल, तर कृपया विनंती आहे, subscribe करून त्या शेजारील घंटीचे बटन अर्थात बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे असेच धार्मिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सातत्याने पोहोचत राहतील.
    धन्यवाद!
    ॐ नमो नारायणा
    ----------------------
    Do not see these 4 things after waking up in the morning.. You will be poor!
    Do not see these 4 things after waking up in the morning. Vaastu Shastra and Astrology believe that first of these things the whole day goes bad, whatever important work you are going to do is not successful, it leads to failure. Misfortune is on your side. Our luck does not support us... and then poverty does not come into the house.Let's see what these 4 things are.
  • Jak na to + styl

Komentáře • 13