धान्य साठवण्याच्या पद्धती | धान्य साठवणूक | dhanya sathavnuk

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • ▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!
    👉लिंक - krushidukan.bh...
    ============================================================
    👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
    🌱 भारतअ‍ॅग्री मध्ये आपले स्वागत आहे.
    ✅आजचा विषय - 🌱धान्य साठवण्याच्या पद्धती | धान्य साठवणूक | dhanya sathavnuk👍
    शेतकरी मित्रानो, आपल्याकडे शेतीमालाच्या साठवणुकीच्या सोयी फारशा उपलब्ध नसतात. परंतु, अन्नधान्यांची योग्य साठवणूक करण्यासाठी अनेक पारंपरिक अणि रासायनिक पद्धती अस्तित्वात आहेत. धान्य साठवणुकीच्या वेळी काळजी न घेतल्यास अन्नधान्याचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होते त्यामुळे साठवणुकीच्या सोयी नसल्यास घरगुती आणि पारंपरिक उपाययोजना करून शेतीमाल प्रदीर्घ काळ टिकवता येतो आणि किडींपासून त्याचा बचाव करता येतो.
    धान्य साठवणूक करण्याच्या पद्धति:
    A) पारंपारिक पद्धत
    B) रासायनिक पद्धत
    A ) पारंपारिक पद्धत
    1️⃣कडुलिंबाची पाने : कडुलिंबाची पाने सावलीमध्ये वाळवून घ्यावीत. वाळलेली पाने कापडाच्या पिशवीत भरावीत. ही पिशवी धान्याच्या गोण्यांमध्ये वेगवेगळ्या थरांमध्ये ठेवावीत. कडुनिंब पानांच्या तीव्र वासामुळे धान्याला कीड लागत नाही.
    2️⃣लसूण : धान्याला लागणारी कीड रोखण्यासाठी लसूण प्रभावी काम करते. प्रथम डब्यात धान्य टाकून त्यावर साल न काढलेली लसणाची संपूर्ण गड्डी ठेवावी आणि त्यावर पुन्हा धान्य असे साधारण थर ठेवावेत. तसेच डब्याचे झाकणही बंद राहील याची काळजी घ्यावी.
    3️⃣लवंग : या पद्धतीमध्ये लसूण आणि कडुलिंबाची वाळवलेली पाने समप्रमाणात घेऊन त्यात १० ते १५ लवंगा टाकाव्यात. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडे पाणी टाकून कडुनिंब पाने, लसूण आणि लवंग चांगले बारीक करून घ्यावे. तयार मिश्रणाच्या मध्यम आकाराच्या गोळ्या बनवून ३ ते ४ दिवस उन्हामध्ये सुकवाव्यात. या गोळ्या कापडामध्ये बांधून धान्यांच्या थरांत ठेवल्यास कीड आणि अळींचा प्रादुर्भाव कमी होतो.
    4️⃣गोडेतेल : धान्य साठवणुकीवेळी एरंडी, भुईमूग, खोबरेल किंवा मोहरी तेल वापरल्यास किडींचा प्रादुर्भाव रोखता येतो. तेलामुळे किडींची अंडी उबण्यास प्रतिबंध होऊन उत्पत्ती थांबते. त्यासाठी १ चमचा तेल प्रति किलो धान्य याप्रमाणे चोळावे. १ क्विंटल धान्यासाठी अर्धा ते एक किलो तेल वापरावे.
    B) रासायनिक पद्धत -
    1️⃣मॅलॅथिऑनची फवारणी - धान्य साठवणूककी पूर्वी रिकामी पोती, साठवणुकीची जागा, रिकामी कणगी तसेच वाहतुकीची साधने फवारणी करून निर्जंतुक करावीत. निर्जंतुक करण्यासाठी Malathion 50 टक्के प्रवाही 10 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करू शकता परंतु उघड्या धान्यावर ही फवारणी होणार नाही याची काळजी घ्या तसेच जनावरे लहान मुले यांना यांना कीटकनाशकाचा स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावि.
    2️⃣ॲल्युमिनियम फॉस्फाईड - मोठ्या प्रमाणात धान्याच्या साठवणुकीसाठी ॲल्युमिनियम फॉस्फाईड तीन ग्रॅम वजनाच्या दोन ते तीन गोळ्या प्रति टण कोठारातील धान्यासाठी किंवा दहा ग्रॅम पाऊच प्रति टन बियाण्यासाठी किंवा 150 ग्रॅम पावडर प्रति 100 घनमीटर जागेसाठी साधारणता पाच ते सात दिवस संपर्कात ठेवल्यास किडींचा नाश होण्यास मदत होते.
    3️⃣झिंक फॉस्फाईड किंवा ब्रोमोडिआलॉनचा वापर - शेतातील उंदीराचे व्यवस्थापन करताना शिफारशीत झिंक फॉस्फाईड किंवा Bromodialon 0.25 % सी. बी. यापैकी कोणत्याही एक रसायन दहा ग्रॅम अधिक 10 मिली गोडेतेल अधिक 380 ग्रॅम भरडलेले गहू, ज्वारी किंवा मका यांचे हे निर्देशीत प्रमाण घेऊन आमिष तयार करावे. नंतर तयार झालेले आमिष साधारण चमचाभर किंवा दहा ग्रॅम प्लास्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील उंदराच्या जिवंत बिळामध्ये टाकावे किंवा बिळाच्या जवळ ठेवावे. परंतु ही उपाययोजना करण्यापूर्वी प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊनच सुरक्षित रित्या योग्य निदान करूनच वापर करावा.
    ( टीप - धान्याची साठवणूक करताना रसायनाचा वापर योग्य पद्धतीने केला नाही तर त्यामुळे मानवी शरीरास इजा किंवा हानी पोचू शकते त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच वापर करावा. )
    तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
    ✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
    👉भारतअ‍ॅग्री ऍप - bit.ly/2ZyV2yl
    👉फेसबुक हिन्दी - bit.ly/36KuGOe
    👉फ़ेसबुक मराठी - bit.ly/36KuGOe
    👉इंस्टाग्राम - bit.ly/3B9Ny8G
    👉वेबसाइट - www.bharatagri.com
    👉लिंक्ड इन - bit.ly/3TWtK0Z
    👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - bit.ly/3Ryf3zt
    👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - bit.ly/3L2cRxF
    #bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

Komentáře • 2