नकळत सारे घडले-मराठी नाटक-पहिली झलक| Nakalat Saare Ghadle-Marathi Natak-First Glimpse|| Anand Ingle

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 05. 2024
  • आनंद इंगळे आणि श्वेता पेंडसे रंगभूमीवर पहिल्यांदा एकत्र
    ‘नकळत सारे घडले’ नाटकाचा १ जूनला शुभारंभ
    मराठी रंगभूमीला गौरवशाली परंपरा लाभली आहे. अनेक प्रतिभावान नाटककारांनी, लेखक दिग्दर्शकांनी आपल्या वैविध्यपूर्ण नाट्यकृतींनी प्रेक्षकांची मने जिंकत रंगभूमीचा एक काळ गाजवला. तेव्हाची अनेक नाटकं आज इतक्या वर्षानंतरही नाट्य रसिकांच्या आणि निर्माता दिग्दर्शकांच्या मनावर गारुड करून आहेत. यातील काही नाटकांना पुनरुजीवीत करण्याचे धाडस आजचे काही निर्माते करताना दिसताहेत. जुने ते सोने या उक्तीप्रमाणे काही जुन्या नाटकांचे पुनरुज्जीवन करून ती नव्या संचात सादर केली जात आहेत. अशा या क्लासिक नाटकांच्या निमित्ताने प्रेक्षकवर्ग पुन्हा मराठी नाटकांकडे वळू लागला आहे. या यादीत शेखर ढवळीकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ‘नकळत सारे घडले’ या नाटकाचा समावेश झाला आहे. नवनित प्रॉडक्शन्स निर्मित रूपकथा प्रकाशित ‘नकळत सारे घडले’ हे नव्या संचातील नाटक १ जूनला रंगभूमीवर दाखल होतयं. नाटकाचे निर्माते राहुल पेठे आणि नितीन भालचंद्र नाईक आहेत.
    या नाटकाच्या निमित्ताने अभिनेते आनंद इंगळे आणि अभिनेत्री डॉ.श्वेता पेंडसे हे दोन मातब्बर कलाकार रंगभूमीवर पहिल्यांदा एकत्र येणार आहेत. या दोघांसोबत प्रशांत केणी, तनिषा वर्दे आदि कलाकारांच्या भूमिका या नाटकात आहेत.
    प्रत्येक पिढीचं एक मत असतं, एक दृष्टिकोन असतो. कोण बरोबर? कोण चूक? पिढ्यांमधल्या वाढलेल्या अंतराचा हा तिढा सोडवायचा तरी कसा? यावर भाष्य करत ‘नकळत सारे घडले’ मनोरंजक नाट्य आपल्या प्रत्येकालाच स्वतःकडे - विविध नाते संबंधांकडे आणि एकूणच आपल्या मूल्यव्यवस्थेकडे पहायची एक निराळी दृष्टी देते.
    ‘नकळत सारे घडले’ नाटकाचे संगीत अशोक पत्की यांचे आहे. नेपथ्य राजन भिसे यांचे तर प्रकाशयोजना शितल तळपदे यांची आहे. वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे.
    #natak #marathi #marathirangbhumi #रंगभूमी #stage #actorslife #मराठीनाटक #marathinatak #marathinatak🎭 #नाट्य #reelitfeelit #rangabhumi #marathisong #marathisongstatus #marathidrama #मराठीड्रामा #मराठी_ड्रामा #मराठी_नाटक #नाटक #मराठी #marathirangabhumi #मराठीरंगभूमी #रंगभूमी #marathitheatre #theatre #marathibooks #theatrelife #theater #actor #drama #prashantdamle #anandingle #shwetapendse #shweta

Komentáře • 14

  • @arundhatigawde9409
    @arundhatigawde9409 Před 11 dny

    आज दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात नाटक पाहिले.कलाकारांचे काम उत्तम.
    आनंद इंगळे लाजवाब.🎉

  • @ShubhadaTalpade
    @ShubhadaTalpade Před 18 dny

    Khup chann natak aahe

  • @alpananadkarni5284
    @alpananadkarni5284 Před měsícem +4

    आज शुभारंभाचा प्रयोग प्रबोधनकार ला बघितला...आणि नुसता आवडला नव्हे तर तंतोतंत पटला. प्रत्येक कलाकाराचा अभिनय अप्रतिम..श्री आनंद ईंगळे as usual लाजवाब ❤

    • @NatakVedaMarathiMaanus
      @NatakVedaMarathiMaanus  Před měsícem +1

      वाह! नक्की आपल्या ओळखीच्या लोकांना ही नाटक जरूर पाह्यला सांगा 🙂

    • @kirankunte5925
      @kirankunte5925 Před měsícem +1

      Must Watch Natak Aahe

    • @NatakVedaMarathiMaanus
      @NatakVedaMarathiMaanus  Před 18 dny

      @@kirankunte5925 नक्कीच 😀👍

  • @SantoshTalpade-ll2nh
    @SantoshTalpade-ll2nh Před 18 dny

    👍

  • @ajitakulkarni5634
    @ajitakulkarni5634 Před měsícem +1

    आज दि.२२/०६/२४ रोजी डोबिंवलीत झालेला प्रयोग एकदम सुंदर.सर्वच कलाकारांच्या भुमिका उत्तम.

  • @sadhanadeshpande8897
    @sadhanadeshpande8897 Před měsícem +1

    आज मोरे नाट्यगृह pune येथे प्रयोग बघितला. अप्रतिम आहे.
    सर्वांचीच कामे उत्तम.

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 Před měsícem +2

    विक्रम गोखले सर आणी स्वाति चिटणीसांचं नाटक बघितलं होत पूर्वी. आता हे ही पाहायचं आहे

    • @NatakVedaMarathiMaanus
      @NatakVedaMarathiMaanus  Před 24 dny

      नक्की बघा.. कसं वाटलं ते ही कॉमेंट करून जरुर कळवा 🙏

  • @sierrarohan
    @sierrarohan Před 10 dny

    काम छानंच वाटत आहे! फक्त बटूनेने ह्या पात्राचा ढाचाच बदलून टाकला असं वाटतं. सुरुवातीच्या वाक्यानंतर, बटूनेने म्हणतो, *अहो बरोबरचे चिरंजीव, बरोबरचे! त्या स्फोटाने चिंधड्या उडून गेल्यानंतर अक्कल येऊन, काही उपयोग नसतो! बरं का!* हे वाक्य बोलताना विक्रम गोखले ह्यांची फेक, आवाजामधली जरब आणि दुसऱ्याला जरा तुच्छ लेखण्याचा आविर्भाव, हे सगळं इकडे दिसतंच नाही. खूपच *सॉफ्ट* बटूनेने वाटतो.