नायगरा अनुभवताना

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • Follow me on instagram
    @a_amerikecha
    www.instagram....
    Email
    aamerikecha@gmail.com

Komentáře • 1,7K

  • @aamerikecha1384
    @aamerikecha1384  Před 3 měsíci +93

    आधी आभार नायगराचे आणि त्याच्या इतकंच माझ्या शब्दांवर, आवाजावर प्रेम करणाऱ्या तुम्हा सर्वांचेही! ❤

    • @karishma8617
      @karishma8617 Před 3 měsíci +16

      तुला माहित आहे का तुझा लेख ऐकताना मी अक्षर्शा रडले 🥹 कारन् जेव्हा तु जे वेक्त करत होते ना माला अस् वाटल् की फीलिंग माझी आहे आनि शब्द तुझे आणी हे पाहता ना अस अनुभवलं की मी तिथेच आहे कुठे तरी
      thnks for this filling and this view
      आणी ती शेवटच्या 4 line's that was heart touching 🥹🫶🏻💗❤️‍🩹

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 3 měsíci +3

      @@karishma8617धन्यवाद 😊❤

    • @rupapatil9983
      @rupapatil9983 Před 3 měsíci +2

      Kuphch sundar mjya bucket list madhil eak pratkyasha nhi pan a paratkshya purna zle tumcha awaj kathan kuph sundar

    • @nikhilmande1687
      @nikhilmande1687 Před 3 měsíci +1

      ताई खूप छान आवाज आहे तुझा, खूप छान वाटल विडिओ पाहताना, मन पूर्णतः रमून गेलं. खूप छान धबधबा आहे 👌❤️😍🌹🙏

    • @nutankokane5546
      @nutankokane5546 Před 2 měsíci +1

      खुप सुंदर
      अप्रतिम

  • @radhikasathe8784
    @radhikasathe8784 Před 3 měsíci +163

    अगं काय गौरी तुझं लेखन... त्यापेक्षा तुझं कथन...नायग-याप्रमाणेच अप्रतिम..शब्दातीत... !!!जणूकाही मीच बसलीय तुझ्या शेजारी बोटीत..असं वाटतं होतं... खरच तू इतरांना मोटीवेट करत होतीस तुझं वर्णन... अप्रतिम शब्दांमुळं अजून च् देखणा झाला नायगारा..... आमचा भंडारदरा पण आहेच अप्रतिम!! भंडारदरा चा हा भाऊ का गं मोठा..तो पण अमेरिकेत रहायला गेलेला❤❤😂😂

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 3 měsíci +3

      😃👍🏻Thanks 😊

    • @smitakhare1039
      @smitakhare1039 Před 3 měsíci +1

      Kiti Sunder Sangtey g kan khup trupt zale

    • @Yogisab20
      @Yogisab20 Před 3 měsíci +2

      Ho amcha bhandardara hi khup chan ahe

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 3 měsíci +1

      @@smitakhare1039thanks ❤

    • @yaminikale5833
      @yaminikale5833 Před 3 měsíci +4

      Kay bolu gauri amezing view
      Thank you so much., bolnya chya plikde aamala hevd apratim शब्द नाही ग इथ घरात बसून हे सर्व पाहू शकलो ते केवळ तुमच्या मुळे परत एकदा thanks
      God bless you
      Take care

  • @amrutadharmadhikari-vedpat1661
    @amrutadharmadhikari-vedpat1661 Před 3 měsíci +49

    नायगरा सारखाच तुझ बोलणही प्रेमात पडणार आहे....तुझ्याच लेखणी आणि तुझ्याच आवाजा शिवाय नायगरा एवढा सुंदर वाटलंच नसता.....❤❤❤❤

  • @kalyanishindagi1902
    @kalyanishindagi1902 Před 2 měsíci +26

    या सगळ्यात गंमत अशी आहे, की त्या अमेरिकेतल्या नायगाराच वर्णन करायला तुझ्या शब्दात आणि भाषेत सह्याद्रीच्या कड्याची धार आणि कृष्णेच्या पाण्याचा मंजुळ खळखळाट याचा फार सुंदर मिलाफ आहे आणि म्हणूनच ऐकताना फार फार आपलं वाटतं ❤

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 2 měsíci

      धन्यवाद ♥️

    • @neelamtalpade7182
      @neelamtalpade7182 Před 2 měsíci

      Gauri just like The Naigara Falls,your discreptive words flow, is very beautiful.It was pleasure to listen to you whilst seeing the panoramic view.

    • @vasantsuryavanshi5134
      @vasantsuryavanshi5134 Před 2 měsíci

      ll​@@neelamtalpade7182

  • @Kashmirasworld...11
    @Kashmirasworld...11 Před 2 měsíci +17

    अगं ताई किती गोड शब्द किती आपलेपणा आणि इतकी ताकत शब्दात आणि आवाजात...... नायगारा फक्त पहिला नाही अनुभवला तुज्या मुळे thanks a lot.... god bless bless u..

  • @saritagore5072
    @saritagore5072 Před 3 měsíci +20

    आजपर्यंत तुमचे सगळे व्हिडिओ पाहीले कारण होत तुमचं शब्दांकन, शब्दसंपदा,तुमचा आवाज, कोणत्याही गोष्टीबद्दलचा तुमचा अभ्यास, तुमच्या बोलण्यात एक स्थिरता, स्तब्धता, शांतता, चैतन्य आणि ऊर्जा ❤ हा व्हिडिओ म्हणजे एक निखळ आनंद अनुभव .. आजचा नायगरा आणि तुमचं बोलणं कायम लक्षात राहील.

  • @ghostrider6290
    @ghostrider6290 Před 3 měsíci +38

    भरमसाठ चॅनलच्या गर्दीत वेगळेपण जपणार काळजाला भिडणार आणि अगदी खरं खरं वाटणार एकमेव आवडतं चॅनल

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 2 měsíci +1

      Thank you so much ❤

    • @hemavelankar2263
      @hemavelankar2263 Před 2 měsíci

      अगदी अगदी ... आज चहा केला, मुलांना शाळेत नेलं, दुकानात गेलो, जेवलो आणि झोपलो ह्या साधारण दैनंदिनी स्वरूपाच्या चॅनल्स च्या भाऊगर्दीत हा गौरीचा चॅनेल वेगळा आणि म्हणूनच आवडता ही ...

  • @ujjwalagawade2154
    @ujjwalagawade2154 Před 3 měsíci +59

    गौरी तु ठार वेडी आहेस (sorry) तुझ्या वेडेपणाची लागण इतकी वाढत चालली आहे की मी काय सांगु... अदभुतपुर्व, अद्वितीय, अवर्णनीय, सगळं सगळं सांगण्या पलीकडलं... जीव कानात गोळा करून नखशिखांत शहारले मी आज तुला ऐकताना.... माझ्या डोळ्यांचा बांध नायगरा सारखा वाहिला तो तुझ्या शब्द आणि आवाजाने... निसर्ग तर महाराजा आहेच पण तु केवढे अधिराज्य गाजवतेस माझ्या मनावर...आज निःशब्द आणि नतमस्तक तुझ्यापुढे... माझं आयुष्य लाभो तुला... नायगरा एवढं उदात्त प्रेम तुला❤❤❤

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 3 měsíci +4

      तुम्हालाही नायगरा इतकंच प्रेम ताई ♥️😊
      तुमच्या कमेंटची वाट बघत होते... खात्री होती, तुम्हाला हे सगळं आवडेल 🫰🏻

    • @pallavisatam2484
      @pallavisatam2484 Před 3 měsíci +2

      तुझ्या लेखनामुळे नायगारा धबधबा पाहिला.डोळे पाणावले.घरातील का रडतेस असे विचारतील म्हणून रडले पण कोणाला ही न कळता...तुझे अभिनंदन... अप्रतिम लेखन शब्द नाहीत माझ्याकडे...मला थोडेजरी लिहीता आले असते तर...तुझे कौतुक करिता लिहीले असते... त्याकारणे अप्रतिम एवढेच लिहिले...पण यापेक्षा अधिक आहे हे मात्र नक्की....

    • @smitaadval5137
      @smitaadval5137 Před 3 měsíci +2

      गौरी तुझा डोळ्यांनी नायगारा पुन्हा अनुभवला आणि डोळे आपोआप वाहायला लागले. नायगारा प्रतेक्षा पाहताना माझी सुधा अशीच अवस्था झाली होती. अद्वितीय आहे नायगारा. पण गौरी तुझ्या सारखं वर्णन नाही ग करतं येणार. तुझे शब्द, वाणी किती मधुर. बस ऐकतच राहावे. खूप खूप आशीर्वाद. अशीच लिहीत रहा❤

    • @sidhusavane8334
      @sidhusavane8334 Před 2 měsíci +1

      Tai majhya pappana sudha tujha avaj ani naygara che kelel varnan hrudyala lagale haluch naygara sparsh sudha jhala

    • @aailove6865
      @aailove6865 Před 2 měsíci +1

      अप्रतिम...तुला सलाम आणि अनेक आशीर्वाद

  • @sampatsuryawanshi4096
    @sampatsuryawanshi4096 Před 3 měsíci +23

    जेव्हा तुम्ही वर्णन करत होते तेव्हा असे वाटत होते की आम्हीच भिजतोय आणि तुमच्या शब्दांची जुळवाजुळव खूपच उस्तुकता देत होती. आम्ही शॉर्ट मध्ये बघितले होते हे काय आजकाल AI वरून काहीपण एडिटिंग करता येते असे वाटायचे खरे सांगायचे तर.. पण आज तुमचा ब्लॉग बघून हर्शून गेलो आम्ही सगळे घरचे. खूपच अथांग असा धबधबा दाखवला madam खूप खूप धन्यवाद 🙏👌👏

  • @ExplorewithJyoti23
    @ExplorewithJyoti23 Před 3 měsíci +10

    I don’t think anyone has ever explained the beauty of Niagara Falls the way you have……your writing is impeccable ❤ loved it.

  • @hemantbhabal482
    @hemantbhabal482 Před 3 měsíci +23

    नायगरच्या उडणाऱ्या तुषारअंगावर पडण्या अगोदर तुझे वकृत्व प्रभाव असलेले शब्द मंत्र मुग्ध कमाल बहार.

  • @sachitchatne1688
    @sachitchatne1688 Před 3 měsíci +14

    छान ❤ तुझे अप्रतिम कथन ऐकुन आम्ही मराठी भाषिक आहोत ह्याचा सन्मान वाटला. तुझी मराठी खूप गोड आहे.

  • @swatikamalakar3162
    @swatikamalakar3162 Před 3 měsíci +17

    केवळ अप्रतीम!!! नायगाराचा जलप्रपात सुंदर की तुझ्या कथनाचा शब्दप्रपात सुंदर !!!! दोन्हीही एकमेकात समरसून गेल्याने डोळे आणि कान तृप्त झाले!! खूप धन्यवाद आणि शुभेच्छा!!!

  • @dhanashrikumbhare8193
    @dhanashrikumbhare8193 Před 3 měsíci +18

    मी कधीच कोणत्याही you tube चॅनल च्या व्हिडीओ ला कॉमेंट करत नाही..पण आज हा तुमचा व्हिडीओ बघून कॉमेंट केल्याशिवाय राहवत नाही..
    काय सुंदर व्हिडीओ केला आहे आपण..तुमचे इतके शुद्ध मराठी बोलणे..तुमचे शब्दांकन याला काही तोडच नाही आहे..मी विचार केला होता की बरेच काही लिहावे पण खर सांगू मलाचं आता शब्दच सुचत नाही आहेत कौतुक करायला..कौतुक करण्याच्या पण कोसो पलीकड हा व्हिडीओ आहे..माझे शब्द अपुरे पडतील..god bless you 🙏🙏

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 2 měsíci

      धन्यवाद ❤

    • @2033Krish
      @2033Krish Před 2 měsíci +1

      I agree
      शुद्ध स्पष्ट मराठी

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 Před 2 měsíci +2

    काय सुंदर वर्णन ते. डोळे मिटले असते तरी नायगरा धबधबा दिसला असता उभेहूब. मी नवीनच join झाली चॅनेलला. कोणीतरी 100% असे काहीतरी आहे त्या ताईंनी फार कौतुक केलं आणि मी search करून join झाली. बोलण्याची शैली अतिशय जिवंतपणा आणणारी. कथावाचक कथा वाचत आहे असे वाटते आहे. सुंदर सुंदर video. 👌🏼👌🏼thanks

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 2 měsíci +1

      खूप खूप धन्यवाद ♥️

  • @gitamore5687
    @gitamore5687 Před 3 měsíci +7

    ताई काय बोलु आणि काय नको असं झालंय
    शब्दच नाहीत
    आज पहिल्यांदा पाहिला तुझ्यासोबत नायगरा म्हणजे मी तर कधी ऐकलाही नव्हता व फोटोत सुद्धा पाहिला नव्हता
    तुझ्या बोलण्याने आणि नायगरा बघून नुसतं धडधडत होत
    अप्रतिम ताई खूपच छान😘😘😘😘😘😘

  • @user-jf1zj5hs2w
    @user-jf1zj5hs2w Před 3 měsíci +7

    गौरी ताई .. अगं कित्ती सुदंर आहे हे सगळं...पाहिलं ते पण आणि आईकल ते तर क्या बात है ...नायगारा चे हे अप्रतिम सौदर्य पाहून डोळे तर दिपलेच पण का कोणास ठाऊक त्याचे हे रौद्र रूप पाहून अंगावर शहारे आल्या शिवाय राहिले नाहीत ....
    पुण्यात घरात बसून तिथे आल्यासारखं वाटलं बरं का ..खूप सुंदर ..पुण्यातल्या कडक उनाळ्यातली थंडगार ट्रीप अनुभवली आज मनाने ...खूप खूप छान ..नायगारा जितका मोठा आहे तितकं प्रेम तुला या सुंदर ट्रीपला नेल्याबद्दल ......तुझ्या चॅनल वरचा माझा सगळ्यात आवडता एपिसोड हा ... अविस्मरणीय...🤗☺️🙏🫰🙌

  • @tejashribhandane3193
    @tejashribhandane3193 Před 3 měsíci +8

    अग गौरी काय आणि किती कौतुक करावे तुझे.नाहीये ग आमचा इतका सुंदर शब्दसंग्रह.नायगारा तर सुंदरच आहे.तो डोळ्यांनी अनुभवला पण कानांना तृप्त करणारे तुझे शब्द यांचं काय करावे.Hats off Dear. खूप खूप शुभेच्छा 🎉

  • @swamiraj5478
    @swamiraj5478 Před 2 měsíci +3

    खूपच छान वर्णन केले ताई तू आणि मी आतापर्यंत भरपूर चॅनल्स बघितले पण त्यातल्या त्यात तुझा तो शब्दांचा कोडवा त्यात ते समोरचे तू दृश्य बघते त्याचे वर्णन खूपच अप्रतिम खूप खूप खूप खूप छान👌👌👌👍

  • @Anusmii
    @Anusmii Před 3 měsíci +3

    काय सुरेख शब्दांकन...आणि निवेदन सुद्धा समर्पक...तुझी प्रतिभा सुद्धा अगदी नायगरा सारखीच उत्तुंग झाली. ❤❤❤❤

  • @savitakapase7355
    @savitakapase7355 Před 2 měsíci +4

    लिहिण्यासाठी शब्दच नाहीत.जणू काही प्रत्यक्षात नायगारा जवळच आपण आहोत असं वर्णन ! अप्रतिम अप्रतिम अप्रतिम

  • @hemantgadekar4166
    @hemantgadekar4166 Před 3 měsíci +8

    खूप आतुरतेने वाट पहिली या व्हिडिओ ची खरेच लहानपणापासून मनात बाळगलेले स्वप्न एकदा तरी आयुष्यात नायगारा फॉल्स पाहायचा आणि जगायचा, शक्य होईल की नाही माहीत नाही पण आज डोळे भरभरून पाहिलं अनुभवलं त्यासाठी धन्यवाद कॉम्प्युटर लॅपटॉप आणि मोबाईल च्या स्क्रीन वर बऱ्याच वेळेस हा फॉल्स चा फोटो ठेवलेला. आज अजून जोमाने इच्छा होते आहे नायगारा पाहण्याची त्यासाठी सुद्धा आभारी 🙏👍 आणि त्याचे केलेले वर्णन अप्रतिम परत परत व्हिडिओ पहवासा वाटतो

  • @sindhuhire8536
    @sindhuhire8536 Před 2 měsíci +2

    गौरी कथन खूपच अप्रतिम शब्दांवरची पकड,तो आवाज जणू तू माझ्या जवळ बसून मला नायगराची संपूर्ण माहिती सांगते आणि ती माहिती मी मन लावून ऐकते.असेच मला वाटले.👌👌🙏 क्षणभर का होईना नायगराला गेल्या सारखे वाटले.

  • @amrutadabholkar8806
    @amrutadabholkar8806 Před 2 měsíci +1

    गौरी, निव्वळ अप्रतिम.. शब्दच नाहीत ग तुझ्या नायगरा वर्णनाच कौतुक करायला. तुला ऐकता ऐकता, डोळे बंद करून भजनात तल्लीन झालेल्याची जी अवस्था होते ना, तीच माझी अवस्था झाली. मी तर नायगारा बघुन आले तुझ्या डोळ्यातून आणि शब्दातून❤

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 2 měsíci

      खूप धन्यवाद अमृता ताई 😊♥️

  • @shamalabhosale9032
    @shamalabhosale9032 Před 2 měsíci +3

    तुझ बोलणं इतक छान ,गोड, सुंदर आहे की ऐकत राहावसन वाटत.किती सुंदर वर्णन केलस नायगारा चे....अवर्णनीय सौंदर्य आहे नायगराचे....तुझ नाव काय ? तू किती भाग्यवान आहेस कि तू नायगऱ्याला कुरवाळून आलीस.....तू केलेले अलंकारीत भाषेत नायगराचे वर्णन विसरन अशक्य. मुली तुला जगातील अशाच विस्मयचकित करणारे स्थळं पाहाण्याचा योग येवो.....

  • @supriyaamarkumbhar8079
    @supriyaamarkumbhar8079 Před 3 měsíci +8

    ❤khup chan....गौरी तुझ्या शब्द रचनेमुळे niagara water fall bagayla अजून सुंदर वाटला ❤❤❤

  • @charulatapotdar7371
    @charulatapotdar7371 Před 3 měsíci +2

    डोळे पाणावले!!अद्भुत आणि अविश्वसनीय!तुझा आवाज आणि तुझे बोलणे संपूच नये असे वाटते एक अनोखे विश्व अनुभवले.

  • @purnimamuranjan4462
    @purnimamuranjan4462 Před 2 měsíci +2

    सुस्पष्ट उच्चाराने व्हिडिओ संपूर्ण पहाता आला...खूप छान❤

  • @Soham__951
    @Soham__951 Před 3 měsíci +3

    Khup sundar vakyrachana...... ❤❤
    Naygara sarkhe tuze vichaar ani sundar ashi shabd mandani..,.

  • @vaibhavpatil7751
    @vaibhavpatil7751 Před 2 měsíci +4

    last one and half year ,i am watching your v logs and videos ., your narrations are day by day going at new high .that gives feeling of real scenario.

  • @balvishwamarathibabyworld
    @balvishwamarathibabyworld Před 3 měsíci +2

    अक्षरशः डोळे पाणावले , कंठ दाटून आला ... शब्द न शब्द मनाला भिडला ... अथांग, निर्मळ, अदभूत या सर्व शब्दांची खरी जागा आणि उपयोग गौरी तुझ्या लेखनामुळे , वाचनामुळे आणि अर्थात नायगरामुळे कळला ... अति सुंदर ... hats off

  • @anushriwada
    @anushriwada Před 2 měsíci +2

    नायगाराचं सुंदर दर्शन आणि वर्णन!तुमची भाषा फार आवडली! अमेरिकेत राहूनही फार छान मराठी बोललात!👌🏻👌🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻

  • @kavitaubhe8196
    @kavitaubhe8196 Před 3 měsíci +3

    अगं गौरी,,, काय म्हणावं तुला, तुझं वर्णन कौशल्य अप्रतिम,
    तू तिकडे सातासमुद्रा पलीकडे पाहिलेले सौंदर्य, तुझ्या वर्णन कौशल्यामुळे आमचे कान आणि डोळे दोन्ही तृप्त झाले
    तुझा ड्रेस sense खूप सुंदर,,
    असे वाटते ऐकताना आम्हीही तुझ्याबरोबर फिरत आहोत,,,
    From Pune

  • @komalmhatre6635
    @komalmhatre6635 Před 3 měsíci +3

    मस्तच अतिशय सुंदर वर्णन गौरी ❤...तू मला एकदम मीना प्रभू यांच्या प्रवासवर्णन पुस्तकांची आठवण करून दिलीस😊 जुन्या आठवणी जाग्या झाल्या...तूही अशीच खूप पुस्तक लिहावीत अस वाटत😊

  • @manishabangar2007
    @manishabangar2007 Před 2 měsíci +2

    अतिशय अप्रतिम वर्णन, अस्खलित मराठी, गोड आवाज ओघवते अन् खिळवून ठेवणारे शब्द, नायगारा इतकीच तुझ्या शब्दांच्या अफाट उंचीमुळे नायगारा अधिकच भावला. अप्रतिम वर्णन

  • @ShivshahiNetwork_16
    @ShivshahiNetwork_16 Před 3 měsíci +6

    शब्दांची श्रीमंती काय असते ते समजले आज❤
    बाकी नायगरा तर भारीच
    मनाला भावलेलं वाक्य - "जागा बोलवतात"
    खूप आभार

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 2 měsíci

      Thank you so much ❤

    • @manikhadkar6066
      @manikhadkar6066 Před 2 měsíci

      गौरी, केवळ अप्रतिम व्हिडिओ ! श्रवणीय आणि प्रेक्षणीय !! बेटा, खूप खूप आशीर्वाद !!!

  • @paragjoshi7895
    @paragjoshi7895 Před 3 měsíci +13

    अप्रतीम लेखन आणि त्याबरोबर नयन मनोहर नायगराचे दर्शन

  • @harshadasonawane-Gruhini
    @harshadasonawane-Gruhini Před 3 měsíci +2

    खुपच भव्य आणि अभुतपुर्व नायगरा आणि तुमचे वर्णन गौरी ताई ..... तुमच्या बोलण्यात खरंच जादू आहे... व्हिडिओ पहातांनाच अस वाटलेल की आम्हीच हे सर्व अनुभवतोय... खरंच खूप खूप सुंदर.. खूप धन्यवाद ताई आम्ही नायगरा पाहण्यासाठी तिथवर येणं अशक्यच पण निसर्गाचे एवढे भव्य दर्शन फक्त तुमच्यामुळेच अनुभवता आलं....🙏🙏🙏😘

  • @rajaniselkar8401
    @rajaniselkar8401 Před 3 měsíci +1

    अग किती अप्रतिम शब्दांकन. नायगारा तर आम्हाला घरी बसून तुमच्या मुळे पाहता आला. पण नायगारा प्रमाणे तू ज्या प्रमाणे त्याचे शब्दात वर्णन केले ते आवर्णिय होते. त्या मुळे असे वाटल कि आम्ही प्रत्यक्ष पहात आहोत आणि आमच्या पण अंगावर् पण्याचे तुषार उडत आहेत❤
    हा vedio परत परत पाहण्या सारखा आहे😍

  • @nutanjadhav5531
    @nutanjadhav5531 Před 2 měsíci +3

    Gouri pul deshapandenchi mi vachak aahe ani jave tyanchya desha nantar aaj parat ekada mi naigara anubhavala ani tula sangate pu la cha barobar tu kinchithi kami nahi padlis

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 2 měsíci

      नाही नाही.. इतकी मोठी मी नाही..😊
      धन्यवाद ❤

  • @pratibharele4386
    @pratibharele4386 Před 2 měsíci +1

    Thank you गौरी तुझ्यामुळे आज नायगरा जवळून अनुभवता आला.मला हा नायगरा धबधबा पाहण्याची खूप इच्छा होती.तो पाहताना मी स्वतःला विसरून गेले.जणू मी प्रत्यक्षात तो पाहत आहे असे वाटत होते.इतका सुंदर नायगरा चा अनुभव शेअर केल्याबद्दल तुझे खूप खूप आभार.
    मी तुझे अमेरिकेचे विडिवो नेहमी बघते .पुन्हा एकदा धन्यवाद .

  • @sangeetadandekar2104
    @sangeetadandekar2104 Před 2 měsíci +1

    गौरी ...खूप छान शब्दात तू नायगरा धबधबा विषयी वाटणारं कुतूहल, आस, उत्कंठा आणि बघीतल्यावरची भव्यता अचुक व्यक्त केलीआहेस . तुझ्या सांगण्यातून नायगरा प्रत्यक्ष पाहत होते.

  • @chaitralijagtap163
    @chaitralijagtap163 Před 2 měsíci +1

    अप्रतिम गौरी.😊
    खूपच सुंदर शब्द मांडणी केली आहेस त्यामुळे, आम्ही सुद्धा घरबसल्या नायगरा नक्कीच अनुभवला अतिशय सुंदर असं तुझं बोलणें मनाला आनंद देतो, यातूनच तुझे वाचन आणि ऐकण्याची इच्छाशक्ती दिसली😊
    एवढे सुंदर एडिटिंग आणि शब्द मांडणी केल्यानंतर अर्थात कोणीही तुला तुझ्या व्हिडिओला आवर्जून लाईक करतील आणि तुला यातून नक्कीच पुढे भरपूर यश मिळेल यात शंकाच नाही . ❤ तुला आणि तुझ्या कुटुंबाला अनेक अनेक शुभेच्छा 🎉❤

  • @kedarkhetale6527
    @kedarkhetale6527 Před 3 měsíci +2

    अप्रतिम व्हिडिओ!! ❤. तुम्ही आम्हाला त्या नायगारा जवळ घेऊन गेलात अस वाटल. खूप छान वाटलं व्हिडिओ बघून.तुमच्या त्या अलंकारिक शब्दामुळे ऐकताच राहावं असं वाटतं. असेच छान व्हिडिओ आम्हाला पुन्हा पुन्हा पाहायला मिळतील अशी अपेक्षा. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.... तुम्हाला support करणाऱ्या तुमचा सर्व टीमचे पण खूप धन्यवाद!!

  • @ravichougule4316
    @ravichougule4316 Před 2 měsíci +2

    ताई मी सुद्धा नाय्यागरा बघितलं आहे २०११ मध्ये, पण तुम्ही केलेलं अप्रतिम वर्णन ऐकून पुन्हा मला ती आठवण झाली, खरंच परत मी तिथं आहे असे वाटल, खूपच छान 😊

  • @rachanahanchate39
    @rachanahanchate39 Před 2 měsíci +1

    आजपर्यंतचे सगळे विडीओ मी व माझी सेरेब्रल palsy मुलगी पाहतो आम्ही वाटच पाहतो तुझ्या वेडीओची पण आजचे ह्या वेडीओची शब्दांकन एक उत्कृष्ट लेखिकेच्या लेखाईटके अतिउत्कृष्ट दर्जाचे ऐकताना डोळ्यात पाणीही आले तुझ्यासोबत निसर्ग अनुभवताना निसर्गाची किमया आणि मानव किती दुर्बल हे जाणवते

  • @sunitasangle4145
    @sunitasangle4145 Před 2 měsíci +2

    एकच शब्द तुझ्या लिखाणा साठी आणि नायगरा साठी अप्रतिम 👌🏻अप्रतिम 👏🏻 अप्रतिम 👍🏻❤❤❤

  • @pranishkamble642
    @pranishkamble642 Před 3 měsíci +1

    तुमचं मराठी फार छान आहे तुम्ही ज्या पद्धतीने मराठीमध्ये सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करता फारच छान👏🏻 असं वाटतं की मराठी शिक्षक एखादी कविता किंवा मराठीचा धडा समजावत आहेत. अतिशय सुंदर आणि स्पेशली नायग्राफॉल, मी सुद्धा 2007 मध्ये नायग्राफॉल पाहिला. आता तुमचं एक्सप्लेनेशन पाहता असं वाटलं की मी पुन्हा तिथेच आहे. मी माझ्या कुटुंबाला पण सांगितले की आपण नायग्राफॉलला नक्की जाऊ. मी आवर्जून सांगेन प्रत्येकाला की प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी जर संधी मिळाल्यास नायग्राफॉल बघावा. हा खरंच अनुभव आहे जो शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही 😊

  • @ManishaSalunkhe-gk5im
    @ManishaSalunkhe-gk5im Před 3 měsíci +2

    मस्त मला तर नायगराला गेल्या सारखे वाटले तुझे बोलणे ऐकून अंगावर शहारे आले गौरी तुझा आवाज खूप छान आहे

  • @kishorkhaire1070
    @kishorkhaire1070 Před 3 měsíci +1

    मॅडम तुम्ही किती ग्रेट आहात किती सुंदर लिखाण केलंय आपण तसा कथन ही केलं व्हिडिओ बघुन असं वाटलं की प्रत्यक्षात आम्ही नायगारा फॉल्स ची सफर करत आहोत खूप सुंदर निसर्ग बघायला मिळाला ते पण आपल्या मुळे आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असेच व्हिडिओ बनवत राहा

  • @manikhadkar6066
    @manikhadkar6066 Před 2 měsíci +1

    केवळ अप्रतिम व्हिडिओ! श्रवणीय आणि प्रेक्षणीय!! गौरी बेटा तुला अनेक आशीर्वाद!!!सर्वांच्या आयुष्यातील जगण्याचे क्षण समृध्द करतेस.❤

  • @Rupalidhaygude5377
    @Rupalidhaygude5377 Před 3 měsíci +1

    गौरी काय बोलू तू खरंच खूप गोड आहेस .. इतकं छान वर्णन केल आहेस ना तू नायगराबद्दल ..की तुझ्या बद्दल बोलायला शब्दच नाहीत माझ्याकडे ..इतक्या गोड आणि सुंदर आवाजात वर्णन केल आहेस ना नायगराबद्दल अप्रतिम कथन केले आहेस खूपच सुंदर....

  • @palvish2490
    @palvish2490 Před 3 měsíci +1

    Tthank you so much ❤ आगोदर मी तुझे व्हिडिओ बघायचे पण आता मी माझ्या मुलांना दाखवते कारण तू कती सुंदर पद्धतीने कथन करतेस भान हराऊन जात आणि भौगोलिक , एतीहासिक माहिती मुलानं मध्ये निसर्गाविषयी प्रेम निर्माण करते असं मला वाटतं

  • @shradhaghawate2685
    @shradhaghawate2685 Před 3 měsíci +1

    मी नेहमी पाहते व्हिडीओ रिलेट पण करते पण आज राहवलं नाही ताई तू डोळे उघडून नायगरा पाहिला अन मी डोळे झाकून अनुभवला शेवटी माझ्या डोळ्यात आलेला अश्रू चा थेंब नायगऱ्यात भिजल्याची अनुभूती देऊन गेला ❤❤❤खूप धन्यवाद ताई तुझे काय बोलू अजून शब्द परागंदा झालेत आज

  • @ashwinikulkarni9066
    @ashwinikulkarni9066 Před 2 měsíci +1

    गौरी मनापासून आभार.... आम्ही पण नायगारा अनुभवला तुझ्या बरोबर.. त्याची भव्यता..सौंदर्य..चे गारूड आणि तुझ्या शब्दाचे माधुर्य. .. अविनाश ची साथ.
    बिल्व ची निरागसता... अवघ्या रंग एकचि झाला...
    अप्रतिम. .
    तुम्हाला मन:पूर्वक आशिर्वाद..
    From ashwini aurangabad..
    I have been with you since a long time and have complemented you... You both are so true transparent.. Grounded. Remain the same .. Inspite of ever growing career.. Prosperity fame...

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 2 měsíci

      खूप धन्यवाद अश्विनी ताई ♥️

    • @ashwinikulkarni9066
      @ashwinikulkarni9066 Před 2 měsíci

      @@aamerikecha1384 very happy to see your response.... Thank u 💕

  • @1726rd
    @1726rd Před 2 měsíci +1

    का आणि कशाचा गर्व करावा आपण....या भव्यतेपुढे कोण आहोत कोण आपण ❤...गौरी केवळ अप्रतिम 🙏🙏

  • @ashwineemohite1787
    @ashwineemohite1787 Před 2 měsíci +1

    अप्रतिम संभाषण कौशल्य,शब्दांकन !!
    अमेरिकेत राहूनही मराठी शब्दसंपदा तू जपली आहेस,खूप अभिनंदन🎉 😊

  • @mrudulalokhande6839
    @mrudulalokhande6839 Před 2 měsíci

    खूपच jiwant शब्दात वर्णन. अप्रतिम. Naygara जितके सुंदर तितके तुझे शब्द.Thank you video साठी

  • @sangitashilimkar6869
    @sangitashilimkar6869 Před 3 měsíci +1

    गौरी किती सुंदर वर्णन केले आहेस गं,मी प्रत्यक्षात कॅनडा मधून हा धबधबा पाहिला आहे पण तुझे वर्णन ऐकल्यानंतर,तुझ्या नजरेतून पाहिल्यानंतर असे वाटले की पहिल्यांदाच पाहत आहोत. खूप सुंदर❤

  • @harshadachaudhari4943
    @harshadachaudhari4943 Před 3 měsíci

    खूप खूप सुंदर व्हिडिओ आणि खूप सुंदर असं संचालन आणि तुझा खूप सुंदर असा आवाज 😊 खूपच समाधान वाटलं असं वाटलं की आपणच तिथे फिरून आलो

  • @sangitadeshpande6708
    @sangitadeshpande6708 Před 3 měsíci +1

    Bapre kiti sunder tuzi vani ani bhasha apratim khup sunder varnan ❤️❤️

  • @jayashrilipare3059
    @jayashrilipare3059 Před 2 měsíci

    किती छान शब्दांकन. असं वाटत होतं आम्ही तुमच्यासोबत नागरा फिरत आहोत. येथून थेट नाय गराला येऊन पोहोचलो. अप्रतिम वर्णन शेवट तर खूपच छान निसर्ग पूर्णविराम.

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn9 Před 2 měsíci +1

    व्वा ! काय शब्दांकन केलस गौरी. सही ❤
    व्हिडिओ जितका सुंदर तितकेच सुंदर शब्दांकन. ऐकतच रहावे

  • @karishma-hl8tb
    @karishma-hl8tb Před 2 měsíci

    गौरी तुझं खूप खूप कौतुक, ....कधी कधी ज्या गोष्टी बद्दल आपण भावशून्य असतो त्या च्या बद्दल तू तुझ्या शब्दाने मन पिळवटून टाकलास

  • @user-yp7pl3co8n
    @user-yp7pl3co8n Před 2 měsíci +1

    2019 ला मी हा नायगारा फाॅल बघितला आज तु केलेले वर्णन अप्रतिम ❤❤❤

  • @sonalPawar-vh7xe
    @sonalPawar-vh7xe Před 3 měsíci +2

    बापरे खूपचं भारी ते पाहातच राहिले अन् कानाने तुझे बोल मला मंत्रमुग्ध केलं ❤ शब्द अपुरे आहेत तुझ्यासाठी तू असाच प्रवास करत राहावी अन् तुझ्या समवे आम्हालाही घेऊन फिरावी हिच सदिच्छा 🎉❤❤❤

  • @manjiripundalik8536
    @manjiripundalik8536 Před 3 měsíci +1

    गौरी तुझे सगळे व्हिडिओज मी नेहमीच बघते. पण हा व्हिडिओ खूप अप्रतिम आहे. तू जे वर्णन केले आहेस खूप छान. मी नायगारा दोन वेळा पाहिला आहे कारण माझा मुलगा Buffalo University मध्ये शिकत होता आणि पुढे दोन वर्षे तिथेच जॉब करत होता. तू जे वर्णन केले आहेस ते ऐकताना मलाही भरून येत होते आणि काय लिहु? शब्दांच्या पलीकडे आहे सगळे.Hats off to you and Naygara Falls🎉🎉❤❤

  • @anitashinde8019
    @anitashinde8019 Před 3 měsíci +1

    गौरी तुझी कुठल्याही गोष्टीचे वर्णन अप्रतिम करतेस आम्ही तिथे असल्याचे फिल करतो धन्य वाद

  • @priyankachavan3312
    @priyankachavan3312 Před 3 měsíci

    तुझा आवाज तुझी शब्द रचना अगदी प्रेमात पाडणारी सर्व विसरून तुझ्या शब्दांच्या जाळ्यात अगदी सहज समोरच्याला गुंतून ठेवणारी तुझी काव्य शैली तुझं भरभरून एखाद्या गोष्टीबद्दल बोलण अर्थातच आम्हाला आवडत पण खर सांगू गौरी ताई हे सर्व आम्हाला तुझ्यामुळे अगदी आपल्या डोळ्यांनी घरबसल्या पाहायला मिळत ❤

  • @amitatandel3794
    @amitatandel3794 Před 3 měsíci +1

    कित्ती अचुक भावनांचे वर्णन आणि शब्दरचना! Enjoyed every bit of this video. असे कधीच म्हणु नकोस की हि शेवटची भेट असेल. Your Niagara journey is never completed until one visits from Canada side. Especially on 15th August, Niagara is lit up with Tiranga lights. The view is mesmerizing, and we feel proud to see Tiranga on Niagara 🇮🇳 🇨🇦. I am sure you will plan one day😃

  • @Harshalisdiy
    @Harshalisdiy Před 3 měsíci +1

    किती ते लोभस आणि भव्यदिव्य दृश्य 😮
    गौरी ताई... काय बोलू आणि किती बोलू, तुझ्या येवढं सुंदर लेखन आणि सादरीकरण नाही जमणार मला. पण आजच्या व्हिडिओ मधला नायगरा जेवढा आवडला त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक तुच त्या नायगरा चं वर्णन, सादरीकरण प्रचंड आवडलं.... नायगरा इतकंच तुझ्या प्रेमात पडली आज मी.
    Thank you so much for this beautiful experience ❤
    ((तुझ्या बकेट लिस्ट मधल्या एका गोष्टीवर टिक झालं असेल आज पण माझ्या बकेट लिस्ट मधे एक गोष्ट वाढली (नायगरा)❤ ))

  • @smitaroplekar3806
    @smitaroplekar3806 Před 3 měsíci +1

    अगदिचं सुरेख.. वर्णन, शब्दांकन.. 👌🏻👌🏻
    दोन वेळेस पाहिला हा आणि दोन्ही प्रवास डोळ्यासमोरुन… धन्यवाद🙏🏻 आणि हो या व्हिडिओने सबस्क्राईब करायला भाग पाडलेचं.

  • @vinitapage5587
    @vinitapage5587 Před 2 měsíci

    अतिशय सुंदर शब्दांकन, काय शब्द संग्रह पण भरपूर आहे आणि एवढं छायाचित्रण सुद्धा सुंदर

  • @vasantbhat5312
    @vasantbhat5312 Před 2 měsíci

    अप्रतिमच फोटोग्राफी अप्रतिमच वर्णन गौरी ...खूप सुंदर नायगारा घडवून आणलास...शब्दातीत

  • @manasidhavalikar9881
    @manasidhavalikar9881 Před 2 měsíci +1

    अतिशय काव्यमय आणि चित्रदर्शी निवेदन शैलीने तुमच्यातील प्रतिभावंत कवयित्रीची ओळख झाली आणि स्वप्नातला नायगरा काही क्षण का होईना मनात रूजून गेला.

  • @manishajoshi2884
    @manishajoshi2884 Před 3 měsíci

    गौरी तुझ्या लिखाण आणि कथनामुळे, आज आमच्या समोर नायगारा जिवंत झाला , खूप सुंदर

  • @anjalibirewar4323
    @anjalibirewar4323 Před 2 měsíci +1

    गौरी❤ तुझं लेखन सुंदर म्हणावं कि तूझं वाचन कि तुझी शब्दांची सुंदर शी गुंफून करुन व्यक्त होण्याची शैली एकाहून एक सरसचं गं अगदी तू आम्हाला दाखवलेल्या नायगरा एव्हढीच अप्रतिम...जणु अगदी प्रत्यक्षात तूझ्या सोबत बघतोय कि काय‌... जेव्हा कधी नायगरा दर्शनासाठी योग येईल तेव्हा तूझ्या नजरेतून नायगरा बघत तूझी आठवण नक्की होईल ❤❤❤❤ love you dear अशीच लिहीत रहा❤

  • @dishamakhare6535
    @dishamakhare6535 Před 2 měsíci +1

    You are the magician gouri who made us cry by your magical words❤️❤️😘😘😍 naygara manla bhavala to amhi shabdshaha . anubhavala ithe punyat basun tujhyamule🎉

  • @ManaliSutar-bw2hu
    @ManaliSutar-bw2hu Před 2 měsíci

    खुप आवडला हा व्हिडिओ..आणि तुमचं बोलणं मनाला भावलं ...ऐकताना बघताना एवढं गुंग झालेले.वाटल तुमच्यासोबत मी पण होते तिथे...तुम्ही भाऊक झालात तेव्हा माझे पण डोळे भरून आले.खूप आपलेपणा अस्ती तुमच्या व्हिडिओज मध्ये......खूप छान❤

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 2 měsíci

      खूप धन्यवाद मनाली ताई ♥️

  • @laxmiratnaparkhi8887
    @laxmiratnaparkhi8887 Před 3 měsíci

    थॅंक्स गौरी तु नायगारा चे किती छान वर्णन केले आहे तुझे कौतुक करताना शब्द अपुरे पडतील इतके तु प्रत्यक्ष अनुभवाचे हुबेहुब वर्णन केले आहे आता नायगारा पाहण्याची ओढ जास्तच लागली आहे मी माझ्या मुलाकडे मिशीगनला आले आहे या संनडेला आम्ही नायगारा पाहण्यासाठी जाणार आहोत तेव्हा तुझी आम्हाला खूप आठवण येईल तुझी भाषा शैली तुझे विचार आणि तुझे लाघवी बोलणे खूप सुंदर खूप सुंदर

  • @heenadedhia4948
    @heenadedhia4948 Před 2 měsíci

    Madam,
    तुम्ही किती छान बोललात, किती छान दाखवले, Niagara Falls ऐकले होते पण आज तुमच्या डोळ्याने अनुभवले
    जर ईश्वर ची कृपा झाली तर भेटू कधी ह्या च जागी ❤

  • @anilkumarkarande5033
    @anilkumarkarande5033 Před 3 měsíci +2

    सुंदर फोटोग्राफी. त्या ही पेक्षा मनाला भावणारे प्रवासवर्णन जणू काही एकपात्री नाटक पाहतो आहे असे वाटते.
    प्रेत्यक्ष मीच तेथे नायगरा पाहतो आहे असे वाटले. 👌👌👌👌🙏🙏🙏

  • @AdityaKetkar
    @AdityaKetkar Před 2 měsíci +1

    Niagara falls is no doubt one of the most wondrous sights of nature...thoroughly enjoyed seeing it ...but even better was ur supreme n passionate narration about the experience..simply wonderful Gauri! Kudos to you!!

  • @siddhikanade7609
    @siddhikanade7609 Před 3 měsíci +1

    सगळंच नयनरम्य .....शब्द अधुरे .....तुमचं स्वप्न सत्यात ......तुमच्या डोळ्यांनी आम्ही पाहिलं .....खरचं जबरदस्त .....अगदी जवळून अनुभवलं तुमच्या सारख्याच साश्रुपूर्ण नयनांनी .......❤खूप विलक्षण ....अद्भुत आणि तुमच्या शब्दाची किमया तर बहारदार ......आणखी काय बोलू ......खूप खूप आणि खूप मनापासून धन्यवाद ........❤

  • @sharmilpurandare7788
    @sharmilpurandare7788 Před 3 měsíci

    खूप सुंदर व्यक्त होता येते तुला.
    गेल्या वर्षी नायगारा पाहता ना याच भावना माझ्या मनात दाटून आल्या होत्या
    हेलिॉप्टरमधून बघितलेला नायगारा तर अविस्मरणीय अनुभव👍

  • @vasundharamehendale155

    खूप सुंदर व्हिडिओ आणि तितकंच अप्रतिम निवेदन!❤ २००६ च्या ऑक्टोबर नंतर तुझ्या सोबत पुन्हा एकदा नायगाराच्या वर्णनात्मक सहलीत सहभागी होण्याची संधी आणि भरभरून आनंद मिळाला.त्यासाठी तुझं खूप खूप कौतुक आणि अशाच वेगवेगळ्या ठिकाणी फिरून माहितीपूर्ण व्हिडिओ तयार करण्यासाठी मनभरून आभाळभर शुभेच्छा!🎉❤🎉

  • @renumamdi3545
    @renumamdi3545 Před 2 měsíci

    नायगरा तर सुंदरच पण त्या पेक्षा सुंदर तुझं शब्दकंन गौरी,👌👌 धन्यवाद आम्हाला नायगारा जवळून दाखवला😊

  • @rushalirajendramatekar1062
    @rushalirajendramatekar1062 Před 3 měsíci +1

    नायगारा फॉल्स असेलही अथांग, उत्तुंग पण गौरी तुझ्या शब्दांनी त्याला अद्वितीय बनवलं...I can only say that "Beauty is in the eyes of beholder"...simply great

  • @manishadhole696
    @manishadhole696 Před 2 měsíci

    खरंच खुप सुंदर आहे नायगरा धबधबा, आणि त्या सुंदर आवाजात नायगराचे वर्णन ऐकून आपणही नायगरा धबधबा पाहायला तिथे बोटीत उभे आहोत असे क्षणभर वाटले. खुप छान ट्रीप दाखवली.

  • @pratikshanamgawli3938
    @pratikshanamgawli3938 Před 27 dny

    आम्हाला नायगारा धबधबा दाखवण्यासाठी खूप खूप धन्यवाद...आणि तो तुझ्या दृष्टीने दाखवण्या साठी तर अजूनच आभार ताई...तू करोडोत एक आहेस ह्या नायगारा सारखी...ह्यात काही विषयच नाही...तुझ बोलण ...शब्द ...आवाज...ह्या नायगारा इतकंच अफाट आहे 💯🧿
    तुझ चॅनल सबस्क्राइब केलंय ही you tube वरची सगळ्यात चांगली गोष्ट आहे माझ्या साठी...Lots of Love...keep growing and glowing...🌷👏🤗

  • @user-fq3fy7kg5h
    @user-fq3fy7kg5h Před 3 měsíci

    काय अप्रतिम वर्णन....लेखन....कथन....आहे तुमचं गौरी.....देखणा नायगारा...देखण्या शब्दांनी उभा केलात...!! केवळ अप्रतिम....!! त्या नायगारा बरोबर तुमच्या शब्दांच्या प्रेमात पडले मी...... खूप खूप शुभेच्छा....अशाच छान लिहीत रहा. आम्हांला निसर्गाच्या सान्निध्यात नेत रहा...

  • @get2amrta
    @get2amrta Před 2 měsíci

    किती गं सुंदर तुझं कथन आणि तितकाच शब्दांचा संग्रह..... परत परत ऐकत राहावेसे वाटते.... खूप सुंदर 👌🏻👌🏻👌🏻

  • @sandyjo1970
    @sandyjo1970 Před 2 měsíci

    आम्ही आत्ताच त्याला भेटून आलो.. तुमचा व्हिडीयो नंतर पाहिला, खरंच सुंदर..अप्रतिम..शब्द न शब्द खरा आहे वर्णन केलेला..👌👌

  • @chandusalunkhe6691
    @chandusalunkhe6691 Před 2 měsíci

    खुपच सुंदर नायगरा, ताई तुमच्या डोळ्यांनी आम्ही अनुभवत होतो. अप्रतिम नजारा शब्दलेखन व वक्तृत्व कल्पनेच्याही पलीकडेचे होते खूप छान वाटले. आम्ही पण फक्त ऐकतच आलो होतो नायगरा धबधबा आज पाहण्यास मिळाले तुमच्या रूपाने... शतशः धन्यवाद... 🙏🚩🚩जय शिवराय....

  • @ashokkotwal6290
    @ashokkotwal6290 Před 2 měsíci +1

    गौरी काय तुझे लेखन काय शब्द
    मी मंत्रामुग्ध झाले खुप दिवसांनी
    !

  • @gopalwawge2456
    @gopalwawge2456 Před 3 měsíci +2

    गौरी ताई तु खुप ग्रेट आहेस. तु आमच्या साठी आदर्श आहेस ❤तु केलेल वर्णन अप्रतिम.भावी जीवनासाठी तुला खुप खुप शुभेच्छा ताई.❤

  • @namitaupadhye4182
    @namitaupadhye4182 Před 3 měsíci

    बापरे भन्नाट लेखन .. काही सुचतच नाही .. मन एकाग्र करून सगळं विसरून मी तुझा व्हिडिओ बघत होते .. काय निसर्ग आहे.. वेड लागलं नायगरा धबधबा ने आणि तु बोलत होतीस त्या शब्दांनी .. काय बोलतेस तू एकदम झकास ❤❤ ऐकत राहावंसं वाटतं... मन सुन्न झालं माझं ... दंडापासून नमस्कार तुला ..👌👌👌👌👌

  • @nehaparit4692
    @nehaparit4692 Před měsícem

    अग ताई तुझ्यामुळे आज आम्हाला नायगारा पाहता आला. आणि तुझे ते शब्दाचं वर्णन अतिशय सुंदर. खूप सुंदर

  • @user-gn9hr5de6k
    @user-gn9hr5de6k Před 3 měsíci +1

    Tai tu kharach khup chan boltes aapoaap dolyatun ananda aashru yatat😭❣️🙌 Dusari gauri hone nahi😢❤

  • @seemavalavalkar9027
    @seemavalavalkar9027 Před 3 měsíci +1

    हाय गौरी,
    खूप सुंदर! तुझी running commentry प्रत्यक्ष अनुभव देत होती. प्रत्यक्ष केव्हा पाहू माहिती नाही , पण तुझ्या शब्दांच्या किमयेने ते दर्शन घडवलं ! Camera ने तर दाखवलंसच पण शेवटचा कोसळणाऱ्या पाण्याचा आवाज अप्रतिम !!