नंदुरबार जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे 4 ऑगस्टपासून ते 11 ऑगस्टपर्यंत भगवा सप्ताह

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • नंदुरबार जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे 4 ऑगस्टपासून ते 11 ऑगस्टपर्यंत भगवा सप्ताह साजरा करण्यात येणार असून, त्या अनुषंगाने नंदुरबार येथील शासकीय विश्रामगृहावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नंदुरबार जिल्हाप्रमुख, अरुण चौधरी यांनी पत्रकार परिषद घेत यात या संदर्भातील माहिती दिली आहे. या सप्ताह अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात सदस्य नोंदणी करण्यात येणार असून, त्याचा शुभारंभ 4 ऑगस्ट पासून करण्यात आला आहे, तसेच यादरम्यान सामाजिक उपक्रम देखील मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख अरुण चौधरी यांनी आयोजित केलेला पत्रकार परिषदेतून दिले आहे, यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख रीना पाडवी, नंदुरबार जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी, शिवसेना तालुकाप्रमुख रमेश पाटील यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित होते, त्याचप्रमाणे आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे उमेदवार देऊन निवडणुका लढविणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख अरुण चौधरी यांनी दिली आहे, तर प्रामुख्याने आम्ही मागणी केल्यानुसार शहादा व नंदुरबार ह्या मतदारसंघातून आम्ही आमचा उमेदवार लढवण्याची पूर्ण तयारी केली असल्याची देखील माहिती अरुण चौधरी यांनी दिली आहे, त्याचप्रमाणे नंदुरबार तहसीलदार यांच्या मनमानी कारभाराबाबत केलेल्या आंदोलनाला यश प्राप्त झाल्याने, यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्यावतीने एकमेकांना पेढे भरून आनंद उत्सव पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साजरा केला.

Komentáře •