पोवाडा नरवीर तान्हाजी मालुसरे

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 12. 2023
  • स्वराज्यावर जीवा पाड प्रेम करणाऱ्या मर्द मावळ्यांनी स्वतःच्या घराची किंवा लेकरा बाळांची पर्वा न करता महाराजांसाठी प्राण पणाला लावले तेंव्हा स्वराज्य स्थापण झालं. स्वराज्यासाठी कामी आलेले नर रत्नांपैकी नरवीर तान्हाजी मालुसरे हे एक रत्न आहे.घरात मुलाचे लग्न असतांना त्यानी मंगल कार्य सोडून आधी "लगीन कोंडाण्याचे मगच बाळ रायबाचे" अशी वल्गना करुन बाळ रायबाचे लग्न सोडून, महाराजांनी स्वतः लढायला जाऊ नये म्हणून ते स्वतः लढायला गेले .उदयभान रजपूत सोबत लढत असतांना किल्ले कोंढाण्यावर लढता लढता धारातिर्थी पडले . रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तान्हाजी ला उदयभानु ने लात मारली हे पाहून सोबत असलेल्या शेलार मामा नी उदयभानु वर हल्ला करुन त्याला ठार केले.महाराज गडावर आल्यानंतर त्यांनी तान्हाजी च्या देहाला वंदन केले व महाराजांच्या तोंडून शब्द निघाले🚩 "गड आला पण माझा सिंह गेला" 🚩तेंव्हा पासून कोंढाणा किल्ल्याचे नाव☀️सिंहगड☀️ झाले. या विषयावर आज चिंचोली निपानी ता.भोकरदन येथील कार्यक्रमात पोवाडा सादर केला.सकल मराठा समाज चिंचोली यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता . सदर च्या कार्यक्रमासाठी सर्व श्री, राजीव पा.मिसाळ जानेफळकर,मधुकर पा.शेळके,कमलाकर पा. शेळके,गजानन पा. शेळके,सरपंच रवि पा.शेळके
    सन्माननिय अंकुश जी जाधव सर,व मा.सुरेशजी तळेकर यांनी अथक परिश्रम घेतले.
    🚩जय भवानी🚩 जय शिवाजी 🚩जय महाराष्ट्र 🚩
  • Hudba

Komentáře • 2