Girnar Parvat Darshan || Guru Dattatray Shikhar || Girnar Yatra Gujarat || Junagadh Gujarat Vlog #4

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • Old Video : • Girnar Night Trek || G...
    नमस्कार मंडळी !
    भाग क्र. ०३ मध्ये आपण पौर्णिमेच्या रात्रीचा 'गिरनार ट्रेक' अनुभवला. आम्ही पहाटे साडेचारच्या सुमारास श्री. दत्तगुरू शिखरावर पोहचलो होतो. त्या एपिसोडला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिलात. त्यासाठी आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद !
    आणि आता या भाग क्र. ०४ मध्ये आम्ही तुम्हाला 'गिरनार पर्वत दर्शन' दाखवत आहोत. हा भागही आपल्या सर्वांना नक्की आवडेल याची आम्हाला खात्री आहे. तर मंडळी अर्थातच हा एपिसोड लाईक करा !... शेयर करा !... आणि आमचं चॅनल साबस्क्राईब करा !!
    मंडळी, गिरनारला जाण्याआधी कृपया खालील गोष्टींची आवर्जून नोंद घ्या ;
    ०१. मंडळी आपल्याला दहा हजार पायऱ्या चढायच्या आहेत याची शारीरिक व मानसिक तयारी ठेवा.
    ०२. चालण्यासाठी चांगली चप्पल किंवा बूट घालावेत. तसेच त्यावर १०-१५ दिवस चालण्याचा सराव करावा.
    ०३. साधारण रात्री ११ वाजता चालायला सुरुवात करावी म्हणजे उन्हाचा त्रास होत नाही व पहाटेच्या प्रसन्न वातावरणात पादुकांचे दर्शन घेता येते. अंदाजे ५ तास लागतात.
    ०४. कपडे सुटसुटीत असावे, जीन पॅन्ट अथवा शरीराला घट्ट बसतील असे कपडे नसावेत.
    ०५. स्वेटर आणि कानटोपी बरोबर असावी. साधारण ६००० पायरी नंतर पहाटेचा गार वारा असतो.
    ०६. हातात काठी घ्यावी त्याने चालण्यासाठी मदत मिळते. पायथ्याजवळ अत्यंत कमी शुल्कात काठी उपलब्ध आहे.
    ०७. पाण्याची बाटली घ्यावी, इलेक्ट्रोल किंवा ग्लुकोज पावडर टाकली तर उत्तम.
    ०८. जवळ खडीसाखर, गोड गोळ्या ठेवाव्यात.
    ०९. सुरवातीपासून वर पादुकापर्यंत कुठेही टॉयलेट/बाथरूमची सोय नाही हे लक्षात ठेवावे.
    १०. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी आवर्जून नीकॅप वापरावी.
    ११. रात्री अंधारात चालणे उत्तम. त्यामुळे किती चाललो याचा अंदाज येत नाही. (शक्यतो ६/८ ग्रुपमध्ये जावे). चढताना पायऱ्यावर नंबर टाकलेले आहेत त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करावे.
    १२. प्रत्येकाने बॅटरी जरूर बरोबर घ्यावी, २ जादा सेल बरोबर असावेत. वाटेत खांबावरचे लाईट आहेत मात्र त्यांच्यामध्ये खूप अंतर आहे.
    १३. चढतांना अजिबात घाई करू नये. दम लागल्यास विश्रांती घ्यावी.
    १४. उतरताना हळूहळू उतरावे. घाई केली तर पायात गोळे येतात. उतरताना काठीचा फार उपयोग होतो. पायाचा भार थोडा काठीवर टाकावा म्हणजे उतरणे सोपे होते.
    १५. जमले तर उतरल्यावर पायाला मालिश करून घ्यावे. त्यामुळे थोडा आराम मिळतो.
    १६. काही कारणास्तव कोणाला चढणे नाही जमले तर डोलीचा आधार घ्यावा. अश्या वेळी इतर डोलीवाल्यांच्या संपर्कात रहावे ते अथवा जवळ असणारे दुकानदार डोलीची व्यवस्था करतात. डोलीचा खर्च आपले आपण करायचा असतो. येथे सरकार नियुक्त दरपत्रक आहे. सधारणतः माणसाचे वजनानुसार हा आकार असतो.
    १७. सकाळी रोपवेने पायथ्यापासून अंबामातेच्या मंदिरापर्यंत जाता - येता येवू शकते. रोपवेचे तिकीट खिडकीजवळ अथवा ओंनलाईन काढता येत. तिकीट खिडकीजवळ गर्दी असते याची नोंद घ्यावी . त्यानुसार नियोजन करावे.
    १८. पायथ्याला अनेक आखाडे व आश्रम आहेत. तिथे राहण्याची व भोजनाची उत्तम सोय आहे. छोटी मोठी हॉटेल्सही आहेत.
    १९. आणि मुख्य म्हणजे निसर्ग व पर्यावरणाचे भान ठेवावे.
    धन्यवाद !!
    अर्चना माने - भोसले
    #क्षितिजरेषा
    #Kshitijresha
    #Gujrat_tourism
    #Junagadh
    #Girnar
    #Girnarjunagadh
    #Girnar_track
    #Girnari
    #Girnarparikrama
    #Girnarparvat
    #Girnarhills
    #Girnarvideo
    #Girnarvideo
    #Girnarmountain
    #girnarparvat
    #girnarvlog

Komentáře • 12

  • @sadhanakamble9484
    @sadhanakamble9484 Před 2 lety +3

    छायाचित्रण व निवेदन 👌👌

  • @dhartibhanuse5278
    @dhartibhanuse5278 Před 2 lety +3

    👌👌

  • @aadibandh
    @aadibandh Před 2 lety +2

    खूप छान

  • @ashishshriwastav6310
    @ashishshriwastav6310 Před 2 lety +3

    👌👌👍

  • @aleemkhan2525
    @aleemkhan2525 Před 2 lety +3

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @ganeshsalunkhe6832
    @ganeshsalunkhe6832 Před 2 lety +3

    Nice

  • @SantoshPatil-dk3ng
    @SantoshPatil-dk3ng Před rokem +1

    जय गिरनारी

  • @sheetalpawar9502
    @sheetalpawar9502 Před 2 lety +3

    Wow!

  • @vaibhavjoshi7704
    @vaibhavjoshi7704 Před 2 lety +3

    👌सुंदर वर्णन 🙏जय गिरनारी 🌼🚩🚩

  • @prasadbhosale7655
    @prasadbhosale7655 Před 2 lety +2

    👌🏻👌🏻

  • @deepakkunnure3445
    @deepakkunnure3445 Před 2 lety +1

    गिरणार हे जैनधर्मियांचे पवित्र सिध्दक्षेत्र आहे पण अन्य धर्मियांनी बळकावली आहेत.दर्शनासाठी जैन गेल्यानंतर ते (जटाधारी )मारणेस अंगावर येतात.माझा अनुभव दतमंदिरातील ..

    • @Kshitijresha
      @Kshitijresha  Před 2 lety +1

      खरचं वाईट अनुभव आला तुम्हाला... असे घडू नये कोणासोबतही....त्यामुळे परप्रांतात फिरतांना आपण काळजी ही घ्यायलाच हवी. असो, आम्हीही बऱ्याच ठिकाणी काही साधू बुवा ध्यान लावून बसलेले पाहिले.... मात्र ते कोणाशी बोलत नव्हते... तुम्ही व्हिडीओ पाहिलात, तुम्हाला तो आवडला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद !! 🙏😊