Vitthal Kale | Baap Lyok | Marathi Movie | Samiti Alumni | VSS Pune

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • "बाप ल्योक" चित्रपटामधील समितीचा ल्योक आपल्या भेटीला👍
    काल परवा प्रदर्शित झालेला बहुचर्चित बाप ल्योक ह्या मकरंद माने, नागराज मंजुळे अशा दिग्गज दिग्दर्शकांच्या चित्रपटाचा प्रमुख नायक, पटकथा कार विठ्ठल काळे, समिती माजी विद्यार्थी ( २००९-११ बॅच ) यांच्याशी सोमवार दिनांक ४ सप्टेंबर सायंकाळी ६ वाजता आपटे वसतिगृह, विद्यार्थी साहाय्यक समिती , पुणे येथे संवादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मराठी चित्रपट सृष्टीच्या उद्याच्या ह्या बाप माणसाचा १२ वर्षांचा प्रवास जाणून घेण्यासाठी त्याला आताच्या ह्या माईलस्टोन क्षणाच्या शुभेच्छांसाठी सर्व समिती परिवारातील विश्वस्त, कार्यकर्ते, सल्लागार, माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी, पालक, देणगीदार उपस्थित होते. संवादक श्री सुनील चोरे सर ह्याच्याशी गप्पा मारताना श्री विठ्ठल सरांनी त्यांच्या समितीतील आठवणींना उजाळा दिला. समितीतील संस्कार ह्यामुळे घडलेले त्यांचे व्यक्तिमत्व हे आजी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत होते. हा कार्यक्रम विद्यार्थी विकास केंद्र, विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे आणि माजी विद्यार्थी मंडळ, विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे ह्यांचा संयोजनाने पार पडला.
    #baaplyok #nagrajmanjule #vitthalkale #umagayabaapra #ajayatul #marathifilm #samiti #majividyarthi #alumni #fcroad #pune #womenempowerment #education

Komentáře • 1