जेवणाचे १७ नियम || Jevanache Niyam || Eating rules (Marathi)

Sdílet
Vložit
  • čas přidán 31. 03. 2023
  • जेवणाचे १७ नियम || Jevanache Niyam || Eating rules (Marathi)
    जेवणाचे १७ नियम
    १. हात-पाय-तोंड स्वच्छ धुवूनच जेवायला बसावे.
    २. जेवताना मुख पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे.
    ३. पश्चिम दिशेला मुख करून जेवल्यास ते जेवण राक्षसांना मिळते व रोग पाठीशी लागतात.
    ४. कधीही पायामध्ये चपला किंवा बूट घालून जेवण करू नये.
    ५. जेवणाची सुरुवात करण्यापूर्वी देवी देवतांचे आवाहन करावे. विश्वातील सर्व प्राणीमात्रांना भोजन मिळावे, कुणीही उपाशी राहू नये अशी प्रार्थना करावी.
    ६. जेवण करताना शक्यतो मौन बाळगावे. गप्पा करत भोजन करू नये.
    ७. राग किंवा संताप आलेला असताना भोजन करू नये.
    ८. जेवण करताना तोंडातून विचित्र आवाज काढू नये.
    ९. दिवसातून कमीत कमी एक वेळा तरी सर्व कुटुंबासोबत बसून जेवण करावे.
    १०. जेवण किचनमध्ये म्हणजेच स्वयंपाकघरात बसूनच करावे. त्यामुळे आपल्या कुंडलीतील राहू ग्रह शांत होतो. कुटुंबावर आकस्मिक संकटे कोसळू नये, यासाठी राहू ग्रह महत्वाचा मानला जातो.
    ११. जेवण करताना जेवणाचे ताट कधीही एका हातात धरून भोजन करू नये. त्यामुळे खाल्लेले अन्न प्रेतयोनीत जाते.
    १२. भोजन झाल्यानंतर कधीही ताटामध्ये हात धुऊ नये.
    १३. आपल्या समोर आलेल्या अन्नाला नाव न ठेवता गुपचुप जेवण करावे.
    १४. ताटातील संपूर्ण अन्न संपवावे. उष्टे पडू देऊ नये.
    १५. जेवण कधीही सोफ्यावर किंवा बेडवर बसून करू नये.
    १६. तडा गेलेल्या, फूटलेल्या भांड्यामध्ये कधीही जेवण करू नये.
    १७. खूप गोंधळ असलेल्या ठिकाणी कधीही जेवण करू नये.
    १८. पिंपळाच्या आणि वडाच्या झाडाखाली कधीही जेवण करू नये.
    १९. उभे राहून जेवण करणे शास्त्रांत अत्यंत चुकीचे मानले गेले आहे.
    २०. अति गोड, अति आंबट, अति तिखट अन्न खाऊ नये.
    २१. कोणी उष्टे ठेवलेले अन्न देखील खाऊ नये.
    २२. जेवण करताना कोणत्याही वाईट घटनांवर, संकटांवर चर्चा करू नये.
    २३. जेवण करताना सर्वात आधी गोड, त्यानंतर खारट व त्यानंतर कडू पदार्थ खावेत.
    २४. जेवण करताना किंवा जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये.
    २५. जेवण झाल्यावर कमीत कमी शंभर पावले चालावी याला शतपावली असे म्हणतात.
    २६. जेवण झाल्यावर एका तासानंतर साखर टाकलेले दूध किंवा एखादे फळ खाल्ल्यास जेवण व्यवस्थित पचते.
    २७. ज्या ताटाला एखाद्या व्यक्तीच्या पायाचा स्पर्श झालेला असेल, त्या ताटातील अन्न चुकूनही खाऊ नये.
    २८. जेवण करताना ताटामध्ये एखादा केस निघाला तर ते अन्न खाऊ नये. नवीन ताटात जेवण करावे.
    २९. केस असलेल्या ताटातील केस काढून ते अन्न खाल्ले गेले तर जीवनात दारिद्र्य येते.
    ३०. जेवण करताना ताटाला कोणी ओलांडले असेल तर असे अन्न सुद्धा खाण्यायोग्य नसते.
    ३१. दोघा भावांनी एका ताटात जेवण केल्याने त्यांच्या धनसंपत्ती मध्ये व प्रेमामध्ये वाढ होते.
    ३२. याउलट पती आणि पत्नीने एका ताटात जेवण करू नये.
    ३३. भोजनाचे ताट पाटावर, चटईवर किंवा उंच जागेवर सन्मानाने ठेवावे व त्यानंतर भोजनाला सुरुवात करावी.
    ३४. तसेच रात्री जेवण झाल्यानंतर भांडी तशीच खरकटी पडू देऊ नये. घरात लक्ष्मी टिकत नाही. रोगराई वाढते.
    ३५. जेवण झाल्यावर आपले ताट योग्य ठिकाणी ठेवावे. उष्टे ताट कधीच चुलीवर/शेगडीवर ठेऊ नये.
    ३६. रात्रीच्या वेळी दहयाचे सेवन केल्यास देवी लक्ष्मीचा अपमान होतो म्हणून रात्रीच्या वेळी दही खाऊ नये.
    ३७. स्वयंपाक करणाऱ्या स्त्री किंवा पुरुषाने आधी आंघोळ करून आणि शुद्ध होऊन मगच स्वयंपाक करायला सुरुवात करावी.
    ३८. स्वयंपाक झाल्यानंतर १ चपाती गाईला, १ चपाती कुत्र्याला आणि १ चपाती कावळ्याला देऊनच आणि अग्नि देवाला नैवेद्य अर्पण करूनच मग घरातील सर्वांनी भोजनाला सुरुवात करावी.
    ३९. घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून जेवण करावे. त्यामुळे त्यांच्यातील एकोपा वाढीस लागतो.
    जेवणाचे हे सर्व नियम पाळणे अर्थातच अवघड आहे. तरीही जास्तीत जास्त नियम आपण नक्की पाळा. जेवणाच्या या नियमांचे पालन केल्यान आपल्या घरामध्ये बरकत येते, असे हिंदू धर्मशास्त्र सांगते.
    पाणी पिण्याचे सुद्धा काही महत्वपूर्ण नियम आहेत. हे नियम जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? नियम जाणून घेण्यासाठी कमेन्ट मध्ये “पाणी” असे नक्की लिहा.
    जेवणाचे नियम हा व्हिडिओ आवडला असेल, तर LIKE SHARE SUBSCRIBE नक्की करा.
    ॐ नमो नारायणा
  • Jak na to + styl

Komentáře • 500