गोंधळ - Ambabai Gondhalala Ye | Maharashtra Shaheer | Ajay-Atul, Guru | Ankush, Sana | Kedar Shinde

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 04. 2023
  • Presenting biggest Marathi song of this season "गोंधळ - Ambabai Gondhalala Ye" from most awaited Marathi movie 2023 "Maharashtra Shaheer" Sung by Ajay Gogavale composed by Ajay - Atul. Starring Ankush Chaudhari & Sana Kedar Shinde. Exclusively on ‪@EverestMarathi‬
    आणि प्रतिक्षा संपली ....
    सादर करत आहोत प्रेक्षकांच्या आग्रही मागणीचा अजय गोगावलेंच्या दमदार आवाजात 'गोंधळ' !!
    Book Maharashtra Shaheer Tickets On BookMyShow
    bit.ly/3lua1cx
    Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.
    bit.ly/EverestMarathi
    Popular Maharashtra Shaheer Videos
    ► 'दिड शहाणे' Deed Shahane - • 'दिड शहाणे' Deed Shaha...
    ► Maharashtra Shaheer Official Trailer - • Maharashtra Shaheer Of...
    ► Gau Nako Kisna Song - • Gau Nako Kisna -Marath...
    ► Baharla Ha Madhumas Song - • Baharla Ha Madhumas - ...
    ► Maharashtra Shaheer Teaser - • महाराष्ट्र शाहीर Offic...
    ♪ Song Available on ♪
    JioSaavn: bitly.ws/Cj2r
    Spotify: bitly.ws/E32M
    Amazon Music: bitly.ws/CiQN
    Gaana: bitly.ws/CiQR
    WYNK: rb.gy/rhq7i
    Resso:
    Apple Music: rb.gy/ujn9q
    CZcams Music: • Ambabai Gondhalala Ye
    Instagram - bitly.ws/DgIE
    Song Credits :
    Music : Ajay - Atul
    Lyrics : Guru Thakur
    Singer : Ajay Gogavale
    Male Corus Singers : Umesh Joshi, Swapnil Godbole, Vijay Dhuri, Janardan Dhatrak, Shripad Lele, Vivek Naik, Pratik Solse
    Female Chorus Singers : Arohi Mhatre, Madhura Paranjape, Sonali Karnik, Aditi Prabhudesai, Seema Lele, Pragati Joshi, Mrunmayee Dadke, Aparna Nimkar, Chaandni R M W
    Musicians
    Dholki : Satyajit Jamsandekar, krishna Musale, Arjun Shinde
    Sambal : Kalu Shinde
    Percussion : Satyajit Jamsandekar, Ratnadeep Jamsandekar, Omkar Ingavle, Raju Kulkarni, Pratap Rath
    Recorded & mixed by : Vijay Dayal @ YRF studios
    Assisted by : Chinmay Mestry
    Mastered by Donal Whelan at Hafod Mastering (Wales)
    Music composed, arranged, produced & conducted by Ajay- Atul
    Lyrical Song Editor : Aniket Mahadik
    Movie Credits:
    Director - Kedar Shinde
    Producers - Sanjay Chhabria ( Everest Entertainment) | Bela Shinde
    Starring - Ankush Chaudhari | Sana Kedar Shinde | Ashvini Mahangade | Shubhangi Sadavarte | Nirmiti Sawant | Mrumayee Deshpande | Dushyant Wagh | Deva | Atul Kale | Amit Dolaawat
    Story - Vasundhara Sable
    Lyrics :
    अगं धाव आई ठाई ठाई दैत्य मातला
    अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला
    आता त्रिशूल तू हातात आई घे
    बळ तेच आज संबळाला दे
    अंबाबाई गोंधळाला ये
    तुळजाभवानी गोंधळाला ये
    अगं काळुबाई गोंधळाला ये
    उदो उदो उदो उदो...
    हे सप्तश्रुंग वासिनी तुझा गोंधळ आईचा गोंधळ
    हे आई तुळजाभवानीचा गोंधळ आईचा गोंधळ
    अगं माहूरगडवासीनी तुझा गोंधळ आईचा गोंधळ
    माझ्या करवीरवासीनी तुझा गोंधळ आईचा गोंधळ
    हे वाघावर बैसूनी अंबा आली ग गोंधळाला
    हे साद ऐकून माझी अंबा आली ग गोंधळाला
    भक्तीचा आवाज
    चढविला गं साज
    आज संबळ वाजं
    माझ्या आईचा गोंधळाला
    आता सरुदे अवस करितो नवस गोंधळाला ये
    तुझा करितो गजर राहू दे नजर गोंधळाला ये
    चोळी बांगडी वाहीन गोडवा गाईन गोंधळाला ये
    आई सुखाचा सागर मायेचा पाझर गोंधळाला ये
    प्रलयातुनी जगाऽऽऽ
    प्रलयातुनी जगा आई तूच तारिले
    बळ तेच आज संबळाला दे
    अंबाबाई गोंधळाला ये
    तुळजाभवानी गोंधळाला ये
    अगं काळुबाई गोंधळाला ये
    हे रात सरली काळी गं
    उजळलं आभाळी गं
    उभी पाठीशी जगदंबा
    माय लेकुरवाळी ग
    आई संकटातून तार
    तुझे उघडुनी ये दार
    आई गोंधळाला येना
    तुझा मांडला दरबार
    तुझ्या दिवटी चा गं जाळ
    झाला दुर्जनांचा काळ
    आता तुच गं सांभाळ
    आई गोंधळ मांडला आज गोंधळाला ये
    अंगार जो तुझ्या ऽऽऽ
    नजंरत प्येटला
    अन तिच आग संबळाला दे
    अंबाबाई गोंधळाला ये
    तुळजाभवानी गोंधळाला ये
    अगं काळुबाई गोंधळाला ये
    दुःख निवारक तू जननी
    आई तू जननी
    शरण तुला मी तव चरणी
    धाडी दिशांतरी संकट हे
    आई संकट हे
    सोडवी क्लेशातूनी दुर्गे
    त्रिभुवन जाणूनी तव महिमा
    आई तव महिमा
    आदिशक्ती तू तूच क्षमा
    विजयाचा वर दे अंबे
    वर दे अंबे
    माय भवानी जगदंबे
    Enjoy & Stay connected with us!
    CZcams: bit.ly/EverestMarathi
    Facebook: / everestentertainment
    Twitter: / everestmarathi
    Instagram: / everestentertainment
    #AjayAtul #Gondhal #MaharashtraShaheer

Komentáře • 2,3K

  • @mithunsapkale4413

    कोणा कोणाला मराठी असल्याचा गर्व आहे ❤

  • @MAXGRIM951
    @MAXGRIM951 Před rokem +89

    ज्या मराठी पिक्चरमध्ये आई भवानीचा गोंधळ नाही तो तो पिक्चर पाहायला मजाच नाही 🚩🙏

  • @rohandeshmukh.3700
    @rohandeshmukh.3700 Před rokem +121

    अनेक गायक संगीतकार आले गेले पण अजय अतुल या जोडीला नमवू शकले नाही. माहित नाही काय जादू आहे पण तुमचे गोंधळ ऐकताना आपसुक् डोळ्यात पाणी येत. एकदा जरी तुम्हाला भेटायला जमल तर हा जीव सुखी होईल.... ❤

  • @shardulmurumkar4954
    @shardulmurumkar4954 Před rokem +504

    अजय-अतुल + गुरू ठाकूर = विषय संपला 💯💥🙏🏻❤️

  • @Amangesh1
    @Amangesh1 Před rokem +366

    मराठी माणसाच्या काळजाला साद घालणारा आवाज म्हणजे अजय अतुल

  • @shubhampatil4705
    @shubhampatil4705 Před rokem +393

    हे गाणं ऐकुन आनंद आणि अंगावर शहारे आले. अजय आणि अतुल सरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा..🚩🎧 💓💯🤞

  • @sundarcreativity9020
    @sundarcreativity9020 Před rokem +41

    लख्ख पडला प्रकाश आई भवानी चा ह्या गाण्यानंतर आई भवानी ला आर्पन केलेले हे गाणे मनाला भावले. अंगावर अक्षरशः काटा आला गाणं ऐकताना,😍💯 खरंच अजय दादा आणि अतुल दादा हे महारा्ट्रातील हिरे आहेत .♥️♥️

  • @Upasananaik
    @Upasananaik Před rokem +221

    खुपचं छान गाणं 😍 "अंबाबाई गोंधळाला ये" ही ओळ ऐकून अक्षरशः अंगावर शहारे आले.🙏 अजय - अतुल + गुरू ठाकूर यांच्या डोक्यावर अंबाबाई चा हात आहे 😊 या गोंधळात साक्षात अंबाबाई अवतरणार आणि अंबाबाई च्या आशिर्वादाने ह्या गाण्याचां गोंधळ महाराष्ट्रभर गाजणार.❤️ जय भवानी.. आई अंबाबाईचा उदो उदो!🙏🚩

  • @user-tq5xg5dg1i

    याला म्हणतात गाणं 😂 नाई तर आमच्या इथले आहेतच कलाकार आपल्या गाण्यात आपलाच उधो उधे करतात खरचं मानल राव आणि त्या पेक्षा आई अंबा बाई कोल्हाूरची क्या बात है आभारी आहोत असेच कार्य करीत रहा आई अंबा बाई तुमच्या पाठीशी आहे 😊😊😊😊

  • @swar_gaurav7635
    @swar_gaurav7635 Před rokem +60

    नटरंग, जोगवा ,चंद्रमुखी आसे किती नवे घ्यावी . खरंच जेव्हा गायच पण कळत नव्हत ना तेव्हा पासून वेड आहे अजय अतुल यांचं .. 💫🤩💕

  • @tufan_bebhan
    @tufan_bebhan Před rokem +2

    उत्तरेकडे गझलकार व गीतकार यांना डोक्यावर उचलून घेतात ,महाराष्ट्राची लावणी, दशावतार, शाहीर जगाला ओळख करून देण्याची वेळ आली आहे👍👍🇮🇳🇮🇳

  • @jagdishbahir3461
    @jagdishbahir3461 Před rokem +604

    कितीही बॉलीवूड गाणी केले तरी मन मराठी मातीत रमत ते हे,

  • @ramanmadhale8513
    @ramanmadhale8513 Před rokem +101

    आभार.... 🥺🥺. महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या पाठिशी आई जगदंबा नक्की आहे.... काय ती पिपाणी.... सलाम अजय-अतुल सर, केदार सर, अंकुश दादा.... 🙌

  • @akshaydushman2795
    @akshaydushman2795 Před rokem +185

    डोळ्यांचे आणि कानांचे पारण फेडलं🙏👏👍अजय अतुल 👏💐🚩✌️अंबाबाई साक्षात गोंधळाला अवतरली....👌👍 हा गोंधळ धिंगाना घालणार👏👍गुरू ठाकूर, अजय अतुल तुम्ही अफलातून आहात...👍👌 आणि सदैव राहणार🙏👍... सदैव नतमस्तक तुमच्या संगिता पुढे♥️💥सदैव प्रेम

  • @theuniquemsrtc7355
    @theuniquemsrtc7355 Před rokem +39

    हा गोंधळ सिनेमागृहात पाहताना काय अनुभव घेतला शब्दात सांगता येणं कठीण .फक्त अनुंभवच करू शकतो ....... आपो आप डोळ्यातून पाणी खेचलं या गाण्याने .....रोम न रोम शहारून गेलं .... music therapy काय असू शकते आणि काय impact करू शकते ते हे गाणं ऐकून नाही अनुभवूनच समजत........अजय अतुल तुम्हांस तोड नाही .......अप्रतिम

  • @sanjaypawar1309
    @sanjaypawar1309 Před rokem +185

    भागात टॉप नुस्ता धुर...🔥 अजय अतुल सर तुमच्यासारखा गोंधळ आजपर्यंत कधीच ऐकलं नाहीत सलाम तुमच्या या आजपर्यंत च्या कर्तृत्वाला ❤ What A Voice...🔥🔝

  • @samyakjadhav1783
    @samyakjadhav1783 Před rokem +131

    आई जगदंबेला साद घालणारे अजय अतुल दादांचे संगीत आणि गुरू ठाकूर यांचे शब्द थेट काळजापर्यंत पोहचले. खुप साध्या आणि सरळ शब्दात मांडलेला अंबाबाईचा गोंधळ. खुप छान ❤🙏

  • @pratikkakare9085
    @pratikkakare9085 Před rokem +14

    चित्रपट पाहिला.. मन प्रसन्न झालं अगदी

  • @vijaygawande3860

    महाराष्ट्राचे पारंपरिक वाद्य म्हणजे संभल याला खरी दाद दिली ती फक्त अजय अतुल यानीच ✌️👌👌

  • @rutuja.21
    @rutuja.21 Před rokem +39

    या गोंधळात आम्ही पण भक्तिरसात सामील झालो..केदार sir खूपच कौतुक तुमचे.गुरू ठाकूर सर शब्दांचे जादूगार आणि अजय अतुल सर ती जादूची छडी.