मनसे भाजप एकत्र येणार ? या तारखेला राज ठाकरे करणार का घोषणा ? mns raj theckeray

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • मनसे भाजप एकत्र येणार ? या तारखेला राज ठाकरे करणार का घोषणा ? mns raj theckeray latest
    महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडविणारी बातमी पुढे आलीय. गेल्या काही वर्षांपासून भाजपवर तुटून पडणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आता नवी भूमिका घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती पुढे आलीय. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पुढच्या वाटचालीत ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जातेय. मुंबईत या दोनही नेत्यांमध्ये दीड तास खलबतं झाली असून त्यात नव्या राजकारणाबद्दल चर्चा झाल्याची माहिती पुढे येतेय. त्यामुळे यापुढच्या काळात भाजप आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता आहे. येत्या 23 तारखेला मुंबईत मनसेचं महाअधिवेशन होत आहे. या अधिवेशनात राज ठाकरे पक्षाची नवी भूमिका ठरविणार आहेत. गेली काही वर्ष राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका करत होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी तर त्यांनी जाहीर सभांमधून व्हिडीओ दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली होती.
    आता महाराष्ट्रातली परिस्थिती बदलल्याने राज ठाकरे वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत गेल्याने मनसेची कोंडी झाली होती. कारण मनसेने विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला साथ देणारी भूमिका घेतली होती. विधानसभेत सध्या मनसेचा एक आमदार आहे. या बदलत्या राजकारणाचा भाग म्हणून मनसे आपला झेंडाही बदलविणार असून हिंदुत्वाची कास धरण्याची शक्यता आहे.
    येत्या 23 जानेवारीला मनसेचं महाअधिवेशन मुंबईत होत असून त्यात राज ठाकरे पक्षाचं नवं धोरण जाहीर करणार आहेत. मनसेच्या राजकीय वाटचालीत हा निर्णय सर्वात महत्त्वाचा ठरणार असून मनसेला हा बदल यश मिळवून देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.सध्याच्या मनसेच्या झेंड्यात निळा, भगवा, पांढरा आणि हिरवा असे रंग आहेत तर मध्ये पक्षाचं चिन्ह असलेलं इंजिन आहे. नव्या झेंड्यात सर्व चारही रंग जाणार असून फक्त भगवा रंग असणार आहे आणि मध्यभागी 'शिवराजमुद्रा' असणार आहे. हा बदल म्हणजे मनसेची हिंदुत्वाकडे असलेली वाटचाल असल्याचं म्हटलं जातंय.
    राज्यात बदलती राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नवी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जात राज्यात सरकार स्थापन केलं. काँग्रेससोबत गेल्याने शिवसेनाला आपली कडवी भूमिका थोडी मवाळ करावी लागली होती. त्यामुळे शिवसेनेचा कट्टर हिंदुत्ववादी मतदार आपल्याकडे खेचण्यासाठी मनसे नवी भूमिका स्वीकारणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान मनसेच्या या नव्या भगवीकरणावर पुण्याच्या शिवसैनिकांनी चक्क स्वागत केलंय. काहीनी तर चक्क मनसेला सेनेत विलीन करण्याचा सल्ला दिला. पण हे सांगतानाच शिवसेनेचं हिंदुत्व अद्यापही कडवटच असल्याचं सांगायला ते विसरले नाहीत.
    23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. यादिवशी मनसेचं महाअधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनात राज ठाकरे पक्षाला नवी दिशा देण्यावर कार्यकर्त्यांना उभारी देणार आहे. याच दिवशी आता राज ठाकरे मराठ अस्मितेसोबतच हिंदुत्वाचीही मोट बांधणार आहेत.
    #livemarathinews
    #महाराष्ट्र
    #raj_thackeray
    #मनसे
    #राष्ट्रवादी
    #
    #शिवसेना
    #भाजप
    #pankaja_munde
    #dhananjay_munde
    #pritam_munde
    #live
    LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
    Made in Marathi Digital News Network in Maharashtra
    आमचे नवीन विडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनेल Made In Marathi ला Subscribe करा
    Subscribe channel- / madeinmarathi
    (About Made In Marathi )
    Hi friends I am Made In Marathi Digital News Network .Channel in Maharashtra
    Get the latest top stories, Live Stream, on location Recorded video, program , current affairs, sports, business, entertainment, politics news and etc in Marathi language.
    (Work all made in marathi Network )
    जय महाराष्ट्र भावान्नो आपल्याला हया channel वर नवनविन मराठी विडीओ पहायला मिलतिल
    तसेच,राजकारन,नवीन चित्रपटा विषई माहिती ,भाषण,कीर्तन, आशा प्रकारे नवनविन विडीओ आपल्याला पहायला मिलतिल.
    आपल्या काहि शंका असतिल व किंव्हा आपले विडीओ सम्पूर्ण माहितिसह आम्हाला पाठवन्या साठि आमचा सम्पर्क
    E-mail id हा आहें। 96patilindia@gmail.com
    INTRO BY =
    Buffalo Sauce
    bit.ly/2WbJ9wB
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Komentáře • 1