अंडा दम बिर्याणी | आता कोणीही बनवु शकेल एवढ्या सोप्या पद्धतीने | anda dum biryani recipe in marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 09. 2024
  • ★ Please take a moment to like and subscribe -
    / @ashwinisrecipe
    ✦ visit Facebook page - www.facebook.c...
    ✦Instagram - ...
    ✦For business inquiries please email us on
    ashwnireceipee@gmail.com
    ✦stainless steel kadhai
    amzn.to/3XkoNj9
    ✦Cast iron kadhai
    amzn.to/3JRRXCT
    ❊❊❊❊❊❊❊❊❊❊❊❊❊❊❊❊❊❊❊❊❊❊❊❊❊❊❊
    अंडा दम बिर्याणी | आता कोणीही बनवु शकेल एवढ्या सोप्या पद्धतीने | anda dum biryani recipe in marathi
    साहित्य→
    अंडी फ्राय करण्यासाठी-
    •उकडलेली अंडी
    •तेल
    •लाल तिखट
    •हळद
    अंडा मसाला बनवण्यासाठी -
    •तेल
    •दालचिनी
    •मसाला वेलची - 1
    •हिरवी वेलच्या - 2-3
    •जावित्री - 1
    •चक्रीफुल- 1
    •शहाजिरे 1/2 tsp
    •बारीक चिरलेला कांदा - दोन मध्यम आकाराचे
    •आलं लसूण पेस्ट - दीड टेबलस्पून
    •हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या ) - 2
    •हळद- अर्धा छोटा चमचा
    •लाल तिखट - गरजेप्रमाणे
    •बिर्याणी मसाला - दोन मोठे चमचे
    •टोमॅटो प्युरी
    •फेटलेलं दही - अर्धी वाटी
    •चवीनुसार मीठ
    •बारीक चिरलेला पुदिना
    •बारीक चिरलेली कोथिंबीर
    •गरजेप्रमाणे पाणी
    •फ्राय करून घेतलेली अंडी
    भातासाठी लागणारे साहित्य -
    •बासमती तांदूळ (अर्धा तास भिजवून घेतलेले ) - 2 कप
    •पाणी
    •चवीनुसार मीठ
    •तमालपत्र - 2-3
    •दालचिनी - 2 मोठे तुकडे
    •मसाला वेलची - 1
    •हिरव्या वेलच्या - 4-5
    •लवंगा - 4-5
    •काळीमिरी 8-10
    •जावित्री - 1
    •चक्रीफुल - 1
    •लिंबाचा एक तुकडा
    लेअर साठी लागणारे साहित्य -
    •तयार अंडा मसाला
    •शिजवून घेतलेला भात
    •तळलेला कांदा
    •बारीक चिरलेला पुदिना
    •बारीक चिरलेली कोथिंबीर
    •केसर घातलेलं दूध
    •तूप
    •गरम पाणी
    कृती -
    सर्वप्रथम गॅसवर एक कुकर गरम करायला ठेवा. त्यामध्ये पाच टेबलस्पून तेल घाला तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालून तो तळून घ्या व बाजुला ठेवा. आता उकडून घेतलेली अंडी तेलामध्ये घालून त्यात थोडी हळद व लाल तिखट घाला अंडी चांगली फ्राय करून घ्या.फ्राय करून घेतलेली अंडी काढून बाजूला ठेवा.आता गरम तेलामध्ये खडे मसाले घाला व मंद आचेवर मिनिटभर परतून घ्या, आता बारीक चिरलेला कांदा घालून तोही चांगला तपकिरी रंगावर येईपर्यंत परतून घ्या.कांदा परतून झाला की यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची व आलं लसूण पेस्ट घाला तेही मिनिटभर परतून घ्या.आता यामध्ये हळद, लाल तिखट व बिर्याणी मसाला घालून व्यवस्थित मिक्स करा आणि टोमॅटो प्युरी घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्या.टोमॅटो प्युरी चांगली परतून झाली की यामध्ये फेटून घेतलेलं दही घाला व तेही छान तेल सुटेपर्यंत परतून घ्या.आता यामध्ये चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर व पुदिना घाला व्यवस्थित मिक्स करा आणि गरजेप्रमाणे पाणी घालून दोन-तीन मिनिटं शिजवून घ्या व परतून घेतलेली अंडी घाला पुन्हा दोन मिनिटं शिजवून घ्या आणि गॅसची फ्लेम बंद करा.
    आता भात बनवण्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवा त्यामध्ये चवीनुसार मीठ,गरम मसाले घालून चांगलं उकळून घ्या हे तीन चार मिनिटे उकळून झालं की यामध्ये भिजवून घेतलेला बासमती तांदूळ घालून 70 ते 80 टक्के भात शिजवून घ्या, तर साधारण तीन ते चार मिनिटांमध्ये भात तयार होतो. तयार झालेला भात चाळणीमध्ये काढून घ्या.
    आता अगोदर जो आपण अंडा मसाला तयार करून घेतलेला आहे त्यातला अर्धा मसाला बाजूला काढून घ्या व त्यावरती अर्धा भात घालून त्याचा एक लेयर तयार करा पुन्हा त्यावरती काढून घेतलेला मसाला घालून त्यावरती तळलेला कांदा बारीक चिरलेला पुदिना व कोथिंबीर घाला. पुन्हा त्याच्यावरती राहिलेल्या भाताचा एक लेयर करा व त्यावर तळलेला कांदा, कोथिंबीर,पुदिना घाला.यासोबतच आवडत असेल तर केशर घातलेलं दूधही घाला. तीन चार टेबलस्पून तूप घाला आणि थोडंसं गरम पाणी घाला कुकरचं झाकण लावून घ्या आता हे कुकर गॅस वरती ठेवून तीन ते चार मिनिटे मोठ्या फ्लेम वरती होऊ द्या नंतर एक तवा गरम करून त्यावरती कुकर ठेवा मध्यम आचेवरती पुन्हा आठ दहा मिनिटे याला दम द्या, दहा मिनिटानंतर गॅस बंद करा व कुकर दहा ते पंधरा मिनिटे तसाच ठेवा पंधरा मिनिटानंतर खाण्यासाठी आपली रेस्टॉरंट स्टाईल अंडा बिर्याणी तयार आहे.
    ❈❈❈❈❈❈❈❈❈❈❈❈❈❈❈❈❈❈❈❈❈❈❈❈❈❈❈❈
    Other Recipes -
    हॉटेलसारखी चिकन दम बिर्याणी बनवण्याची सोपी पद्धत kacchi chicken biryani recipe | hyderabadi biryani
    • हॉटेलसारखी चिकन दम बिर...
    चिकन दम बिर्याणी | चिकन बिर्याणी बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत | Chicken Dum Biryani/biriyani
    • चिकन दम बिर्याणी | चिक...
    Mutton Dum Biryani / मटण बिर्याणी | Mutton Biryani Recipe / mutton recipes | Biryani Recipe
    • Mutton Dum Biryani / म...
    झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा व सुक्क मटण । Kolhapuri tambda rassa & sukka mutton /kolhapuri mutton
    • झणझणीत कोल्हापुरी तांब...
    1किलो प्रमाणात सुकं काळं मटण,रस्सा आणि अळणी सूप | kaala mutton recipe |Aalni soup|Black Mutton Curry
    • 1किलो प्रमाणात सुकं का...
    नागपुर स्पेशल झणझणीत व तर्रीदार सावजी मटन | Saoji Mutton Recipe
    • नागपुर स्पेशल झणझणीत व...
    #eggbiryani #trending #andabiryani #marathirecipe #biryani #easyrecipe #food
    anda biryani recipe
    egg biryani recipe

Komentáře • 84