मॉर्निग वॉकला चाललेल्या जेष्ठ नागरिकार दोन बिबट्यांचा हल्ला l केवळ दैव बलवत्तर म्हणून वाचले l

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • #विघ्नहरटाइम्स
    दोन बिबट्याच्या हल्ल्यातून हरिदास महादू औटी बचावले.
    नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा नारायणगावच्या तांबे आळी येथील हरिदास महादू औटी (वय 78) यांच्यावर दोन बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले असून त्यांच्यावर नारायणगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हरिदास औटी हे आज (ता. 27) सकाळी पावणेसहा वाजता चालायला गेले असताना नारायणगाव -जुन्नर रस्त्यावर दरंदाळेमळा या ठिकाणी उसातून दोन बिबट्या बाहेर येऊन त्यांनी हरिदास औटी यांच्या यांच्यावर झेप घेतली. अगोदर एक बिबट्या बाहेर आला त्यांनी आवटी यांच्यावर हल्ला केला आणि त्यानंतर दुसराही बिबट्या आला त्यांनी देखील यांच्यावर हल्ला केला. औटी यांच्या हातामध्ये काठी असल्यामुळे ते बिबट्याला प्रतिकार करू शकले. बिबट्याच्या हल्ला औटी यांच्या उजव्या डोळ्याजवळ जोरदार जखम झाली. दररोज याच रस्त्याला फिरायला जात असतात. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत एक कुत्रा असतो. आज त्यांच्यासोबत कुत्रा फिरायला नव्हता. दोन बिबट्याने अचानक हल्ला केल्यामुळे ओटी घाबरले. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केला तिथपासून ते आपल्या घरापर्यंत दोन किलोमीटर पायी चालत आले. घरी आल्यावर आपले नाना का झोपले अशी पुतणे दीपक औटी यांनी विचारणा केली असता बाबा म्हणाले दोन बिबट्याने माझ्यावर हल्ला केलाय. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दीपक आवटे यांनी त्यांना तात्काळ नारायणगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून त्यांना नारायणगाव येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्या प्रकृती मध्ये सुधारणा होत असल्याचे डॉक्टर अमेय डोके यांनी सांगितले. ते म्हणाले की, केवळ नशीब बोललो तर म्हणून त्यांचा डोळा वाचला आहे. दरम्यान औटी यांना हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरज वाजगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट देऊन प्रकृतीची विचारपूस केली.

Komentáře • 23