Chhatrapati Sambhaji Maharaj 🙏🚩entry status

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 02. 2024
  • छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांत कोरलं गेलंय यात काही वादच नाहीये. त्यांचा इतिहास त्यांची कारकीर्द संपूर्ण जगाला माहितीये. मात्र आज आपण संभाजी राजे यांच्याविषयीचा इतिहास आज जाणून घेणार आहोत. आज त्यांची पुण्यतिथी आहे. इतिहासातून अनेक व्यक्तींचा उल्लेख नामशेष होत चाललेला आहे. त्यामुळे अनेक थोर पुरुषांचे आपल्याला इतिहास देखील माहीत होत नाही आणि त्यांच्या वंशजांविषयीची कल्पनाही बरेच जणांना नाही.
    संभाजी राजे यांचे पुत्र शाहू महाराज होते. शाहूमहाराजांचा मुलगा रामराजे महाराज यांना दत्तक घेण्यात आले होते. शाहू उर्फ आबासाहेब महाराज हे रामराजे महाराजांचे दत्तक पुत्र आहेत. शाहू उर्फ आबासाहेब महाराज यांना तीन पुत्र आहेत. त्यांची नावे आहेत छ.प्रतापसिंह महाराज(शाहू उर्फ जंगली महाराज दत्तक),राजाराम, छ.शहाजी उर्फ आप्पासाहेब महाराज.शहाजी महाराजांना दोन दत्तक पुत्र होते.त्यांची नावे होती छ. व्यंकोजी महाराज आणि छ. राजाराम महाराज उर्फ आबासाहेब. व्यंकोजी महाराज यांचे पुत्र छ. प्रतापसिंह महाराज तर राजाराम महाराज यांचे पुत्र शिवाजी महाराज. प्रतापसिंह महाराजांचे दत्तक पुत्र म्हणजे छ. शाहू महाराज. शाहू महाराजांना छ.प्रतापसिमह, विजयसिंह, अभयसिंह आणि शिवाजी असे चार पुत्र होते. प्रतापसिंह महाराजांचे पुत्र छ. उदयनराजे आहेत.
    अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजी महाराज अत्यंत देखणे आणि शूर होते. तसेच ते अनेक भाषांत विद्याविशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले होते. मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले
    #छत्रपती_शिवशंभु_दैवत
  • Hry

Komentáře • 13